बुधवार, 31 जुलाई 2013
... तर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मनसे स्टाईलने विरोध!
शनिवार, 20 जुलाई 2013
मुंबई - लखनभैया बनावट चकमक प्रकरणी
न्यायालयाने पोलिसांना सुनाविलेल्या जन्मठेप प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेना (मनसे) पोलिसांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले.
छोटा
राजनचा हस्तक असलेल्या रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैयाच्या बनावट चकमकीच्या
खटल्यात दोषी ठरलेल्या 13 पोलिसांसह 21 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने
जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिस अधिकारी प्रदीप शर्माच्या पथकाने 11
नोव्हेंबर 2006 रोजी लखनभैयाला वर्सोव्यात नाना-नानी पार्कमध्ये बनावट
चकमकीत ठार केले होते. मात्र, शर्माच्या विरोधात पुरेसा पुरावा नसल्यामुळे
त्यांची न्यायालयातून सुटका झाली. चकमकीचे नेतृत्व तत्कालीन पोलिस निरीक्षक
प्रदीप सूर्यवंशीने केले होते. शिक्षा झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी
राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
याविषयी बोलताना
राज ठाकरे म्हणाले, ''पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकारने
पोलिसांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे. लखनभैया हा साधुसंत नव्हता. या
प्रकरणी आम्ही पोलिसांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना आम्ही सर्वप्रकारची
मदत करू. या प्रकरणातून सर्व पोलिस सुखरूप बाहेर पडून पुन्हा कामावर रुजू
होतील अशी माझी इच्छा आहे.''
|
राजचा पोलिसांना पाठिंबा
| |
शनिवार, 20 जुलै 2013 - 12:27 PM IST
| |
रविवार, 14 जुलाई 2013
सोमवार, 24 जून 2013
... नाहीतर माझ्याशी केलेली चर्चा उघड करेन - राज ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीच्या महायुतीमध्ये येणार का, हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यावरील एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज ठाकरे यांनी युतीतील घटक पक्षांवर हल्लाबोल केला. माझ्या पक्षामध्ये सगळे निर्णय मीच घेतो. त्यामध्ये बाहेरच्या कोणीही चर्चा करायची गरज नाही. माध्यमांनाही आता या विषयावर चर्चा करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. याच्यापुढे कोणीही या विषयावर चर्चा केली, तर माझ्याशी काही नेत्यांनी ज्या काही गोष्टींची चर्चा केली आहे, ती उघड करावी लागेल. असेही त्यांनी सांगितले.तसेच नाशिक महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी आणि नगरसेवकांशी नाशिकच्या विकासासंबंधी चर्चा केली
गुरुवार, 13 जून 2013
'स्वतःच्या स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे हेच ठाकरे कुटुंबीयांचे काम' -नवाब मलिक
तरुणांना कायदा मोडायला लावण्यास उद्युक्त केल्याबद्दल राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी टीका
केली. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तरुणांचे आयुष्य उदधवस्त करणे, हेच
काम ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.
रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा केंद्रावर हल्लाबोल करून परीक्षार्थीना मारहाण केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर गुरुवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्ला चढवला. हा हिंसाचार झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो आणि आपला या हिंसाचारामागे हात नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
तरुणांना भडकावून त्यांना तोडफोड करण्यास प्रवृत्त करायचे आणि नंतर आपला त्यात काही संबंध नाही, असे सांगून खटल्यातून बाहेर पडायचे, हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे पहिल्यापासून धोरण असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला लावायचा आणि नंतर त्यांना एकटे सोडून आपण बाहेर पडायचे, हेच या पक्षांच्या नेत्यांचे काम असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले

बुधवार, 12 जून 2013
वाढदिवस साजरा न करण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन
|
| |
|
गुरुवार, 13 जून 2013 - 12:30 AM
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन अद्याप एक वर्ष न
झाल्याने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी केले आहे. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत हा आदेश
पोहोचविला असून वाढदिवसानिमित्त कोणत्याही जाहिरातबाजीस मनाई करण्यात आली
आहे.
राज यांचा शुक्रवारी (ता.14) वाढदिवस आहे. या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली जाते; तसेच विविध कार्यक्रमही होतात; परंतु बाळासाहेबांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेलो नसल्याने वाढदिवस साजरा करणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याचे आवाहन त्यांनी युवासैनिकांना केले आहे | |
सदस्यता लें
संदेश (Atom)