गुरुवार, 29 ऑगस्ट 2013 - 03:00 AM
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीचा मुहूर्त साधत येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे थर रचायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणाऱ्या भाजपचे तोंड बंद केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांची पर्वणी साधली जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी रणनीती आखली आहे.
लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून आदित्य शिरोडकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने टी-शर्ट वगैरे वाटप करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या तीन मतदारसंघापैकी दोन कॉंग्रेसकडे; तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.
तिसऱ्या थरातून मुसंडीची तयारी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला 32.60 टक्के, भाजपला 32.15 टक्के आणि मनसेला 29.79 टक्के मते मिळाली. दक्षिण-मध्य मुंबईतही मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती (येथे कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले). दक्षिण मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसे यांच्यामध्ये मतांची थेट विभागणी झाल्याने कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांना लाभ झाला. आता मात्र दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा गड हलविण्यासाठी मनसेने तेथे अधिक ताकद लावण्याचे ठरवले आहे. एकंदर या तिन्ही मतदारसंघांत सध्या तिसऱ्या थरावर असलेल्या मनसेची विजयाचे दही चाखण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें