शुक्रवार, 31 दिसंबर 2010

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 01, 2011 AT 12:30 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 या नवीन वर्षासाठी नवा संकल्प सोडला आहे. मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने स्वतःच्या वाढदिवसाचे होर्डिंग, बॅनर कुठेही लावू नयेत; अन्यथा त्याच्याविरुद्ध पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल. आपल्याही वाढदिवसाचे एकही होर्डिंग कुणी लावू नये, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले.

नवीन वर्षाचा नवा संकल्प मांडताना राज यांनी होर्डिंगबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या वरपासून खालपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपल्या सहीचे पत्र दोन-तीन दिवसांत मिळेलच. शहराचे विद्रुपीकरण वाढत चालत आहे. रस्त्यात जागाजोगी होर्डिंगबाजी दिसून येते. शहराला होर्डिंगपासून वाचविण्यासाठी हा आपला नवा संकल्प आहे, याची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवसाची होर्डिंग चुकूनही लागता कामा नयेत, असे स्पष्ट करतानाच राज म्हणाले, की माहीत नव्हते, विसरलो, अशा फुटकळ सबबी आपण ऐकून घेणार नाही. एखाद्या समाजोपयोगी घटनेचे वा उपक्रमांचे होर्डिंग फक्त एकच दिवस लावता येईल; मात्र तो दिवस झाल्यानंतर तातडीने ज्यांनी हे होर्डिंग वा बॅनर लावला आहे, त्याने तो उतरविला पाहिजे. शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वच्छतेचे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजोपयोगी व एखाद्या उपक्रमाचे होर्डिंग लावताना विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या महापुरुांचे पुतळे अथवा फोटोंआड कुठलेही होर्डिंग येणार नाही याची दक्षता घ्या, शहरात कुठेही बकालपणा करू नका, अशा सूचना देताना राज म्हणाले, की शाळा, रुग्णालये, ट्रॅफिक सिग्नल अशा ठिकाणी मनसेचे एकही होर्डिंग वा बॅनर लागता कामा नये. एवढे सांगूनही जर कोणी असा पराक्रम केला, तर त्याच्यावर पक्षातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.

सोमवार, 27 दिसंबर 2010

दादोजींच्या पुतळ्यावरून राजकारण - राज

दादोजींच्या पुतळ्यावरून राजकारण - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 27, 2010 AT 03:39 PM (IST)
 
मुंबई - लाल महाल परिसरातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविणे हे इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेले राजकारण आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आज पहाटे दोनच्या सुमारास लाल महाल परिसरात समुह शिल्पात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महापालिकेने काढला. याबाबत राज ठाकरे म्हणाले, ''सत्ताधाऱ्यांनी नाकर्तेपणा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याचे राजकारण करण्यात येत आहे. लाल महालामध्ये दादोजींसोबत शहाजीराजेंचाही पुतळा बसवायला हवा होता. या प्रकरणी गरज पडल्यास मनसे आंदोलन करेल.''

रविवार, 26 दिसंबर 2010

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज

भारतकुमार राऊत-राजच्या मैत्रीने उद्धव नाराज
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 27, 2010 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप कार्यालयातील भेटीमुळे युतीमध्ये निर्माण झालेला तणाव निवळला असला, तरीही शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी थेट राज यांना दिलेल्या निमंत्रणानुसार ते त्यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतप्त झाले असून भारतकुमार व राज यांच्या पडद्यामागील मैत्रीचा निषेध म्हणून ते शनिवारी राऊत यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याचे समजते.

राज यांनी गेल्या आठवड्यात भाजप कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे युतीत तणाव निर्माण झाला होता. भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला; मित्रपक्ष भाजपच्या हरकतींवरून नाराज झालेल्या उद्धव यांनी आपली नाराजी जाहीरपणे बालून दाखविली; पण भारतकुमार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचे निमंत्रण थेट राज यांना दिल्याचा मुद्दा पुढे आणत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज भाजप कार्यालयात आलेले तुम्हाला चालत नाहीत; पण तुमच्या खासदारांनी त्यांना भेटून निमंत्रण दिलेले कसे चालते, असा सवालही भाजपच्या गोटातून उपस्थित करण्यात आला. राजकारणात शिवसेना व मनसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच आपल्या खासदारांचे हे "मैत्री'पूर्ण वर्तन उद्धव यांना रुचले नाही. आपण समोरासमोर टीका करायची व पुन्हा शिवसेनेचे काही नेते आपल्या जुन्या मैत्रीचे हवाले देणार, या दुटप्पीपणामुळे उद्धव नाराज झाल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध राज यांनी टीका केली होती. "एलआयसी'मध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेने युनियन स्थापन करायची, हे दाखले ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार जुन्या मैत्रीचे हवाले देतात, हा प्रकार त्यांना रुचला नाही. सध्या राजकारणाच्या प्रत्येक वाटेवर शिवसेना व मनसेमध्ये जाहीर संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या महायुद्धात भारतीय विद्यार्थी सेना व मनविसे समोरासमोर उभी ठाकली असतानाच, शिवसेनेच्या खासदाराच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नेमका कुठला संदेश जाणार, याकडेही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले आहे.

राज या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. म्हणूनच उद्धव "बीकेसी' येथे झालेल्या विवाह सोहळ्यास गेले नाहीत. त्यांच्या भूमिकेचे शिवसेनेतून स्वागत होत असून पडद्यामागून मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी मैत्री ठेवणाऱ्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना यामुळे चांगलीच चपराक मिळेल, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सोमवार, 20 दिसंबर 2010

मनसेशी युतीबाबत भाजपची चाचपणी

मनसेशी युतीबाबत भाजपची चाचपणी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 21, 2010 AT 12:34 AM (IST)
उमाकांत देशपांडे
मुंबई - शिवसेनेशी ताणले गेलेले संबंध आणि आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला इशारा देण्यासाठी राज ठाकरे यांची भाजप प्रदेश कार्यालय भेट घडवून आणली गेली. युतीबाबत चर्चा झाली नसली तरी, आगामी काळात तशी चाचपणी होणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्यांनी सूचित केले. 

मनसेशी युती करावी, असा भाजपमध्ये जोरदार मतप्रवाह असून, मनसेशी सलगी करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही प्रदेश नेत्यांना हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.
राज ठाकरे अचानकपणे भाजप प्रदेश कार्यालयात गेले आणि राजकीय चर्चेला सुरवात झाली आहे. ही राजकीय भेट नव्हती, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले असले, तरी राजकारणात सहज किंवा योगायोगाने असे काही घडत नाही. त्यामुळे अशा भेटीत राजकीय चर्चा किंवा समीकरणे जुळत नसली तरी त्यासाठी पोषक वातावरण तयार करणे किंवा शिवसेनेला इशारा देण्यासाठी या भेटीचे नियोजन झाले. भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक काल पार पडली. त्यामध्ये एकनाथ खडसेंसह अन्य वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध नाराजी व्यक्त केली. खडसेंनी तर विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेनेला उघडपणेच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडण्याचा इशारा दिला होता. खडसेंच्या मुलाचा विधान परिषद निवडणुकीत पराभव करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी मदत केली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोरांना थंड करण्यात आले नाही व भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी राज्यात प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी मनसेशी युती करण्यासाठी काही पावलेही टाकली होती; पण ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व अन्य नेत्यांनी शिवसेनेशी युती तोडू नये, अशी भूमिका घेतल्याने मनसेशी युती साध्य होऊ शकली नव्हती.
मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असून, त्यामागे भाजपची फरपट होऊ नये, असे भाजप नेत्यांचे मत आहे. शिवसेना पदरात टाकतील, तेवढ्या जागा भाजपने लढवायच्या, हे आता मान्य करू नये. एवढे वर्ष युती असली, तरी कधी ना कधी त्याचा विचार भाजपला करावाच लागेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी युतीबाबत भाजप निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आहे. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत वरिष्ठ भाजप नेत्यांनी आपली भूमिका पक्षपातळीवर काल मांडली होती. त्याच वेळी राज ठाकरे प्रदेश कार्यालयासमोरील "एलआयसी'च्या योगक्षेम इमारतीत येणार असल्याचे भाजप नेत्यांना समजल्यावर हा योगायोग साधण्याचे भाजप नेत्यांनी ठरविले. त्यामुळे राज ठाकरे यांना चहापानाचे निमंत्रण देण्यात आले व त्यांनी स्वीकारले. त्यामुळे मनसेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचे युतीमध्ये रूपांतर कधी होणार, याबाबत राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढविण्यास सुरवात झाली आहे.

रविवार, 19 दिसंबर 2010

राज ठाकरे साहित्य संमेलनाला येणार

राज ठाकरे साहित्य संमेलनाला येणार
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 20, 2010 AT 12:15 AM (IST)
 

ठाणे - ठाण्यात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजकांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कृष्ण कुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले. या वेळी संमेलनाचे प्रमुख सल्लागार मा. य. गोखले, प्रमुख कार्यवाह विद्याधर ठाणेकर आदी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आपण संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांना सांगितले. राज ठाकरे यांनी संमेलनाच्या तयारीबाबत आयोजकांशी चर्चा केल्याचे विद्याधर ठाणेकर यांनी सांगितले.

तर, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही संमेलनाला येणार असल्याचे निमंत्रण देण्यास गेलेल्या आयोजकांना सांगितले आहे. याशिवाय इतर राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही आयोजकांनी निमंत्रण दिले असून, संमेलनात साहित्यिकांबरोबर राजकीय नेत्यांची उपस्थितीही दिसणार आहे.

ग्रंथदिंडीचे उद्‌घाटनसंमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीचे उद्‌घाटन (ता. 24) खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. ही ग्रंथदिंडी जनकवी पी. सावळाराम यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

शनिवार, 18 दिसंबर 2010

राहुल गांधी बावळट असल्याची राज यांची टीका

राहुल गांधी बावळट असल्याची राज यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 19, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - हिंदूंना दहशतवादी म्हणणारा राहुल गांधी बावळट आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. डोंबिवली जिमखान्यातर्फे आयोजित "उत्सव 2010'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, आमदार रवींद्र चव्हाण, रमेश पाटील, बाळा नांदगांवकर, सीकेपी बॅंकेचे संचालक श्‍यामराव देशमुख, जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी, उत्सवचे अध्यक्ष दिलीप कुडाळकर, सचिव संजना ठाकूर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, "दहशतवादी म्हणजे काय, याचा राहुल गांधीने कधी अभ्यास केला आहे का? त्याला लष्कर ए तोयबा माहीत आहे का? त्याला लष्कर ए तोयबा विचारला तर गल्लीत खेळलेला "कोयबा'च आठवेल या शब्दात त्यांनी राहुल गांधी यांना हिणविले. कसाब डोंबिवलीतील फडके रोडला राहायचा का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. चार लोकांसमोर बोलण्याची हिंमत नाही म्हणून अमेरिका दूतावासासमोर जाऊन हे वाक्‍य तो बोलला, मात्र खरोखरच बोलला किंवा नाही, हेसुद्धा माहीत नाही. केवळ प्रसिद्धिमाध्यमांनी प्रसिद्ध केले म्हणून त्यावर विश्‍वास ठेवायचा; मात्र त्यांनाही बातमी नीट समजते का? असा टोलाही त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना लगावला.

तर आदर्श प्रकरणावर टोला मारताना त्यांनी मोकळ्या मैदानावर सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे जिमखान्याचे एवढे मोठे मैदान विकू नका. आज उद्योगपती आणि राजकारण्यांचे साटेलोटे असून ते "आदर्श'च्या रूपाने बाहेर पडत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. राज्य शासनाने ज्या सुविधा नागरिकांना देणे आवश्‍यक आहे, त्या सुविधा आज बिल्डर नागरिकांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन वर्षात नवे मुद्दे घेऊन मी तुमच्या भेटीला येईन, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी दिले. सिंधुताई सपकाळ यांनी उत्सवला शुभेच्छा देतानाच राज ठाकरे यांना गरुडासारखी झेप घे, आज सारे जग तुझ्याकडे आशेने पाहात आहे. त्यामुळे आभाळभर ओझं घेऊन तुला चालायचे आहे, असे म्हणत त्यांना आशीर्वाद दिला.

जिमखान्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 150 स्टॉल्स आहेत.

शनिवार, 4 दिसंबर 2010

राज ठाकरेंमुळे नव्हे, तर विकासामुळे पलायन थांबले

राज ठाकरेंमुळे नव्हे, तर विकासामुळे पलायन थांबले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 05, 2010 AT 12:30 AM (IST)
 
बिहार जनतेने विकासाला कौल दिला- सुशीलकुमार मोदीनागपूर- रोजगारासाठी बिहारमधून होणारे स्थलांतरण मागील पाच वर्षांत झपाट्याने कमी झाले आहे. त्यामागे राज ठाकरे यांचा बिहारी जनतेचा विरोध हे कारण नसून, एनडीए सरकारने केलेला विकास कारणीभूत आहे. बिहारमधील महिला आणि नागरिकांनी सरकारने केलेल्या विकासकामांना कौल दिला, असे प्रतिपादन बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल याच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभाकरिता सुशीलकुमार मोदी नागपुरात आले होते. हॉटेल प्राईड येथे पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार म्हणाले, कॉंग्रेसची बिहारवर तब्बल 40 वर्ष सत्ता होती, तर लालूप्रसाद यादव यांनी 15 वर्ष सत्ता उपभोगली. या काळात बिहार राज्य अतिशय माघारले; परंतु नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मागील पाच वर्षांत विकासाची प्रचंड कामे केली. बिहार गुन्हेगारीकरिता प्रसिद्ध होता. मात्र, एनडीए सरकारने मागील कार्यकाळात तब्बल 50 हजार गुन्हेगारांना शिक्षा दिली. त्यात 120 जणांना फाशी आणि दहा हजार गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली. बिहारमध्ये मुली सायकल चालविताना दिसत नव्हत्या; परंतु सरकारने नवव्या वर्गातील मुला-मुलींना सायकल खरेदीसाठी दोन हजार रुपये दिले. राज्यात 27 लाख विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे राज्यात एकप्रकारे सामाजिक क्रांती झाली. त्याच मुलींनी नंतर आपल्या पालकांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास प्रेरित केले. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याकरिता मागील कार्यकाळात विशेष योजना आखण्यात आल्या होत्या. आता तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता कपडे खरेदीसाठी 250 रुपये देण्याची योजना आखण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बिहार प्रकाशमान करणारबिहारमध्ये विजेची प्रचंड मागणी असताना उत्पादन नगण्य आहे. आगामी पाच वर्षांत संपूर्ण बिहारमध्ये वीजपुरवठा करण्याचे ध्येय आखण्यात आले आहे. त्याकरिता बिहार सरकार तब्बल तीन हजार मे. वॅ. क्षमतेचे विद्युत प्रकल्प उभारणार आहे, तर खासगी कंपन्यांकडून 30 हजार मे. वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठ्याचा करार होत नसल्याने हे प्रकल्प अडचणीत आले आहे. तेव्हा कोळसा पुरवठ्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे, असे उपमुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले.

करिश्‍मा नको; विकास हवाकॉंग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी बिहारमध्ये फ्लॉप ठरले. तसेच कॉंग्रेसचाही सपशेल पराभव झाला. त्यामुळे लोकांना "करिश्‍मा नको; विकास हवा', हेच त्यातून दिसून येते. घराणेशाहीतून राजकारण शिकता येत नाही. त्याकरिता प्रत्यक्ष काम करणे आवश्‍यक आहे, असे सुशीलकुमार मोदी म्हणाले. मीदेखील लोकसभेत होतो. कधीही राहुल गांधी यांना लोकांच्या प्रश्‍नावर बोलताना पाहिले नाही. दलितांच्या झोपडीत रात्र काढून जनता प्रभावित होत नाही. त्याकरिता त्यांना विकासकामे हवी आहेत, अशी टीकाही मोदी यांनी केली.

शनिवार, 20 नवंबर 2010

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा

पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात मनसेचा मोर्चा
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरावर पडलेला दरोडा अन् नाशिकरोड येथे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिन्यांच्या झालेल्या चोरीच्या घटनेने गुन्हेगारांची मुजोरी व पोलीस यंत्रणेची हतबलता समोर आल्याची तक्रार करतानाच ज्या शहरात खुद्द पोलीस सुरक्षित नाही, तेथे सामान्य नागरिकांचे काय, असे प्रश्न उपस्थित करत मनसेने शनिवारी पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शहराला भयमुक्त करण्याची मागणी केली. सातत्याने सुरू असणारे चेन स्नॅचिंगचे प्रकार आणि अलिकडेच घरात शिरून महिलांवर झालेले प्राणघातक हल्ले या पाश्र्वभूमीवर मोर्चात महिलांची उपस्थितीही लक्षणिय होती. आ. वसंत गीते, आ. उत्तम ढिकले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
चोऱ्या-घरफोडय़ा, वाहने जाळण्याच्या घटना, पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना लुबाडणाऱ्या इराणी टोळीने घातलेला धुमाकूळ, बँकेत पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेऊन पैसे लांबविण्याचे प्रकार अशा असंख्य गुन्ह्यांच्या मालिकेने शहरासह जिल्ह्यातील एकूणच कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असताना पोलिसांनी ते रोखण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेकडे यापूर्वी व्यंगचित्रांच्या माध्यमातून लक्ष वेधणाऱ्या मनसेने मोर्चात त्याच स्वरूपाचे फलक झळकावत पुन्हा सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ‘पोलिसांचा धाक सामान्यांना, चोरांचा धाक पोलिसांना’,  ‘सरकार बसलं दिल्लीत, चोऱ्या होतात गल्लीत, शासन सुस्त, चोर मस्त’ अशा आशयाच्या फलकांसोबत मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बी. डी. भालेकर मैदानावरुन निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख भागांमधून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलीस आयुक्तांनी शहरवासियांचा भ्रमनिरास केला असून वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दरोडय़ांचे सत्र सुरू असल्याने शहरात पुरेशी यंत्रणा अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याचे आ. गीते यांनी नमूद केले. या संदर्भात मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
नाशिक भयमुक्त करण्यासाठी सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक पोलीस ठाण्याला अधिकाधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर झाला असून जिल्ह्यासाठी नव्याने पोलीस भरती करावी, यापूर्वी पोलिसांनी तडीपार केलेल्या पण शासनाकडून अपिलात सुटून आलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशा मागण्या मनसेने केल्या. तसेच रात्रीच्यावेळी शहरात गस्त घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक, नव्याने निर्माण झालेल्या इंदिरानगर, उपनगर व आडगांव पोलीस ठाण्यात नवीन कर्मचारी वर्ग आणि पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.   

सिडको करणार उद्यान खुले मनसेने केला पाठपुरावा

सिडको करणार उद्यान खुले मनसेने केला पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 21, 2010 AT 12:18
पनवेल - नवीन पनवेल येथील सेक्‍टर-11 मध्ये सिडकोने तयार केलेले अल्ट्रा मॉडर्न उद्यान तयार होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र हे उद्यान सिडकोने अजूनही खुले न केल्याने येथील परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिडकोच्या वतीने उद्यान खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोचे उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे यांनी दिली आहे.  याबाबत पनवेल येथील मनसेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला. काही महिन्यांपासून तयार असलेले उद्यान केवळ उद्‌घाटनाअभावी बंद ठेवण्यात आले. मात्र या प्रकरणी मनसेने सिडकोकडे विचारणा केली. तसेच सात दिवसांच्या आत उद्यान खुले न केल्यास मनसेच्या पद्धतीने उद्यान खुले करण्यात येईल, असा इशारा नवीन पनवेल मनसेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर येरुणकर यांनी दिला होता. त्यानंतर उद्यान खुले करण्याचा निर्णय सिडकोने जाहीर केला आहे.

मंगलवार, 16 नवंबर 2010

महाआघाडी विरोधी पक्षनेते पदासाठी कोर्टात जाणार
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 17, 2010 AT 12:15 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रणधुमाळी संपली असली तरी अजूनही आघाडीच्या नगरसेवकांनी आपला विरोधी पक्षनेते पदावरचा हक्‍क सोडलेला नाही. मनसेला विरोधी नेते पद देण्यास विरोध करणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी महाआघाडी स्थापन करून त्याची कायदेशीर नोंदणी करून घेतली आहे. आता या महाआघाडीला विरोधी नेते पद द्यावे, असा दावा करण्यासाठी महाआघाडीने कोर्टात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. 

पालिकेतील सत्ताधारी पक्षानंतर सर्वात मोठा असलेला पक्ष म्हणून नियमानुसार मनसेला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले असले तरी सुरुवातीपासूनच आघाडीच्या नगरसेवकांचा या निर्णयाला विरोध आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी अपक्षांच्या मदतीने महाआघाडी स्थापन केली असून या महाआघाडीत 32 सदस्य आहेत; तसेच या महाआघाडीची कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे, अहमदनगर आणि बुलढाणा या महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद महाआघाडीला देण्यात आले आहे. यामुळे याच धर्तीवर या महाआघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळावे, असा दावा आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. त्याचबरोबर मनसेकडे एक अपक्ष आला असतानाही मनसेने आपली युती कोकण आयुक्‍तांकडे नोंदणी केली नाही किंवा शिवसेना भाजपाकडेदेखील अपक्ष गेले असतानाही त्यांनी आपली युतीची नोंदणी केलेली नाही. यामुळे आघाडीने महाआघाडीची सर्वप्रथम नोंदणी केल्यामुळेसुद्धा विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, असा आघाडीचा दावा आहे.
त्याचबरोबर महापौरांनी महापौर निवडीनंतर सभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रगीत थांबवून मनसेचा विरोधी पक्षनेता जाहीर केला असल्यामुळे आघाडीकडून याला हरकत घेण्यात आली आहे. एकदा सभा संपल्यानंतर कोणतीही घोषणा करता येत नसताना विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणे चुकीचे असल्याचेही आघाडीच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबत आघाडीच्या नेत्यांचे वकिलांशी बोलणी सुरू असून पुढील दोन दिवसांत या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कोट यांनी सांगितले; मात्र फेब्रुवारी 24 नोव्हेंबर 2009 च्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सत्ताधारी पक्षानंतर आपलाच पक्ष हा सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष असल्यामुळेच विरोधीनेते पदाचे आपणच दावेदार होतो आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळाले असल्याचा दावा मनसे शहरप्रमुख राजेश कदम यांनी केला आहे.

रविवार, 14 नवंबर 2010

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!

कॅटरिंग कॉलेजना अखेर मराठी ठसका!
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:15 AM (IST)
 
शर्मिला कलगुटकर
मुंबई - नागपूरचा वडाभात, कोल्हापूरचा तांबडा रस्सा, खानदेशातील शेवभाजी अन्‌ अवघ्या महाराष्ट्राच्या पुरणपोळीकडे पाठ फिरवून मेक्‍सिकन, थाई, पंजाबी फूडला शाही मान देणाऱ्या कॅटरिंग महाविद्यालयांना झणझणीत मराठी ठसका बसला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तत्कालीन तंत्र व उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्राच्या रसपूर्ण खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पाककृती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठी पाट्यांनंतर आता ताटवाट्यांतील पदार्थांनाही न्याय मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या संपन्न खाद्यसंस्कृतीच्या नुसत्या आठवणीनेही रसना तृप्त होते. खमंग काकडी, दही खावडी, ज्वारीची भाकरी, गरमागरम पिठले, झणझणीत खर्डा, पांढऱ्या वांग्यांचे भरित, तीळकुटाची चटणी, भरलेल्या मिरच्या, साजूक तुपाची रवदार धार असलेले वरण, मुगाची खिचडी... अशा जिभेस रग अन्‌ पोटास तड लागेपर्यंत चापण्याच्या असंख्य पाककृती आहेत. दुर्दैवाने राज्यातील एकाही कॅटरिंग कॉलेजमध्ये त्या शिकवल्या जात नाहीत. चीझ, पनीर, बटरमध्ये लोळणाऱ्या पंजाबी फूडने थेट हॉटेलांच्या स्वयंपाकघरात वर्णी लागली. हे पाहून "दिवा महाराष्ट्र'चे डॉ. सुहास अवचट यांनी ही सारी परिस्थिती कथन करणारे विस्तृत पत्र तत्कालीन मंत्रिमहोदयांना लिहिले होते. मराठीच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महाराष्ट्रातल्या या जिव्हाळ्याच्या पदार्थांची यादीही पेश केली होती. इतकेच नव्हे, तर "अन्नपूर्णा' या संस्थेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलमध्ये देण्यात येणाऱ्या पदार्थांमध्येही गावागावांतली खासियत असावी यासाठी पाठपुरावा केला होता. या साऱ्याची खमंग फोडणी बसली असून या महाविद्यालयांना अभ्यासक्रमात महाराष्ट्रीय पाककृतींचा समावेश करणे सक्तीचे झाले आहे. त्याबद्दलचा विस्तृत पत्रव्यवहारही या महाविद्यालयांशी करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर शासनदरबारी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्येही चायनीज, थाई फूडचा वरचष्मा असतो. या पाककृती पेश करणाऱ्या बल्लवाचार्यांनाच अनेकदा त्या कशा बनवायच्या हे ठाऊक नसते. मुगाच्या डाळीचे वरण अन्‌ मसुरीच्या डाळीला द्याव्या लागणाऱ्या लसणाच्या फोडणीमध्ये वैविध्य असते, इतके मूलभूत ज्ञानही या विद्यार्थ्यांना अनेकदा नसल्याची खंत अनेक मराठमोळे हॉटेल व्यावसायिकच व्यक्त करतात. या अभ्यासक्रमामध्ये दहीतुपात
मुरवलेल्या पदार्थांइतक्‍याच अन्य प्रांतांतील रेसिपीही घोळवून घेतलेल्या असतात, पण घडीच्या पोळीचे पदर मात्र सुटता सुटत नाहीत. केरळमध्ये सांबार, भात, इडली, डोशांचे उदंड पीक असताना वरण दृष्टीलाही पडत नाही; तर गोव्यातील शाकाहारी खानावळीतल्या ताटालाही सागुतीचा गंध असतो. आपल्याकडे मात्र कोथिंबीर वडी, उपीट, साबुदाण्याची गरमागरम खिचडी देणाऱ्या हॉटेलांसाठी शोधयात्रा काढावी लागते; तर गिरगावातला अनंताश्रम बंद झाल्यामुळे खवय्ये अनंतकाळ हळहळतात... इतिहासाच्या पानावर मराठी खाद्यसंस्कृती विराजमान होण्यापूर्वी ती हॉटेलातल्या पानांवर पुन्हा डावीकडून लागू लागली हेही नसे थोडके!

शनिवार, 13 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी

कल्याण-डोंबिवलीत उद्धव-राज हातमिळवणी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 14, 2010 AT 12:15 AM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महापौरपद व विरोधी पक्षनेतेपदासाठी हातमिळवणी झाल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा असताना मनसेकडे घाईघाईने विरोधी पक्षनेतेपद कसे देण्यात आले, असा सवालही त्यांनी केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, मनसे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 29 नगरसेवक निवडून आले व मनसेने 27 जागा जिंकल्या. शिवसेनेने भाजप व अपक्षांच्या मदतीने महापौरपदावर दावा केला. आघाडीकडे बहुमत नव्हते. त्यामुळे कुणी अपक्ष उमेदवार पुढे आला तर त्याला पाठिंबा देण्याची रणनीती दोन्ही कॉंग्रेसने आखली; तर मनसेने महापौरपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेवर तोफा डागणाऱ्या राज ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन शिवसेनेला महापौरपद मिळण्याचा मार्ग मोकळा केला. तरीही आघाडीचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असल्याने आमच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद यायला हवे होते, असे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेला हे पद कसे देण्यात आले असा सवालही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला. महापालिकांमधील विरोधी पक्षनेतेपदाचा घोळ वर्षभर चालतो. कल्याण-डोंबिवलीत मात्र घाईघाईने मनसेला हे पद देण्यात आले, त्यामुळे महापौरपद व विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचे स्पष्ट होते, असा दावाही त्यांनी केला.

बुधवार, 10 नवंबर 2010

चौहान नव्हे; चव्हाण म्हणून वावरा!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 11, 2010 AT 12:35 AM (IST)
 

मुंबई - पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे मानले जातात. त्यांनी आपली हीच प्रतिमा जपावी, कोणत्याही जमीन वा भूखंडाच्या प्रकरणात अडकू नये. महाराष्ट्रातील विकासाच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांना दिला. नव्या मुख्यमंत्र्यांनी मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांना शुभेच्छा देऊन ते म्हणाले, की आतापर्यंत ते सर्वांत जास्त काळ दिल्लीतच वावरले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर "चौहान' म्हणून नव्हे; तर "चव्हाण' म्हणून वावरावे. दिल्लीहून मुंबईकडे येताना पृथ्वीराज चव्हाण यांनी "मैं बम्बई जा रहा हूं' असा उल्लेख वारंवार केला. तेव्हा मुंबईत आल्यानंतर आपण त्यांना 108 मण्यांची माळ देणार आहोत. त्यांनी 108 वेळा "मुंबई, मुंबई...' असा जप करावा, असा टोला राज यांनी लगावला.
पृथ्वीराज यांनी सर्वप्रथम आदर्श गैरव्यवहारात गुंतलेल्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करावी. सनदी अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालू नये, अशी मागणी करताना राज म्हणाले, की महाराष्ट्रात शासकीय व पोलिस अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे. याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी - राज

मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 10, 2010 AT 02:04 PM (IST)
 

मुंबई - मुंबईचा उल्लेख 'बंबई' असा करणारे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र माहीत नसेल तर माहीत करून घ्यावा. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ मराठीतूनच घ्यावी, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडीनंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, ''मुंबईला बंबई म्हणणारे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले की, त्यांना 'मुंबई'चा जप करण्यासाठी १०८ मण्यांची माळ भेट देणार आहे. त्यानंतर त्यांनी एक-एक मणी मोजत 'मुंबई' म्हणण्याची सवय करून घ्यावी. पृथ्वीराज चव्हाण हे कोणत्याही वादात अडकलेले नेते नसून, ती प्रतिमा त्यांनी जपावी. पृथ्वीराज हे नव्याने महाराष्ट्रात येत असून, त्यांचे काम बघूनच त्यांच्याबदद्ल मत मांडता येईल. राज्यातील काँग्रेस नेते त्यांना टिकू देतील असे वाटत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा.''

सोमवार, 8 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार

कल्याण-डोंबिवलीत "मनसे' विरोधी बाकावर बसणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 09, 2010 AT 12:28 AM (IST)
 

डोंबिवली - 'कल्याण-डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधी पक्षाचे काम करणार आहे. विरोधी पक्ष म्हणजे विरोधक नव्हे; तर पालिकेतील सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याची भूमिका मनसे चोख बजावेल,'' अशी भूमिका या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीर केली.

पालिकेच्या निकालानंतर 27 जागांवर विजय मिळविलेली मनसे सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका बजावणार, अशी चर्चा होती. महापालिकेत महापौर "मनसे'चाच असेल, असे राज यांनी निवडणुकीपूर्वी आणि प्रचारात सांगितले होते. त्यामुळे सत्ता स्थापनेविषयी तर्कवितर्क सुरू होते. निकालानंतर प्रथमच भूमिका जाहीर करताना राज ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

'महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहील. घोडेबाजारात सहभागी होणार नाही. सत्ता स्थापनेसाठी मी स्वत:हून कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधलेला नाही. जे काही वर्तमानपत्रातून वाचले, त्या सगळ्या अफवा होत्या. राजकीय अफवांवर माझा विश्‍वास नाही. त्यामुळे त्याविषयी मी काही खुलासा करणार नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन मनसे सत्ता स्थापन करणार, असे गणित मांडले जात होते. मात्र, मनसेने या दोन्ही कॉंग्रेसला धक्का दिल्याने ते मनसेसोबत येणे कसे शक्‍य आहे, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. आमच्यापुढे दुसरा पर्याय शिवसेनेचा होता; पण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले, विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांची आकडेवारी पाहता, मागच्या वेळी शिवसेना आणि पुरस्कृत नगरसेवक धरून 34 जागा होत्या. यंदा त्यांना 31 जागा मिळाल्या, म्हणजे त्या कमी झाल्या. शिवसेनेच्या मागच्या वेळच्या 11 जागी मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत.'' मनसेमुळे त्यांचे मावळते महापौर आणि उपमहापौर पराभूत झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'कल्याण-डोंबिवलीचा महापौर "मनसे'चा व्हावा, ही माझी इच्छा होती. जनतेने मला तसा पाठिंबाही दिला. मात्र, मी मनसेच्या हाती पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. पूर्ण सत्ता हाती नसली तरी ही शेवटची निवडणूक नाही. यापुढेही निवडणुका होणार आहेत. मी काही सत्तापिपासू नाही,'' असा टोलाही त्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या 11 जणांपैकी चार अपक्षांचा एक गट तयार करण्यात आला असून, त्यापैकी एका अपक्षाने मला पत्र पाठवून महापौरपदासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, असे विनोदी पत्र पाठविले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तो अपक्ष नगरसेवक कोण, याचा तपशील त्यांनी दिला नाही.

नगरसेवकांची संख्या आता 28अपक्ष नगरसेविका सरोज भोईर यांनी आज मनसेत प्रवेश केल्याने त्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रनगरमधून शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वामन म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र भोईर यांचा पराभव झाला. भोईर हे पूर्वीपासून मनसेच्या वाटेवर होते. त्यांच्या पत्नी सरोज भोईर देवीचा पाडा प्रभागातून अपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. भोईर यांनी पत्नीसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे भोईर पती-पत्नींनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला

'मनसे' विरोधी पक्ष म्हणून काम करणार - राज

'मनसे' विरोधी पक्ष म्हणून काम करणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 08, 2010 AT 02:02 PM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाविरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे, आज (सोमवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष नगरसेवक असलेल्या प्रकाश भोईर यांनी मनसेत प्रवेश केल्याने आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत पक्षाचे २८ नगरसेवक झाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, ''कल्याण-डोंबिवलीत महापौर हा कोणत्याही पक्षाचा होऊ द्या, आम्ही घोडेबाजारांत सहभागी होणार नाही. महापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नसून, मतदानही करणार नाही. आमचे सर्व नगरसेवक विरोधी पक्ष म्हणून काम करताना महापालिका क्षेत्रातील कामावर अंकुश ठेवतील. येथील नागरिकांची मनसेच्या नगरसेवकांकडून कोणतीच निराशा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. युतीबाबत मी आतापर्यंत कोणाला भेटलो नाही आणि भेटणारही नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.

गुरुवार, 4 नवंबर 2010

"कृष्णकुंज'वर जुळवाजुळव

"कृष्णकुंज'वर जुळवाजुळवकल्याण -डोंबिवलीत मनसे आपला पॅटर्न दाखवील, असा दावा करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज "कृष्णकुंज' निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीला मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, आमदार नितीन सरदेसाई, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिशिर शिंदे, सरचिटणीस शिरीष पारकर आदी उपस्थित होते. बैठकीत विविध पर्यायांवर आकडेवारीनुसार चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी कोणती गणिते जुळू शकतील, अन्यथा प्रभावी विरोधी पक्ष होण्याच्या पर्यायाचा या बैठकीवर चर्चा करण्यात आली. आमदार नांदगावकर, सरदेसाई व दरेकर यांना राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. त्यानंतरच राज ठाकरे आपला निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा असल्याचे बोलले जाते.

राज आज डोंबिवलीतपहिल्याच फटक्‍यात 27 नगरसेवकांचे घवघवीत यश संपादन करून प्रस्थापितांना धक्का देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (ता.5) सकाळी डोंबिवलीतील फडके रोडवर येणार आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी ते कल्याण येथील दुर्गाडीमार्गे ते डोंबिवलीत दाखल होणार आहेत. फडके रोडवर नेहमीच तरुणाईचा जल्लोष असतो. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या तरुणाईचे आभार मानण्याकरिता व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उद्या सकाळी येणार आहेत.

बुधवार, 3 नवंबर 2010

इतर पक्षांसाठी मनसे 'अनटचेबल' - राज

इतर पक्षांसाठी मनसे 'अनटचेबल' - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 03, 2010 AT 01:06 PM (IST)
 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असली, तरी अद्याप मला आघाडीसाठी कोणत्याच पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे इतर पक्षांसाठी मनसे सध्यातरी 'अनटचेबल' आहे. तरीही सत्ता स्थापनेचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली निवडणूकीत जिंकलेले मनसेच्या २७ नगरसेवकांनी आज (बुधवार) राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''कल्याण-डोंबिवलीत आणखी मतदान झाले असते तर मनसेला सत्ता मिळविण्यात अडचण आली नसती. या ठिकाणी आणखी जागा जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने आता दोन दिवसांत येथील निर्णय घेण्यात येईल. आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पदावरून जावे की रहावे हे कोणी एका वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने ठरवू नये. अशोक चव्हाण जर या प्रकरणात दोषी असतील तर त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.''

मंगलवार, 2 नवंबर 2010

आघाडी आणि युतीला "राज' नको

आघाडी आणि युतीला "राज' नको
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 03, 2010 AT 12:48 AM (IST)
 
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 जागा जिंकणारी मनसे "किंगमेकर' ठरली असली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी बाकावर बसण्याचे जाहीर करीत चुकीची सत्ता नको, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, शिवसेना-मनसेत उभा वाद असल्याने त्यांच्यातही सत्तेसाठी सूत जुळणार नाही, अशी राजकीय परिस्थिती आघाडीच्या वक्तव्याने निर्माण झाली आहे. परिणामी, युती आणि मनसे दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण झाला असून महापालिकेत सत्ता कोणाची येणार, याचीच चर्चा रगंली आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेने युतीतील भाजपचा धुव्वा उडविला आहे. भाजपच्या मते, त्यांना खरी हानी पोहोचली आहे ती शिवसेनेच्या अपक्ष बंडखोरांमुळे. अवघ्या नऊ जागांवर भाजपला विजय मिळविता आला आहे. "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा प्रचाराचा सामना रंगल्याने उद्धव आणि राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कल्याण-डोंबिवलीतील जनतेने मात्र दोन्ही ठाकरेंना स्वीकारले असून भाऊबंदकीतील वाद संपुष्टात यावा, अशी त्यांची भावना असल्याचे दोघांना मिळालेला कौल पाहता स्पष्ट होते. दोघांनी एकत्रित येऊन मराठी माणसाचे "कल्याण' करावे, असे मतपेटीतून त्यांनी सूचित केले आहे.

शिवसेना-मनसे सत्तेसाठी एकत्रित येणार नाही. दोघांच्या एकत्रित येण्यामुळे दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जाण्याची दाट शक्‍यता आहे. मनसे किंगमेकर झाल्याचे कळताच दिल्लीहून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कॉंग्रेस विरोधी बाकावर बसेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असून सत्तास्थापनेत तटस्थ भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी जनतेने दिलेला कौल मान्य करीत त्यांना मनसेराज नको असल्याचे स्पष्ट केले आहे. मनसेच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेसाठी लागणारा आकडा सहज गाठता येतो; परंतु अपक्षांची मदत घेऊनही हा आकडा गाठणे आघाडीला आणि युतीला शक्‍य नाही.

अपक्षांच्या कलाबाबत संभ्रम
दरवेळेस सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अपक्ष निर्णायक भूमिका बजावतात. यंदाच्या निवडणुकीत 11 अपक्ष निवडून आले आहेत. बाळ हरदास, मोहन उगले व सरोज भोईर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांना पुन्हा शिवसेनेकडे वळविण्याचे कसब शिवसेना नेत्यांना करावे लागणार आहे. हरदास यांनी आपली निष्ठा राष्ट्रवादीकडे असल्याचे बोलून दाखवले आहे. अपक्ष शिवसेनेकडे वळतात का, याविषयी सुस्पष्टता नाही. श्रेयस समेळ, उषा वाळंज व विक्रम तरे यांचा पाठिंबा आपल्यालाच राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी या तिघांनी त्यांचा कल अद्याप स्पष्ट केलेला नाही. उर्वरित संजय पावशे आणि महेंद्र गायकवाड हे कोणाला पाठिंबा देतात, याविषयीही साशंकता आहे

सोमवार, 1 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर

कल्याण-डोंबिवलीत मनसेच किंगमेकर!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 107 पैकी 25 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तारुढ शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. युतीपैकी केवळ भाजपचे बाहुबल घटवण्यात मनसेला यश आले असले, तरी शिवसेनेच्या मतांवर मनसेचा पर्यायाने राज ठाकरे यांच्या करिष्म्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. मात्र कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी पूर्णतः मनसेच्याच हाती आहे. काठावरच्या बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 54 चा जादुई आकडा गाठण्यासाठी आघाडी किंवा युतीला मनसेवरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे मनसेला हाताशी धरून सत्ता कोण स्थापन करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक राजकीय पक्षांप्रमाणे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची केली होती. म्हणूनच निकालाबाबत कधी नव्हे एवढी उत्सुकता होती. 107 पैकी 62 जागा शिवसेनेने लढविल्या. त्यापैकी 32 जागा त्यांच्या पदरात पडल्या. जवळपास 50 टक्के यश त्यांनी मिळवले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 29 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या तीन जागा वाढल्या. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने 45 जागा लढविल्या आणि फक्त नऊ जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळी भाजपकडे 16 जागा होत्या. यंदा त्यांच्या सात जागा घटल्या. भाजपच्या पीछेहाटीचा फटका युतीला बसला आहे. युतीच्या एकूण जागांची संख्या 41 होते. त्यामुळे "54'चे संख्याबळ गाठण्यासाठी मनसे फॅक्‍टर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सत्तास्थापनेसाठी जवळचे काही अपक्ष गृहित धरले, तरी युतीला 54 चा आकडा गाठणे शक्‍य होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

युतीचे 41 व अपक्षांतील सहा-सात सदस्य धरूनही सदस्यसंख्या बहुमताच्या आसपासही जाण्याची शक्‍यता दिसत नाही. भाजपच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या शहरी मतांवर मनसेने डल्ला मारल्याने युतीचे सत्तास्वप्न भंग होण्याची शक्‍यताच अधिक आहे.

आघाडीलाही धक्का
कॉंग्रेसने यावेळी 55 आणि राष्ट्रवादीने 52 जागा लढविल्या होत्या. मनसे फॅक्‍टर युतीला मारक ठरणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता; परंतु मनसेने भाजपबरोबर आघाडीलाही धक्का दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 जागा मिळाल्या आहेत. आघाडीचे एकूण संख्याबळ 30 च्या घरात आहे. मनसेने जशी भाजपला हानी पोचवली आहे, तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मागे खेचत धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यांच्या सहा जागा घटल्या आहेत. राष्ट्रवादीला गेल्यावेळी 22 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यांना सात जागांवर पाणी सोडावे लागले आहे. आघाडीला 40 जागांची अपेक्षा होती. त्यांच्या पदरात दहा जागा कमी पडल्या आहेत.

या निवडणुकीत "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा सामना रंगला होता. दोन्ही ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना आहे त्याच जागा राखण्यात यश आले असले, तरी मनसेने मिळविलेल्या 25 जागा त्यांना आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीचा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. अंबरनाथ पालिकेत शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला असला, तरी मनसे आता कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी युतीला पाठिंबा देणार नाही. महापालिकेतील आघाडीच्या तीस सदस्यांना मनसेने पाठिंबा दिला, तर "54' ची मॅजिक फिगर गाठणे त्यांना सहज शक्‍य आहे. मनसेने आघाडीला पाठिंबा दिला, तर "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' असा युतीचा प्रचार सुरुच राहील. शिवाय या स्थितीत किती अपक्ष या नव्या राजकीय सूत्रात सहभागी होतात, ते लवकरच स्पष्ट होईल. ज्या अपक्षांना युती व आघाडीने उमेदवारी नाकारली, ते सत्तेचे पारडे जेथे जड आहे तेथेच झुकण्याची दाट शक्‍यता आहे. काहीही असले, तरी नव्या राजकारणात कल्याण-डोंबिवलीतील सत्तेची दोरी सध्या तरी मनसेच्याच हाती आहे.

मनसेचा करिष्मा उल्लेखनीय 
प्रचारात राज ठाकरे यांनी मतदारांना पूर्ण सत्ता देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणांना जमलेली गर्दी ते मतांमध्ये परावर्तीत करू शकल्यानेच मनसेला 25 जागांवर विजय मिळविता आला. याचा विचार शिवसेनेने गांभीर्याने करणे गरजे आहे. 31 जागा मिळवून शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली असली तरी 25 जागा मिळवून मनसे दुसऱ्या स्थानी आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल

त्रिशंकू"राज'

त्रिशंकू"राज'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
डोंबिवली - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादाने राज्यभरात गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मतदारांचा कौल आज स्पष्ट झाला. या निवडणुकीत मनसेच्या "इंजिना'ने युती आणि आघाडीला "धडक' देत तब्बल 26 जागांवर विजय मिळविला. मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती आल्या आहेत.

आघाडी किंवा युती कोणालाही सत्ता मिळवायची असेल, मनसेची मदत घेण्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मनसे कोणाला पाठिंबा देणार, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत किंवा महापौर मनसेचा आणि अन्य पदे मदत करणाऱ्या पक्षांना अशीही समीकरणे जुळू शकतात, ही चर्चाही रंगली आहे. सत्तेच्या सारीपाटावर मनसे कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते खुले न केल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. सत्तेबाबत राज ठाकरे यांनीच पुढाकार घ्यावा म्हणून आघाडीचे नेते तूर्त गप्प आहेत; तर शिवसेनेने सत्तेसाठी, महापौरपदासाठी समविचारी नगरसेवकांसोबत जाण्याचे संकेत दिल्याने राजकीय चित्र नेमके कसे असेल, याबाबत उत्सुकता आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 107 पैकी 40 जागा सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला मिळाल्या आहेत. शिवसेनेने 31, तर भाजपने अवघ्या 9 जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपला लढविलेल्या जागांपैकी 10 टक्केच प्रतिसाद मिळाला आहे. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो; मात्र डोंबिवलीतील पांढरपेशा मतदाराने भाजपला सपशेल नाकारले आहे. शिवाय शिवसेनेच्या बंडखोरीचा फटकाही भाजपला बसला आहे. मनसेच्या "इंजिना'ने सर्वच पक्षांना मोठी "धडक' दिल्याचा ठाम दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. शिवसेनेने आपल्याकडील बहुतांश प्रभाग राखले आहेत. मात्र भाजपला मिळालेल्या कमी जागांमुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. निवडून आलेल्या अपक्षांपैकी पाच जण आम्ही पुरस्कृत केलेले आहेत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यांचा पाठिंबा गृहीत धरता युतीचे संख्याबळ 45 पर्यंत जाते. मात्र शिवसेना-भाजप युतीने उमेदवारी नाकारलेल्या; तरीही निवडून आलेल्यांपैकी किती अपक्ष सत्तेसाठी पुन्हा युतीच्या छताखाली येतील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे.

दरम्यान, "मनसे फॅक्‍टर'चा फटका आघाडीलाही बसला आहे. आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 जागांवर विजय मिळविला आहे; तर 11 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली विकास आघाडीचे 12 बंडखोर रिंगणात होते. त्यापैकी एकच निवडून आला आहे. या बंडखोरांनी कॉंग्रेसविरोधात उघडलेल्या विकास आघाडीचा फार फटका बसलेला नाही, तर आघाडीला "मनसे फॅक्‍टर' मारक ठरला. मनसेमुळे आघाडीची पीछेहाट झाली, असे निकालांवरुन दिसते.
निवडणुकीच्या प्रचारात मनसे विरुद्ध शिवसेना असा "ठाकरी' प्रचार रंगला होता. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' अशी टीका शिवसेनेकडून होत असल्याने मनसे आघाडीसोबत जाणार का किंवा आपल्या महापौरपदासाठी आघाडीचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांत चर्चिला जात आहे. त्याचवेळी मनसे शिवसेनेबरोबर जाणार नाही. कॉंग्रेस आघाडीला समर्थन देईल, असे दावे आघाडीच्या नेतेमंडळींकडून सुरू आहेत.

पक्षीय बलाबल
शिवसेना -31
भाजप -09
मनसे -26
कॉंग्रेस -15
राष्ट्रवादी -15
अपक्ष व इतर -11
एकूण -107

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 01, 2010 AT 10:21 AM (IST)

मुंबई - कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या १०७ जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला ४१ जागा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३०, मनसेला २५ आणि अपक्षांना ११ जागा मिळाल्या. यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ५४ नगरसेवक बरोबर असणे आवश्यक आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत पहायला मिळालेल्या या महापालिकेत मनसेने शिवसेनेला धक्का दिला. मनसेने सर्वच १०७ जागांवर आपले उमेदवार उभे करून २५ जागा मिळविण्यात यश मिळविले. तसेच काही प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. यामुळे याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेने ३२ जागांवर, तर भाजपने ९ जागांवर यश मिळविले. काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा जिंकण्यात यश आले.
कल्याण-डोंबिवलीचे महापौर आणि उपमहापौरांना पराभव स्वीकारावा लागले. महापौर रमेश जाधव यांचा वॉर्ड क्र. ३८ मधून आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जाधव यांचा मनसेचे उमेदवार नितीन निकम यांनी पराभव केला. खडेगोळवली या वॉर्ड क्र. ४८ मधून संध्या तरे यांनी विजय मिळविला. संध्या तरे यांनी १०५८ मते मिळवीत अपक्ष उमेदवार वैशाली तरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या

रविवारी झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी दहापासून डोंबिवली क्रीडासंकुलात मतमोजणी झाली.

कल्याण-डोंबिवलीत महापौरांचा पराभव

कल्याण-डोंबिवलीत महापौरांचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 01, 2010 AT 10:21 AM (IST)
 
मुंबई - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर रमेश जाधव यांचा वॉर्ड क्र. ३८ मधून आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जाधव यांचा मनसेचे उमेदवार नितीन निकम यांनी पराभव केला. शिवसेनेनेही याठिकाणी खाते उघडले असून, खडेगोळवली या वॉर्ड क्र. ४८ मधून संध्या तरे यांनी विजय मिळविला. संध्या तरे यांनी १०५८ मते मिळवीत अपक्ष उमेदवार वैशाली तरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीलाही पहिली जागा जिंकण्यात यश मिळविले असून, मनिषा गायकवाड यांनी विजय मिळविला.

रविवारी झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी दहापासून डोंबिवली क्रीडासंकुलात मतमोजणीस सुरवात झाली. दुपारी दोनवाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंमधील वादामुळे याठिकाणी सत्ता कोणाची येते याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत याठिकाणी होत आहे. महापालिकेच्या १०७ जागांसाठी ६११ उमेदवार उभे राहिले होते. मात्र, मतदारांनी निरुत्साह दाखविल्याने फक्त ४८ टक्के मतदान झाले. कमी मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

वॉर्डनुसार निकाल - प्रभाग क्र. २१ - विजयी उमेदवार - जवाद डोन (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्र. ३८ - विजयी उमेदवार - नितीन निकम (मनसे)
प्रभाग क्र. ४४ - विजयी उमेदवार - कल्याण धुमाळ (शिवसेना)
प्रभाग क्र. ४६ - विजयी उमेदवार - जनार्दन म्हात्रे (शिवसेना)
प्रभाग क्र. ४८ - विजयी उमेदवार - संध्या तरे (शिवसेना)
प्रभाग क्र. ५३ - विजयी उमेदवार - कल्याण पाटील (शिवसेना)
प्रभाग क्र. ७७ - विजयी उमेदवार - नंदू म्हात्रे (काँग्रेस)

रविवार, 31 अक्टूबर 2010

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 31, 2010 AT 12:30 AM (IST)
 
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत प्रचारासाठी मुक्काम ठोकणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त भुजंगराव शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या 9 एप्रिल 2010 च्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेरून येणाऱ्या राजकीय नेत्याने प्रचार संपण्यापूर्वी ही निवडणूक ज्या परिसरात होते, तो परिसर सोडून जावे, असे आदेश आहेत. निवडणुकीचा प्रचार 29 ऑक्‍टोबरला रात्री संपला. तत्पूर्वी पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज ठाकरे यांना शहर सोडून जाण्याची नोटीस बजावली होती; मात्र ठाकरे यांनी शहर न सोडता ते निवडणूक परिसरात होते. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे यांच्याविरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संदर्भात मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले, की मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही.
प्रचारासाठी मनसेने सरकारी वाहने वापरली
29 ऑक्‍टोबरला झालेल्या मनसेच्या प्रचारसभेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर, भिवंडी, डहाणू व पनवेल या आगारांतून 27 बसेसमधून कार्यकर्ते सभेला आले होते. या सभेचे आयोजक मनसेचे जिल्हा चिटणीस यांनी इरफान शेख यांच्याविरोधात प्रचारासाठी सरकारी वाहनांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी रामनाथ सोनवणे यांनी बाजरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित बस आगार व्यवस्थापकांनी बसेस प्रचारासाठी कशा दिल्या आणि कोणी परवानगी दिल्या याचीही या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी सोनवणे यानी सांगितले. प्रचारसभेचा आयोजक व बस पुरविणारे या दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली, कोल्हापुरात शांततेत मतदान

कल्याण-डोंबिवली, कोल्हापुरात शांततेत मतदान
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 31, 2010 AT 10:49 AM (IST)
 
मुंबई - कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीमध्ये सुमारे ४० टक्के मतदान झाले असून, कोल्हापूरमध्ये ७० टक्के मतदान झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील १०७ जागांसाठी, तर कोल्हापूर महापालिकेतील ७७ जागांसाठी मतदान झाले.

कल्याण डोंबिवलीमधील १०७ जागांसाठी ६७५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले १०७ उमेदवार उतरविल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे. प्रचारादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर केलेल्या टिकेमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शिवसेना-भाजप युतीला आणि मनसेला आव्हान असणार आहे.

कोल्हापूरमधील ७७ जागांसाठी ४८० उमेदवार उभे आहेत. कोल्हापूरमध्ये दोन्ही कॉंग्रेससह शिवसेना-भाजप युती, जनसुराज्य शक्ती व शाहू आघाडीसह अपक्षांचे भवितव्य पणाला लागले आहे.

शनिवार, 30 अक्टूबर 2010

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
वृत्तसंस्था
Saturday, October 30, 2010 AT 12:48 PM (IST)


मुंबई- कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईतून डोंबिवलीत तळ हलविलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य निवडणूक आयोगाने डोंबिवली सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
या निवडणुकीसाठी मतदान रविवारी (३१ ऑक्‍टोबर) सुरू होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील आपला तळ हलविणे आवश्‍यक आहे.
शुक्रवारी रात्री डोंबिवलीच्या पूर्व भागातील ठाकरे यांच्या निवासस्थानी आयोगाने ही नोटीस बजावली.



 

शुक्रवार, 29 अक्टूबर 2010

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:30 AM (IST)
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातच मुख्य लढत असली, तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता नाही. "पालिकेत आमचाच महापौर असेल,' अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास ते युतीचा पाठिंबा घेणार की आघाडीचा, यावरच सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याने कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीला यंदा प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी यथेच्छ चिखलफेक झाल्याने निकालानंतर युती आणि मनसे कितपत एकत्र येतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही एका आघाडीला बहुमत न मिळाल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरेल. अंबरनाथ नगरपालिकेत मनसेने युतीला पाठिंबा दिल्याने त्या बदल्यात मनसे युतीचा पाठिंबा घेईल की आघाडीचा, हे पाहणे रंजक ठरेल. आघाडीचा पाठिंबा घेतल्यास मनसेला अनेक आरोपांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळेच राज ठाकरे सातत्याने "पूर्ण सत्ता द्या,' असे आवाहन मतदारांना करीत आहेत. "आम्ही कॉंग्रेसशी चर्चा केली, तर त्याला "डील' म्हणू नका,' असेही त्यांनी युतीच्या नेत्यांना खडसावल्याने पुढील राजकारण मनसेभोवती कसे फिरेल, त्याची ही चुणूक मानली जात आहे. या पालिकेसाठी येत्या रविवारी (ता. 31) मतदान होणार असून सोमवारी (ता. 1) सकाळी 10.30 पासून मतमोजणी सुरू होईल.

एखादा पक्ष किंवा आघाडीला निर्णायक किंवा स्पष्ट कौल न देण्याची येथील मतदारांची आजवरच्या तीन निवडणुकांतील परंपरा आहे. 1995 ते 2005 या कालावधीत शिवसेना-भाजप युतीला अपक्षांची मदत घेऊनच सत्ता हस्तगत करावी होती. गेल्या पाच वर्षांत आधीची अडीच वर्षे आघाडी आणि आताची अडीच वर्षे शिवसेना-भाजप युती सत्तेत आहे. या अडीचकीच्या सत्तेची मदारही अपक्षांवरच होती.

पालिकेच्या 107 जागांपैकी शिवसेना 62 जागा लढवीत असून भाजपची लढाई 45 जागांवर आहे. युतीसाठी यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. नजीकच्या काळातील मुंबई, ठाण्याच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युतीसाठी ही जनमत चाचणी आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांपैकी एकाही राजकीय पक्षाने स्वबळावर 107 जागा लढविलेल्या नाहीत. फक्त मनसे सर्व जागा लढवीत आहे. कॉंग्रेसविरोधातील बंडखोरांनी यंदा "कल्याण-डोंबिवली विकास आघाडी' उघडली आहे आणि या आघाडीचे 12 उमेदवार रिंगणात आहेत. या आघाडीचे "रिंगमास्टर' "राष्ट्रवादी'पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड असल्याने कॉंग्रेसपुढे आव्हान उभे ठाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरून आधी वाद झाला असला आणि नंतर कॉंग्रेस 55, राष्ट्रवादी 52 या सूत्रावर तो मिटविण्यात आला असला, तरी कमी जागा लढवून अधिक जागांवर विजय मिळविण्याची परंपरा राष्ट्रवादी कॉंग्रेस यंदाही कायम राखते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे."रिडालोस'चे 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळी रिपाईंना तीन व बसपला एक जागा मिळाली होती. या वेळी ते आहे ती स्थिती कायम राखतात का, हेही सोमवारी स्पष्ट होईल.

प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतच तळ ठोकला असून गेल्या आठवड्यात त्यांच्या चार सभा पार पडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी "रोड शो' अणि प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही "रोड शो' केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत डोंबिवलीच्या माहेरवाशीण असलेल्या त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे आणि "युवा सेने'चे सेनापती आदित्य ठाकरे हेही रणधुमाळीत सहभागी झाल्याने ठाकरे कुटुंबीय प्रचारात उतरल्याचे दिसून आले. आघाडीतर्फे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आर. आर. पाटील, नारायण राणे, सुनील तटकरे, गणेश नाईक, जयंत पाटील, वसंत डावखरे आदी दिग्गजांनी सभा आणि "रोड शो' केले. भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुंबई-ठाण्यातील आमदारांनी प्रचाराचा डोलारा सांभाळला.

विकासापेक्षा भाऊबंदकीच प्रचाराचा मुख्य मुद्दा! कल्याण-डोंबिवलीच्या विकासापेक्षा ठाकरे घराण्यातील वाद हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचे दिसून आले. दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आतषबाजीला सुरुवात केली आणि कालांतराने सर्वच नेते त्यात सहभागी झाले. प्रचारात युतीने आपल्या आजवरच्या कामांवर भर दिला; तर राज ठाकरे आणि आघाडीच्या नेतेमंडळींनी युतीने शहराचा कसा सत्यानाश केला, यावर भर दिला. आघाडीने शहर विकासाला निधी देण्याचे आश्‍वासन दिले; तर रामदास आठवले यांनी जातीयवादी शक्तींना सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केले. प्रचारात रस्ते, प्रदूषण, अनधिकृत बांधकामे यांचाही उल्लेख झाला. शिवसेना आणि मनसेने "एसएमएस', "वेबसाईट', "एलसीडी'चा वापर करीत प्रचार हायटेक केला

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:15 AM (IST)
 

कल्याण - कल्याण व डोंबिवली शहरांना शिवसेना-भाजप युतीने बकाल केले. त्यामुळे या अभद्र युतीला सत्तेवरून खाली खेचा आणि मनसेच्या हाती पूर्ण बहुमतात सत्ता द्या आणि शहरांच्या विकासाबाबत निश्‍चिंत राहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सुभाष मैदानात झालेल्या प्रचारसभेत मतदारांना केले. या वेळी

कल्याण-डोंबिवलीत सात दिवस मुक्काम आहे, हे नाटक नसून ती सत्ता आल्यानंतरची "प्रॅक्‍टिस' आहे, असे राज म्हणाले. वाहतूक कोंडी, उखडलेले रस्ते, उघडी गटारे आणि सर्वत्र भटकणारी कुत्री, कचऱ्याचे साचलेले ढीग याने नागरिक त्रस्त आहेत. 1995 पासून शिवसेना सत्तेत आहे. त्या वेळी राज्यात युतीचेच सरकार होते तेव्हा या शहरांचा विकास का नाही केला, असा सवाल त्यांनी केला.

पालिका सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी मिळवली. कंत्राटदारांचे लाड केले. सर्वांनीच आपले उखळ पांढरे केले. ते नागरिकांचे काय कल्याण करणार, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

सध्या राज्यात विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे, स्वार्थासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत आणि नागरिकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात आघाडीची सत्ता असताना कल्याण-डोंबिवलीत विजेचे भारनियमन का, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करतानाच पालिकेची सत्ता हाती मागणाऱ्या आघाडी नेत्यांची कथनी आणि करणी भलतीच आहे, अशा शब्दांत टीका केली

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या "छप्पर फाडके' आश्‍वासनांचा खरपूस समाचार घेतला.

"एमएमआरडीए' आणि राज्य सरकार निधी देत नाही, असे युतीवाले म्हणत आहेत. याच "एमएमआरडीए'च्या अधिकृत सदस्यांत शिवसेनेचे महापौर व अन्य सदस्य आहेत. मग त्यांना निधी का आणता आला नाही. विकासासाठी इच्छा लागते. तीच यांच्याकडे नाही. मनसेकडे पूर्ण सत्ता द्या. कल्याण-डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलतो, असे आवाहन शेवटी त्यांनी मतदारांना केले

गुरुवार, 28 अक्टूबर 2010

Raj Thakre At Kalyan 27/10/2010 p2

Raj Thakre At Kalyan 27/10/2010

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?
-
Friday, October 29, 2010 AT 12:17 AM (IST)

डोंबिवली - 'हा खंडू खोपडे, तो सूर्याजी पिसाळ; मग हा कोण शिवाजी का,'' अशी बोचरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज येथे केली.

डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील अप्पा दातार चौकात सायंकाळी मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. काल कल्याणमध्ये झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला राज ठाकरे यांनी या सभेतून प्रत्युत्तर दिले.

कसाबला फाशी का दिली जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उपस्थित केला होता. त्यावर कसाबच्या फाशीचा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांशी काय संबंध, असा सवाल राज यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कसा कोथळा बाहेर काढला याविषयी वक्तव्य केले होते. त्याची, सत्तेवर असताना कल्याण-डोंबिवलीकरांचा कोथळा बाहेर काढला त्याचे काय, असे विचारून राज यांनी खिल्ली उडविली आहे. आपणास अंतर्गत वाद वाढवायचे नाहीत, असेही त्यांनी भाषणाच्या ओघात सांगितले.

या वेळी राज यांनी भाजपचाही समाचार घेतला. युतीच्या अंगाशी येते तेव्हा ते प्रशासनाला दोष देतात. टेंडरमध्ये पैसे खाताना प्रशासन आड येत नाही. टेंडर कशी पास होतात, असे विचारून राज म्हणाले, की सर्व बाजूने शहरे पोखरून काढणाऱ्या या लोकांना जरासुद्धा लाज वाटत नाही? माझ्या हाती सत्ता द्या. येथील समस्या दूर केल्या नाहीत, तर मी पुन्हा तोंड दाखवायलासुद्धा कल्याण-डोंबिवलीत पाय ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले.

अपक्षांना थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील?

ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 12:15 AM (IST)

डोंबिवली - 'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले, की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले.

'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?'' अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले,

'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले, की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का' असा प्रश्‍न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्‍न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.''

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा वचकनामा राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ""गेली साडे बारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर ""राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल; तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला ठाकरे यांनी दिला.

'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे सांगत डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरुवातीला मी "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्द्याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण हे कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते. पेपरवाल्यांनी ते प्रसिद्ध न करता नेमका हाच मुद्दा उचलून धरला. तसेच खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले दगड, असे विधान शिवसेनाप्रमुखांच्या आजूबाजुला असलेल्या लोकांविषयी केले होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. "माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील, की जाहिरात त्यांनी (शाहरूखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि अप्रत्यक्षरित्या आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज ठाकरे यांनीच महाबळेश्‍वर येथे उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ती काय ऍडल्ट फिल्म आहे का? असे सांगत राज ठाकरे यांनी ही फिल्म दाखवून काय साध्य होणार, असा प्रतिप्रश्‍न केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक मला अन्य कोणत्याही मुद्द्याभोवती फिरवायची नसून जनतेच्या प्रश्‍नाभोवतीच ठेवायची आहे. नागरिकांच्या प्रश्‍नांशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवरच मनसे निवडणूक लढवित असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आणि यापुढील सभांत याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.

भाऊबंदकीचा दुसरा अंक

भाऊबंदकीचा दुसरा अंक
-
Thursday, October 28, 2010 AT 01:15 AM (IST)


दुभंगलेले ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करून त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे.

दिवाळी सुरू होण्याआधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्यात वाक्‌बाण युद्ध सुरू झाले आहे. शब्दांची आतषबाजीही रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात जाहीर शिव्याशाप सुरू होते. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मात्र मी कधीही काही बोलणार नाही,' असे राज नेहमी सांगत असत; पण उद्धव यांनी थेट सामना करायचे टाळून जेव्हा बाळासाहेबांमार्फत शरसंधान सुरू केले तेव्हा राज यांना आपली प्रतिज्ञा कधी ना कधी मोडावी लागणार, हे स्पष्ट होते. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती त्या वेळी त्यांच्या नावे प्रसिद्धीला दिल्या जाणाऱ्या पत्रकातून किंवा "सामना'च्या कार्यकारी संपादकांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून राज यांच्या टिकेला उत्तरे दिली जात असत. प्रकृती स्थिरावल्यानंतर या वेळी ते दसरा मेळाव्याला आले आणि त्यांच्या तोंडूनच राज यांची टिंगलटवाळी केली गेली. आपल्या नातवाचे लॉंचिंग करताना शिवसेनाप्रमुखांनी पुतण्यावर केलेले शरसंधान घराणेशाहीची कक्षा आणखी संकुचित करणारे होते. राज यांनी त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे निमित्त साधून उत्तर दिले. शिवसेनाप्रमुखांनी या देशातल्या एकाही नेत्याला आपल्या ठाकरी शैलीतून सोडलेले नाही. त्यामुळे त्यांचेच बाळकडू घेऊन मोठ्या झालेल्या राज यांनी तरी किती काळ तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करायचा? "अरे'ला "कारे' करणे हा ठाकरी बाणा असेल, तर राजही "ठाकरे'च आहेत हे त्यांनी डोंबिवलीच्या मैदानात दाखवून दिले.

राज यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनाप्रमुखांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात "राज ठाकरे' हीदेखील घराणेशाहीच असल्याचे म्हटले आहे. ते बरोबरच आहे. त्यामुळे बाळासाहेब यांना राज यांनी दिलेल्या घरच्या आहेराने देशातले सारेच राजकारणी थक्क झाले तर नवल नाही. शिवसेनाप्रमुखांच्या वयाचा विचार करून गेल्या काही दिवसांत सर्वच राजकारण्यांनी त्यांना आपल्या राजकीय टीकेच्या वर्तुळाबाहेर ठेवले होते. पण आता खुद्द त्यांच्या पुतण्यानेच हे वर्तुळ छेदले असल्याने राजकारणातील इतर नेत्यांनाही बोलायला मोकळीक मिळणार आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना सोडल्यानंतर राज यांच्यासारखीच प्रतिज्ञा केली होती. पण त्यांनाही ही प्रतिज्ञा मोडायला शिवसेनेने भाग पाडले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंवरच "हल्लाबोल' केला. त्याचा त्यांना बराच त्रास झाला. बरीच शक्ती वाया गेली. त्यापासून धडा घेऊन राज आणि राणे या दोघांनीही बाळासाहेब यांना टिकेपासून दूर ठेवून उद्धव यांनाच आपले लक्ष्य केले होते. उद्धव यांच्या दृष्टीने हीच मोठी अडचण होती. या दोघांना थेट बाळासाहेबांच्या तोंडी देणे उद्धव यांची राजकीय गरज होती. राज यांनी बाळासाहेबांवर तोंडसुख घेण्याआधी काही दिवस राणे यांनीही "मातोश्रीवरील लीला' सांगण्याची धमकी दिली होती. त्यालाही बाळासाहेबांनाच उत्तर द्यावे लागले. त्यामुळे बाळासाहेबांना दैवत मानणारा शिवसेनेचा विरोधक उद्धव यांनी शिल्लक ठेवला नाही, असे म्हणता येईल. ही बेरीज समजायची की वजाबाकी याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांना करावा लागणार आहे. राज आणि उद्धव यांच्यात दुभंगलेले "ठाकरे घर' सांधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही आपोआपच खिळ बसणार आहे. ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करण्याचे, त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्
याचे आणि मराठी माणसाचे राजकारण सांधण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे. राज काय आणि बाळासाहेब काय, दोघेही बोलले ते खरेच आहे. राज बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झाले हेही खरे आणि बाळासाहेबांनी त्यांच्या संयमाचा विचार न करता आगपाखड केली हेही खरेच. तरीही दोघांनीही जे बोलायला हवे, ते टाळलेच आहे. केवळ व्यक्तिगत शेरेबाजी आणि टिंगलटवाळी यापुरताच विषय थांबला आहे. अशा व्यक्तिगत निंदानालस्तीतून लोकांची घटकाभर करमणूक होते; पण त्यातून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काहीच साध्य होत नाही. दोघांनाही परस्परांविषयी खरे बोलायचे असेल तर बोलण्यासारखे पुष्कळ आहे. त्यातून कदाचित सार्वजनिक हितही साधले जाईल! पण तसे काही होणार नाही. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्याच्या घरावर दगड मारत नाहीत, हे भारतातील राजकारणी चांगले जाणून असतात. त्यामुळे ठाकरे घराण्याने कल्याण-डोंबिवलीमध्ये जो धोबीघाट घातला, त्यातून ना कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांचे कल्याण होणार, ना महाराष्ट्रातील जनतेचे.

.

बुधवार, 27 अक्टूबर 2010

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 12:30 AM (IST)

कल्याण  - ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत केली. नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी युती, आघाडीवर सडकून टीका केली असली, तरी त्यांचा सर्वाधिक भर विकासाच्या मुद्द्यावरच होता.

कल्याण पूर्वेतील डबल टॉवर येथे मनसेतर्फे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार बाळा नांदगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे, काका मांडले, आमदार प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला, की तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली. आता माझ्या हाती सत्ता द्या, केळी सोलल्यासारखे एकेकाला सोलून ठेवतो,'' असे सांगत त्यांनी युतीच्या कारभारावर हल्ला चढविला.

'गटारे उघडी, रस्ते नाहीत, रुग्णालये नाहीत; यांनी काही केले नाही तरी लोक मतदान करतात. त्यामुळे तुम्हाला गृहित धरण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा विश्‍वास मोडीत काढत नाहीत, तोपर्यंत काही वेगळं घडणार नाही. हा विश्‍वास मोडून काढण्याची संधी चालून आली आहे. निवडून दिलेले लोक रग्गड झाले. शहर भकास झाले. निवडून दिलेल्या सत्ताधारी पक्षाने शहराच्या विकासाचा आत्मियतेने विचारच केला नाही. सकाळी दोन-तीन तास आणि सायंकाळी तीन तास वीज भारनियमन केले जाते. रोज करण्यासाठी काय तो व्यायाम आहे,'' असा सवाल राज यांनी केला. "माय नेम इज खान'च्या वेळी काठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वाढदिवसाला "सामना' मुखपत्रात चित्रपटाची जाहिरात छापून आल्यावर काय वाटले असेल? मी जर कृपाशंकरच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेलो, तर काय वाटेल माझ्याविषयी? तेच वाटले होते शिवसैनिकांना, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आजवर मी जे बोललो तेच केले आहे, असे सांगत मराठीतून दुकानांच्या पाट्या, मोबाईल फोनवरही मराठीला प्राधान्य, असे दाखले त्यांनी दिले. ""कल्याण डोंबिवलीबाबत बोलतोय तेच खरे करून दाखविणार आहे. कारण टेंडरवर माझे घर चालत नाही,'' असे सांगून ते म्हणाले, ""दात स्वच्छ होत नसतील, तर लोक टूथपेस्टही बदलतात. तुम्ही तर पंधरा-पंधरा वर्षे दात खराब झाले, पडायला आले तरी एकच टूथपेस्ट (युती) वापरत आहात. आता मनसे ही नवी टूथपेस्ट आहे. नवीन चकाचक. ती 31 ऑक्‍टोबरला वापरावीच लागेल; त्याशिवाय गत्यंतर नाही,'' अशी मल्लीनाथी राज ठाकरे यांनी केली.

शांतता नाही, तोपर्यंत भाषण नाही!सभेच्या ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. उपस्थितांचा एकच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सुरुवातीला 15 मिनिटे राज ठाकरे काहीच बोलले नाहीत. "जोपर्यंत शांतता होत नाही, तोपर्यंत भाषण करणार नाही; अन्यथा भाषण न करताच निघून जाईन,' असा दमही त्यांनी उपस्थितांना भरला. त्यानंतर गैरसोयीविषयी दिलगिरी व्यक्त करीत आधीच्या लोकांनी (सत्ताधारी युतीचे नेते) सगळ्या मोकळ्या जागा खाऊन टाकल्याने सभांसाठी जागा मिळत नसल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 01:00 AM (IST)

राज हा वार करणारा "वार'करी - उद्धव ठाकरेडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतदानासाठी आता चारच दिवस उरले असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्याही जाहीर सभांचे कुरुक्षेत्र बुधवारी चांगलेच रंगले. एकूणच या प्रचारात वैयक्तिक टीका करताना ठाकरी शैलीत एकमेकांच्या "वस्त्रहरणा'चा प्रयोग रंगत आहे. डोंबिवलीच्या "कल्याणा'चा मात्र या ठाकरी कलहात विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

'ज्या बाळासाहेबांना विठ्ठल म्हणतो, त्यांच्यावरच वार करणारा हा वारकरी आहे,'' असा हल्ला चढवत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ""सभेला कपडे कोणते घालू म्हणत होतास; पण कपडे काढल्यासारखा बोललास. माझ्यावर टीका केली, तरी मी गप्प राहिलो; पण बाळासाहेबांवर-माझ्या वडिलांवर हल्ला चढवशील, तर महाभारतातल्या अर्जुनासारखा-षंढासारखा मी गप्प बसणार नाही,'' असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले. येथील युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

रुळावरून घसरलेले रेल्वे इंजिन प्रदूषण करीत फिरत आहे, अशी टीका करताना उद्धव यांनी राज यांच्या प्रत्येक मुद्‌द्‌याचा समाचार घेतला आणि त्यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. मनसेचा धनसे असा उल्लेख ते सतत करीत होते. 'ज्याला अंगाखांद्यावर खेळविले, त्याने पूर्वी कपडे खराब केले होते. आता मोठा झालास. आता तरी आमचे कपडे खराब करू नकोस,'' असा टोला लगावताना राज यांचा उल्लेख त्यांनी "नालायक', "खंडोजी खोपडे' असा केला. 'शिवसेनेत खोबरे काढलेल्या करवंट्या उरल्या आहेत, असे म्हणून तू शिवसैनिकांचा अपमान केला आहेस; पण तुझ्याभोवती गळकी टमरेलं आहेत. शिवसैनिक होते म्हणून मुंबईच्या दंगलीत हिंदू आणि मराठी माणसे वाचली,'' याचे स्मरण त्यांनी करून दिले.

सत्ता दिलीत, तर विकासासाठी मी कल्याण-डोंबिवलीत पंधरवड्यातून तीन दिवस मुक्काम ठोकेन, असे राज यांनी जाहीर केले होते, त्याचा संदर्भ देत उद्धव म्हणाले, ""इथे तिथे मुक्काम ठोकायला मी नाटकी नाही आणि गाव दिसले की मुक्काम टाकायला ही काही तमाशाची बारी नाही.'' शिवसेनेत अधिकार नव्हते, तर राजला नाशिकचा विकास कसा करता आला, असा प्रश्‍नही त्यांनी केला. तुझा लढा नेमका कोणाशी, शिवसेनेशी की कॉंग्रेसशी, हे एकदा जाहीर कर, असे आव्हानही त्यांनी राज यांना दिले.

युतीमुळे कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश - राजकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा "वचकनामा' राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे मी डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरवातीला "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्‌द्‌याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. ""माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील की, जाहिरात त्यांनी (शाहरुखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज यांनी केला व आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज यांनीच महाबळेश्‍वर येथे उद्धव यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, "ती फिल्म दाखवून काय साध्य होणार,' असा प्रतिप्रश्‍न राज यांनी केला.

'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?''

अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले, 'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का,' असा प्रश्‍न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्‍न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.''

'पालिकेत गेली साडेबारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर 'राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला राज ठाकरे यांनी मारला.

'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले.

'ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी रात्री झालेल्या प्रचारसभेत केली.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला की, तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली.

Raj Thakre Wachknama Press Conference 5

Raj Thakre Wachknama Press Conference 4

Raj Thakre Wachknama Press Conference 3

Raj Thakre Wachknama Press Conference 2

Raj Thakre Wachknama Press Conference 1

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 27, 2010 AT 05:44 PM (IST)

मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारात मी बाळासाहेबांबाबत अवघी १५ मिनिटे बोललो आणि इतर भाषण कल्याण डोंबिवलीतील समस्यांविषयी केले. मात्र, काही माध्यमांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगविले. त्यामुळे मला पुन्हा त्याच विषयाची चर्चा करण्यात काही रस नसून, कल्याण डोंबिवलीत वाढलेल्या अराजकतेविषयी पाऊल उचलायचे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) आपल्या पक्षाचा 'वचकनामा' प्रसिद्ध करताना सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी ३१ ऑक्टोबरला मतदान होत असून, प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहे. राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचकनामा जाहीर करताना, बाळासाहेबांच्या अंगाखांद्यांवर आपण खेळलो असल्याचे मान्य करीत बाळासाहेबांबद्दल आदर असल्याचे सांगितले. त्यामुळे तोच विषय पुन्हा बोलून काही मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला अशी म्हणणारी शिवसेना पुन्हा मत मागायला मराठी माणसाकडे कशाला आली, असा प्रश्नही त्यांनी त्यांनी केला.

कल्याण डोंबिवलीकरांनी पूर्ण सत्ता माझ्या हातात दिली तर या ठिकाणी मी स्वतः थांबून कामे कशी केली जातात हे दाखवून देईन. काही चुकलं तर मला जबाबदार धरा असेही राज यांनी सांगितले.

मंगलवार, 26 अक्टूबर 2010

Raj thakre kalyan/dombivli

Raj thakre Kalyan/dombivili 2

Raj thakre Kalyan/dombivili

राज ठाकरेंना शेंदूर सेनेने फासला-बाळासाहेब

राज ठाकरेंना शेंदूर सेनेने फासला-बाळासाहेब
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 05:18 PM (IST)
 
मुंबई - राज ठाकरेसारख्या दगडाला शिवसेनेने शेंदूर फासला, म्हणूनच त्याच्याभोवती बडवे निर्माण झाले, या शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर मंगळवारी टीका केली. डोंबिवलीमधील प्रचारसभेत सोमवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी निवेदन प्रसिद्ध करून राज ठाकरेंवर प्रतिहल्ला चढविला.

राज ठाकरे हे शेंबडे पोरं असून, त्याला लहानचे मोठे आम्हीच केल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेच्या पक्षातच घराणेशाही असताना त्याने शिवसेनेवर चिखलफेक करू नये. उद्धव ठाकरेंची निवड राज ठाकरे यांनीच केली. महाबळेश्‍वरमध्ये त्यावेळी झालेल्या सभेची चित्रफित आमच्याकडे असून, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापुरच्या नागरिकांना आम्ही ती दाखवणार आहोत, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.

सोमवार, 25 अक्टूबर 2010

मी कॉपी करत नाही

मी कॉपी करत नाही
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:15 AM (IST)
 

डोंबिवली - 'मी काहीही बोललो तर माझी कॉपी करतो, अशी टीका माझ्यावर केली जात आहे. कारण माझ्यावर लहानपणापासून बाळासाहेबांचेच संस्कार आहेत. त्यांच्यासारखा वागणार-बोलणार नाही तर मग काय करणार,' अशी कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. "माझी कॉपी करतो' या बाळासाहेबांच्या टीकेला राज ठाकरे यांनी आदरपूर्वक प्रत्युत्तर दिले आहे. मी आजही त्यांना मानतो, कालही मानत होतो. यापुढेही मानेन. इतरांनी लुडबूड करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे.

डोंबिवली पश्‍चिमेतील भागशाळा मैदानात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी झालेल्या प्रचारसभेत राज बोलत होते. या वेळी नाट्य अभिनेते भरत जाधव, मनसेचे आमदार रमेश पाटील, रमेश वांजळे, शिशिर शिंदे, प्रकाश भोईर, प्रवीण दरेकर, शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, वैशाली दरेकर, मनोज चव्हाण, राजन गावंड, काका मांडले आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज यांनी सांगितले, की मी व्यंगचित्रकार झालो. माझ्या व्यंगचित्रांच्या ब्रशचा "स्ट्रोक' बाळासाहेबांसारखाच आहे. त्याविषयी यापूर्वी कोणी बोलले नाही. आचार्य अत्रे यांचे लिखाण आणि "सामना'मधील बाळासाहेबांचे अग्रलेख यात साम्य दिसून येईल. म्हणजे बाळासाहेबांनी अत्रेंची कॉपी केली, असे म्हणायचे? असे दाखले राज यांनी दिले. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष मी केला, असे बाळासाहेब सांगतात. मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता; मात्र बाळासाहेब असे म्हणत असतील तर त्यांना माझा एकच सवाल आहे, की मी घेतलेला निर्णय अयोग्य होता तर तो माणूस तिथेच कसा ? आणि मी योग्य होतो तर माझे निर्णय चुकीचे कसे, असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, की शिवसेनेत आता जी जुनी माणसे आहेत ती सर्व खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे आहेत.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केला, असा प्रचार निवडणुकीत करणाऱ्यांना माझा सवाल आहे, की हे पक्षाचे धोरण नाही. कल्याण-डोंबिवलीवर गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीने बलात्कार केला आहे. त्याची त्यांना शरम वाटत नाही. काल आघाडीच्या प्रचारसभेत मते द्याल तर ???"छप्पर फाड के मते देऊ,'??? असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही? सत्ता दिली तर निधी नाही, माणसे तडफडून मेली तरी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, हे कोणते राज्यकर्ते आहेत? असाही सवाल त्यांनी केला. आघाडीची प्रचारसभा म्हणजे दहातोंडी रावणाचा अवतार असल्याची टीका केली.

या वेळी अमरसिंगांवर सडकून टीका करताना राज म्हणाले, की सगळ्यांनी नाकारल्यावर बेडूक असलेल्या अमरसिंगला शहाणपण आले आहे. मराठींचा मुद्दा उपस्थित करून मनसेने रान उठविले.

आता निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या बिहारी पुळक्‍याला प्रत्युत्तर देणारे स्वाक्षरीची मोहीम करीत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी केली. तेव्हा कुठे होती शिवसेना आणि उद्धव ठाकरेही कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.?????

मनसेच्या हाती सत्ता देणार असाल तर पूर्ण सत्ता द्या. कोणाच्या हनुवटीला हात लावण्याची वेळ आणू नका. सत्ताधारी युतीला सत्तेबाहेर फेकून द्या. संधी वारंवार येत नसते. गेली पंधरा वर्षे चांगला पर्याय नव्हता. आता मनसे पर्याय आहे. मी उभा आहे. माझा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले. पक्षाचा "वचकनामा' येत्या 27 तारखेला प्रसिद्ध करणार आहे. त्यात भरमसाठ आश्‍वासनांचा भरणा नसून काही दहाएक मुद्देच आहेत, याकडेही राज ठाकरे यानी लक्ष वेधले. सभेला खच्चून गर्दी होती. कान्होजी जेधे मैदान पूर्ण भरले होते.

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - 'सभेला येताना कपडे कोणते घालू, असा विचार करत होतो. कोणतेही कपडे घातले असते तरी म्हणाले असते, माझी कॉपी करतो,'' अशी तडाखेबंद सुरुवात करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच लक्ष्य केले. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, असे वारंवार सांगतानाच 'मी कॉपी करतो म्हणणाऱ्यांनीच प्रबोधनकार, अत्रेंची कॉपी केली म्हणायचे का?'' असे विचारत त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रथमच तोंडसुख घेतले.

शिवसेनेत मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता, तेथे मी कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नेमणूक कशी करणार, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. बाळासाहेबांनाच उद्धवला कार्याध्यक्ष करायचे होते, पण मी आड येत होतो. समजा, मी उद्धवची नियुक्ती केली असे मानले, तर मग माझा निर्णय योग्य की अयोग्य ते तरी सांगा? अयोग्य असेल, तर तो माणूस अजून त्या पदावर कसा? योग्य असेल तर मग माझे इतर सर्व निर्णय कसे काय चुकले? पक्ष तुमचा, मालक तुम्ही, मग तेथे मी निर्णय कसे घेणार, अशा प्रश्‍नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली. केव्हा काय बोलतो ते बाळासाहेबांना आठवत नाही, अशी चौफेर टोलेबाजी करीत आपल्याच "विठ्ठला'चा आणि त्या भोवतीच्या बडव्यांचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला. शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेल्या वरवंट्या शिल्लक आहेत, असा घणाघाती हल्ला चढवित शिवसेना-भाजप युतीने सत्तेच्या काळात कल्याण-डोंबिवलीवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज यांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यांच्या प्रत्येक टोलेबाजीला जोरदार प्रतिसाद देत त्यांना प्रतिसादही मिळत होता.

डोंबिवलीच्या कान्होजी जेधे मैदानात मनसेची सभा झाली. यावेळी पक्षाच्या उमेदवारांसोबत अभिनेते भरत जाधवही उपस्थित होते. राज हे शरद पवारांची टेस्ट ट्यूब बेबी असल्याची टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी लक्ष्य केले आणि मला मराठी माणसाने टेस्ट केले आहे. मी त्यांची बेबी आहे, असे प्रत्युत्तर दिले. ""शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आजवर तोडपाणी केले. काहीही काम न करता तुम्ही त्यांना निवडून दिले, म्हणून ते शेफारले आहेत. पूर्वी तुमच्यासमोर शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपलीकडे पर्याय नव्हता. आता मनसेचा पर्याय आहे. आम्हाला संधी द्या. या शहराचा कायापालट करू. मनसेचा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा,'' असे सांगत त्यांनी मनसेला मते देण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवलीकरांना केले.

गुरुवार, 21 अक्टूबर 2010

आघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे?

आघाडीला वेध मनसेच्या वचकनाम्याचे?
सकाळ वृत्तसेवा
Friday, October 22, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून कोणत्या आश्‍वासनांची खैरात होणार आहे, याची जनतेला उत्सुकता लागली आहे. परंतु आघाडीचे नेते जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात राहून गेलेल्या मुद्द्यांचा समावेश आपल्या वचननाम्यात करण्याची तयारी आघाडीने सुरू केलेली असतानाच दुसरीकडे मनसेच्या "वचक'नाम्याचे वेध आघाडीला लागले असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.

बुधवारी झालेल्या आघाडीच्या संयुक्‍त बैठकीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल, अशी शक्‍यता आघाडीच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. आघाडीच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवर महिन्याभरापासून चर्चा सुरू असून, दोन आठवड्यांपूर्वीच जाहीरनामा तयार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र युतीने वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर त्यातील आश्‍वासनांपैकी कोणते मुद्दे राहून गेले आहेत, याची चाचपणी करत आघाडीच्या नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा बदल केला असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली.

आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून मनसेची धास्ती घेतली असून, मनसे आपल्या वचकनाम्यात कोणत्या वचनांना प्राधान्य देते, याकडे आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. यामुळे जोपर्यंत मनसेचा वचकनामा जाहीर होणार नाही तोपर्यंत आघाडीचे नेते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत चालढकल करणार असल्याची शक्‍यता राजकीय गोटातून व्यक्‍त होत आहे. मनसेने आपल्या वचकनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांनुसार आपल्या जाहीरनाम्यात बदल करून परिपूर्ण जाहीरनामा जनतेसमोर ठेवून त्याद्वारे जनतेला इम्प्रेस करण्याचा डाव आघाडीचे नेते टाकत आहेत.

प्रत्यक्षात जाहीरनाम्यातील वचनांची वीस टक्‍केही पूर्तता होत नाही. तरीही पालिका निवडणुकीत आघाडी कोणती नवी आश्‍वासने देणार? याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

आघाडीची भूमिका काय?स्थानिक नेते 24 ऑक्‍टोबर रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचे सांगत आहेत. असे असले तरीही जोपर्यंत मनसेचा वचकनामा प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध होण्यात टाळाटाळ होण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असतानाही आघाडीची भूमिकाच जनतेसमोर मांडली न गेल्याची भावना जनतेतून व्यक्‍त होत आहे.