मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 09, 2010 AT 02:39 PM (IST)
मुंबई - मुंबईतील मलेरियाचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी महानगरपालिकेची वाट न पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश, आज (सोमवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
माटुंगा येथे मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, ''मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोटे दाखवत आहे. यामुळे आता ही जबाबदारी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पार पाडतील. तसेच मलेरियामुळे झालेल्या मृतांची संख्या सांगण्याबाबतही मुंबई महापालिका दिशाभूल करीत आहे. मुंबईत वाढलेल्या मलेरियाला परप्रांतियांचे लोंढेच जबाबदार आहेत. मुंबईत येणारे लोंढे हे मतांचे गठ्ठे आहेत. ''
मुंबई झोपडपट्ट्यांची वाढत असलेली संख्या गंभीर असून, यापुढे ज्याभागात झोपडपट्टी झालेली दिसेल त्या भागातील मनसेच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें