महाराष्ट्राचे लोकनेते,
भाजपचे लढवय्ये नेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे
अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा
श्वास घेतला. आज (मंगळवारी) सकाळी झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर आलेला
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. मुंडे यांना वाचविण्यासाठी
डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले
नाही. या वृत्तामुळे भाजपसह महाराष्ट्राला जबरदस्त हादरा बसला आहे. मुंडे
यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज गमावल्याची भावना
व्यक्त होत आहे.
सोमवार, 2 जून 2014
शनिवार, 31 मई 2014
मी विधानसभा निवडणूक लढवणार! - राज ठाकरे
लोकसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला सामोरे
गेले. यावेळी त्यांनी देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचे
विजयाबद्दल अभिनंदन केले. कोणत्याही कुबड्यांचा आधार न घेता बहुमताने सरकार
स्थापन केल्याबद्दल राज यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक केले. तसेच आपण इतर
पक्षांप्रमाणे चार भिंतीच्या आत चिंतन न करता, थेट जनतेसमोर येण्याचा
पर्याय निवडल्याचे सांगितले. लोकसभेतील विजयाचे श्रेय हे दुसऱ्या तिसऱ्या
कोणाचे नसून हे यश फक्त नरेंद्र मोदींचेच असल्याचे राज यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे वर्णन राज यांनी विरोधी पक्ष कधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी हरत असतात असे केले. यावेळी राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे अनुयायी असल्याची उपरोधिक टीका राज यांनी केली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना महात्मा गांधींच्या संदेशाचा अर्थ उमगला व त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीत हा संदेश प्रत्यक्षात आणल्याचे सांगत राज यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. लोकसभेच्या पराभवाने मी खचून गेलेलो नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी नक्कीच मुसंडी मारून दाखवेन असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.
तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवासाठी राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनसेतर्फे नाशिकमध्ये अनेक लोकोपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्य़ात अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यापुढील काळात पक्षाच्या आदेशाशिवाय कोणतेही मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचा इशारा राज यांनी सभेत दिला.

सोमवार, 26 मई 2014
"मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी...'
मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासह राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांनीही शपथ घेतली. तब्येत ठीक नसल्याने मोदी यांच्या मातोश्री हिराबा दिल्लीमधील सोहळ्यासाठी येऊ शकल्या नाहीत; मात्र, गांधीनगर येथील घरातून दूरचित्रवाहिनीवर त्यांनी हा सोहळा आवर्जून पाहिला. महाराष्ट्रातील खासदारांपैकी गोपीनाथ मुंडे आणि अनंत गीते यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मंगलवार, 20 मई 2014
स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी - मोदी
नवी दिल्ली - भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेमधील ऐतिहासिक सेंट्रल
हॉल येथे आज (मंगळवार) नव्याने निवडून आलेल्या सर्व भाजप खासदारांना
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे विशेष आभार
मानत पक्षाचे संसदीय नेते नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. माजी
पंतप्रधान व ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढत मोदी
यांनी संवेदनशील भूमिका मांडली. यावेळी अटलजी यावेळी येथे असते; तर
सोन्याहून पिवळे झाले असते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.
'मोदी यांना भाजपवर कृपा केली, असा शब्दप्रयोग ज्येष्ठ भाजप नेते अडवानींनी केला. मात्र त्यांनी असा शब्दप्रयोग करु नये, अशी माझी त्यांना विनंती आहे. माझ्या आईप्रमाणेच भाजप हीदेखील माझी आईच आहे. मुलगा आईवर कृपा करत नसतो; तर आईची समर्पित भावनेने केवळ सेवा करत असतो. ही पक्षाचीच कृपा आहे; की मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे,' अशी भावना अश्रु अनावर होत असताना मोदी यांनी व्यक्त केली.
मोदी उवाच -
- देशातील सर्व घटकांचा विचार करणारे व त्यांच्यासाठीच जगणारे सरकार आवश्यक असून ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. आज आपण लोकशाहीच्या या मंदिरामध्ये सव्वाशे कोटी देशवासीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो आहोत. ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी आपणांस स्वत:ला पूर्णत: समर्पित करावे लागेल.
- पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनंतर मी एका कार्यकर्त्याच्या भावनेमधून काम करण्यास सुरुवात केली. 15 सप्टेंबर रोजी मी हा परिश्रम यज्ञ सुरु केला व 10 मेला निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर भाजप अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना एका सैनिकाच्या भूमिकेमधून पूर्ण अहवाल सादर केला! मी केवळ एका कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून जगलो.
- गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी मुख्यमंत्री कार्यालय पाहिले व विधानसभा पाहिली. आजही असेच झाले आहे! कदाचित माझ्या आयुष्यात असेच लिहिले असेल...
- देशास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व त्यासाठी अविरत झटलेल्या सर्व महापुरुषांना मी प्रणाम करतो. मी भारताच्या संविधानकर्त्यांना प्रणाम करतो. त्यांच्यामुळेच आज येथे लोकशाहीचा विजय झाला आहे. एका गरीब कुटूंबामधून आलेली व्यक्ती आज या स्थानी उभी आहे, हेच भारतीय लोकशाही व संविधानाचे खरे यश आहे.
- या निवडणुकीमध्ये कोणाचा जय वा पराजय झाला, ही बाब आता गौण आहे. भारताच्या सामान्य नागरिकामध्येही एका नव्या आत्मविश्वासाचा संचार या निवडणुकीमध्ये झाला आहे; हेच या निवडणुकीचे खरे यश आहे. हे नवे सरकार गरीबांना, देशामधील कोट्यवधी तरुणांना, देशातील माता भगिनींना समर्पित आहे. देशाच्या प्रत्येक घटकास हे सरकार समर्पित आहे. माझ्या प्रचारादरम्यान मी एका नव्या भारतास पाहिले आहे. अंगावर एकच वस्त्र असलेल्या परंतु तरीही खांद्यावर भाजपचा झेंडा असलेल्या गरीबास मी पाहिले आहे. यामुळे भारतीयांच्या स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी आहे, हे भान ठेवून आचरण हवे.
- भूतकाळातील सरकारांनी काहीच चांगले काम केले नाही, असे मी मानत नाही. गतकाळातील सरकारांनी केलेली चांगली कामे पुढे नेणे आवश्यक आहे.
- भाजपला संपूर्ण बहुमत देण्याचा अर्थ म्हणजे देशाच्या आशा व आकांक्षांस मत असा आहे. आता जबाबदरीचा कालखंड सुरु झाला आहे.
- हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही जन्माला आलो. देशासाठी झुंजून वीरमरण पत्करण्याची संधी आम्हाला मिळाली नसेल; मात्र देशासाठी जगण्याचे अहोभाग्य आम्हाला जरुर मिळाले आहे!
- निराशा नको! 2001च्या विनाशकारी भूकंपानंतर उध्वस्त झालेला गुजरात पुन्हा एकदा नव्या जोमाने चालवायास लागला. निराशा सोडून नवी मार्गक्रमणा करावयास हवी. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांनी केवळ एक पाऊल चालले तरी देश सव्वाशे कोटी पाऊले प्रगती करेल! आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमाविणाऱ्या भारतीयांना केवळ एका संधीची आवश्यकता. या नव्या सरकारला अशा संधी पुरवायच्या आहेत.
- देशातील सगळ्यांचा विकास हवा; मात्र सगळ्यांचे योगदानही हवे.
- माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने व ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने हा देश पुढे नेऊ
- परिश्रमांची पराकाष्ठा करु व देश पुढे नेऊ. पुढील दोन वर्षांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे शताब्दीवर्ष आहे. 'आचार परमो धर्म' या उपाध्याय यांच्या जीवनमूल्याचा विकास अधिकाधिक कसा होईल,याचा विचार होणे आवश्यक आहे. भारताच्या दरिद्रिनारायणाची सेवा हेच या मूल्यांचे उद्दिष्ट आहे.
- देशातील कोट्यवधी जनतेने एका व्यक्तीस वा एका पक्षास जिंकून दिले नाही; तर भारताचे स्थान जगामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे.
- ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या खांद्यांवर बसल्यानेच मी मोठा दिसतो आहे. पक्षामध्ये पाच पिढ्या अविरत खपल्यानंतर आज हे दिवस दिसले आहेत. या सर्वांना माझे नमन आहे. या तपस्येमुळेच आज आपण सर्व येथे आहोत. संघटन हीच भाजपची ताकद आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

मोदी संसदेच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक!
नवी दिल्ली - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रथमच प्रवेश करत असलेले भावी पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन सभागृहात आले.
लोकसभा
निवडणुकीत बडोदा आणि वाराणसीमधून निवडून आल्यानंतर मोदी प्रथमच संसदेत
पोचले आहेत. तसेच त्यांची भाजपकडून भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात
आल्याने ते संसदेत पहिल्यांदाच थेट पंतप्रधान म्हणून प्रवेश करत आहेत.
यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभेत थेट मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश केला
होता.
आज सकाळी गुजरात भवनामधून संसदेत पोहचलेले
मोदी गाडीतून उतरताच पहिल्यांदा सभागृहाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले.
त्यानंतर त्यांनी नमस्कार करून संसदेत प्रवेश केला. संसदेत त्यांचे सर्व
निवडून आलेल्या खासदारांनी स्वागत केले व संसदीय नेतेपदी त्यांची निवड
करण्यात आली.
शुक्रवार, 18 अप्रैल 2014
उद्धवसोबत चर्चा होऊ शकते - राज ठाकरे
मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे कौटुंबिक मतभेद नसून राजकीय आहेत.
त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी आज दिले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते
बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच मी स्वतंत्र पक्ष काढला, माझ्या पक्षामुळे मराठी मतांत फूट पडत असल्याचे बाळासाहेब कधीही म्हणाले नाहीत, माझे राजकीय विरोधकच तसा सूर आळवतात. वास्तविक पाहता कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांनाही मराठी मते मिळत असताना मतांच्या विभागणीवर मलाच का दोष देण्यात येतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काही तात्त्विक मुद्यांवर उत्तर भारतीयांच्या विरोधात मी आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पोटावर लाथ मारून त्यांच्या हक्कांच्या नोकऱ्या कुणी बळकावत असेल तर मी गप्प का बसू. आसाम, तसेच पश्चिम बंगालमध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधात वातावरण असताना फक्त मला एकट्यालाच दोषी का धरले जाते, असा सवाल करून राज म्हणाले, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे फक्त उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यांचा गुजरातप्रमाणे विकास करावा म्हणजे आमच्या डोक्याचा ताप जाईल, यासाठीच मोदींना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे असल्याने भाजप नेते तुमचा पाठिंबा घेण्यास तयार नाहीत, या मुद्यावर बोलताना "पाठिंब्यासाठी फोन करून तेच माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे कधीही गेलो नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही
कितीही केसेस होऊ देत, ठोकशाही होणारच
टोलविरोधी आंदोलनाच्या मुद्यावर बोलताना "माझ्यावर कितीही केसेस झाल्या तरी घाबरणार नाही, सरकार ऐकत नसेल तर ठोकशाही होणारच,' अशी भूमिका राज यांनी मांडली. टोलसंदर्भात अनेक निवेदने दिली, चर्चा केल्या; परंतु काहीही हालचाल होत नसल्याने काही प्रमाणात हिंसक आंदोलने होणारच, असे सांगत टोल धोरणाला आपला विरोध नसून त्यातून जमा होणाऱ्या पैशाच्या हिशेबावर आपला आक्षेप असल्याचे राज यांनी नमूद केले. आठ वर्षांत कोणत्याही पक्षाच्या तुलनेत 13 आमदार, विविध महापालिकांमध्ये नगरसेवक असे यश मिळविले असून, अन्य पक्षांच्या तुलनेत मनसेची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येते. याच बळावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे निवडून येणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारणात मी कधीही डील केले नाही, राजकारण माझ्यासाठी "मिशन' आहे, अशा शब्दांत राज यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

सदस्यता लें
संदेश (Atom)