मनसेला एकहाती सत्ता द्या - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 11, 2010 AT 12:15 AM (IST)
डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीचा विकास करण्यासाठी मनसेला एकहाती सत्ता द्या. नाशिकच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीचा विकास करून दाखवतो. आम्हाला जनतेला पारदर्शक कारभार करून दाखवायचा आहे. मला जरा अजमावून तर पाहा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.10) येथे केले.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या 100 प्रभागांतील उमेदवारांची यादी अध्यक्ष ठाकरे यांनी डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉटेलात जाहीर केली. या वेळी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, रमेश पाटील, प्रकाश भोईर हे उपस्थित होते. मनसेच्या इच्छुकांच्या मुलाखती स्वत: घेतल्याचे सांगून "कोअर कमिटी'ने घेतलेल्या मुलाखती व आपण घेतलेल्या मुलाखती ज्यांना जवळपास 90 पेक्षा जास्त गुण मिळाले, अशा निवडून येणाऱ्या योग्य उमेदवारांची निवड केल्याचे ठाकरे म्हणाले.

काही उमेदवारांनी स्वत:हून इतरांना संधी देण्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे काय असतील, जाहीरनामा काय असेल, याविषयी लगेचच सगळे सांगणे योग्य ठरणार नाही. आमच्या पक्षाचा जाहीरनामा नसून "वचकनामा' असेल, असे राज यांनी या वेळी स्पष्ट केले. पहिल्यांदाच 100 उमेदवारांची मोठी यादी जाहीर करत असल्याच्या घटनेकडे राज यांनी लक्ष वेधले.
मी निवडणुका पैसा मिळविण्यासाठी लढवत नाही. मला पैशांची गरज नाही. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणही आपण करत नाही. आगरी-कोळी, ब्राह्मण, सीकेपी असे आपल्याकडे नाही. शहराचा विकास महत्त्वाचा आहे. शहरातील माणसं मोठी होतात. शहरे छोटी होत जातात, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तोच विचार या निवडणुकीच्या माध्यमातून करण्यास आमचा कार्यकर्ता भाग पाडणार आहे.
सरकारची वक्रदृष्टी असणाऱ्यांना बेघर होऊ देणार नाही.
सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकामे तोडण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. न्यायालयाला चुकीची माहिती दिली जाते. परप्रांतातून येणाऱ्यांना फुकट घरे दिली जातात. 1995 पासून बसलेल्या मराठी माणसाला बेघर करण्यात येत आहे. बिल्डर बांधून जातो. त्याला पकडणार कोण, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर खड्डे भरणे
निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम जोराने सुरू आहे. कंत्राटदाराकडून पैसे घेतल्यानंतर रस्त्यावर खड्डे नाही पडणार, तर काय होईल, असे सांगून ठाकरे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराकडूनच ते भरून घ्या, अशी अट निविदेत टाकण्याची सक्ती मनसे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'ओबामांना विचारून सांगतो'
पालिकेच्या डोक्यावरील कर्ज कसे फेडणार, सत्ता पूर्ण मिळाली नाही तर कोणाचे सहकार्य घेणार, या विषयावरचे प्रश्न तुम्ही इतरांनाही विचारा, असा सल्ला त्यांनी दिला. सत्तेसाठी सहकार्य घेण्याबाबत ओबामांना विचारून सांगतो, असे उत्तर दिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें