जाधव, बनकर यांची हर्सूल कारागृहात रवानगी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 11, 2011 AT 12:56 PM (IST)
औरंगाबाद - पोलिसांनी केलेल्या मारहाणप्रकरणी आमदार हषवर्धन जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांना आज (मंगळवार) हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. बुधवारी (ता. 12) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादेत होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार जाधव आणि दिलीप बनकर पाटील यांची हर्सूलमध्ये रवानगी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वेरूळ लेणी येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी निघालेल्या जाधव आणि बनकर पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर साधारणतः दोन दिवस आमदार जाधव यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यावेळी आमदार जाधव यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना उपचारानंतर हर्सूल कारागृहात नेण्याऐवजी तिथेच उपचारार्थ दाखल केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज त्यांना हर्सूल कारागृहात दाखल केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें