सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 12, 2010 AT 04:54 PM (IST)
मुंबई - भारतीय जनतेच्या 'कॉमनवेल्थ'वर खासदार सुरेश कलमाडी यांनी डल्ला मारला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केली.
म्युनिचमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत नेमबाजीत ५० मीटर प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवणाऱ्या कोल्हापुरच्या तेजस्विनी सावंतने त्यांची "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. तेजस्विनीचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुरेश कलमाडींना लक्ष्य केले.
नवी दिल्लीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप कलमाडी यांच्यावर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी कलमाडींवर टिका केली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें