राज ठकरे यांनी सपत्निक घेतले कुलदेवतेचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 13, 2010 AT 02:15 AM (IST)
लोणावळा - नवरात्रोत्सवातील पाचवी माळ व मंगळवार असल्याने कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या गडावर देवीच्या दर्शनासाठी असंख्य कोळी बांधवांसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह देवीची पूजा केली.
मंगळवार हा देवीचा वार असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
सकाळी साडेदहाच्या सुमारास ठाकरे यांचे गडावर सपत्निक आगमन झाले. यावेळी मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, रमेश पाटील, प्रवीण दरेकर, प्रकाश भोईर यांच्यासह मनसेचे नेते विनोद खोपकर, शालिनी ठाकरे, राज्य सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर, रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पिंजण, विजय तडवळकर, तालुकाध्यक्ष पंकज गदिया, उपाध्यक्ष सुरेश जाधव, मनविसे तालुकाध्यक्ष अशोक कुटे आदींसह मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी "बिग बॉस' आंदोलन तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें