भाजप- 126 , शिवसेना- 70 , कांग्रेस- 32 ,राष्ट्रवादी- 40 जागांवर आघाडी .
शनिवार, 18 अक्टूबर 2014
बुधवार, 15 अक्टूबर 2014
गूगलवर राज, चौटाला लोकप्रिय
महाराष्ट्र आणि हरियाणा
विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी, १४ ऑक्टोबर रोजी
गूगलवर महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि
हरियाणासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये इंडियन नॅशनल लोकदलचे ओमप्रकाश चौटाला
सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले.
गूगलवर १४ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणाव 'सर्चिंग' झाले. महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये राज नंतर उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, भाजपचे देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आर. आर. पाटील हे नेते लोकप्रिय ठरले.

सोमवार, 13 अक्टूबर 2014
'अच्छे दिन' आणण्याचे सोडून मोदी प्रचारात - राज
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे
गुजरात प्रमे स्वाभाविक होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमिका बदलायला
हवी होती. अच्छे दिन आणायचे सोडून मोदी राज्यात प्रचारात व्यस्त आहेत, अशी
टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार)
केली.
मुंबईत
वार्तालाप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य करत
काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. विधानसभा निवडणुकांचा प्रचार
थांबण्यास काही तास शिल्लक असताना राज यांनी वार्तालापाच्या माध्यमातून
आपली मते व्यक्त केली.
राज
म्हणाले, ‘‘मोदींच्या लोकसभेतील यशासाठी 25 टक्के मोदी, 25 टक्के माध्यमे
आणि इतर घटक तर 50 टक्के वाटा हा काँग्रेसचा आहे. लोकसभेची निवडणूक लढवायची
नव्हती, पण काही कारणास्तव लढवावी लागली. आमच्या विकास आराखड्याला
महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेची
निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असं माझं
मत आहे. राज्यांना स्वायत्तता मिळायला हवी या बाबतीत मी आग्रही आहे.
राज्यांना त्यांच्या विकासाचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळायलाच हवेत. सत्ता
आल्यास राज्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे.‘‘
गुरुवार, 9 अक्टूबर 2014
वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ - राज ठाकरे
मुंबई - वेळप्रसंगी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असे
वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुती तुटल्याच्या दिवशी राज ठाकरे आजारी असल्याने रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारणा केली होती. तब्येतीची विचारपूस केली त्यात गैर काय, अशा शब्दांत उद्धव यांनी त्यांच्यातील संभाषणाची कबुलीही दिली होती. तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी "कृष्णकुंज‘वर जाऊन राज यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राज आणि उद्धव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच राज यांनी वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बुधवार, 8 अक्टूबर 2014
मंगलवार, 7 अक्टूबर 2014
...मोदी देश कधी चालविणार ?
डोंबिवली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सगळीकडे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी तळ
ठोकून आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, तर ते देश कधी
चालविणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.
येथील डीएनसी मैदानावर मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येतील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचाही प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी फिरणार आहेत का ? कारण भाजपकडे महाराष्ट्रात एकही चेहरा असलेला नेता नाही. याचा दाखला देण्यासाठी ठाकरे यांनी मोदी यांच्याच विधानाचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मुंडे असते, तर मला प्रचारासाठी येण्याची गरज भासली नसती. यावरून त्यांनी राज्यातील भाजप नेत्याची लायकीच काढली आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या, तरी मला काही फरक पडत नाही. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आयात केले आहेत. त्यांच्या नावाची जंत्रीच ठाकरे यांनी वाचून दाखविली. त्यामुळे मोदी हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या लोकांनी राज्याच्या विकासावर वरवंटा फिरविला. त्याच लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी मोदी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. हा भाजपचा प्रचार नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच प्रचार आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. राज यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची नक्कल करून सभेत एकच हशा पिकविला. खडसे विधानसभेत सहा तास बोलतात. विधानसभा ही काय प्रवचन देण्याची जागा आहे का ? त्यांची जागा आस्था चॅनेलवर आहे, असा सल्लाही राज यांनी खडसे यांना दिला आहे.

सोमवार, 6 अक्टूबर 2014
नरेंद्र मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?
मुंबईतील
मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची घाटकोपर येथे सभा झाली, या वेळी
ते बोलत होते. राज म्हणाले की, मोदींनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी
काढली आहे. "मुंढे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती,‘ असे
मोदी यांनी बीड येथील सभेत विधान केले होते. तो धागा पकडत राज म्हणाले, की
स्वतःची ताकद नसतानाही स्वबळाच्या बेटक्या भाजप फुगवत आहे. भाजपला स्वतःचे
उमेदवार नाहीत, सगळे बाहेरून आयात केलेले आहेत.
या
वेळी राज यांनी भाजपने कोणत्या पक्षांचे उमेदवार आयात केले याची यादी
वाचून दाखवली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी
जोरदार टीकास्त्र सोडले.
सदस्यता लें
संदेश (Atom)