राज ठाकरे उद्या नाशिकला
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 15, 2011 AT 01:00 AM (IST)
नाशिक - महापालिकेच्या पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (ता. 16) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या वेळी ते विविध बैठकांत नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती सचिव व विधिमंडळ उपनेते आमदार वसंतराव गिते, शहराध्यक्ष आमदार नितीन भोसले यांनी दिली.
नाशिक हे राज्यातील प्रमुख महानगर असल्याने व येथील महापालिकेच्या निवडणुका येत्या वर्षात होत असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आलेल्या "मनसे'च्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या पक्षाच्या दृष्टीने आगामी निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. राज ठाकरे यांनी स्वतः त्यासाठी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नाशिकने "मनसे'ला दिलेली साथ लक्षात घेऊन त्यांनी आत्तापासूनच राजकीय व्यूहरचना करण्यास प्रारंभ केला आहे. कल्याण पालिकेतील चमकदार कामगिरीनंतर आता नाशिकवर "मनसे'चा झेंडा फडकावण्याचे स्वप्न पूर्ण करायचेच, असे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

येत्या बुधवारी राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सकाळी नऊला मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील वॉर्डप्रमुख, विभागप्रमुख, त्यानंतर दुपारच्या सत्रात पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः चर्चा होऊन त्यांना श्री. ठाकरे भेटतील. सायंकाळी नगरसेवक व शहर पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल. गुरुवारी (ता. 17) सकाळी नऊला नाशिक पूर्व विधानसभा व दुपारच्या सत्रात नाशिक रोड मतदारसंघातील विभाग व वॉर्डप्रमुखांची बैठक होईल. महिला, वाहतूक, रोजगार-स्वयंरोजगार आदी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतुल चांडक व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें