मुंबई
- नगर जिल्ह्यातील जवखेडा (ता. पाथर्डी) येथील दलित हत्याकांडाप्रकरणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जवखेडा
गावामध्ये संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांची हत्या
करण्यात आली होती. यांच्या नातेवाईकांची राज ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली
होती. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जवखेडा हत्याकाडांची वेगाने
चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांना बळ आणि त्यांचे मनोबल
वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही केले.
या
भेटीत राज ठाकरे यांनी ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये, तर अंतिम दर तीन
हजार रुपये द्या, अशी मागणी केली. महाराष्ट्राला पर्यटनदृष्ट्या समृद्ध
करण्याची मागणी करत पर्यटनाबाबत आम्ही प्रेझेंटेशन सादर करू, असेही त्यांनी
मुख्यमंत्र्यांना सांगितले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने अनेक
कामे रखडली असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें