शनिवार, 31 दिसंबर 2016

मनसे सोडणाऱ्यांवर पश्‍चातापाची वेळ - बाळा नांदगावकर

पुणे - ""महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यामुळे लोकप्रतिनिधींची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जे पक्ष सोडून जातील, त्यांना नंतर पश्‍चाताप होईल,'' अशा शब्दांत मनसेचे वरिष्ठ नेते आणि पुणे महापालिका निवडणुकीसाठी पुण्याचे प्रभारी बाळा नांदगावकर यांनी पक्षांतर करणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
मनसेतर्फे महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पुढील आठवड्यात होणार आहेत. त्यानिमित्त आढावा बैठक घेण्यासाठी शहरात आलेल्या नांदगावकर यांनी गुरुवारी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. विविध विषयांवरील पक्षाची भूमिका, निवडणुकीची तयारी, मराठी आणि पक्षांतराच्या मुद्यावर नांदगावकर यांनी या वेळी मोकळेपणाने गप्पा मारल्या. ऑगस्ट महिन्यापासून पुण्यातील निवडणुकीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर संवाद "प्रस्थापित' केल्याचे सांगत नांदगावकर यांनी यापुढे नागरिकांबरोबरही अशाच प्रकारे संवाद साधण्यात येईल, असे सांगितले.
पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचे मूल्यमापन कसे कराल, या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ""महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करताना पुणेकरांच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही पुणेकरांची क्षमा मागतो; पण बहुतांश लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रभागांमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती अधिकाधिक लोकापर्यंत पोचविण्यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी नगरसेवकांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद वाढविला आहे.''
पक्षांतराच्या मुद्यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, ""फक्त दहा वर्षे जुन्या असलेल्या आमच्या पक्षाने गेल्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळविले. निवडून आलेल्या नगरसेवकांना, नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षामुळे आणि राजसाहेबांमुळे ओळख मिळाली. पक्षामुळे हे सर्व जण मोठे झाले; परंतु सध्याच्या प्रभागरचनेनुसार निवडून येण्यासाठी म्हणून संधी साधत अन्य पक्षांत जाणाऱ्या या सर्वांना नंतर पश्‍चाताप होईल. प्रभागात चांगले काम करणाऱ्या विद्यमान नगरसेवकांसह जिंकून येण्याची क्षमता (इलेक्‍टिव्ह मेरिट) असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल.''

शनिवार, 19 नवंबर 2016

मोदी, दोन उंदीर पकडण्यासाठी घर जाळले! - राज

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळा पैश्याचा एवढा तिरस्कार होता, तर मग तुम्ही निवडून आलाच कसा. 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा खर्च भाजपने अद्याप दिलेला नाही. पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका बँकेतून पैसे काढून झाल्या का?, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडत या निर्णयाबाबत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले -
- नोटबंदीचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतलेला नाही.
- रोज नवीन नियम येत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.
- निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार केला नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.
- नोटबंदीने देश बदलत असेल तर स्वागत आहे.
- बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहिलेले नागरिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पाणीही स्वीकारत नाहीत, हे कशामुळे पहायला हवे.
- नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय फसला तर, देश खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही.
- निर्णय मागे घेणार नाही, असे ते म्हणत आहे, मी पण म्हणतो मागे घेऊ नका. पण, निर्णय फसल्यास देश किती मागे जाईल हे सांगणे कठीण आहे.
- काळा पैसा कोणाकडे आहे, हे माहिती असूनही अद्याप छापे पडताना दिसत नाही. 
- रांगेत उभे राहून सर्वसामान्यच मरत आहेत. काळा पैसेवाला एकतरी अद्याप मेला आहे का?
- देशातील फक्त साडेचार टक्के लोक प्राप्तीकर भरतात. देश रोख व्यवहारावर चालतो. हा सर्व काळा पैसा नाही.
- पंजाबची निवडणूक लढविताना अरुण जेटलींनी फॉर्म भरताना रोख रक्कम 82 लाख रुपये दाखविली होती. तेव्हा नाही विचारले काळा पैसा किती आहे. आज ही परिस्थिती अरुण जेटलींवर आली असती तर त्यांनी अडीच-अडीच लाख कसे भरले असते. 
- दहा महिन्यांपासून या निर्णयाबाबत काम सुरु आहे. मग, आठ दिवसांपूर्वी नोटांच्या कागदाबाबतची टेंडर कशी काढण्यात आली.
- नोटबंदी करताना नागरिक एटीएममधून पैसे काढतात हे माहिती नव्हते का? एटीएमच्या बदलासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा खर्च आहे.
- बनावट नोटा या साडेचारशे कोटी रुपयांच्या नोटा असताना तुम्ही साडे सतरा लाख कोटी रुपयांच्या नोटांवर बंदी घातली. दोन उंदीर पकडण्यासाठी अख्खे घर जाळण्याचा हा प्रकार आहे.
- दहा महिन्यांपूर्वी नोटा छापण्यास सुरवात केली, मग उर्जित पटेलांची सही कशी. उर्जित पटेल रिलायन्समध्ये नोकरीत होते. 
- जगभरात आर्थिक मंदी आल्यानंतर आपला देश फक्त कॅश इकॉनॉमीवर तरला होता.
- मोदींनी म्हटले आहे 50 दिवस द्या, चला आम्ही द्यायला तयार आहोत.
- मोदीजी सकाळी गोव्यात भाषणात हुंदका येतो आणि पुण्यात शरद पवार यांचे बोट धरून राजकारण शिकलो असे म्हणत आहेत.
- संघप्रमुख मोहन भागवत याविषयी काहीच बोलले नाहीत. संघातील, भाजपमधील लोक नाराज आहेत.
- जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीबाबत रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधान एकमेकांवर निर्णय ढकलत आहेत.
- या देशात दंगली घडतील मी यापूर्वीच म्हटले होते, आता सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटले आहे.
- देशाचा विचार न करता पैशाबाबत असा निर्णय घेता, हा निर्णय घेतल्यानंतर तुमचाच खासदार लग्नात 500 कोटी खर्च करतो. मुलीच्या साडीची किंमत 17 कोटी होती.
वृत्तपत्रातील जाहिराती कमी व्हायला लागल्या. टीव्हीवरही फक्त ‘पतंजली‘च्याच जाहिराती आहेत. या जाहिराती कुठून येतात, हे माहीत आहेच
- अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागणार आहे, त्यामुळे स्वतःच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे.
- नोटाबंदीची हे प्रकरण सावरले गेले तर आनंदच आहे. या निर्णयातून काहीतरी चांगले घडो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

रविवार, 23 अक्टूबर 2016

राज ठाकरेंची खंडणी आम्हाला नको: लष्कर

नवी दिल्ली - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात संधी देणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या बळजबरीबाबत भारतीय लष्कराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असलेल्या "ए दिल हैं मुश्‍किल‘ या दिग्दर्शक करण जोहर याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "काही अटी‘ घालत या चित्रपटाच्या प्रदर्शनास असलेला विरोध मागे घेत असल्याचे जाहीर केले. या अटींमध्ये सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भातील अटीचाही समावेश होता. या प्रकारासंदर्भात भारतीय लष्कराकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. याआधीच उरी येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून करण्यात आलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्‍स‘चे राजकारण झाल्याने लष्कराकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवरच, हा नवा प्रकार घडला आहे.
"लष्कराबरोबर राजकारण करु नका. भारतीय लष्करास अत्यंत शिस्तबद्ध, बिगर राजकीय व धर्मनिरपेक्ष पार्श्‍वभूमी लाभली आहे. तेव्हा अशा खालच्या स्तरावरील राजकीय चिखलफेकीमध्ये ओढले जावे, अशी लष्कराची इच्छा नाही,‘‘ असे संतप्त मत एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्‍त केले आहे. ""सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करुन देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘‘ अशी भावना अन्य एका अधिकाऱ्यानेही व्यक्त केली.
अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लष्कराने अंतिमत: स्वतंत्ररित्या निधी स्वीकारण्याचे मान्य केले असून यासाठीच सैनिक कल्याण निधीची (आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज) स्थापना करण्यात आली आहे. मात्र राजकीय दबाव आणून निधी देण्यास भाग पाडले जाणे सर्वथा चुकीचे असल्याचे प्रातिनिधीक मत लष्करामधून व्यक्त करण्यात आले आहे. "सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही,‘ अशी तीव्र प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल मनमोहन बहादूर (निवृत्त) यांनी व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांच्या अटी 
ए दिल... चित्रपटाच्या सुरवातीला हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखवावा, भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालावी, ज्या निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे, त्यांनी प्रायश्‍चित म्हणून पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीत जमा करावेत, अशा अटी बैठकीत राज ठाकरे यांनी घातल्या.

शनिवार, 22 अक्टूबर 2016

हा मनसेच्या आंदोलनाचा विजय- राज ठाकरे

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा मनसेने केलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. अखेर आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत या चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. या बैठकीला राज ठाकरे, करण जोहर उपस्थित होते.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की या बैठकीत आमच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल‘ चित्रपट सुरु होण्यापूर्वी उरी हल्ल्यात हुतात्मा जवानांना आदरांजली वाहणारा फलक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.. प्रोड्युसर्स गिल्ड यांनी पत्र लिहून आश्वासन दिले आहे, पाकिस्तानी कलाकार, गायक यांना चित्रपटात घेणार नाही. पाकिस्तानी कलाकारांना घेऊऩ काम करणाऱ्या प्रत्येक निर्मात्याने प्रायश्चित म्हणून लष्कराच्या वेलफेअर फंडाला पाच कोटी रुपये द्यावेत. या सर्व मागण्या मान्य झाल्याने आमच्या आंदोलनाचा विजय झाला आहे. मनसेने यापूर्वीही पाक कलाकारांना विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांचाच या संदर्भात मला फोन आला होता. पाक कलाकारांसाठी आपल्याकडे रेड कार्पेट का टाकले जाते. मला वाटत नाही, की हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय नागरिक जातील.

शनिवार, 8 अक्टूबर 2016

मावळतो तो पुन्हा उगवतोही - राज ठाकरे

पुणे - ‘राज ठाकरे आता मावळला‘, असं काहींना वाटतं; पण जो मावळतो तो उगवतोही. हे, लक्षात ठेवा,‘‘ अशा नेमक्‍या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांना उत्तर दिले. राज विझला, असं कोणी म्हंटल नाही. हे बरं झालं, अशी कोटीही त्यांनी या वेळी केली.

मुंबई, पुण्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी ठाकरे यांच्यावर नुकतीच टीका केली होती. त्याला ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत उत्तर तर दिलंच. शिवाय, राणे यांचं व्यंग्यचित्र रेखाटून त्यांचा स्वभावही त्यातून दाखवला.

ठाकरे म्हणाले, ‘राजकारण हा माझ्या जगण्याचा मुद्दा नाही. त्यावर अवलंबून नाही. खरंतर राजकारणाकडं मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. हा माझ्या "पॅशन‘चा विषय आहे. जगभरात ज्या चांगल्या गोष्टी पाहतो, तशा आपल्याकडे होऊ शकतात, याचा सतत विचार करत असतो. ते करून दाखवण्याची तयारीही आहे.‘‘ नगरसेवक, आमदार कोणाच्या लक्षातही राहत नाहीत. नव्वद टक्के लोकांचा त्यांच्याशी कधी संबंधही येत नाही; पण हे लोक मतदार असतात. त्यांनी मत दिलेले असते. शहरात सुधारणा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असते. ती पूर्ण करणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. ती विसरता कामा नये. लोकप्रतिनिधींनी काम केले तर खरोखरच शहर बदलू शकते. त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी,‘‘ असेही ते म्हणाले.

शनिवार, 1 अक्टूबर 2016

सलमानला पुळका असेल, तर पाकला जावे: राज

मुंबई : "बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास येथील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांच्या संघटनेने बंदी घातली आहे. यावर सलमान खानसह काही कलाकारांनी नाराजीचा सूर लावला होता.


‘पाकिस्तानमधील कलाकार दहशतवादी नाहीत,‘ असे वक्तव्य सलमान खानने केले होते. या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी आज समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, "कलाकार आभाळातून पडले आहेत का? कलाकारांना सीमा नसतात म्हणे! कर्नाटक-तमिळनाडूमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद झाले, तेव्हा दोन्ही राज्यांतील कलाकार रस्त्यावर उतरले होते. त्यांना त्यांच्या सीमा कळतात. ते स्वत:च्या राज्याच्या पाण्यासाठी उभे राहिले आणि यांना (हिंदी चित्रपटांतील कलाकार) स्वत:च्या देशासाठी उभे राहता येत नाही? पाकिस्तानच्या ज्या कलाकारांना यांना पुळका आहे, त्यांना खुद्द पाकिस्तानमध्ये तरी किंमत आहे का? ‘पाकिस्तानचे नागरिक चांगले आहेत‘ असा यांचा दावा असतो. पण आमच्यासमोर त्यांचे दहशतवादीच येत असतात. सलमान खानला पाकिस्तानविषयी एवढेच प्रेम असेल, तर ‘बजरंगी भाईजान‘चे चित्रिकरण पाकिस्तानमध्ये जाऊन का नाही केले?‘‘

राज ठाकरे म्हणाले..
  • ‘पाकिस्तानचे काय करावे‘ आणि त्यांच्याशी कसे वागावे, हे ठरवायला पंतप्रधान आणि आपले लष्कर सक्षम आहे. त्यांना इतर कुणी सल्ले देण्याची गरज नाही. 
  • ‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. 
  • ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी‘वर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. हे कसे काय चालते? 
  • ‘आयपीएल‘मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर ‘बीसीसीआय‘ने बंदी घातली आहे. त्यावेळी ‘खेळाडू दहशतवादी नसतात‘ असे कोणताही खेळाडू म्हणाला नाही. मग कलाकारच असे का बोलतात? 
  • फवाद खान पाकिस्तानमध्ये जाऊन सांगतो, की मला माझा देश प्रिय आहे आणि मी निषेध करणार नाही. निषेध करणार नाही, मग इथे काम कसे काय करू शकतो? 
  • उद्या सीमेवरील जवानाने हातातील शस्र खाली ठेऊन ‘पाकिस्तानच्या कलाकरांची मैफल ऐकतो‘ म्हटले, तर देशाची सुरक्षा कोण करणार? सलमान खान?

शनिवार, 24 सितंबर 2016

मराठा समाजाचा मोर्चा पुण्यातील गर्दीचा उच्चांक मोडणार?

पुणे - इंदिरा गांधी, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण यांच्या लाखांचा आकडा ओलांडणाऱ्या सभा, गणेशोत्सव, आषाढी वारीनिमित्त जमणारे काही लाख भाविक यांचा अनुभव पुणेकरांनी आतापर्यंत घेतला आहे. मात्र, मराठा समाजाच्या मोर्चाच्या संयोजकांनी केलेल्या नियोजनानुसार पुण्यात उद्या (रविवारी) मोर्चा निघाला, तर तो आतापर्यंतचे सर्व आकडे पार करणारा उच्चांकी असण्याची शक्‍यता आहे. पोलिसांपासून ते संयोजकांपर्यंत अनेकांनी केलेल्या अंदाजाचा लंबक दहा ते वीस लाखांपर्यंत जात असल्याने प्रत्यक्ष काय होईल, याबाबत उत्सुकता आहे.

राज्यात ठिकठिकाणी निघणारे मराठा क्रांती मूक मोर्चे त्या-त्या भागांत गर्दीचे उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. या मोर्चाच्या आयोजकांनी केलेल्या दाव्याइतके लोक रविवारी सहभागी झाल्यास, हा विराट मोर्चा पुण्यातही गर्दीचा विक्रम नोंदवील. पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्याचे नियोजनही सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतील मराठा समाजही रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे पुण्यात रविवारी होणाऱ्या मोर्चाबद्दल सर्वत्र मोठी उत्सुकता आहे.
पुण्यात गणेशोत्सवात मोठी गर्दी होते. त्याचबरोबर दरवर्षी देहू-आळंदीहून पंढरपूरला मार्गस्थ होणारा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी थांबतो. या सोहळ्यात दरवर्षी एक ते सव्वा लाख वारकरी असतात. तसेच स्थानिक भाविकही त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. पालखी सोहळा पुण्यात येतो, त्या वेळी जशी डेक्कन जिमखाना आणि लक्ष्मी रस्ता परिसरात गर्दी होते, तशीच गर्दी उद्याही अनुभवास येणार आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 26 फेब्रुवारी 1998 रोजी वानवडीतील
केदारीनगर येथे जाहीर सभा घेतली होती. शहर आणि जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने मतदार सभेला आले होते. कॉंग्रेसचे नेते शरद पवार त्यांच्यासमवेत होते.
सभेला पाच लाख लोक उपस्थित असल्याचा उल्लेख त्या वेळच्या बातम्यांमध्ये आहे. जाहीर सभांच्या गर्दीचा उच्चांक मोडून नवा विक्रम त्या वेळी नोंदविला गेला. सोनिया गांधी यांच्यासमवेत असलेल्या राहुल गांधींना त्या वेळी शिंदेशाही पगडी घालून सन्मानित करण्यात आले होते.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांची फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर अपक्ष उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी मोठी सभा झाली. त्या सभेला दीड लाखापेक्षा अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

बांगला देशाची निर्मिती 1971 मध्ये झाली. त्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातील सभेला झालेली प्रचंड गर्दी त्या वेळी चर्चेचा विषय ठरला
होता. त्यानंतर, त्यांनी 1976 मध्ये सारसबागेत घेतलेल्या सभेलाही प्रचंड गर्दी झाली होती. विमानतळापासून सारसबागेपर्यंत त्यांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.

ज्येष्ठ समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची 24 जानेवारी 1975 मध्ये झालेल्या जाहीर सभेला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे दीड लाख लोक उपस्थित होते. इंदिरा गांधी यांच्या 1977 मध्ये पराभव करणाऱ्या राजनारायण यांच्या जाहीर सभेला त्या वेळी मोठी गर्दी झाली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 19 फेब्रुवारी 1997 रोजी सारसबाग येथे सभा झाली. त्या सभेलाही मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे एप्रिल 1989 मध्ये निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनाला हजारो शोकाकुल चाहते उपस्थित होते. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी अंत्ययात्रा असा उल्लेख त्या वेळच्या बातम्यांमध्ये करण्यात आला होता.

शुक्रवार, 23 सितंबर 2016

पाकिस्तानी कलाकारांनो भारत सोडा! - मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फतवा; चित्रीकरण थांबविण्याचा इशारा
मुंबई - उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना भारत तातडीने सोडण्याचा फतवा शुक्रवारी काढला. देश सोडून हे कलाकार न गेल्यास चित्रीकरण थांबविण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

शाहरुखअभिनित "रईस‘ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि "ऐ दिल है मुश्‍कील‘ चित्रपटातील अभिनेता फवाद खान यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांमुळे भारतीय कलाकारांची संधी हिरावून घेतली जात आहे, असा आरोप मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. या कलाकारांना तातडीने देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. हे कलाकार परत न गेल्यास आमचे कार्यकर्ते त्यांना हाकलून देतील, तसेच त्यांना येथे काम करू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
करण जोहर यांचा "ऐ दिल है मुश्‍कील‘ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात फवाद खान हा सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. माहिरा ही शाहरुख खान याच्या "रईस‘ चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे.
मुंबई पोलिसांनी मात्र, या कलाकारांनी चिंता करण्याची गरज नसून, त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल आहे. मनसेच्या चित्रपट विभागाने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास 48 तासांची मुदत दिली आहे. पाकिस्तानी कलाकारांना पत्रेही पाठविण्यात आली असून, यात म्हटले आहे, की तुमचा देश दहशतवादाला प्रोत्साहन देत असताना तुम्ही येथील व्यवसाय बंद करा. याबाबत चित्रपट निर्मात्यांनाही पत्रेही पाठविण्यात येणार आहेत. देशात मोठ्या संख्येने कलाकार असून, ते काम मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. तुम्ही कोणत्या आधारावर पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहात, असा प्रश्‍न निर्मात्यांना विचारण्यात येणार आहे.

भारतासारख्या सुमारे सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात लाखो जण चित्रपटातील संधीसाठी संघर्ष करीत असताना मोठे बॅनर्स पाकिस्तानी कलाकारांना संधी देत आहेत.
- शालिनी ठाकरे, सरचिटणीस, मनसे

बुधवार, 14 सितंबर 2016

...तर राज यांनी निवडणूक लढवावी:आशीष देशमुख

नागपूर - मुंबईतील प्रेस क्‍लबमध्ये विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालणारे मनसेचे कार्यकर्ते लोकशाहीचे विरोधक आहेत. वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा त्यांचा ग्रह असल्यास मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी व निवडून यावे, असे आव्हान काटोलचे भाजप आमदार आशीष देशमुख यांनी दिले आहे. ही निवडणूक राज ठाकरेंना लढविता यावी यासाठी आपण काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

आज मुंबईत घडलेल्या घटनेवर देशमुखांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकशाहीत आपले मत मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे विरोधक नागपुरात किंवा विदर्भात अन्यत्र येऊन वक्तव्ये करतात. त्यांचे अभिव्यक्तीचे व मताचे स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असले प्रकार घडत नाहीत. तोच सभ्यपणा मनसेने मुंबईत दाखवायला हवा. धुडगूस घालणे हे सर्वांत सोपे काम आहे. त्यात कोणताही पराक्रम नाही. पराक्रम गाजवायचाच असेल, तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपले मत मांडावे. गुंडगिरी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनसे आणि अन्य विदर्भविरोधकांकडून अखंड महाराष्ट्रासाठी दिले जाणारे तर्क निराधार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा किंवा त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा विदर्भाच्या मागणीशी काहीही संबंध नाही. विदर्भ जबरीने महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला, हेच ऐतिहासिक वास्तव आहे. नव्या पिढीला हे वास्तव कळून चुकले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या नावाखाली सुरू असलेला भूलभुलैया यापुढे खपणार नाही, असे मतही आशीष देशमुख यांनी नोंदविले आहे.

विधानसभेत केवळ एक आमदार असलेला मनसे. विदर्भात कुठेही विशेष अस्तित्व नाही. आता यांना कामे नाहीत. त्यामुळे हे बावरलेत. समोर आणखी वाईट दिवस आहेत त्यांच्या नशिबी. म्हणून राडा करून चमकोगिरी करत आहेत. स्वतः संयुक्त कुटुंबात राहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या आपल्या नेत्याला दुःख देऊन स्वतः का वेगळा पक्ष काढला, याचे उत्तर आधी द्यावे. बाता करतात संयुक्त महाराष्ट्राच्या?
- नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरण

मंगलवार, 30 अगस्त 2016

ऍट्रासिटीऐवजी दुसरा कायदा आणा - राज

मुंबई - ऍट्रासिटी कायद्याचा गैरवापर होत असून, हा कायदा रद्द केला पाहिजे. त्याऐवजी दुसरा कायदा आणला पाहिजे. धर्म व जातीनिहाय आरक्षण हवेच कशाला, आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केले.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, ‘कोपर्डी भेटीच्या वेळी गावकऱ्यांनी ऍट्रासिटीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी केल्या. या दुरुपयोगामुळेच या कायद्यात बदल झाला पाहिजे, असे मला वाटते. हिंदू सणावर गदा येत आहे, यावर कोण बोलणार आहे की नाही? दहीहंडीबाबत मी बोललो, तर माध्यमे लेख लिहून मला झोडपत राहिली. दहीहंडीला जे घाणेरडे स्वरूप आले, त्या नावाखाली धांगडधिंगा होतो त्याला लोकं कंटाळली होती आणि म्हणून लोक विरोधात बोलायला लागले आहेत. आमदार किती निवडून आलेत, याची चिंता मला नाही, माझी सत्ता रस्त्यावर आहे. शहरात फेरीवाल्यांचा उच्छाद वाढला आहे, त्यांनी फुटपाथ व्यापून टाकले; पण अशा विषयांवर माध्यमे गप्प का? बलात्कार थांबवण्यासाठी शरियासारखे कायदे हवे असे बोललो तर चुकीचा अर्थ काढत राज ठाकरेंना शरिया हवा अशा बातम्या सुरू केल्या जातात. माझ्यावर कितीही टीका करा, महाराष्ट्राच्या हिताचे जे असेल ते मी बोलत राहणारच.‘‘
निवडणूक लढवा; पण आधी विचार करा. प्रत्येक गोष्ट माझ्या मराठी माणसाच्या हिताची, महाराष्ट्राच्या हिताची आहे का? मराठी माणसाच्या हिताचीच कृती करा. कल्याणमधल्या पक्षाच्या आंदोलनावेळी एक उत्तर भारतीय म्हणतो, की आमच्यामुळे ही मुंबई उभी आहे. अशी बोलायची यांची हिंमत होतेच कशी? असा सवालही राज यांनी केला.

"जीएसटी‘मुळे सगळे केंद्राकडे जाणार, पुन्हा मोगलाई सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दलित मुद्द्यावरून भावनिक आवाहन उत्तर प्रदेश निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन होते.‘‘
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

शुक्रवार, 26 अगस्त 2016

हे तर सण बंद करण्याचे षडयंत्र - राज ठाकरे

मुंबई - दहिहंडीबद्दल सध्या जे सुरू आहे. हे अंत्यत चुकीचे आहे. हे तर सण बंद करण्यचे षडयंत्र आसल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दहिहंडी या सणावरून सध्या सरकार, न्यायालय आणि राजकीय पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. राज ठाकरे यंनी ही यात उडी घेतली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायालयाच्या हेतूबद्दल शंका निर्माण केली. ते म्हणाले की, न्यायालयाच्या हेतू बद्दलच शंका उपस्थित होते. न्यायालयाने मंडळांची बाजू ऐकून घेतली नाही. ती घ्यायला हवी होती. हा विषय न्यायालयात जातोच कसा असा सवाल करताना सरकार नियमावली जाहिर करू शकले असते, असेही ते म्हणाले.

सरकार जितके लक्ष दहीहंडीवर देत आहे. तितके लक्ष इसिसवर द्यावे, असा सल्लाही राज यांनी सरकारला दिला. न्यायलय या विषयावर लगेच निर्णय देते आणि आम्ही केलेल्या टोल विरोधातील याचिकेवर निर्णय लागत नाही. अजून तारीखही मिळत नाही आणि याचा मात्र निर्णय लगेच लागतो, असेही राज म्हणाले. हे सरकारचं पळकुटे धोरण आहे. त्यांना निर्णय घ्यायचे नाहीत म्हणून हे सुरु आहे. याबाबत सरकारनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. या घडामोडीवरून असे वाटते कि हे सण बंद करण्याचं षडयंत्र आहे का? असा सवाल राज यांनी केला. पूर्वीप्रमाणेच जशी दही हंडी साजरी होत होती तशी यंदा ही  होणार. खरे तर या विषयात न्यायालयानेने यायला नको होते. काळजी घेतली पाहिजे. असे बोलून ते म्हणाले की अपील मी केले आहे. पण माझ्यावर अवमान खटला दाखल करण्याआधी न्यायालयाने दूसरी बाजू ऐकली होती का आणि तरीही माझ्यावर अवमान खटला दाखल करायचा असेल तर करा. मंडळांवर कारवाई सुरु केली, तर हे प्रकरण भडकेल. अपघात होऊ नये असं मला पण वाटते. हा माझ्या पक्षाचा विषय नाही. सणांचा विषय आहे. कायदा आणि सुव्यवस्था सरकारने बघावी. सुरक्षेची काळजी घेऊन थर लावावेत असे मी मंडळांना सांगितले आहे. सराव असेल तितकेच थर लावा हे ही मी सांगितले. आता सरकारनीही जास्त ताणु नये असेही ते म्हणाले.

गुरुवार, 18 अगस्त 2016

हिंदूंच्या सणांवर गदा का? - राज ठाकरे




मुंबई - हिंदूंच्या सणात सर्वोच्च न्यायालय कायम हस्तक्षेप करत असते, अशी टिप्पणी करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहरमचा सण कसा साजरा करावा हे सांगण्याची प्राज्ञा दाखवाल का, असा प्रश्‍न आज केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मशिदीवर ध्वनिक्षेपक चालतात, पण दहीहंडीचा सण साजरा करत येत नाही, अशी टीका केली. राज्य सरकारने हिंदूंचा हा सण साजरा करण्यासाठी रीट याचिका दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

न्यायालयाने प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायचा असेल, तर निवडणुका घेताच कशाला असा प्रश्‍न करीत त्यांनी देश चालवायला घ्या, अशी टीकाही त्यांनी केली. दहीहंडीत काही गैरप्रकार आहेत हे मान्य, पण ते दूर सारून सण साजरा व्हायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले. दुपारी बोलावलेल्या पत्रपरिषदेत मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य द्या, या मुद्यापाठोपाठ त्यांनी हिंदुत्ववादाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. न्यायालयाने डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्‍त करून ते म्हणाले, की हिंदूधर्मीयांच्या सणात कायम काही आक्षेप नोंदवायचे आणि मोहरमसारख्या सणांच्या मिरवणुका मात्र शांतपणे होऊ द्यायच्या यात अर्थ नाही. दहीहंडीत तीन-चार वर्षांच्या मुलांना सहभागी करून घेणे योग्य नाहीच; मात्र थर किती असावेत, त्यांनी काय करावे, आवाजाने ध्वनिप्रदूषण कसे होते अशा विषयांवर बोलणे न्यायालयाच्या कार्यकक्षेत बसत नाही याचे स्मरण ठेवणे उचित ठरेल. दहीहंडी मंडळांची कोणतीही भूमिका लक्षात न घेता न्यायालयाने परस्पर निर्णय देणे हा तर आक्षेपार्ह प्रकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज दुपारी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात आलेल्या गोविंदा मंडळांचीही त्यांनी भेट घेतली. दहीहंडी उत्सव मागील वर्षाप्रमाणेच व्हावा, त्यासाठी पुढाकार घेईन, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी दिले.

राज ठाकरे उवाच
कानठळ्या बसवणारे संगीत नको
ढोलच्या गजरात सण साजरा करा
सुरक्षा उपाययोजना अंमलात आणा
सराव नसेल, तर थराचा अतिरेक नको
मंडळात सुसूत्रता आणण्यासाठी पुढाकार

गुरुवार, 4 अगस्त 2016

सरकारला माणसांच्या जीवाचे मोल नाही- राज

नाशिक- मुबलक असले की त्याची किंमत कमी होते. महाराष्ट्रातल्या सरकारलाही माणसांची किमत वाटत नाही. त्यामुळेच सावित्री नदीवरील महाडचा पूल कोसळला. त्यावर सरकारची प्रतिक्रीया देखील अशीच संवेदनहीन आहे. यावर ठोस काही तरी झाले पाहिजे. घटना घडीली नेते, लोकप्रतिनिधी बोलतात व दोन चार दिवसाने विसरतात हे किती दिवस चालणार? असा उद्वीग्न प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

नाशिकला आलेल्या महापूरानंतर त्यांनी बुधवारी पुरग्रस्तांची भेट घेतली. नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. विविध नागीरकांचीीह विचारपूस करुन महापालिका पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. महाड येथील पूलाच्या दुर्घटनेबाबत त्यांनी सरकारी अनास्था विद्वीग्न करते असे सांगितले. "ज्यांनी पूल बांधले ते त्यांच्या देशात निघून गेलेत. पूलाचे आयुष्य संपल्याचे पत्र ते तेथून पाठवतात. अन्‌ आपण त्याकडे अनास्थेने पाहतो. "लोकांच्या जीवाचे काही मोल आहे की नाही?. त्याचे मोल सरकारला वाटते की नाही?. लोकांनीही थोडे बदलावे. सत्तेत बसलेल्यांकडे, राजकारण्यांकडे उत्तर मागावे. प्रश्‍न सुटेपर्यंत पाठपुरावा करत रहावा.‘ असे त्यांनी सांगितले.

---------------------------------------------------------------------------
विधी मंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून झालेला गोंधळ हा सरकार व विरोधकांची मिलिजुली आहे. सरकारला नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागू नये म्हणून विदर्भाचा मुद्या भोवतीचं चर्चा फिरवून अधिवेशनाचे पाच-सहा दिवस घालविण्याची सरकारची चाल होती व त्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची सुध्दा साथ असल्याचा घणाघाती आरोप करीत राज ठाकरे यांनी विदर्भाच्या मुद्यावरून सुरु झालेल्या वादात उडी घेतली. अखंड महाराष्ट्र हिच मनसेची ठाम भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री विदर्भाचाच असल्याने त्यांना विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी आहे. त्यांना थांबविले कोणी? असा सवाल त्यांनी केला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून गोंधळ सुरु आहे. त्यावर मनसेच्या वतीने प्रथमचं ठाकरे यांनी भुमिका स्पष्ट केली. विदर्भ हा मुद्दाच नसल्याचे सांगताना, राज्यात शिक्षण, आरोग्य यासारखे अनेक प्रश्‍न आहेत. त्यापासून लक्ष हटविण्यासाठी हा वेळकाढूपणा सुरु आहे.

राज ठाकरेंनी दिला पूरग्रस्तांना दिलासा

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला गोदापार्क महापुरामुळे पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला असून, पार्कच्या पुनःनिर्माणासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. राज यांनी अंधारात केलेल्या पाहणीतही उद्‌ध्वस्त झालेल्या गोदापार्कचे वास्तव समोर आले. गोदापार्कसह गोदाकाठावरील पुराचा तडाखा बसलेल्या ठिकाणांना भेट देऊन राज यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. 

गोदावरी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गोदापार्क निर्माण करण्याचे राज ठाकरे यांचे स्वप्न आहे. 2002 मध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना चोपडा पुलापासून अडीच किलोमीटरपर्यंतचा गोदापार्क उभारण्यात आला होता. 2008 मध्ये आलेल्या पुरामुळे युतीच्या काळात बांधलेल्या पार्कची दुरवस्था झाली. 2012 मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर आसारामबापू पुलापासून नव्याने गोदापार्क उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या निधीऐवजी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) गोदापार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रिलायन्स फाउंडेशनने त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. गोदापार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. गेल्या महिन्यात उद्‌घाटन करण्याची तयारी करण्यात आली. राज यांच्या तारखा निश्‍चित न झाल्याने उद्‌घाटन बारगळले. मुसळधार पावसाने आलेल्या पुराने गोदापार्क कवेत घेत उद्‌ध्वस्त करून टाकल्याने राज यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. गोदापार्कमधील फरशी, आकर्षक पथदीप, हिरवळीचे मोठे नुकसान झाले आहे. 

पूरग्रस्त भागाला भेट 
नाशिकमध्ये पुराने हाहाकार माजविल्याचे कळाल्यानंतर राज काल (ता. 2) नाशिकला निघाले होते; परंतु पोलिस नियंत्रण कक्षातून येण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे राज यांचे आज सायंकाळी आगमन झाले. अहिल्याबाई होळकर पूल, रामकुंड, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्‍वर पूल येथे प्रत्यक्ष, तर काझीगढीच्या धोकादायक भागाचे त्यांनी दुरून दर्शन घेतले. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख आदी उपस्थित होते.

शुक्रवार, 29 जुलाई 2016

मुंबईसाठी 'भाईबंध'; 'मातोश्री'वर राज

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा प्रस्ताव शिवसेनेने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर (मनसे) ठेवला आहे. निमित्त ठरले, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी "मातोश्री‘वर जाऊन उद्धव यांच्या घेतलेल्या भेटीचे. गेली अनेक वर्षे दुरावलेले हे चुलत बंधू भेटल्यामुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्‍यता आहे. 

भाजपने उघडलेली आघाडी आणि गेल्या काही वर्षांच्या सत्तेमुळे निर्माण झालेले प्रस्थापितविरोधी (ऍन्टीइन्कम्बन्सी) वातावरण भेदण्यासाठी मराठी मतांनी एकत्र येणे हा एकमेव पर्याय शिवसेनेसमोर असून, तो प्रत्यक्षात आणण्याच्या हालचाली शिवसेनेतून सुरू झाल्या आहेत. राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंबरोबर अत्यंत सलगीचे संबंध असलेल्या "सामना‘चे संपादक संजय राऊत यांनी या भेटीची कल्पना मांडली होती. ती स्वीकारत आज ठाकरे बंधूंची प्राथमिक भेट झाली. काही वर्षांच्या मध्यंतरानंतर झालेली ही भेट दोन्ही पक्षांनी मराठी माणसाला एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जावे यासाठी होती. भाजप येत्या काही दिवसांत मुंबईच्या महापालिकेतून बाहेर पडेल आणि कारभाराची चौकशी सुरू करेल, अशी भीती असल्याने शिवसेना नवा भिडू शोधते आहे. मराठी मतांचे एकत्रीकरण हा निवडणूक जिंकवून देणारा एकमेव मुद्दा असल्याने ठाकरेंनी एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत फारसे काही हाती लागेल अशी शक्‍यता वाटत नसल्याने, आज राज यांनी भावाला भेटण्याची तयारी दाखवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संबंधातला तपशील ठरवण्यास वेळ असला, तरी ही शक्‍यता तपासून पाहण्यास दोघांचीही हरकत नाही, हा कार्यकर्त्यांना अत्यंत विधायक मुद्दा वाटतो आहे.
 राज ठाकरे यांचे समर्थक बाळा नांदगावकर हे शिवसेनेत परतणार अशी शक्‍यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्‍त केली जात होती. त्यांचे शिवसेनेशी असलेले सुमधुर संबंध लक्षात घेता; त्यांना आज मध्यस्थ ठेवण्यात आले होते. "ही दोन भावांची नव्हे, तर दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट असल्या‘चे विधान करीत त्यांनी या भेटीमागील राजकीय रंगांना जगासमोर आणले आहे. मनसेला या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले, तरी प्रत्येक वॉर्डात मनसे खेचणार ती मते अर्थातच शिवसेनेच्या विरोधात जातील. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्याचा विचार या भेटीमागे आहे, असे सांगितले जाते. मुंबईतील उपनगरांत शिवसेनेची मते फारशी नसल्याने या भागात हार मानावी लागेल, अशी भीती शिवसेना नेत्यांना वाटते, त्यामुळे एकत्र येण्याची धडपड सुरू आहे. 

राज यांनी 'मातोश्री'वर जाऊन घेतली उद्धवची भेट

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री‘वर जाऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली असून, भेटीचे कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राज व उद्धव यांनी एका खोलीमध्ये चर्चा केली. यावेळी चर्चेदरम्यान दोघांशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. चर्चेनंतर दोघांनी जेवणही केले. राज यांनी उद्धव यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसेच निघण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शनही घेतले.‘

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस झाला. त्यानंतर राज यांनी आज मातोश्रीवर हजेरी लावली आहे. यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे-जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ओवैसींच्या फोटो केकवर राज यांनी ठेवली सुरी

राज व उद्धव ठाकरे यांच्या भेटी-
23 नोव्हेंबर 2008 -  राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची पुस्तके परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.
16 जुलै 2012 - उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
20 नोव्हेंबर 2012 - बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र.
3 नोव्हेंबर 2014 - राज ठाकरेंच्या मुलीला अपघात. यावेळी उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट.
17 नोव्हेंबर 2014 - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र.

सोमवार, 25 जुलाई 2016

भारतात 'शरियत'सारखा कायदा हवा - राज ठाकरे

गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही हे सरकारचे अपयश
कोपर्डी (जि. नगर) - गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेलीच नाही. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महिलांची छेडछाड आणि बलात्कारासारखे गुन्हे थांबविण्यासाठी आता  ‘शरियत‘सारखा एखादा कायदा देशातही आणावा लागेल, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.

ठाकरे यांनी आज सकाळी येथे येऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर ते गावकऱ्यांशी बोलत होते. असे गुन्हे का होतात, हे तपासले पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘पीडित कुटुंबाची शस्त्र परवान्याची मागणी आहे. त्यांना तो मिळेलही; पण तेवढ्यावर भागणार नाही. केवळ शस्त्रे हा यावर उपाय नाही. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक पाहिजे. कायदा राबविणाऱ्या सरकारची भीती असली पाहिजे. ती गुन्हेगारांना नाही, हे सरकारचे अपयश आहे. सरकार बदलले; पण ते दिसत नाही. कायद्याची भीती नसेल तर असे राज्य व देश चालणार नाही.‘‘
अशा गुन्हेगारांना कायदा समजत नसेल, तर "शरियत‘सारखा एखादा कायदा भारतात येणे आवश्‍यक आहे. त्यात असे कृत्य करणाऱ्यांचे हात-पाय तिथल्या तिथे छाटले जातात. पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अशा नराधमांना हीच शिक्षा योग्य आहे, अशी आक्रमक भूमिका ठाकरे यांनी या वेळी मांडली. या पीडित कुटुंबाला मदत मिळत असली तरी त्यांचे दुःख मोठे आहे. त्यांच्या घरातील एखाद्याला तरी सरकारी नोकरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
"ऍट्रॉसिटी‘चा धाक व त्यामुळे इतर समाजांवर दहशत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले, त्यावर ठाकरे म्हणाले, ‘या कायद्याचा कुणी गैरफायदा घेत असेल, तर त्यावर पर्याय आणला पाहिजे. सरकारने त्याबाबत गांभीर्याने पावले टाकली पाहिजेत. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यात काय होते ते पाहू.‘‘
माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, मनसे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रिटा गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, नगरचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे आदी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री वेळ मारून नेतात‘
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच येथे येऊन गेले; पण ते कायमच वेळ मारून नेतात, असा आरोप करून राज ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री जे सांगतात, त्याची अंमलबजावणी आणि घोषणांची पूर्तता करीत नाहीत; पण या प्रकरणात त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.‘

सोमवार, 4 जुलाई 2016

मनसेतील फूट टाळण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच्या पत्राचा आधार

मनसेतील फूट टाळण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच्या पत्राचा आधार 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात फाटाफूट होण्याच्या भीतीने धास्तावलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तब्बल १० वर्षांपूर्वी शिवसेना सोडताना पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शुक्रवारी आधार घेतला. या पत्रातील 'मी पक्षशिस्त आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींशी कधीच तडजोड करणार नाही', या वाक्याची त्यांनी पदाधिकाऱ्यांना पुन्हा आठवण करून दिली. 

पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसांच्या शिबिराचा समारोप राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

सुमारे १० वर्षांपूर्वी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून वेगळी चूल मांडताना पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या जाहीर पत्राचा राज ठाकरे यांनी यावेळी सविस्तर उल्लेख केला. या व्यतिरिक्त त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही खडे बोलही सुनावले. 'कामांच्या माध्यमातून तुम्ही जनतेशी सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांची कामे कोणतीही अपेक्षा न बाळगता केल्यास ते तुम्हाला लक्षात ठेवतात. त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये जाऊन अधिक जोमाने कामे करा असा', सल्लाही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. 

काय होते 'त्या' पत्रात? 

पदाधिकाऱ्यांना लिहिलेल्या या पत्रात, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय मानसिक क्लेश देणारा, पण कसा आवश्यक होता. इतर राजकीय पक्षात जाण्यापेक्षा मनसेची स्थापना करण्याचा निर्णय का घेतला. नवा पक्ष स्थापन करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ते राज ठाकरे यांनी मांडले होते. यासर्व बाबींचा उल्लेख त्यांनी शुक्रवारच्या भाषणात केला.

मंगलवार, 14 जून 2016

ओवैसींच्या फोटो केकवर राज यांनी ठेवली सुरी

मुंबई - महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) वाढदिवसानिमित्त एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या फोटो केकवर सुरी ठेवून तो केक कापण्याचे टाळले.

राज यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी त्यांनी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एका कार्यकर्त्याने ओवैसी यांचा फोटो असलेला केक आणला होता. हा केक कापून वाद निर्माण होण्याचे लक्षात येताच त्यांनी ओवैसींच्या गळ्यावर सुरी टेकविली आणि तेथून निघून गेले.

राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद नवीन नाही. यापूर्वीही या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून विविध मुद्दे पुढे आणण्याची शक्यता आहे.

सोमवार, 16 मई 2016

देश न्यायालय चालवतंय की सरकार- राज ठाकरे

मुंबई - ‘नीट‘ परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की हा देश न्यायालय चालवतंय की सरकार. सर्वोच्च न्यायालयाचा या निर्णयाशी काय संबध?, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘नीट‘च्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकांच्या प्रतिनिधींना घेऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ‘नीट‘च्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना पण मी हेच सांगितले की काहीही करा, पण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची भेटीची वेळ ठरेल आणि तोडगा निघेल. मी त्यांना पालकांना देखील पंतप्रधानांच्या भेटीला नेण्याची विनंती केली आहे. काल दुपारी मी पंतप्रधानांशी बोललो, त्यांना सर्व परिस्थिती समजवून सांगितली. मी मुख्यमंत्र्यांना भेटतोय हे त्यांना सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी तात्काळ चर्चेची तयारी दाखवली आहे. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. मुलांच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

शुक्रवार, 6 मई 2016

'मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणता'

मुंबई - "मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणणे आहे?‘ असे म्हणत कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

वेगळ्या विदर्भाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 2013 मध्ये वेगळ्या विदर्भाची जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे राज यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर पुराव्यासह सादर करत ‘विदर्भ राज्यासाठी मतदान करणाऱ्या अशा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा चौकाची सजावट केली नसल्याचेही निदर्शनास आणून देत "भाजप सरकारपेक्षा कॉंग्रेसचे सरकार चांगले होते‘ असे वक्तव्य केले होते.

या पार्श्‍वभूमीमवर दिग्विजयसिंह यांनी ट्‌विटरद्वारे "मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणणे आहे?‘ असे म्हणत एक छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात "आज मोदींचे मित्र म्हणत आहेत की भाजपपेक्षा कॉंग्रेस चांगले होते. उद्या संपूर्ण देश पुन्हा एकदा म्हणेल कॉंग्रेसपेक्षा चांगले कोणतेही सरकार नाही‘ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.

शुक्रवार, 8 अप्रैल 2016

सत्ता यांची अन् हे घाबरतात आम्हाला- राज ठाकरे


मुंबई- केंद्रात, राज्यात, महानगर पालिकेत यांची सत्ता असूनही हे आम्हाला घाबरतात, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला आज (शुक्रवार) लगावला. गुढीपाडव्यानिमित्त येथील शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या मेळाव्यावेळी ठाकरे बोलत होते.
मनसेचाही ‘भगवा’ झेंडा . 

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-
  • मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा
  • होमपिचवर खेळायची संधी मिळाली, आता खेळतोय.
  • दिग्गजांनी सभा घेऊन शिवाजी पार्क मैदाना गाजवले, इथे अटी-शर्ती मग सभा घ्यायच्या कुठे?
  • 50 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, असे न्यायालयाने सांगितले. परंतु, बाहेर वाहतुकीचा आवाज 100 डेसिबल असतो.
  • सत्तेत असून शिवसेना मनसेला घाबरते.
  • शिवसेनेची मनपात, राज्यात, केंद्रात सत्ता, मात्र यांना आमच्या सभेमुळे पोटदुखी.
  • सेनेच्या झेंड्यांकडे बाळासाहेबांचा आशिर्वाद म्हणून पाहिले, बाळासाहेब माझ्या पाठिशी.
  • मनसेमुळेच महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले.
  • मोबाईलवर मराठी, रेल्वेतील नोकऱ्या, मराठी पाट्या, हे मनसेचं यश.
  • जुना हिशेब मांडण्यासाठी शिवतीर्थावर सभा
  • मनसेने अर्धवट सोडलेले एक आंदोलन दाखवा, जे इतरांना अनेक वर्ष जमले नाही, ते आम्ही आठवड्यात केले.
  • अमित शहा न्यायालयातून सुटले, मग राम मंदिर का सुटत नाही?
  • राम मंदिराच्या मुद्द्यावरून सत्तेत आलात, पण कुठेय राम मंदिर?
  • राम मंदिराच्या आंदोलनाचं काय झाले? कुठे आहे राम मंदिर?
  • जैतापूर आंदोलनाचे काय झाले? सत्तेत राहून विरोध करण्याचे सेनेचे नाटक.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा वाढदिवस लक्षात राहतो, ते तिथे जातात आणि इथे त्यांना शिव्या घालतात.
  • भाजप किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा.
  • 100 दिवसात अच्छे दिन येणार होते, काय झाले?
  • नरेंद्र मोदींएवढे परदेश दौरे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाने केले नाहीत.
  • देशाला मोदींसारखा पंतप्रधान हवा, हे पहिल्यांदा मी म्हटलं होते.
  • गुजरातला महाराष्ट्राच्या पुढे नेण्याचे कारस्थान
  • सराफांना भाजपने फसवले, सराफ म्हणतात, ‘एकही भूल कमल का फूल‘
  • ‘भारत माता की जय‘ हा नारा मी इंदिरा गांधींच्या तोंडून ऐकला आहे.
  • मनसेच्या झेंड्यात निळा-दलित, भगवा-हिंदुत्व अन् जो हिरवा आहे तो कलाम, ए. आर. रहमान यांच्यासाठी.
  • मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग हा भेंडी बाजार, भिवंडीसाठी नाही.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्गातल्या मॉनिटरप्रमाणे.
  • ओवेसी बंधू हे भाजपनेच जन्माला घातलेत. यांनीच फायनान्स केलेले आहेत.
  • विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र करायला यांच्या बापाचा माल आहे का?
  • मा. गो. वैद्य म्हणतात महाराष्ट्राचे 4 तुकडे करा, हा महाराष्ट्र म्हणजे केक आहे का? तुकडे करायला? 
  • विदर्भ, मराठवाड्यातून अनेक मंत्री झाले, त्यांनी लक्ष दिले नसेल तर महाराष्ट्राचा दोष कसा?
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नरचा आणि जिजामातांचा जन्म बुलडाण्याचा. मग विदर्भ वेगळा करून माय-लेकाची ताटातूट करताय का?
  • मंत्र्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला नाही, म्हणून तुम्ही महाराष्ट्र तोडायला निघालात?
  • तुम्हाला विकास जमत नसेल, तर खुर्च्या खाली करा.
  • संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा.
  • पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांप्रमाणे मराठवाड्यातल्या नेत्यांनी साखर कारखाने उभारले, त्यामुळेच दुष्काळ.
  • काँग्रेसच्या राज्यातही शेतकरी आत्महत्या होत्या, आज यांच्या राज्यातही होत आहेत.
  • मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या मेसेजमुळे डोळ्यातून पाणी येत आहे.
  • राज्यात 33 हजार विहिरी बांधल्याचे फडणवीस सांगतात, पण कुठे बांधल्या त्या दाखवा.
  • या सरकारला आता ना अधिकारी विचारतात, ना जनता.
  • देवेंद्र फडणवीस बिनकामाचे, अशा चांगल्या माणसाचा उपयोग नाही.
  • ओवैसी इतके बरळतात, मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत? माझ्यावरच का?
  • रिक्षा जाळा म्हटल्याचे दाखवले, मग रामदेवबाबा गर्दन छाटा म्हणाले ते का नाही दाखवले?
  • बाहेरच्यांना पोसण्यासाठी इथल्या जनतेवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे.
  • भूजला भूकंप झाला त्यावेळी इथल्या गुजरातींनी भरभरून मदत केली, मग लातूरच्या भूकंपावेळी यांचे हात का ढिले झाले नाहीत?
  • अनधिकृत इमारती अधिकृत करता, पण बिल्डरवर कारवाई का नाही?
  • भारताविरोधी घोषणा देणाऱ्या पीडीपीसोबत भाजपची युती, मग तुमचा राष्ट्रवाद कसला?
  • आरएसएसच्या कामाबद्दल आदर, पण या धंद्यांबद्दल नाही.
  • जेएनयू प्रकरण इतके चालवले, जसे की देशात दुसरे प्रश्नच नव्हते.
  • शिवजयंती जशी साजरी झाली, तशीच बाबासाहेबांची जयंती साजरी करू.
  • शिवजयंतीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंतीही जल्लोषात साजरी झाली पाहिजे.

शनिवार, 19 मार्च 2016

मनसेचाही ‘भगवा’ झेंडा .

सत्ता यांची अन् हे घाबरतात आम्हाला- राज ठाकरे
'मनसे'ची स्थापना करताना पक्षाच्या झेंड्यात चार रंगांना स्थान देणारे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने पक्षासाठी खास भगवा झेंडा तयार केला आहे. शिवछत्रपतींची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव कोरलेले हे भगवे ध्वज शिवजयंतीच्या दिवशी घरांवर, वाहनांवर आणि मिरवणुकांमध्ये डौलाने फडकवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Android फोन slow झालाय ? हे करा


मनसेच्या ठाणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. 'हा झेंडा केवळ शिवजयंतीसाठी तयार करण्यात आला असून उर्वरित दिवशी पक्षाचा जुनाच झेंडा ओळख असेल. शिवजयंती हा काही 'बर्थ डे' नसून मराठी अस्मितेचा सण आहे. त्यामुळे तो इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्हे तर तिथीनुसारच साजरा व्हायला हवा,' असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २६ मार्च रोजी भगवा फडकवत मनसैनिक शिवजयंती साजरी करणार आहेत.
डिलीट केलेल्या फाइल्स परत मिळवा

शुक्रवार, 11 मार्च 2016

रिक्षा परमिट आंदोलन स्थगित करा- राज ठाकरे

मुंबई- पुढील सूचना मिळेपर्यंत रिक्षा परमिट आंदोलन स्थगित करण्याबरोबरच कायदा हातात न घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) कार्यकर्त्यांना केले.

मनसेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना परप्रांतीयांच्या नवीन रिक्षा जाळा असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. या प्रकारानंतर ठाकरे यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले सत्तर हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीसाठी व त्यांच्या लाभासाठी देण्यात येत आहेत. हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात आले आहे. सत्तर टक्के परवाने परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत, मराठी तरुणांवर हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्यास जाळून टाका, असा खळबळजनक आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. नवीन रिक्षा जाळा, मात्र येथून घरी जाताना जुन्या रिक्षाचालकाने बिल मागितले तर रिक्षा जाळू नका, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या वडापाव विक्रेत्याला केलेल्या मारहाणीबाबत लगावला. सत्तर हजार रिक्षा परवानाधारकांमध्ये सत्तर टक्के परप्रांतीय असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Slow Android? Click here 

राज ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता

मुंबई : कायदा न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. विधान भवन परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी नवीन रिक्षा जाळून टाका, अशी चिथावणी दिली होती. बजाज कंपनीला फायदा होण्यासाठीच राज्य सरकारने 70 हजार परवाने खुले केले, असा आरोपही राज यांनी केला होता. त्यांचे हे वक्‍तव्य तपासून कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
70 हजार परवाने असल्याचा जावईशोध राज ठाकरे यांनी लावला आहे. प्रत्यक्षात रद्द झालेले 41 हजार परवाने आहेत, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. रिक्षा परवाना मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्‍तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हा नियम जुनाच आहे. मी फक्‍त त्याची अंमलबजावणी करत आहे. मुलाखतीसाठी आलेल्या ज्या उमेदवारांना मराठी बोलता आले नाही, त्यांना परवाना दिलेला नाही, असे रावते यांनी स्पष्ट केले.
How to download youtube Video 

बुधवार, 9 मार्च 2016

पुणेकरांनी सत्ता दिल्यास वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य - राज ठाकरे

मुंबई - ‘पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपी सक्षम करायला हवीच; पण केवळ या एकाच मुद्‌द्‌यावर अवलंबून न राहता सायकल ट्रॅक, रस्ते, बीआरटी आदी घटकांचाही विचार करायला हवा. त्यासाठी पुणेकरांनी सत्ता दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुकीला प्राधान्य देणारा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल,‘‘ असा निर्वाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मनसेच्या दशकपूर्तीनिमित्त  संवाद साधताना ठाकरे यांनी पुण्याच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना, पक्षाचे पुण्यासाठीचे नियोजन, सद्यस्थिती यांचा आढावा घेतला; तसेच स्मार्ट सिटी, रिंग रोड, मेट्रो, जायकाचा प्रकल्प, महापालिकेतील कार्यपद्धती आदींबद्दलही त्यांनी चर्चा केली.
ठाकरे म्हणाले, ‘विरोधासाठी विरोध ही माझी भूमिका नाही; तर चुकीच्या गोष्टींना विरोध असेल. स्मार्ट सिटी करायला हवीच; पण महापालिकेसारखी यंत्रणा असताना, नव्या कंपनीची गरजच काय? त्या "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप आहेत. मनसेने ते सादर केले आहेत. महापालिकेच्या कारभारात राज्य सरकारने विनाकारण ढवळाढवळ करू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.‘‘
‘जे शहराच्या उपयोगाला येणार, त्याला माझा विरोध कधीच राहणार नाही; पण छुपा अजेंडा असता कामा नये. तो असेल तर कडाडून विरोध करेन. रिंग रोड एवढ्यासाठी बांधायचा, कारण बाजूची जमीन मला विकत घ्यायची आहे. असे असेल तर माझा विरोध राहील. जमिनी दामदुपटीने विकायच्या. दुसऱ्या महायुद्धानंतर आयझोनोव्हर, अमेरिकेत ट्रुमन यांनी रस्ते सरळ केले. मंदीमुळे रस्त्यांची कामे काढली; पण त्यांच्या प्रॉपर्ट्या दिसत नाहीत. पीएमपीला 12 लाख प्रवासी असूनही तोटा कसा होतो, तेच कळत नाही. मुळात वाहतुकीच्या प्रश्‍नांसाठी राज्य सरकारने मदत करायला हवी. त्याचवेळी महापालिकेतील कारभार सुधारणे गरजेचे आहे. त्याच-त्याच ठेकेदारांना वर्षानुवर्षे कामे कशी दिली जातात?‘‘
‘पुण्यातील कचरा असो, आरोग्याचा प्रश्‍न. वाहतूक हीदेखील शहराची गंभीर समस्या झाली आहे. पुण्याची वाढ अक्राळविक्राळ होत आहे. त्यात सुविधांचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिक भरडले जात आहेत. विकास आराखडाही या शहरातील राज्यकर्त्यांना करता आला नाही आणि नगरविकास योजनाही. पुणेकरांनी एकदा आम्हाला सत्ता द्यावी. पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही तयार केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करून दाखवू आणि त्यात वाहतुकीला प्राधान्य असेल,‘‘ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘पुणेकरांच्या पैशावर आयुक्तांचे सारखे परदेश दौरे कशाला? इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असताना कशाला जायचे? एक ई-मेल पाठविली तर सगळी माहिती मिळते. नाशिकमध्ये उद्योजकांच्या मदतीने आम्ही गोदा पार्कचे काम हाती घेतले आहे. रस्ते चांगले केले आहेत; पण विरोधक म्हणतात कुंभमेळ्यामुळे राज्य सरकारने केले; पण त्याची तयारी आम्ही दोन वर्षांपूर्वीच सुरू केली होती. ते लक्षात घ्यायला हवे, विनाकारण टीका होऊ नये,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘पुणे शहर म्हणजे दुचाकी वाहनांचे "डंपिंग ग्राउंड‘ झाले आहे. दुचाकी वाहन उद्योजकांची लॉबी त्यामागे काम करीत आहे. त्यामुळेच पीएमपीला सक्षम केले जात नाही आणि वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. पुणे किंवा नाशिकमधील नगरसेवकांनी शहराचे मालक असल्याचा आविर्भाव आणू नये; तर विश्‍वस्तांच्या जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. नागरिकांना सुविधा देण्याचे महापालिकेचे काम आहे. ते त्यांनी प्रामाणिकपणाने पार पाडले पाहिजे,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

Surf internet without worry of clearing browser history
- राज ठाकरे म्हणाले
- आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग नव्हे; तर वॉर्ड पद्धतच हवी
- स्मार्ट सिटीला पाठिंबा; पण "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप
- विकासाच्या योजना राबविताना त्यात सुप्त हेतू असू नयेत
- 12 लाख प्रवासी असूनही पीएमपी तोट्यात कशी?
- इंटरनेटवर माहिती असताना आयुक्तांचे परदेश दौरे कशाला?
- पुण्यात डीपी (विकास आराखडा) नाही अन्‌ टीपीही (नगरविकास योजना)
- नगरसेवकांनी मालकाची नव्हे; तर विश्‍वस्तांची भूमिका बजवावी 

मंगलवार, 8 मार्च 2016

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे



पुणे - ‘मेक इन इंडिया‘ भरवून देशात उद्योग येत नाहीत. कागदावर शब्दकोडी सोडवली जातात, उद्योग उभे राहत नाहीत. जनरल मोटर्स कंपनी गुजरातेतून महाराष्ट्रात येते, मग व्हायब्रंट गुजरात मोहिमेचा काय फायदा? "मेक इन इंडिया‘मध्ये कुठले आले दीड लाख कोटी? "शंभर दिवसांत अच्छे दिन आणीन‘ या नरेंद्र मोदींच्या घोषणेचे काय झाले? लोकांमध्ये फसवल्याची भावना आहे, मोदींचे दोन वर्षांपूर्वीचे वलय आता किती राहिलेय, असे सवालावर सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ‘ला दिलेल्या खास मुलाखतीत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

मनसेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ठाकरे यांनी दिलेल्या या मुलाखतीत पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत भावी वाटचालीबाबतची दिशा स्पष्ट केलीच, पण प्रश्‍नांना आपल्या नेहमीच्याच आत्मविश्‍वासाने, रोखठोक उत्तरे दिली. तसेच भावी राजकारणातही मराठी माणूस हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील "कृष्णकुंज‘ या त्यांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास रंगलेल्या या मुलाखतीचा हा सारांश. डिलीट केलेल्या फाइल्स परत मिळवा
प्रश्‍न - मोदींना सुरवातीला पाठिंबा आणि नंतर विरोध ही विसंगती नव्हती का?
ठाकरे - माझा विरोध भूमिकासापेक्ष असतो. गुजरातहून परतल्यावर मला प्रश्‍न पडला की मोदींनी मुखवटा उभा केला की काय? ते देश म्हणून विचार करत नाहीत. एक तर परदेशात जाणे नाही तर भाषणे ठोकणे. राज्याच्या निवडणुकांत एखाद्या पंतप्रधानाने 40 सभा घेतल्यात का कधी? बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद करायची कल्पना त्यांना सुचली. कारण मनातून गुजराती आहे ना! तुम्ही गुजरातच्या बाहेर पडलेला नाही आहात ना? दोन वर्षांत चमत्काराची अपेक्षा नाही, पण होणाऱ्या गोष्टींची झुळूक तर का नाही? "मेक इन इंडिया‘ हे मुंबईत का, दिल्लीत का नाही? अशामुळे उद्योग येत नाहीत. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात मोहिमेनंतर किती उद्योग आले? तिथली जनरल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात येते. मग तुम्ही व्हायब्रंट म्हणून उद्योग आणले का घालवले? केंद्राला कराचा एक पैसा न देता आमचे कर आम्ही वसूल करू, आणि विकास करू, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना मोदींनी घेतली होती. आज तेच पंतप्रधान आहेत. मग आता भूमिकेत बदल का? देश दिलाय तुमच्याकडे. तो पाहा ना तुम्ही.
प्रश्‍न - पक्षाची दहा वर्षांची वाटचाल कशी झाली?
ठाकरे - पक्षस्थापना अवघड असली, तरी मला आत्मविश्‍वास होता. माझ्या विकास आराखड्यात माझ्या कल्पना आहेत. सत्तेमुळे करू शकता तो विकास आराखडा झाला, संघटनेद्वारे करू शकता अशी आंदोलने झाली. "ठाकरे आंदोलन घेतो आणि अर्धवट सोडतो‘, अशी हाकाटी केली. पण असे सोडलेले आंदोलन कुणीही दाखवावे. शहरातील पाट्या मराठीत आल्या. केंद्रीय आस्थापनेत मराठी मुले का भरत नाहीत, यावर आंदोलन केल्यावर केंद्रीय मंत्र्यांना सांगावे लागले, की परीक्षा त्या त्या मुलाच्या भाषेत होईल आणि नोकरीत त्या राज्यातल्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल. कमी खर्च आलेल्या रस्त्यांना टोलची गरज नाही आणि जिथे लावला पाहिजे तिथली रोखीची पद्धत बंद करा, असा आग्रह आम्ही धरला. त्यामुळे 67 ठिकाणचे टोल बंद झाले. मोबाईलवर मराठी आवाज ऐकू येऊ लागला. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट सुरू झाले. मराठी भाषा दिवस मनसेने मोठ्या प्रमाणावर साजरा करायला सुरवात केली. आमीर खानने मराठी शिकली, अमिताभने भाषणाची सुरवात मराठीतून केली, हे मोठे यश होते.
प्रश्‍न - आंदोलनाची पद्धत हिंसक, खळखट्ट्याक असल्याने या मुद्द्याला सहानुभूती असणारेही नाराज झाले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन योग्य ठरले नसते का?
ठाकरे - अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाचे काय झाले? शांततापूर्ण मार्गाच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या, रेल्वे बोर्डापासून दिल्लीपर्यंत निवेदने दिली, यानंतरही पाच-पाच लाख परप्रांतीय मुलाखतीसाठी येत असतील, तर असे आंदोलन का करू नये? त्यांना काय आम्ही गुलाबाचे फूल द्यायला हवे होते? टॅक्‍सीचालक पोलिसांना मारू लागले, महिलांशी घाणेरडे वागायला लागले, अरेरावी करू लागले, तो लोकांच्या मनातला उद्रेक बाहेर पडला. हजारो अनधिकृत टॅक्‍सी-रिक्षा आम्ही पकडून दिल्या. त्या सरकारला तोडाव्या लागल्या. कायदा मोडणाऱ्यांसाठीचा कायदा आम्ही मोडला.


प्रश्‍न - शहरी तोंडावळ्याचे, एका विशिष्ट गटांचे प्रश्‍न आपण मांडले, राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत भिडणाऱ्या मूलभूत समस्यांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे का?
ठाकरे - फक्त 10 वर्षांत सगळेच माझ्याकडून कसे मागता? माझ्या हातात राज्य आल्याशिवाय या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत. दुष्काळासंदर्भात काय पावले उचलता येतील त्यावरही अनिल शिदोरे सध्या काम करीत आहेत.
ग्रामीण युवकांची स्वप्ने शहरात दडलेली आहेत. शहरीकरणाचे प्रमाण वाढत असून, ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. शहराचा ताण वाढतो आहे. शहरे कोसळली तर सगळे कोसळून जाईल तुमचे. तुम्ही मूळच्या करदात्याला फसवता आहात. माणसे वाढताहेत म्हणून त्याला पाणी कमी दिले जाते आहे.

प्रश्‍न - शहरीकरणाची समस्या ही अतिकेंद्रीकरणाची असून, शहरीकरण तीन-चार शहरांतच एकवटले आहे. त्यावर मार्ग काय?
ठाकरे - महाराष्ट्रातील माणसाची सोय लावा प्रथम. गुजराती राहतात इथे आणि धंदा करतात गुजरातमध्ये. यांची ओझी आम्ही का वाहायची? शहरांचे विकेंद्रीकरण झाले तरी जिकडे गूळ दाखवाल तिकडे बाहेरचे डोंगळे येणारेत. जे कराल ते मराठी माणसाच्या हातात राहणार आहे का? विकेंद्रीकरण ही प्रक्रिया आहे. ती होतेच.

प्रश्‍न - मनसेला सुरवातीच्या काळात मिळणारा प्रतिसाद सातत्याच्या अभावाने कमी झाल्याचे निरीक्षण मांडले जाते. आपले मत काय?
ठाकरे - आपल्याकडे मतदानाचे आकडे, सभांची गर्दी यावर यशापयश मोजले जाते. 60 वर्षे राज्य केलेल्या पक्षाचे काय झालेय? माझी फक्त दहा वर्षे झालीत, प्रत्येक पक्षाला हे चढउतार येत असतातच.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही.

प्रश्‍न - नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अनुभव काय?
ठाकरे - गोदापार्क, बोटॅनिकल गार्डनसारखे उपक्रम पाहा, रस्ते पाहा. कुंभमेळ्याच्या तरतुदीमुळे विकास झाला नाही तर तो आम्ही केला. कर्ज काढले आम्ही, तीन वर्षांपूर्वी निविदा काढल्या आम्ही. नुसत्याच टीकेला अर्थ नाही, शाबासकीची पाठही थोपटा.

प्रश्‍न - हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही घेणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
ठाकरे - मला हिंदुत्वाबद्दल विचारले तेव्हा "मी हिंदू आहे‘, असे उत्तर दिले. पक्षाच्या झेंड्यातला भगवा हिंदूंचा, निळा दलितांचा आणि हिरवा मुस्लिमांचा. पण माझ्या मनातला मुसलमान अमजलअली खान, झाकीर हुसेन हे आहेत, भेंडीबाजार, बेहरामपाडा, भिवंडीतील मुस्लिम नाही. ओवेसींनी काढलेल्या मोर्च्यात महिला पोलिसांना मारहाण झाल्यानंतर त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरेच होता. तेव्हा का यांच्या शेपट्या आत होतात? धर्मांध समोर येतील तेव्हा त्यांच्यासमोर उभा राहणारा राज ठाकरेच असेल. वाटेल ते सहन करणार नाही.
Android फोन slow झालाय ? हे करा  

गुरुवार, 3 मार्च 2016

अब की बार, डान्स बार - राज ठाकरे

मुंबई - डान्स बारबाबत मुख्यमंत्री महोदयांचा गृहपाठ कमी पडला की तुमची इच्छाशक्ती नाही? की तुमचे बारमालकांबरोबर काही संगनमत झालय? आम्हाला एकच समजते अब की बार, डान्स बार, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मनसेच्या ट्विटर अकाउंटवरून राज्यात पुन्हा डान्स बार सुरु करण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. डान्स बारला परवाना देण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या विशिष्ट अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवित सरकारची कोंडी केली होती. 

राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना 2013 मधअये विधानसभेने एकमुखाने निर्णय घेऊन डान्सबार वर बंदी आणली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य सरकारनी गृहपाठ नीट केला नाही आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही. आता काय झाल मुख्यमंत्रीमहोदय. सरकार जितकी आस्था डान्सबार सुरु होण्याबाबत दाखवते, तशीच त्यांनी इतर विषयांवरही दाखवली तर जनता त्यांना मनापासून दुवा देईल. अच्छे दिन डान्सबार मालकांचे आल्याचे हे लक्षात आले आहे. संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेला भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काय करते हे पहावे लागेल.
 
 

बुधवार, 24 फ़रवरी 2016

नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे

मालवण - "एकवेळ पूर्वीचे कॉंग्रेसचे सरकार परवडले; मात्र सध्या सत्तेत असलेले सरकार भयानक आहे. या सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जनतेला फक्त भूलभुलैया दाखविला. त्यांनी जनतेची फसवणूक केलीच; पण मीसुद्धा त्यांच्या थापांना बळी पडलो,‘‘ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केले. 

ठाकरे सध्या मालवण दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी (ता.25) आंगणेवाडी यात्रेला जाणार आहेत. आज त्यांनी तारकर्लीतील पर्यटनाचा आनंद घेतला. पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. सध्याच्या सरकारबाबत विचारले असता, पूर्वीचे सरकार परवडले, असा उपरोधिक टोला मारला. ते म्हणाले, ""सध्याचे सरकार अपरिपक्व आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. मोदी यांनी तर जनतेला भूलभुलैया दाखविला. मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही त्यांनी तिथल्या काही कल्पना दाखविल्या. माझाही त्यावर विश्‍वास बसला होता; मात्र गेल्या दीड वर्षाचा कारभार पाहता त्यांच्या थापा उघड झाल्या आहेत.‘‘ 

ते म्हणाले, की सध्या कोकणात जे आमदार, खासदार आहेत, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. आमच्या लोकांकडे सत्ता आली असती, तर आम्ही हे करून दाखविले असते; मात्र जनतेने आता यातून धडा घेण्याची आवश्‍यकता आहे. सी-वर्ल्डसारखा प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकला असता; मात्र राजकारणामुळे आज हा प्रकल्प अडकला, याचे खरे दुःख आहे. 

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा 

बुधवार, 17 फ़रवरी 2016

मोदी गुजरातमधून बाहेर आलेच नाहीत-राज

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून अद्याप बाहेर पडलेच नाहीत. मला वाटलेले देशाचा विचार होईल, पण तसे होत नाही. भाजप सरकार फक्त दिखावूपणा करण्यात हुशार आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले - 
- चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्यानंतर आता तो बदलण्यात आला. अशी बोटचेपी भूमिका त्यांनी अनेकवेळा घेतली आहे.
- शिवसेनेची भूमिकाच आतापर्यंत कळली नाही
- सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे नंतर सरकारविरोधी धोरणांबद्ददल बोलायचे आणि नंतर लोकांना दायवायचे की आम्ही सरकारमध्ये आहेत आणि विरोधी पक्षातही आहोत
- मेक इन इंडियाचा अर्थच मला आतापर्यंत लागला नाही
- गुजरातमध्ये सिंह प्रसिद्ध असल्यानेच मेक इन इंडियाचा लोगोमध्ये सिंह आहे.
- निव्वळ एमओयूवर सह्या होणे म्हणजे उद्योग येणे असे नाही
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर अमाप खर्च करण्यात आला 
- मोदींना दर दोन महिन्यांनी असा एखादा कार्यक्रम घ्यावा लागतोच 
- या कार्यक्रमात नशीब फक्त आगच लागली. स्फोट नाही झाला. 
- उच्च न्यायालयाने सांगूनही यांनी काही ऐकले नाही. भाजप सरकार दिखावूपणा करण्यात व्यस्त आहे
- देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे, परदेशातील उद्योगपतींना आमंत्रण देऊन काय उपयोग?
- गुजरात आणि मुंबई यातून ते बाहेरच पडत नाही. मेक इन इंडिया मुंबईतच का घेतले, दुसऱ्या शहरांमध्ये असा कार्यक्रम का घेतला नाही?
- मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेनच का करण्यात आली?

भाजपविरोधात बोलले की देशद्रोही
देशविरोधी कारवाई करत असतील त्यांना अटक करा. भाजपविरोधात बोलले की देशद्रोही ठरविण्यात येते. तर, त्यांच्या बाजूने बोलले की देशप्रेमी ठरविण्यात येते. काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करताना भाजपला लाज वाटली नाही का. त्यांनी भारताविरोधात आंदोलने केली होती, पाकिस्तानचे झेंडे फडकाविले होते, यामध्ये फक्त राजकारण करण्यात येत आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपने देण्याची गरज नाही.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा