मंगलवार, 11 सितंबर 2012

असीमवरील देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्या!


विशेष प्रतिनिधी ,  मुंबई

गृहमंत्री आर. आर. पाटील यांना गृहखात्याचा कारभार कळत नाही, हे आपण समजू शकतो. मात्र त्यांना व्यंगचित्रेही कळत नाहीत, हे दुर्दैवी आहे. असीम त्रिवेदी या तरुणाने काढलेले व्यंगचित्र सामान्य नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करणारे आहे. त्यामुळे त्याच्यावर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. कृष्णभुवन या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत भाष्य केले. असीम त्रिवेदीने ज्या संसदेचा अपमान करणारे चित्र काढले आहे, त्या संसदेवर दहशतवादी हल्ला करणारा अफझल गुरू अजूनही जिवंत आहे. कसाबला फाशी देण्याऐवजी बिर्याणी भरवणारे सरकार आपल्या देशात आहे. अशा वेळी सामान्य माणसाला सर्व व्यवस्थेबद्दल चीड असणे  स्वाभाविक आहे. ती चीड आणि तो संताप असीमने आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केला. देशातल्या  परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें