बुधवार, 9 मार्च 2016

पुणेकरांनी सत्ता दिल्यास वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य - राज ठाकरे

मुंबई - ‘पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपी सक्षम करायला हवीच; पण केवळ या एकाच मुद्‌द्‌यावर अवलंबून न राहता सायकल ट्रॅक, रस्ते, बीआरटी आदी घटकांचाही विचार करायला हवा. त्यासाठी पुणेकरांनी सत्ता दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुकीला प्राधान्य देणारा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल,‘‘ असा निर्वाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मनसेच्या दशकपूर्तीनिमित्त  संवाद साधताना ठाकरे यांनी पुण्याच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना, पक्षाचे पुण्यासाठीचे नियोजन, सद्यस्थिती यांचा आढावा घेतला; तसेच स्मार्ट सिटी, रिंग रोड, मेट्रो, जायकाचा प्रकल्प, महापालिकेतील कार्यपद्धती आदींबद्दलही त्यांनी चर्चा केली.
ठाकरे म्हणाले, ‘विरोधासाठी विरोध ही माझी भूमिका नाही; तर चुकीच्या गोष्टींना विरोध असेल. स्मार्ट सिटी करायला हवीच; पण महापालिकेसारखी यंत्रणा असताना, नव्या कंपनीची गरजच काय? त्या "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप आहेत. मनसेने ते सादर केले आहेत. महापालिकेच्या कारभारात राज्य सरकारने विनाकारण ढवळाढवळ करू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.‘‘
‘जे शहराच्या उपयोगाला येणार, त्याला माझा विरोध कधीच राहणार नाही; पण छुपा अजेंडा असता कामा नये. तो असेल तर कडाडून विरोध करेन. रिंग रोड एवढ्यासाठी बांधायचा, कारण बाजूची जमीन मला विकत घ्यायची आहे. असे असेल तर माझा विरोध राहील. जमिनी दामदुपटीने विकायच्या. दुसऱ्या महायुद्धानंतर आयझोनोव्हर, अमेरिकेत ट्रुमन यांनी रस्ते सरळ केले. मंदीमुळे रस्त्यांची कामे काढली; पण त्यांच्या प्रॉपर्ट्या दिसत नाहीत. पीएमपीला 12 लाख प्रवासी असूनही तोटा कसा होतो, तेच कळत नाही. मुळात वाहतुकीच्या प्रश्‍नांसाठी राज्य सरकारने मदत करायला हवी. त्याचवेळी महापालिकेतील कारभार सुधारणे गरजेचे आहे. त्याच-त्याच ठेकेदारांना वर्षानुवर्षे कामे कशी दिली जातात?‘‘
‘पुण्यातील कचरा असो, आरोग्याचा प्रश्‍न. वाहतूक हीदेखील शहराची गंभीर समस्या झाली आहे. पुण्याची वाढ अक्राळविक्राळ होत आहे. त्यात सुविधांचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिक भरडले जात आहेत. विकास आराखडाही या शहरातील राज्यकर्त्यांना करता आला नाही आणि नगरविकास योजनाही. पुणेकरांनी एकदा आम्हाला सत्ता द्यावी. पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही तयार केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करून दाखवू आणि त्यात वाहतुकीला प्राधान्य असेल,‘‘ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘पुणेकरांच्या पैशावर आयुक्तांचे सारखे परदेश दौरे कशाला? इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असताना कशाला जायचे? एक ई-मेल पाठविली तर सगळी माहिती मिळते. नाशिकमध्ये उद्योजकांच्या मदतीने आम्ही गोदा पार्कचे काम हाती घेतले आहे. रस्ते चांगले केले आहेत; पण विरोधक म्हणतात कुंभमेळ्यामुळे राज्य सरकारने केले; पण त्याची तयारी आम्ही दोन वर्षांपूर्वीच सुरू केली होती. ते लक्षात घ्यायला हवे, विनाकारण टीका होऊ नये,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘पुणे शहर म्हणजे दुचाकी वाहनांचे "डंपिंग ग्राउंड‘ झाले आहे. दुचाकी वाहन उद्योजकांची लॉबी त्यामागे काम करीत आहे. त्यामुळेच पीएमपीला सक्षम केले जात नाही आणि वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. पुणे किंवा नाशिकमधील नगरसेवकांनी शहराचे मालक असल्याचा आविर्भाव आणू नये; तर विश्‍वस्तांच्या जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. नागरिकांना सुविधा देण्याचे महापालिकेचे काम आहे. ते त्यांनी प्रामाणिकपणाने पार पाडले पाहिजे,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

Surf internet without worry of clearing browser history
- राज ठाकरे म्हणाले
- आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग नव्हे; तर वॉर्ड पद्धतच हवी
- स्मार्ट सिटीला पाठिंबा; पण "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप
- विकासाच्या योजना राबविताना त्यात सुप्त हेतू असू नयेत
- 12 लाख प्रवासी असूनही पीएमपी तोट्यात कशी?
- इंटरनेटवर माहिती असताना आयुक्तांचे परदेश दौरे कशाला?
- पुण्यात डीपी (विकास आराखडा) नाही अन्‌ टीपीही (नगरविकास योजना)
- नगरसेवकांनी मालकाची नव्हे; तर विश्‍वस्तांची भूमिका बजवावी 

मंगलवार, 8 मार्च 2016

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे



पुणे - ‘मेक इन इंडिया‘ भरवून देशात उद्योग येत नाहीत. कागदावर शब्दकोडी सोडवली जातात, उद्योग उभे राहत नाहीत. जनरल मोटर्स कंपनी गुजरातेतून महाराष्ट्रात येते, मग व्हायब्रंट गुजरात मोहिमेचा काय फायदा? "मेक इन इंडिया‘मध्ये कुठले आले दीड लाख कोटी? "शंभर दिवसांत अच्छे दिन आणीन‘ या नरेंद्र मोदींच्या घोषणेचे काय झाले? लोकांमध्ये फसवल्याची भावना आहे, मोदींचे दोन वर्षांपूर्वीचे वलय आता किती राहिलेय, असे सवालावर सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ‘ला दिलेल्या खास मुलाखतीत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

मनसेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ठाकरे यांनी दिलेल्या या मुलाखतीत पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत भावी वाटचालीबाबतची दिशा स्पष्ट केलीच, पण प्रश्‍नांना आपल्या नेहमीच्याच आत्मविश्‍वासाने, रोखठोक उत्तरे दिली. तसेच भावी राजकारणातही मराठी माणूस हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील "कृष्णकुंज‘ या त्यांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास रंगलेल्या या मुलाखतीचा हा सारांश. डिलीट केलेल्या फाइल्स परत मिळवा
प्रश्‍न - मोदींना सुरवातीला पाठिंबा आणि नंतर विरोध ही विसंगती नव्हती का?
ठाकरे - माझा विरोध भूमिकासापेक्ष असतो. गुजरातहून परतल्यावर मला प्रश्‍न पडला की मोदींनी मुखवटा उभा केला की काय? ते देश म्हणून विचार करत नाहीत. एक तर परदेशात जाणे नाही तर भाषणे ठोकणे. राज्याच्या निवडणुकांत एखाद्या पंतप्रधानाने 40 सभा घेतल्यात का कधी? बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद करायची कल्पना त्यांना सुचली. कारण मनातून गुजराती आहे ना! तुम्ही गुजरातच्या बाहेर पडलेला नाही आहात ना? दोन वर्षांत चमत्काराची अपेक्षा नाही, पण होणाऱ्या गोष्टींची झुळूक तर का नाही? "मेक इन इंडिया‘ हे मुंबईत का, दिल्लीत का नाही? अशामुळे उद्योग येत नाहीत. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात मोहिमेनंतर किती उद्योग आले? तिथली जनरल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात येते. मग तुम्ही व्हायब्रंट म्हणून उद्योग आणले का घालवले? केंद्राला कराचा एक पैसा न देता आमचे कर आम्ही वसूल करू, आणि विकास करू, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना मोदींनी घेतली होती. आज तेच पंतप्रधान आहेत. मग आता भूमिकेत बदल का? देश दिलाय तुमच्याकडे. तो पाहा ना तुम्ही.
प्रश्‍न - पक्षाची दहा वर्षांची वाटचाल कशी झाली?
ठाकरे - पक्षस्थापना अवघड असली, तरी मला आत्मविश्‍वास होता. माझ्या विकास आराखड्यात माझ्या कल्पना आहेत. सत्तेमुळे करू शकता तो विकास आराखडा झाला, संघटनेद्वारे करू शकता अशी आंदोलने झाली. "ठाकरे आंदोलन घेतो आणि अर्धवट सोडतो‘, अशी हाकाटी केली. पण असे सोडलेले आंदोलन कुणीही दाखवावे. शहरातील पाट्या मराठीत आल्या. केंद्रीय आस्थापनेत मराठी मुले का भरत नाहीत, यावर आंदोलन केल्यावर केंद्रीय मंत्र्यांना सांगावे लागले, की परीक्षा त्या त्या मुलाच्या भाषेत होईल आणि नोकरीत त्या राज्यातल्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल. कमी खर्च आलेल्या रस्त्यांना टोलची गरज नाही आणि जिथे लावला पाहिजे तिथली रोखीची पद्धत बंद करा, असा आग्रह आम्ही धरला. त्यामुळे 67 ठिकाणचे टोल बंद झाले. मोबाईलवर मराठी आवाज ऐकू येऊ लागला. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट सुरू झाले. मराठी भाषा दिवस मनसेने मोठ्या प्रमाणावर साजरा करायला सुरवात केली. आमीर खानने मराठी शिकली, अमिताभने भाषणाची सुरवात मराठीतून केली, हे मोठे यश होते.
प्रश्‍न - आंदोलनाची पद्धत हिंसक, खळखट्ट्याक असल्याने या मुद्द्याला सहानुभूती असणारेही नाराज झाले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन योग्य ठरले नसते का?
ठाकरे - अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाचे काय झाले? शांततापूर्ण मार्गाच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या, रेल्वे बोर्डापासून दिल्लीपर्यंत निवेदने दिली, यानंतरही पाच-पाच लाख परप्रांतीय मुलाखतीसाठी येत असतील, तर असे आंदोलन का करू नये? त्यांना काय आम्ही गुलाबाचे फूल द्यायला हवे होते? टॅक्‍सीचालक पोलिसांना मारू लागले, महिलांशी घाणेरडे वागायला लागले, अरेरावी करू लागले, तो लोकांच्या मनातला उद्रेक बाहेर पडला. हजारो अनधिकृत टॅक्‍सी-रिक्षा आम्ही पकडून दिल्या. त्या सरकारला तोडाव्या लागल्या. कायदा मोडणाऱ्यांसाठीचा कायदा आम्ही मोडला.


प्रश्‍न - शहरी तोंडावळ्याचे, एका विशिष्ट गटांचे प्रश्‍न आपण मांडले, राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत भिडणाऱ्या मूलभूत समस्यांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे का?
ठाकरे - फक्त 10 वर्षांत सगळेच माझ्याकडून कसे मागता? माझ्या हातात राज्य आल्याशिवाय या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत. दुष्काळासंदर्भात काय पावले उचलता येतील त्यावरही अनिल शिदोरे सध्या काम करीत आहेत.
ग्रामीण युवकांची स्वप्ने शहरात दडलेली आहेत. शहरीकरणाचे प्रमाण वाढत असून, ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. शहराचा ताण वाढतो आहे. शहरे कोसळली तर सगळे कोसळून जाईल तुमचे. तुम्ही मूळच्या करदात्याला फसवता आहात. माणसे वाढताहेत म्हणून त्याला पाणी कमी दिले जाते आहे.

प्रश्‍न - शहरीकरणाची समस्या ही अतिकेंद्रीकरणाची असून, शहरीकरण तीन-चार शहरांतच एकवटले आहे. त्यावर मार्ग काय?
ठाकरे - महाराष्ट्रातील माणसाची सोय लावा प्रथम. गुजराती राहतात इथे आणि धंदा करतात गुजरातमध्ये. यांची ओझी आम्ही का वाहायची? शहरांचे विकेंद्रीकरण झाले तरी जिकडे गूळ दाखवाल तिकडे बाहेरचे डोंगळे येणारेत. जे कराल ते मराठी माणसाच्या हातात राहणार आहे का? विकेंद्रीकरण ही प्रक्रिया आहे. ती होतेच.

प्रश्‍न - मनसेला सुरवातीच्या काळात मिळणारा प्रतिसाद सातत्याच्या अभावाने कमी झाल्याचे निरीक्षण मांडले जाते. आपले मत काय?
ठाकरे - आपल्याकडे मतदानाचे आकडे, सभांची गर्दी यावर यशापयश मोजले जाते. 60 वर्षे राज्य केलेल्या पक्षाचे काय झालेय? माझी फक्त दहा वर्षे झालीत, प्रत्येक पक्षाला हे चढउतार येत असतातच.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही.

प्रश्‍न - नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अनुभव काय?
ठाकरे - गोदापार्क, बोटॅनिकल गार्डनसारखे उपक्रम पाहा, रस्ते पाहा. कुंभमेळ्याच्या तरतुदीमुळे विकास झाला नाही तर तो आम्ही केला. कर्ज काढले आम्ही, तीन वर्षांपूर्वी निविदा काढल्या आम्ही. नुसत्याच टीकेला अर्थ नाही, शाबासकीची पाठही थोपटा.

प्रश्‍न - हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही घेणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
ठाकरे - मला हिंदुत्वाबद्दल विचारले तेव्हा "मी हिंदू आहे‘, असे उत्तर दिले. पक्षाच्या झेंड्यातला भगवा हिंदूंचा, निळा दलितांचा आणि हिरवा मुस्लिमांचा. पण माझ्या मनातला मुसलमान अमजलअली खान, झाकीर हुसेन हे आहेत, भेंडीबाजार, बेहरामपाडा, भिवंडीतील मुस्लिम नाही. ओवेसींनी काढलेल्या मोर्च्यात महिला पोलिसांना मारहाण झाल्यानंतर त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरेच होता. तेव्हा का यांच्या शेपट्या आत होतात? धर्मांध समोर येतील तेव्हा त्यांच्यासमोर उभा राहणारा राज ठाकरेच असेल. वाटेल ते सहन करणार नाही.
Android फोन slow झालाय ? हे करा  

गुरुवार, 3 मार्च 2016

अब की बार, डान्स बार - राज ठाकरे

मुंबई - डान्स बारबाबत मुख्यमंत्री महोदयांचा गृहपाठ कमी पडला की तुमची इच्छाशक्ती नाही? की तुमचे बारमालकांबरोबर काही संगनमत झालय? आम्हाला एकच समजते अब की बार, डान्स बार, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मनसेच्या ट्विटर अकाउंटवरून राज्यात पुन्हा डान्स बार सुरु करण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. डान्स बारला परवाना देण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या विशिष्ट अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवित सरकारची कोंडी केली होती. 

राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना 2013 मधअये विधानसभेने एकमुखाने निर्णय घेऊन डान्सबार वर बंदी आणली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य सरकारनी गृहपाठ नीट केला नाही आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही. आता काय झाल मुख्यमंत्रीमहोदय. सरकार जितकी आस्था डान्सबार सुरु होण्याबाबत दाखवते, तशीच त्यांनी इतर विषयांवरही दाखवली तर जनता त्यांना मनापासून दुवा देईल. अच्छे दिन डान्सबार मालकांचे आल्याचे हे लक्षात आले आहे. संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेला भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काय करते हे पहावे लागेल.
 
 

बुधवार, 24 फ़रवरी 2016

नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे

मालवण - "एकवेळ पूर्वीचे कॉंग्रेसचे सरकार परवडले; मात्र सध्या सत्तेत असलेले सरकार भयानक आहे. या सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जनतेला फक्त भूलभुलैया दाखविला. त्यांनी जनतेची फसवणूक केलीच; पण मीसुद्धा त्यांच्या थापांना बळी पडलो,‘‘ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केले. 

ठाकरे सध्या मालवण दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी (ता.25) आंगणेवाडी यात्रेला जाणार आहेत. आज त्यांनी तारकर्लीतील पर्यटनाचा आनंद घेतला. पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. सध्याच्या सरकारबाबत विचारले असता, पूर्वीचे सरकार परवडले, असा उपरोधिक टोला मारला. ते म्हणाले, ""सध्याचे सरकार अपरिपक्व आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. मोदी यांनी तर जनतेला भूलभुलैया दाखविला. मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही त्यांनी तिथल्या काही कल्पना दाखविल्या. माझाही त्यावर विश्‍वास बसला होता; मात्र गेल्या दीड वर्षाचा कारभार पाहता त्यांच्या थापा उघड झाल्या आहेत.‘‘ 

ते म्हणाले, की सध्या कोकणात जे आमदार, खासदार आहेत, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. आमच्या लोकांकडे सत्ता आली असती, तर आम्ही हे करून दाखविले असते; मात्र जनतेने आता यातून धडा घेण्याची आवश्‍यकता आहे. सी-वर्ल्डसारखा प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकला असता; मात्र राजकारणामुळे आज हा प्रकल्प अडकला, याचे खरे दुःख आहे. 

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा 

बुधवार, 17 फ़रवरी 2016

मोदी गुजरातमधून बाहेर आलेच नाहीत-राज

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून अद्याप बाहेर पडलेच नाहीत. मला वाटलेले देशाचा विचार होईल, पण तसे होत नाही. भाजप सरकार फक्त दिखावूपणा करण्यात हुशार आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले - 
- चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्यानंतर आता तो बदलण्यात आला. अशी बोटचेपी भूमिका त्यांनी अनेकवेळा घेतली आहे.
- शिवसेनेची भूमिकाच आतापर्यंत कळली नाही
- सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे नंतर सरकारविरोधी धोरणांबद्ददल बोलायचे आणि नंतर लोकांना दायवायचे की आम्ही सरकारमध्ये आहेत आणि विरोधी पक्षातही आहोत
- मेक इन इंडियाचा अर्थच मला आतापर्यंत लागला नाही
- गुजरातमध्ये सिंह प्रसिद्ध असल्यानेच मेक इन इंडियाचा लोगोमध्ये सिंह आहे.
- निव्वळ एमओयूवर सह्या होणे म्हणजे उद्योग येणे असे नाही
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर अमाप खर्च करण्यात आला 
- मोदींना दर दोन महिन्यांनी असा एखादा कार्यक्रम घ्यावा लागतोच 
- या कार्यक्रमात नशीब फक्त आगच लागली. स्फोट नाही झाला. 
- उच्च न्यायालयाने सांगूनही यांनी काही ऐकले नाही. भाजप सरकार दिखावूपणा करण्यात व्यस्त आहे
- देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे, परदेशातील उद्योगपतींना आमंत्रण देऊन काय उपयोग?
- गुजरात आणि मुंबई यातून ते बाहेरच पडत नाही. मेक इन इंडिया मुंबईतच का घेतले, दुसऱ्या शहरांमध्ये असा कार्यक्रम का घेतला नाही?
- मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेनच का करण्यात आली?

भाजपविरोधात बोलले की देशद्रोही
देशविरोधी कारवाई करत असतील त्यांना अटक करा. भाजपविरोधात बोलले की देशद्रोही ठरविण्यात येते. तर, त्यांच्या बाजूने बोलले की देशप्रेमी ठरविण्यात येते. काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करताना भाजपला लाज वाटली नाही का. त्यांनी भारताविरोधात आंदोलने केली होती, पाकिस्तानचे झेंडे फडकाविले होते, यामध्ये फक्त राजकारण करण्यात येत आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपने देण्याची गरज नाही.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा 

रविवार, 7 फ़रवरी 2016

तेच आता गांधी कुटुंबावर घसरले- राज ठाकरे

पुणे - भाजपचे लोक पूर्वी कॉंग्रेस पक्षाला संसदेत काम करू देत नव्हते. कॉंग्रेस काम करू देत नाही म्हणून तेच आता गांधी कुटुंबावर घसरले असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कसबा विभाग मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी मनसेचे कसबा विभाग प्रमुख आशिष देवधर यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन असल्याने शाळांमध्ये जाऊन चारऐवजी दहा मान्यवरांना पाठवून मराठीचे महत्त्व पटवून सांगण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्याचे देवधर यांनी सांगितले. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अनिल शिदोरे, दीपक पायगुडे, अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे यांसह मनसेचे नगरसेवक उपस्थित होते. 

हेल्मेट सक्तीबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘हेल्मेटसक्ती म्हणजे सत्तेत आल्यानंतरचे शहाणपण आहे. माणसांचा जीव वाचावा असे जर या सरकारला वाटत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण त्याआधी रस्ते चांगले आहेत का? तसेच हेल्मेट घातल्याने हॉर्न ऐकायला येत नाही. वाहन चालवताना त्रास होतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग सक्ती कशाला?’’

गांधी कुटुंब संसदेत काम करू देत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याचे मी आजच वाचले. आधी सर्व गोष्टींना विरोध करायचा. आता कॉंग्रेस काम करू देत नाही म्हणून टीका करीत आहेत. 
- राज ठाकरे 

शनिवार, 9 जनवरी 2016

राज ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व कार्डचे सूतोवाच

मुंबई - विकास आणि मराठीच्या अजेंड्यावर यश मिळत नसल्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता हिंदुत्वाचा पट मांडणार आहेत. तसे संकेतच त्यांनी आज दिले. ‘मी हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी उभा राहणार,’ असे सांगत त्यांनी राजकरणात स्थिरस्थावर होण्यासाठी नवा डाव मांडण्याची तयारी दाखवली.

रुईया महाविद्यालयातील जाहिरात व पत्रकारिता विभागाच्या कार्यक्रमात राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग का, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला असता राज म्हणाले, ‘तो रंग भारताला मानणाऱ्या मुस्लिमांसाठी आहे. अमजद अली खान यांच्या सरोदसाठी व झाकिर हुसेन यांच्या तबल्यासाठी तो हिरवा रंग आहे. भिवंडी आणि बेहराम पाड्यासाठी तो हिरवा रंग नाही, अशी भूमिका मांडली. हिंदुत्वाबाबत तुमचा स्टॅंड काय, यावर त्यांनी राजकारणात नवी चाल खेळणार असल्याचे संकेत दिले. ‘मी हिंदू आहे. धर्मांतर केलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वासाठी उभा राहणारच,’ असे सांगात मुंबईतील मुस्लिम संघटनांच्या मोर्चात महिला पोलिसांना मारहाण झाली होती. त्यानंतर मी मोर्चा काढला होता. तेव्हा सर्वप्रथम माझ्या पक्षाने विरोध केला होता, असे सांगत त्यांनी भावी वाटचालीचे संकेत दिले.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा