मुंबई - विधान परिषदेच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार
धनंजय मुंडे यांनी आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट
घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
विधान परिषद निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना सर्वच पक्षाच्या आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांनी अचानक "कृष्णकुंज'वर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लगेच ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना झटका बसला असून त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची आजची भेट राजकीय नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें