- सकाळ वृत्तसेवा
Monday, April 08, 2013 AT 02:45 AM (IST)
जळगाव - मराठी माणसासाठी एकत्र येण्याची गरज असताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली लोकांची माथी भडकविण्याचे उद्योग राज्यातील आघाडी सरकारकडूनच करण्यात येत आहेत. मराठी माणसांची जाती-जातींत वाटणी करून मत विभागणीचे सरकारचेच षडयंत्र आहे, अशी सडकून टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केली. जळगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता आज जळगाव येथील सभेने झाली. सागर पार्कच्या भव्य मैदानावर झालेल्या सभेस नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर उपस्थित होते. राज ठाकरे पुढे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे अशी महाराष्ट्रातील महापुरुषांचीही जातीनिहाय वाटणी या नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी करून टाकलेली आहे, तिथे जनसामान्यांना काय गोष्ट लावली? जातीवरून माथी भडकविण्याचे काम नुसतेच सत्ताधारी करताहेत, असे नाही. सत्ताधारी आणि विरोधक मिळून हाच एक उद्योग करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने आता सावध झाले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत नाहीत, परंतु जातीचे राजकारण करण्यासाठी मात्र दोघे एकत्र येतात. महाराष्ट्रातील जनतेने विशेषत: युवकांनी जाती-पातीचे हे राजकारण मोडून काढण्याची वेळ आली आहे. सावध होण्याची वेळ आलेली आहे. इथले राजे गाफील आहेत म्हणूनच परप्रांतीयांना इथे फावते आहे. अशाच एका गाफील क्षणांत अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा बुलंद किल्ला काबीज केला होता. पुढे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात ऐक्याचा जागर केला आणि परिस्थिती बदलली. इथे उद्योग उभारायचा तर मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, अशी अट अन्य सगळ्या प्रांतांतून घातली जाते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून तसे काहीही होत नाही. महाराष्ट्र सगळ्यांना मोकळा करून दिलेला आहे आणि इथल्या तरुणांचा मात्र श्वास गुदमरतो आहे. मराठी तरुणांना नोकऱ्यांसाठी मी भांडतो तर माझ्यावर केसेस केल्या जातात. आजमितीला माझ्यावर 89 केसेस आहेत, मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मेलेल्या कोंबड्याला कसली आली आगीची भीती, असा सवालही त्यांनी केला. मुद्दाम विभागला महाराष्ट्र राज पुढे म्हणाले, ""संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्यात आले. अनेकांनी हौतात्म्य पत्करले, परंतु आज विभागनिहाय महाराष्ट्र विभक्त करण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा अस्मिता जाणीवपूर्वक रुजवण्यात येत आहेत. महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रातले प्रश्न सारखेच आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची अशी विभागणी योग्य नाही. मला एकसंध महाराष्ट्रच दिसतो. माझा मतदार संघ म्हणजे महाराष्ट्र आहे.'' मराठी मुलांना नोकऱ्या हव्याच महाराष्ट्रात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. खासगी उद्योगांतूनही त्यांना प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे. त्यांच्यासाठी मी काल लढत होतो. आज लढतो आहे आणि उद्याही लढत राहीन. तमिळनाडू, गुजरात, आसाम राज्यात तेथील स्थानिक मुलांना सर्वत्रच नोकऱ्यांत प्राधान्य दिले जाते, मग महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रात मराठीतच कारभार झाला पाहिजे. प्रत्येक दुकानाबाहेर मराठीत पाटी लागलीच पाहिजे. मराठी भाषेला महाराष्ट्रातच दुय्यम दर्जा मी खपवून घेणार नाही. गर्दीचा भ्रमनिरास! राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, जळगावच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार सुरेशदादा जैन यांच्याबाबत ते काहीतरी बोलतील, अशी जनतेची अपेक्षा होती. राज यांनी केवळ एका वाक्यात बोळवण करून लोकांची निराशा केली. कुठल्याही स्थानिक प्रश्नावर वा विषयावर ते बोलले नाहीत, यामुळे निराशा झाली, असे अनेकांनी सभेतून परतताना सांगितले. अजित पवारांना पैशांचा माज! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. राज म्हणाले, ""महाराष्ट्रातील जनता पाण्यासाठी होरपळतेय आणि अजित पवार म्हणतात, धरणात पाणी नाही म्हणून मी "मुतू' काय? त्यांना पैशाचा माज आलाय. त्यामुळेच त्यांनी अशी गलिच्छ भाषा वापरली आहे, मात्र येत्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार मत मागतील तर त्यांना हीच जनता "मूत' देईल आणि त्यांना आपल्या "मुतात' वाहूनही टाकील. जैन, खडसेंनी उधळले 95 कोटी राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे व आमदार सुरेशदादा जैन यांचा थोडक्यात समाचार ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले, नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नात सुरेशदादा भेटले, त्यांनी मला भेटण्याचा निरोप दिला, ते भेटले त्यावेळी ते म्हणाले (सुरेशदादांची नक्कल करून) विधानपरिषद निवडणुकीत मी 45 कोटी खर्च केले, नाथाभाऊनी 40 कोटी खर्च केले. खरंच एका साध्या आमदारासाठी दोघांनी 95 कोटी खर्च केले असतील तर ते दुर्दैवच आहे. आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय पण निवडणुकीत एवढा पैसा खर्च होतो. हे चित्रही तुम्हाला बदलावे लागणार आहे. |
|
रविवार, 7 अप्रैल 2013
महाराष्ट्रात परप्रांतीयांचा सुळसुळाट - राज
महापुरुषांनाही जातींमध्ये विभागले आहे : राज
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 07, 2013 AT 08:18 PM (IST)
''जातीच्या नावावर राजकीय नेते जनतेला भडकावत आहेत. वेगवेगळ्या जातींमध्ये समाजाला विभागायचे आणि सत्ता मिळवायची, हा नेत्यांचा डाव आहे. या राजकीय नेत्यांनी समाजालाच नव्हे, तर महापुरुषांनाही जातींमध्ये विभागले आहे,'' अशी टीका राज यांनी सभेत केली. जातींमध्ये दरी निर्माण करण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे एकेकाळचा संयुक्त महाराष्ट्र हा आता विभक्त महाराष्ट्र झाला आहे, असे राज म्हणाले.
...................
आणखी तपशील थोड्याच वेळात
गुरुवार, 28 मार्च 2013
भाई व क्षितिज ठाकूर यांनी घेतली राज यांची भेट
Raj Thakre Video
मुंबई - निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचे काका भाई ठाकूर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी नुकत्याच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
भाईचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. गेल्या विधानसभेची निवडणूक स्वतः न लढविता त्यांनी पुत्र क्षितिज ठाकूर यांना निवडून आणले होते. क्षितिज यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. क्षितिज ठाकूर व सचिन सूर्यवंशी यांच्यातील वादविवाद विधिमंडळापर्यंत पोचला आणि सूर्यवंशी यांना विधान भवनातच आमदारांनी मारहाण केली. मात्र, या प्रकरणात पाच आमदारांचे निलंबन आणि अटक केवळ दोनच आमदारांना का, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. निलंबन केवळ विरोधक आमदारांचेच का केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाल्यानंतर क्षितिज यांनी राज यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
- सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, March 29, 2013 AT 03:45 AM (IST)
मुंबई - निलंबित आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचे काका भाई ठाकूर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी नुकत्याच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
भाईचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. गेल्या विधानसभेची निवडणूक स्वतः न लढविता त्यांनी पुत्र क्षितिज ठाकूर यांना निवडून आणले होते. क्षितिज यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. क्षितिज ठाकूर व सचिन सूर्यवंशी यांच्यातील वादविवाद विधिमंडळापर्यंत पोचला आणि सूर्यवंशी यांना विधान भवनातच आमदारांनी मारहाण केली. मात्र, या प्रकरणात पाच आमदारांचे निलंबन आणि अटक केवळ दोनच आमदारांना का, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. निलंबन केवळ विरोधक आमदारांचेच का केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाल्यानंतर क्षितिज यांनी राज यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
बुधवार, 27 मार्च 2013
Friends ..please Subscribe to My YouTube Channel
Friends ..please Subscribe to My YouTube Channel
http://www.youtube.com/user/DONHEREATUL/videos
http://www.youtube.com/user/DONHEREATUL/videos
रविवार, 24 मार्च 2013
जनतेचा कुणीही वाली राहणार नाही - राज
- सकाळ वृत्तसेवा
Monday, March 25, 2013 AT 02:00 AM (IST)
संपूर्ण विदर्भाचा दौरा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या दौऱ्याची सांगता रविवारी (ता.24) अमरावतीमधील सभेने झाली. या सभेने अमरावतीतील गर्दीचे सारे उच्चांक मोडीत काढले. यापूर्वी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने जिल्ह्यात तुलनात्मक चर्चाही सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राज्यातील सरकारने इतक्या घाणेरड्या गोष्टी करून ठेवल्या आहेत की, त्यापैकी नेमक्या किती गोष्टी अमरावतीत जनतेपुढे मांडायच्या, असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. सिंचनाच्या मुद्द्यावर त्यांनी विविध पुराव्यांचा हवाला देत 70 हजार कोटी रुपये गेले कुठे?, हे विचारण्याची वेळ आता आली असल्याचे सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वीज, पाणी, शेती आदी विषयांवर मत व्यक्त केले आहे. हे करायचेय, ते करायचेय, असे ते सांगत आहेत. परंतु, इतक्या वर्षांपासून सत्ता यांच्या हातात असताना सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण राहिलेच कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेल्या 14 वर्षांपासून पाच मोठी खाती आहेत. तरीही आज विदर्भाची ही स्थिती आहे, असा आरोप करीत विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.
2009 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी या सरकारने 25 हजार 856 कोटी किंमत असलेले सिंचन प्रकल्प मंजूर केले आणि कंत्राटदारांना आगाऊ पैसेदेखील दिले. हे पैसे राज्यकर्त्यांच्या खिशात जात असून, यांच्याकडूनच मराठवाडा आणि विदर्भ भकास केला जात असल्याचा आरोप श्री. ठाकरे यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील एका वीज प्रकल्पामुळे सिंचन आणि पिण्याचे पाणी जाणार असेल, तर उद्यापासून आंदोलने झालीच पाहिजेत, असे आव्हान त्यांनी केले.
विधानभवनात पोलिस उपनिरीक्षकाला झालेल्या मारहाणीत मनसेचा आमदार असला तरी कारवाई कठोर झालीच पाहिजे, असे सरकारला मी सांगितले. सरकारने पाच आमदारांना निलंबित केले. परंतु, गुन्हे फक्त दोघांवर दाखल केले. विशेष म्हणजे, त्या मारहाणीत 15 ते 20 आमदार असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतःचे आमदार वाचवले. अर्थसंकल्पाला विरोध होऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मुळात पोलिसांवर हात उगारणेच चुकीचे आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी अमरावती येथील सभेतही केला.
बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असताना विदर्भात परप्रांतीयांना नोकरीच्या संधी दिल्या जात आहेत. पण, इथले लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतून 1379 मुली पळवल्या गेल्या. त्यापैकी 886 मुलींचा शोध लागला. पण, इतर मुलींचे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही. तरीही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील राज्यात सगळे आलबेल असल्याचे सांगत असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मध्यंतरी ज्येष्ठ उद्योजक रनत टाटा यांच्यासोबत झालेल्या भेटीत ताडोबात "रिसॉर्ट' काढण्याची विनंती त्यांना केली. ताडोबात वाघ दाखविण्याचेदेखील पैसे मिळतात, हे जेव्हा कळेल तेव्हा वाघांच्या हत्या बंद होतील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्यात एक जागा अशी नाही की, जी चांगली राहिली. या सरकारच्या काळात सगळं बरबटल्याचा आरोप त्यांनी केला. पिण्याच्या पाण्याचा नियमभंग कोणी केला, शेती पिकाला भाव का नाही, चांगले शिक्षण का नाही, असा प्रश्न राज्य मंत्रिमंडळाला विचारीत पिण्याच्या पाण्याचा भंग कोणी केला, शेती पिकाला भाव का नाही, चांगले शिक्षण का नाही, असा मुद्दा उपस्थित करीत राज्य मंत्रिमंडळ याचे उत्तर देणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. प्रत्येकाचा भंग राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार करणार आणि हेच हक्कभंग आणणार. किती वर्षे हे करायचे ते सांगा? इतके राजकीय पक्ष आले आणि ते तसेच निघाले. पण, राज ठाकरे तसा नाही. त्याचा स्वीकार करा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला सरकार भाव देत नाही. त्यामुळे कृषिमालाला भाव नाही. जनतेच्या समस्यांनादेखील किंमत नसल्याचा आरोप त्यांनी केल्या. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गो-शाळा सुरू करायच्या असल्याचे सांगत "आमची पिल्लं' कसायांकडे जाता कामा नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
सभेच्या व्यासपीठावर आमदार बाळा नांदगावकर, आमदार प्रवीण दरेकर, मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, अरविंद गावंडे, रिटा गुप्ता, पप्पू पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आदी उपस्थित होते.
मी जणू काही इनडोअर प्लांटच
राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर विदर्भाचा दौरा केला. चंद्रपुरातून आल्यानंतर डॉक्टरांनी दोन दिवस आराम करायचा सल्ला दिला आणि खर्डेघशी सुरू झाली. मी काही जणू "इनडोअर प्लांट' असल्यासारखा ऊन, वारा, थंडी, पावसाची तमा बाळगत नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी काही नेत्यांची टिंगलही उडविली.
...अन् राज खुर्चीवर बसले
सभेच्या सुरुवातीला मनसेच्या काही नेत्यांची भाषणे झाली. सव्वासातच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन होताच टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. राज ठाकरे बोलायला उभे राहिले. पण, गोंधळ थांबत नसल्याचे बघताच जोपर्यंत हे थांबणार नाही, तोपर्यत मी बोलणार नाही, असे सांगत परत खुर्चीवर जाऊन बसले.
गुरुवार, 21 मार्च 2013
आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक
-
Thursday, March 21, 2013 AT 11:20 AM (IST)
पोलिस निरीक्षकाला विधानभवनात मारहाण करणाऱ्या पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.
या पाचही आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारातदेखील येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई करू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर दबाव आणला होता. मात्र, या दबावाला झुगारून सरकारने विधानसभेत आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करत निलंबनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या आमदारांनी पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मंगळवारी (ता. 19) विधानभवनात मारहाण केली होती. या निंदनीय प्रकाराचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातल्या जनतेची जाहीर माफी मागत या प्रकाराचा खेद व्यक्त केला. या आमदारांवर मारहाणीबाबत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांचे निलंबन करू नये, असा दबाव सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर टाकला होता. मात्र, सरकारने हा दबाव झुगारला आणि विधानसभेत विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
काल दुपारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
रविवार, 10 मार्च 2013
सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे
-
Monday, March 11, 2013 AT 04:30 AM (IST)
राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज'वरील पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना, रिपाइंच्या वतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते उपस्थित नसल्याच्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आतापर्यंत सरकारच्या विरोधातील जलसंपदा, गृहनिर्माण आदी भ्रष्टाचार आपणच मोठ्या प्रमाणात बाहेर काढले असून, विरोधकांमध्ये कोण सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो, हे आता लोकांना कळणार असल्याचा टोला मनसेला लगाविला होता. त्याबाबत राज यांना विचारणा केली असता सकाळी जोरदार भाषण करून सायंकाळी "सेटिंग' करण्याची मनसेमध्ये पद्धत नसल्याचा भीमटोला खडसेंना लगाविला.
...
रतन टाटा यांचा आशीर्वाद
उद्योगपती रतन टाटा यांनी घरी येऊन घेतलेल्या भेटीकडे आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहत नसून त्यांच्याकडून मला मिळालेला आशीर्वाद म्हणूनच मी त्याकडे पाहत आहे. वाघांची शिकार थांबविण्यासाठी अशा अभयारण्याच्या ठिकाणी टाटा ग्रुपने हॉटेल्स काढल्यास वाघ मारण्याऐवजी वाघ दाखविणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी सूचना आपण टाटा यांना केली असल्याचे राज यांनी सांगितले.
...
दुष्काळाचे कारण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नेमलेल्या नेत्यांमुळेच राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असल्याची टीका राज यांनी केली. या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळेच दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने विकासकामेच करण्यात आली नसल्याची टीका त्यांनी केली.
...
मनसे होणार आक्रमक
मनसेच्या सर्व आमदारांची आज सकाळी 10पासूनच "कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, असे समजते. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना दुष्काळ, जलसंपदा आदी विषयांवरून सळो की पळो करून सोडण्याचा आदेश आमदारांना दिल्याचे कळते. राज्यात विरोधक म्हणून "मनसे'च्या आमदारांची वेगळी ओळख लोकांपर्यंत गेली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारला धारेवर धरण्यास या आमदारांना सांगण्यात आले आहे
सदस्यता लें
संदेश (Atom)