गुरुवार, 23 फ़रवरी 2012

मोदींच्या सुरक्षाकवचाखाली नाशिकचे मनसैनिक

मोदींच्या सुरक्षाकवचाखाली नाशिकचे मनसैनिक
-
Friday, February 24, 2012 AT 03:30 AM (IST)

नाशिक - महापालिकेची सत्ता काबीज करताना स्वतःच्या "संख्याबळा'ची खबरदारी घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 40 नगरसेवक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रवाना झाले. नगरसेवकांना कुठल्या भागाची सफर घडविणार, हे "राज' गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाकवचाखाली जाण्यासाठी नगरसेवकांची बस जव्हार, मोखाडामार्गे गुजरातला रवाना झाल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीत 40 जागा मिळवून मनसे मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. नाशिकचा महापौर मनसेचाच असे जाहीर केल्यानंतर त्यादृष्टीने फिल्डिंग लागण्यास सुरवात झाली. इतर पक्षांचे पाठबळ मिळविताना आपल्याच पक्षाकडून काही दगाफटका नको म्हणून मनसेच्या नेत्यांनी 40 नगरसेवकांना सफर घडविण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी दहापासून आमदार वसंतराव गिते यांच्या भाभानगर येथील निवासस्थानावर मुक्कामाचे सामान घेऊन नगरसेवक आणि त्यांचे कुटुंबीय दाखल होऊ लागले. दुपारी साडेचारला आमदार नितीन भोसले वगळता आमदार गिते, आमदार ऍड. उत्तमराव ढिकले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत नीता ट्रॅव्हल्सच्या दोन लक्‍झरी बसमधून नगरसेवक रवाना झाले. शहराबाहेर जाण्यापूर्वी सर्व नगरसेवकांना विभागीय महसूल आयुक्तांसमोर हजर करून पक्षाची नोंदणी करण्यात आली. हॉटेल पुरोहितमध्ये जेवणाचा आस्वाद लुटल्यानंतर लक्‍झरी बस त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना झाल्या. नगरसेवकांच्या पर्यटनाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. "राज को राज रहने दो' म्हणत नगरसेवकांनीही तोंडावर बोट ठेवले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें