सकाळ वृत्तसेवा
Friday, November 20, 2009 AT 06:04 AM (IST)
मुंबई - पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मराठीत चर्चा करण्यासाठी नक्कीच सहभागी होऊ, असा विश्वास समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केला. मनसेच्या आमदारांनी विधानसभेत आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेण्याला विरोध करीत त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर या विषयावरून बराच वादविवाद झाला होता.
मराठीचे शिक्षण घेण्यासाठी आझमी यांनी सध्या एका शिक्षकाकडे शिकवणी लावली आहे. रोज सुमारे तासभर ते मराठीचे धडे गिरवित असतात. वर्षभरातील शिकवणीनंतर पुढच्या वर्षी दूरचित्रवाणीवर मी राज ठाकरेंबरोबर मराठीत चर्चा करेन, असे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वीही मी मराठीची शिकवणी लावली होती. मात्र, त्यानंतर मी लोकसभेत निवडून गेल्यामुळे मराठी शिकलो नाही. आता मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठीतच बोलले पाहिजे, याची मला जाणीव झाली आहे, असे त्यांनी सांगितले
2010 madhe hi asach bolshil
जवाब देंहटाएं"पुढच्या वर्षी राज ठाकरेंशी मराठीत बोलेन "