मुंबई- डोंबिवलीत
निर्माण झालेल्या फेरीवाल्यांच्या समस्येवर शिवसेना आक्रमक झाल्यानंतर
मनसेनेही मुंबईत हा मुद्दा उचलून धरला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास
टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मनसेच्या माजी नगरसेवकांनी घेराव घालत ही
कारवाई त्वरित आणि कडक करावी अशी मागणी केली आहे. परंतु जर पोलीस
संरक्षणाच्या नावाखाली ही कारवाई करता येत नसेल तर, मनसैनिक महापालिकेच्या
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहील, महापालिकेच्या
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मनसे घेईल, असा शब्द माजी नगरसेवकांनी
दिला आहे.
दादर-माहीममधील नागरिकांना होत असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा त्रास लक्षात घेत मनसेच्या माजी नगरसेवकांनी महापालिका उपायुक्त आनंद वाग्राळकर यांना गुरुवारी सकाळी घेराव घातला. एफ दक्षिण विभागाच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. आनंद वाग्राळकर हे कधीही सामान्य नागरिकांना भेटत नाहीत. तसेच या विभागातील फेरीवाल्यांवरही ते कडक कारवाई करत नाहीत, असा आरोप करत उपयुक्तांना धडा शिकवण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, सुधीर जाधव आणि विरेंद्र तांडेल यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आनंद वाग्राळकर यांना भेटण्यास गेले होते. यावेळी त्यांनी आनंद वाग्राळकर यांना घेराव घातला. वाग्राळकर यांनी आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात धडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मनसेच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले.
मात्र ही कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा या माजी नगरसेवकांनी दिला. महापालिकेकडे अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा यंत्रणा नसल्यास मनसेच्या वतीने ती उपलब्ध करून देण्याची तयारीही धुरी यांनी दर्शवली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें