मुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या
पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस
पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा
गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि
इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी
राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न
केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.
आणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला. 'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक, उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें