मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे
गुजरात प्रमे स्वाभाविक होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमिका बदलायला
हवी होती. अच्छे दिन आणायचे सोडून मोदी राज्यात प्रचारात व्यस्त आहेत, अशी
टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार)
केली.
मुंबईत
वार्तालाप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य करत
काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. विधानसभा निवडणुकांचा प्रचार
थांबण्यास काही तास शिल्लक असताना राज यांनी वार्तालापाच्या माध्यमातून
आपली मते व्यक्त केली.
राज
म्हणाले, ‘‘मोदींच्या लोकसभेतील यशासाठी 25 टक्के मोदी, 25 टक्के माध्यमे
आणि इतर घटक तर 50 टक्के वाटा हा काँग्रेसचा आहे. लोकसभेची निवडणूक लढवायची
नव्हती, पण काही कारणास्तव लढवावी लागली. आमच्या विकास आराखड्याला
महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेची
निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असं माझं
मत आहे. राज्यांना स्वायत्तता मिळायला हवी या बाबतीत मी आग्रही आहे.
राज्यांना त्यांच्या विकासाचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळायलाच हवेत. सत्ता
आल्यास राज्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे.‘‘
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें