जाधव यांच्या भेटीला ठाकरे, विलासराव देशमुख, मुंडे, पालकमंत्रीही
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 10, 2011 AT 12:15 AM (IST)
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. नऊ) सकाळी 11 वाजता न्यायालयाच्या आदेशाने घाटी रुग्णालयात जाऊन जखमी आमदार हर्षवर्धन जाधव आणि जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी आमदार जाधव यांच्याशी एकांतात चर्चा केली.
दरम्यान, रविवारी दिवसभरात आमदार जाधव यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, खासदार गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेल्या आमदार हषवर्धन जाधव यांना वेरूळ लेणीच्या पायथ्याशी पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना खुलताबाद पोलिस ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. त्यानंतर रविवारी (ता. नऊ) त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. ते विमानतळावरून सुभेदारी विश्रामगृहात आले. तेथून ते आमदार जाधव यांना भेटण्यासाठी घाटी रुग्णालयात पोहचले. तत्पूर्वी श्री. ठाकरे यांना भेटण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली.
सध्या आमदार जाधव हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ही परवानगी श्री. ठाकरे यांना घ्यावी लागली. आमदार जाधव यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हे खास हेलिकॅप्टरने मुंबईहून औरंगाबादला आले होते. त्यांच्यासोबत आमदार शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे होते. या वेळी घाटी रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
श्री. ठाकरे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि या प्रकारात जखमी झालेल्या दिलीप बनकर यांचीही भेट घेतली. या वेळी आमदार जाधव यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्या तेजस्विनी जाधवही उपस्थित होत्या. श्री. ठाकरे यांना एकट्यालाच आमदार जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबईहून ठाकरे यांच्यासोबत आलेल्या आमदार शिशिर शिंदे यांच्यासह नेत्यांनाही खोलीच्या बाहेर थांबावे लागले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ठाकरे यांनी आमदार जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते सुभेदारीकडे रवाना झाले.
दरम्यान, राज ठाकरे आलेले असताना आमदार जाधव यांचे सासरे खासदार रावसाहेब दानवे यांनाही आमदार जाधव यांच्या खोलीत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी खासदार दानवे आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.
"शोध मराठी मनाचा' कार्यक्रमाच्या समारोपानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, खासदार गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार श्री. जाधव यांची भेट घेतली. या वेळी श्री. देशमुख यांनी या प्रकरणी आपण कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले, तर श्री. मुंडे यांनी या मारहाणीचा निषेध केला.
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार जाधव यांना झालेल्या मारहाणप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नियुक्ती केली आहे. त्यामध्ये आमदार संजय सिरसाठ, आमदार किशनचंद तनवाणी आणि आमदार संतोष सांबरे यांचा समावेश आहे. या समितीनेही रविवारी (ता. नऊ) आमदार जाधव यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेही उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें