आता जनतेच्या न्यायालयात मागणार न्याय- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Friday, February 10, 2012 AT 01:30 AM (IST)
नाशिक
- सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे
झाले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात
न्याय मागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी केले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे आज राज ठाकरे यांच्या रोड शोद्वारे श्रीगणेशा झाला. श्री. ठाकरे यांनी "रोड शो'दरम्यान मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांना भेटी देत, मतदारांना आवाहन केले. महात्मानगर, रामवाडी, मेन रोड, पंचवटीसह विविध भागांत जोरदार स्वागत झाले. सकाळी अकरापासून सुरू असलेल्या या "रोड शो'दरम्यान दुपारी ते पत्रकारांशी बोलले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानास परवानगी नाकारल्याने मनसने उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही निर्णय कायम राहिल्याने नाशिकला "रोड शो'दरम्यान श्री. ठाकरे म्हणाले, की उच्च न्यायालयात नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मिळेल या आशेने सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती. निदान तेथे तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सगळीकडून कोंडी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणायचे नाही. आता जनतेच्या न्यायालयातच न्याय मागू.
दिवसभराच्या दौऱ्यात श्री. ठाकरे यांनी शहरातील सर्व प्रभागांतील मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला भेटी दिल्या. रोड शोदरम्यान ठिकठिकाणी जमलेली गर्दी पाहता लोकांना आकर्षित करण्याचा राज करिश्मा दिसला. रामवाडी, मेन रोड भागात शिवसेनेच्या नेत्यांच्या कार्यालयासमोर रोड शो सुरू असताना चुरसही होती
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें