मुंबई
- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय
मुंडे यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
बीड
जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी
काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे
यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा
झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. धनंजय मुंडे हे वडिल पंडित अण्णा
मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच या जागेसाठी
राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें