मनसेचे रेल्वे इंजिनला निघाले प्रचाराला
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 15, 2010 AT 12:15 AM (IST)
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणूक रिंगणात मनसेतर्फे उतरलेल्या उमेदवारांनी आज सायंकाळी डोंबिवली येथील शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाची प्रतिकृती असलेला रथ तयार करण्यात आला असून, रेल्वे इंजिन आजपासून प्रचाराला निघाले आहे. प्रचार कार्यालयापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत सर्व उमेदवारांनी हातात झेंडे घेतले होते; तर गळ्यात स्कार्फ होता. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार रमेश पाटील, नेते शरद गंभीरराव, शहराध्यक्ष राजेश कदम, हरिश्चंद्र पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तयार करण्यात आलेल्या रेल्वे इंजिनाच्या प्रतिकृतीला आमदार रमेश पाटील यांनी मनसेचा झेंडा दाखवून सत्तापरिवर्तनासाठी मनसेचे इंजिन कल्याण-डोंबिवली फिरणार आहे, असे स्पष्ट केले. रेल्वे इंजिनाच्या दोन प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. मनसेचे "इंजिन' पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें