मुंबई
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हिला
अपघात झाल्याने राज यांचा राज्यव्यापी दौरा लांबणीवर पडला आहे. उर्वशीच्या
प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही पत्नीसह
हिंदुजा रुग्णालयात गेले होते.
विधानसभा
निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबरपासून आपला राज्यव्यापी दौरा
आयोजित केला होता. काल (ता.1 ) त्यांनी नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे
झालेल्या दलित हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेट दिली. या
संदर्भातील चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे मुंबईत परतले होते.
मात्र, रविवारी रात्री उशिरा राज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला एस. व्ही.
रोडवर अपघात झाला. उर्वशीला माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. तिच्या पायाचे हाड तुटले असून, चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. सध्या
तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या
घटनेमुळे राज यांचा पुढील दोन-तीन दिवसांचा दौरा लांबणीवर टाकला आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर राज यांनी राज्यव्यापी दौरा
सुरु केला आहे. आज (मंगळवार) ते कल्याण-डोंबिवली येथे जाणार होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें