बुधवार, 17 मार्च 2010

महेश भटला हिसका दाखवू - राज

महेश भटला हिसका दाखवू - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 18, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खंडणीच्या खोट्यानाट्या प्रकरणात अडकविण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता. आता हा महेश भट एकदा माझ्या बेचकीत येऊ दे, मग मी त्याला हिसका दाखवितो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

मनसेचे सरचिटणीस व संपादक शिरीष पारकर यांच्या "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' या पाक्षिकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते सीएसटी स्थानकात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. मनसेच्या अकरा कार्यकर्त्यांना खंडणीच्या प्रकरणात अटक झाल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, की खंडणी मागण्यासाठी अकरा जण लागतात का? आमच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोट्यानाट्या केसेस टाकण्यात आल्या आहेत. त्या चित्रपट निर्मात्याच्या चित्रपटात परदेशी कलाकारांचा समावेश आहे. कोणी अफगाणी आहे, कोणी इराणी आहे. या कलाकारांकडे वर्क परमिट आहेत का, याची विचारणा करण्यास माझे कार्यकर्ते गेले होते, पण महेश भट यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दबाव आणून आपल्या कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीची तक्रार घेतली, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

वर्क परमिटच्या नावाखाली जर कसाब निघाला तर काय करणार, असा सवाल करताच ते म्हणाले, की यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही. सरकारलाही त्याचे काही घेणे-देणे नाही; त्यामुळे त्यांना काय करायचे ते त्यांनी करू दे. आमच्या कारवाया सुरू राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेमधील सर्व नोकऱ्या व रेल्वेचे स्टॉल्स भूमिपुत्रांनाच मिळालेच पाहिजेत, असे ठामपणे सांगतानाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक भाषेतून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केले, पण रेल्वेतील नोकऱ्यांच्या जाहिराती मात्र येथील स्थानिक वृत्तपत्रांत आल्या पाहिजेत; नाहीतर जागा तिकडे व परीक्षा इकडे असे होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें