प्रभादेवी
: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला 14
जून रोजी मुंबईतील 36 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना एक दिवस पेट्रोल 4
रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मनसेच्या वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष
धुरी यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत दादर, वरळी नाका, वडाळा, शिवडी, भायखळा, ताडदेव, मलबार हिल, भांडुप, कालिना, विलेपार्ले, अंधेरी, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, दहिसर, मुलुंड, विक्रोळी, वाशी नाका, मुंबादेवी, कुलाबा, कुर्ला आदी पेट्रोल पंपांवर पेट्रोल त्या दिवसाच्या दरांपेक्षा चार रुपयांनी स्वस्त मिळणार असल्याचे धुरी यांनी सांगितले.
ही सवलत फक्त दुचाकीस्वारांसाठी असून 14 तारखेला मध्यरात्री 12 वाजल्यापासून दिवसभरात कधीही पेट्रोल भरू शकतात. त्या दिवशी पेट्रोलचा जो दर असेल त्याप्रमाणे दुचाकीस्वारांनी भरलेले पेट्रोलचे प्रति लिटर 4 रुपयाप्रमाणे होणारे पैसे मनसैनिक भरणार असल्याची माहिती धुरी यांनी दिली.
पेट्रोल पंपांवर गर्दी होणार
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना मिळणारी भेट आणि सध्याचे पेट्रोलचे भडकलेले दर पाहता ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें