बुधवार, 19 सितंबर 2018

मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी

बई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राज यांनी व्यंगचित्र रेखाटताना मोदी आणि अमित शहा यांना संघाच्या वर्गाबाहेरचे स्वयंसेवक दाखवले आहे, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था आपल्या पायाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे राज यांना त्यामध्ये सूचित करायचे आहे. तर, एक स्वयंसेवक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात दिलेले भाषणाचे स्मरण करत असल्याचे दाखवले आहे. आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मालकी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विविध विचारांचे अदान प्रदान केले जाते, असे भागवत यांनी सांगितले होते. त्यावर, संघातील स्वयंसेवक म्हणतो की, भागवतजी आम्हाला आजपर्यंत संघातील शाखेत तुम्ही म्हणत आहात तेच शिकवले गेले आहे. मग या दोघांना म्हणजेच मोदी आणि शहा यांना ते शिकवलं गेलं नाही का ? हे दोघे आपली लोकशाही विसरुन का वागत आहेत, आपली व्यवस्था पायाखाली आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न त्या स्वयंसेवकांने भागवतांना केला आहे, अशा स्वरुपातील व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. 

गुरुवार, 30 अगस्त 2018

सनातनसाठीच डाव्यांना उचलले : राज ठाकरे

औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.
"व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, "मराठवाड्यातून मुली पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. याबद्दल कुणीच बोलत नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे. याला सरकारच जबाबदार आहे.''
काय म्हणाले राज ठाकरे.... 

- सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते "ते' हैद्राबादवरुन येतात, भीतीदायक वातावरण निर्माण करतात. दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात.
- कामावर मतदान होते, याच्यावरील माझा विश्‍वास उडाला आहे. विकासावर मतदान होतच नाही. औरंगाबादचे राजकारण कित्येक वर्ष धर्मावरच सुरु आहे. कामाची पावती मतदानातून मिळाली तरच विकास होईल.
- थापा मारुनच सत्तेत राहता येते. तर महिना- दोन महिने मलाही भाजपात जाऊन यावे लागेल. तसेही आजच पंतप्रधान नेपाळला गेलेत. नवीन "थापा' आणायलाच गेले असावेत.
- 25 वर्षांत औरंगाबाद शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही. लोकप्रतिनिधींना तुमची भीती वाटत नाही. त्यामुळेच कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे.
- प्रभागांमुळे मोठ्या शहरांची वाट लागली आहे. एका प्रभागात चार नगरसेवक त्यांची तोंडे त्या अशोकस्तंभावरील चार सिंहासारखी असतात. जो दिसत नसतो, तो प्रभागात काड्या करण्याचे काम करतो.
- कंपन्यांच्या "सीएसआर' फंडातून शहर विकासाची कामे होतात. मात्र त्यात पैसे खायला मिळत नसल्याने अडचणी येतात. त्याचा सामना करण्याची तयारी असेल तर तशी कामे औरंगाबादेतही करता येतील.
मराठा क्रांती मोर्चाची पोरं वाळूज प्रकरणात नव्हतीच 
वाळुजमध्ये कंपन्यांवर दगडफेक झाली, त्यात मराठा क्रांती मोर्चाची पोरं नव्हतीच. दंगल घडवणारे परप्रांतीयच होते, हेच मी केव्हापासून सांगतोय. मोर्चाला नेतृत्व नाही, त्यामुळेच कुणीही येतोय आणि बदनाम करतोय. पोलिसांकडून समोर आलेली नावे मराठी पोरांची असली तरी, माझ्याकडे आलेल्या रिपोर्टप्रमाणे दंगल घडवणारे परप्रांतीयच आहेत, असे राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

रविवार, 12 अगस्त 2018

'साठ वर्षातील सिंचनाचा पैसा गेला कुठे'

पुणे- गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले.
गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा व्यवस्थित कामाला लागला असता तर गावे केव्हाच जलयुक्त झाली असती असेही राज यांनी म्हटले आहे. जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधारे खात्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी टीका राज यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे काम केले आहे ते सरकारने केले नाही. ते सरकारने केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी असती. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, यामुळे अमिर खान यांचे काम मोठे आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्विकारत नाही. पण त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तो अवश्य स्विकारावा, अशी विनंतीही राज यांनी अमिर खानला केली.
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, 26 जुलाई 2018

मराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे

मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. काल मात्र काकासाहेब शिंदे ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल, ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला 'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.
एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून इतके मोर्चे काढल्यावर सरकारने ह्यावर तत्परतेने भूमिका घ्यायला हवी होती, आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने करायला हवी होती. पण त्यांनी तसे केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई - वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून. आपले शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत रहावे, ही तर परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे. हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.
ह्याचवेळी सरकारला एक इशारा. सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे? किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असे की सरकारला  "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसते आहे. त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा न्यायालयाचे कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे. वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारने सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये.

मंगलवार, 26 जून 2018

लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना

मुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.
आणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला. 'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक, उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.

मंगलवार, 12 जून 2018

राज ठाकरे यांच्या जन्मदिनी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त

प्रभादेवी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला 14 जून रोजी मुंबईतील 36 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना एक दिवस पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मनसेच्या वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईत दादर, वरळी नाका, वडाळा, शिवडी, भायखळा, ताडदेव, मलबार हिल, भांडुप, कालिना, विलेपार्ले, अंधेरी, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, दहिसर, मुलुंड, विक्रोळी, वाशी नाका, मुंबादेवी, कुलाबा, कुर्ला आदी पेट्रोल पंपांवर पेट्रोल त्या दिवसाच्या दरांपेक्षा चार रुपयांनी स्वस्त मिळणार असल्याचे धुरी यांनी सांगितले.
ही सवलत फक्त दुचाकीस्वारांसाठी असून 14 तारखेला मध्यरात्री 12 वाजल्यापासून दिवसभरात कधीही पेट्रोल भरू शकतात. त्या दिवशी पेट्रोलचा जो दर असेल त्याप्रमाणे दुचाकीस्वारांनी भरलेले पेट्रोलचे प्रति लिटर 4 रुपयाप्रमाणे होणारे पैसे मनसैनिक भरणार असल्याची माहिती धुरी यांनी दिली.
पेट्रोल पंपांवर गर्दी होणार
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना मिळणारी भेट आणि सध्याचे पेट्रोलचे भडकलेले दर पाहता ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर गर्दी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

शनिवार, 26 मई 2018

भाजपला दुटप्पीपणाचे परिणाम भोगावे लागतील - राज ठाकरे

चिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वंतत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
शनिवारी (ता.26) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय नागपूरला पळवून नेत आहेत.

शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडवणवीस व मूनगुंटीवार स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लीपींग फीरत आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या निवडणुकीत लोक नक्कीच करतील.पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतासाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री आदीत्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्‍न आहे.
म्हणून आता पाहण्यामध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे मांडले जात आहे.जागा वाढवण्यासाठी भाजपावाले दंगली घडवून आणतील. पण गूजराथमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच.
पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसींगापासून  नरसींहाराव, देवगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कूणालाच नव्हता.त्यामूळे पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.
ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले जाते याचे क्लीपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला त्यांनी लगावला.या वेळी श्री.ठाकरे यांच्या समवेत पक्षाचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या  निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वाना माहीत आहे. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार.या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत,असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
ईव्हीएम मशीनच्या खोटेपणाबद्दल भाजपचे किरीट सोमय्या किती तरी वर्ष ओरडत होते. अगदी सर्वोच्च न्यायालयात भांडण पोहोचले होते.आता किरीट सोमय्या अचानक सत्ता आल्यापासून ईव्हीएम बद्दल गप्प का बसले आहेत असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

मंगलवार, 8 मई 2018

"बुलेट ट्रेन'ला "मनसे'ची धडक

ठाणे - केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्‍या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला जमिनीच्या सर्वेक्षणाचा डाव उधळून लावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनेही दिवा-म्हातार्डी गावात स्थानिक भूमिपुत्र आणि तहसीलदार, पोलिस, रेल्वे अधिकारी आदींची बैठक घेऊन जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत सर्व्हे करून देणार नसल्याची भूमिका घेतली होती.

दिवा-शिळ येथील शिळ, डवले, पडले, आगासन, बेतवडे, देसाई आणि म्हातार्डी या सात गावांतून बुलेट ट्रेन जात असून नियोजित स्थानक दिवा-म्हातार्डी परिसरात असल्याने भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात दिवा-शिळ भागात आले होते. तेव्हा सरकारच्या या सर्वेक्षणाला मनसेने विरोध दर्शवत मोजणीसाठी आणलेले यंत्र उधळून लावत सर्वेक्षण बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी सर्वेक्षणासाठी उपस्थित असलेले तहसीलदार अधिक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गावकऱ्यांशी वेळोवेळी बैठका तसेच जिल्हास्तरावर चर्चा झाल्या आहेत. शिळ गावातील नागरिकांच्या मागण्या नाहीत. मात्र, म्हातार्डी येथील नागरिकांना जमिनीचे दर वाढवून देण्याची मागणी आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या मनसेला प्रकल्पाची माहिती देऊन चर्चेतून मार्ग काढला जाईल.
दरम्यान, सकाळी बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला विरोध दर्शविल्यानंतर सायंकाळी ठाणे तहसीलदार कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास विरोध दर्शवणाऱ्या घोषणा देत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनाला मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे, मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाधितांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून प्रशासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तरीही मनसेचा विरोध असेल तर त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगितली जाईल.
- सुदाम परदेशी, प्रांताधिकारी, ठाणे.  
पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षण 
मनसेने बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या भूमी सर्वेक्षणाला सोमवारी क्षणिक विरोध दर्शवल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसेची पाठ फिरताच पुन्हा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे आता संघर्ष अटळ बनल्याची चिन्हे दिसत आहेत.

शुक्रवार, 4 मई 2018

भाजपमधील एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ; राज यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका


उल्हासनगर : ''व्यक्ती बदलला की भूमिका बदलते. भाजपमध्ये एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याकडून आज आणि भविष्यात धोके दिसत आहेत'', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. भाजपशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर प्रथम भाजपला तर मोदीमुक्त होऊ द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे बोलत होते. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ही गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना नष्ट करण्याची आहे. विशेषतः शेतकऱ्यांबाबत बुलेट ट्रेनच्या नावावर बनावट सात बारा बनवून त्यांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. नाणार प्रकल्प कोकणात येणार याबाबत स्थानिक अनभिज्ञ राहतात. पण परप्रांतीय व्यापाऱ्यांना अगोदरच कसे ठाऊक होते ? ते जमिनी विकत घेऊन मोकळे होतातच कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार आणि परप्रांतीय व्यापारी एकत्र आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

उल्हासनगर शहरात मनसेच्या नेत्यांनी एकही नगरसेवक नसताना विद्यमान शहर जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका तयार होत असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या युनिटचे काम, कब्रस्तानचा पाठपुरावा, एल बी टी गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी स्तुती केली. यापुढे सातत्याने सर्व शहरांना भेट देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, सचिव सचिन मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडू देशमुख, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संजय घुगे, शैलेश पांडव, मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लवकरच 'कृष्णकुंज'वर बोलवून पक्ष संघटनेचे धडे देणार असे सांगितले.

बुधवार, 2 मई 2018

राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्याच्या घरी जेवण

आज दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो. 


शनिवार, 14 अप्रैल 2018

नाणारचे ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.
नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी आज (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की, ‘सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.’

केंद्र सरकारकडून नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सह्याही झाल्या. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे.

या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.

नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

रविवार, 8 अप्रैल 2018

नाशिकमध्ये मनसेचे इंजिन धावले; भाजपला धक्का

नाशिक : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला.

भाजपच्या विजया लोणारी यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैशाली भोसले यांना ७४५३, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२३१, तर भाजपच्या विजया लोणारी यांना ४८१० एवढी मते मिळाली. निवडणुकीत उभ्या असलेल्या उर्वरीत सहा जणांचे अनामत रक्कम जप्त झाली.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी येथे मनसेची जागा असली तरी बहुतांश भाग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी व्यापला असल्याकारणाने येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी पुन्हा भोसले कुटुंबीयांवर विश्वास ठेवत भाजपला नाकारले.

बुधवार, 21 मार्च 2018

रेल्वे, राज आणि बरेच काही..!

भारत हा तरूणांचा देश आहे. येथील 'डेमोग्राफीक डिव्हिडंड'बद्दल जगाला उत्सुकता आहे. युवकांच्या संख्येबद्दल कौतुकाने बोलले तर जाते. पण त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला, त्या सोडवायला कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही अशी स्थिती आहे. इंदिरा गांधी यांची हत्या न पाहिलेला वर्ग आज मतदार आहे. या मतदारानेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. मोदींना या वर्गाची गरज पूर्णत: ज्ञात असल्याने त्यांनी या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगारक्षम कार्यक्रमांवर भर देण्याची घोषणा केली होती.
उपजीवीकेचे साधन मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणावर कौशल्य विकासावर त्यांनी भर दिला होता. हा कार्यक्रम अन्य घोषणांप्रमाणे यशस्वीपणे राबवला न गेल्याने देशातील युवक हताश झाले आहेत.
आगामी निवडणुकात या निराशांची फौज मोदींची जादू संपवू शकते. धर्मवाद, घोषणाबाजी अशा अनेक बाबींवर मोदी सरकारला धारेवर धरले जाते. पण या सरकारचे खरे अपयश रोजगारनिर्मितीत न मिळालेल्या यशाचे आहे. सतत भाषणबाजी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बडया नेत्याला हे लक्षात आलेले दिसते आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे नावाच्या तरूण नेत्याने जी वक्‍तव्ये केली त्यात तरूणांचा हा खरा प्रश्‍न कुठेही प्रतिबिंबित झाला नव्हता. राज ठाकरे वयाने तरूण आहेत, ते मोदीमुक्‍तीच्या घोषणा देत बोलत असताना, एकेकाळी त्यांना डोक्‍यावर घेऊन नाचणाऱ्या माध्यमांवर अकारण टीका करताना देशातील खरी समस्या कशी समजू शकले नाहीत असे राहून राहून वाटत होते.
मुंबईतील रेल्वे बंद पाडणाऱ्या अॅप्रेन्टीस युवकांना आधाराचा खांदा देत राज यांनी ही भाषणातील ही चूक दुरुस्त केलेली दिसते. रेल्वे, रेल्वेतील भरती हे राज यांच्या आवडीचे विषय आहेत. मुंबईत दररोज किती रेल्वेगाडया येतात याचे हिशेब तपासताना भारतात सर्वाधिक मोठा रोजगार देणारी भारतीय रेल्वे ही केवळ काही प्रांतातील तरूणांना संधी देत असल्याची माहिती राज यांना गवसली होती. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान अशा नेत्यांनी रेल्वे आपल्या प्रदेशातील तरूणांना रोजगार देण्यासाठी वापरली हे एकेकाळचे राज यांचे आवडते वास्तव होते. भूमीपुत्र या रोजगाराला पारखे राहिले असे वास्तव ते बोलून दाखवत.
कल्याणला रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांवर हात साफ करून घेण्याचा प्रकार मनसेने केला होताच. त्याची मोठी आवृत्ती कमबॅक करण्यासाठी राज यांनी आता वापरलेली दिसते. ऐन परीक्षांच्या काळात मुंबई थांबवणे हे मतपेटीत वाढ करणारे ठरेल का माहीत नाही. पण तरूणांच्या समस्या हाती घेऊन अराजक निर्माण करण्याचा मार्ग राज यांनी पुन्हा एकदा अंगीकारलेला दिसतो. आधी मोदींची स्तुती नंतर मोदींपासून मुक्‍ती ,निवडणूक लढण्याची घोषणा मग नंतर घूमजाव अशा कोलांटयाउडया मारणारे राज ठाकरे विश्‍वासार्हता गमावून बसले आहेत. ती मिळवायला त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. आमदारसंख्या भूतकाळ आहे, संघटना मागील काळात नव्हती, वर्तमानात दिसत नाही आणि भविष्यात उभी रहाण्याची स्थिती नाही. अशा परिस्थितीत आंदोलने हा मार्ग चोखाळणे तसे सोपे असते. खळळखटयाक झाले की दंगा केल्याचे समाधान मिळते. विधायक कामाची दिल्ली दूर असल्याने बेदिली माजवणे सोपे जाते.
वाहतूक ही मुंबईची मोठी समस्या आहे. ओला, उबेर या खाजगी गाड्‌यांच्या बंदला समर्थन देत मनसेने काहीतरी केले आहे अन् दुसऱ्याच दिवशी यातायात बंद करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राज खोऱ्याने मते खेचतील, असे नाही. पण सरकारसंबंधात झालेल्या भ्रमनिरासाला नेतृत्व देऊ बघतील. अमराठी मंडळींविरोधातील मनसेच्या आंदोलानामुळे महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योग एकेकाळी ठप्प पडले होते. सेनेने प्रारंभीच्या काळात अंगीकारलेली भूमीपुत्रांच्या रोजगारी समस्या हाती घेण्याची पद्धत मनसेने पुन्हा एकदा अंगीकारली आहे. यात कुणाचेही भले नाही. हे तर खरेच पण सरकारला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना या तरूणांच्या असंतोषाला संघटित रुप येण्यापासून थांबवावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत, तरूण आहेत. बेरोजगारांच्या फौजांचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांना भेडसावतो काय? त्यांचे गुरू नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यावरचे उत्तर आहे काय ?
राज यांना समस्येला उत्तर शोधायचे नाहीये, ते काम फडणवीसांचे आहे, मोदींचे आहे आणि भारत जिंकू बघणाऱ्या अमितभाई शहांचेही आहे.
राज ठाकरे यांच्यात सातत्यपूर्णतेचा लवलेश नाही. पण अशी आंदोलने हवा तयार करतात. ती सुरू करणाऱ्यांचे या खेळात काही जात नसते. राज्यकर्त्यांना मात्र त्यातून मार्ग काढून समाजाला शांत करावे लागते. राज यांना वणवा पेटवायचा आहे, तेवढे झाले तरी त्यांना बाकी काही करण्याची गरज भासणार नाही. खरे तर राज यांनी विधायक कामांकडे जास्त लक्ष द्यावे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तयार केलेल्या ब्लूप्रिंटपेक्षा रेल्वे अडवणे सोपे आहे, वांझोटेही. राज यांचा भर आक्रमक मनसुब्यांवर दिसतो. त्याकडे सरकारला लक्षपूर्वक पहावे लागेल. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते थांबून जाणे परवडणारे नाही. राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्याबद्दलच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. मोदीमुक्‍त भारताचा संदेश दिल्याने मोदीविरोधकांना ते भाषण कमालीचे आवडले होते. मोदीभक्‍तांनी एका आमदाराच्या जोरावर दिलेली मुक्‍तीची हाक साहजिकच कडव्या टीकेचा विषय ठरवली. जनमनात स्वत:बद्दल प्रचंड उत्सुकता तेवती ठेवणारा हा नेता अधूनमधून बोलतो. आझाद मैदानावरचे पोलिसांच्या समर्थनार्थ केलेले भाषण असेल किंवा परळच्या रेल्वे दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाबाहेर घेतलेली छोटेखानी सभा असेल राज लक्ष वेधतात.
जनता भलेही त्यांना मते देत नसेल. पण त्यांचे भाषण मात्र ऐकते. त्यामुळेच ते दुर्लक्षून चालणार नाही. परवाच्या नववर्षसभेतील भाषणात बरेच विरोधाभास होते. काही वर्षांपूर्वी राज अचानक गुजरातेत थडकले होते अन् तेथील प्रगतीचा स्तिमीत करणारा आलेख त्यांनी स्वत:हून जनतेसमोर मांडला होता. (मोदींच्या निमंत्रणावरुन ते तेथे गेल्याचे ऐकिवात तरी नाही) मोदींवर आरत्या ओवाळणारा हा पहिलाच अन्यपक्षीय नेता असावा. आता भूमिका बदलल्या आहेत. माणूस प्रगल्भ होत असतो असे म्हणतात. त्यामुळेच की काय पण आता त्यांना मोदींपासून भारताने स्वत:ची सुटका करून घेणे गरजेचे वाटते. पुन्हा पुढच्या सहा वर्षांनी नेमके काय वाटेल ते माहीत नाही, पण असा प्रश्‍न ठाकरे घराण्यातील कुणालाही विचारायची तौहीन करायची नसते. (मोदी शहा मराठी वाचत नसल्याने त्यांच्याबददल टीकात्मक लिहिणे सोपे असते ,सांप्रतकाळी फॅशनेबलही) नितीन गडकरी हे रोडकरी या गौरवास पात्र असल्याचेही ते काही काळापूर्वी म्हणाले होते.
राज यांच्या कित्येक भाषणातला प्रत्येक शब्द माध्यमे घराघरात पोहोचवतात. पण ही प्रसिध्दीमाध्यमे मोदींची आणि विशेषत्वाने अमित शहांची बटिक असल्याची माहिती त्यांनी जनतेला दिली आहे. माझ्या भाषणाच्यावेळी वीजपुरवठा बंद केला गेला नाही, तरच ते तुम्हाला ऐकायला मिळेल असे ते म्हणाले. अशी वीज कुठे गेल्याची बातमी नाही, ती शहा यांच्या दमनकारी नीतीने दडवली गेली का माहीत नाही पण शहा यांनी माध्यमांच्या मालकांना दूरध्वनी करुन ते भाषण नक्‍कीच बंद पाडले नाही. कारण भाषण दिसत होते. (शहा यांना राज दखल घेण्यायोग्य वाटत नाहीत की काय ? गुजराती दुकानदारांनी काही संपर्क असेल तर सांगावे, असो) हे भाषण करताना राज यांनी केलेली काही वक्‍तव्ये त्यांच्याबद्दल ममत्व असणाऱ्यांना नाराज करणारी होती. मोदी उदयापूर्वीच्या काळात संघविचारांबद्दल आस्था असणारा मतदार राज यांच्याकडे आशेने बघत होता. त्यावेळी भाजपकडे नायक नसल्याने या मतांचा लंबक राज यांच्यावर काहीकाळ स्थिरावला होता. कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी मनसेला मिळालेली मते या मंडळींची होती. आज परिवारावर निष्ठा असलेली मंडळी मोदींवर काहीशी नाराज आहेत. घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत ही त्यांची खंत आहे. ही नाराज मंडळी राज यांना पसंती देतील का हा प्रश्‍न असला तरी भविष्यात तसे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
सरसंघचालक मोहन भागवत यांना भाषणात ओढून या वर्गाला राज यांनी अकारण नाराज केले. सरसंघचालकांचा जाहीर उल्लेखही या मंडळींना आवडत नाही, राज तर टीका करून मोकळे झाले. संरक्षणक्षेत्रात लुडबूड करणाऱ्या उदयोगाबद्दल राज बोलले तरीही भाषण कोणत्या वर्गासाठी होते हे कळत नव्हते. ऍप्रेन्टीसांना पाठिंबा देऊन राज यांनी नाराज युवकांना चुचकारल्यासारखे दिसते तरी आहे. हे आंदोलन किती काळ टिकेल माहीत नाही. शिवाय त्यामुळे काही प्रश्‍नही निर्माण होणार आहेत. संघराज्य प्रणालीत स्थानिकांना नोकरीत वाटा असावा का येथपासून चेल्याचपाटयांना नोकरी देणार्रंया लेकुरवाळ्या रेल्वेवर अजून किती भार टाकणे शक्‍य आहे. येथपर्यंतचे अनेक प्रश्‍न समोर येतात. राज यांना खरेच त्याबद्दल काही विचार मांडायचे आहेत काय? मुंबई बदलली आहे, जगही बदलले आहे. या चकचकीत आधुनिक जगाने युवकांना रोजगार दिले नाहीत हे खरेच आहे. पण त्यावर उत्तर खळळखटयाक करणे आहे की ब्लूप्रिंट ? राज यांनीच उत्तर शोधलेले बरे. जनतेला कृती हवी असते.
शेतकरी मोर्च्यात मला सत्ता द्या, असे विधान करणारे राज ठाकरे कोणाच्या ताकदीवर अशी स्वप्ने पाहतात ते माहीत नाही. उत्तर शोधण्याची त्यांची मानसिकता असेल तर ते त्यांच्या आगामी वाटचालीसाठी बरे ठरेल. किसान सभेच्या लाँग मार्चच्या आयत्या मंचावर गेलेल्या कॉंग्रेसने आजही चोखपणे पत्रक काढले आहे. देशात दररोज 33 हजार युवक नोकरी मिळवण्याच्या स्पर्धेत शिरतात अन् रोजगार तयार होतात. केवळ 450. शिवाय 551 नोकऱ्या दररोज रद्दबातल होतात, असे भयावह वास्तव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समोर आणले आहे. राजवट कुणाचीही असो, हे भयावह आहे. अपेक्षांचे ओझे उंचावणारे मोदी यावर उत्तर शोधू शकले असते. तर फार बरे झाले असते. - मृणालिनी नानिवडेकर

सोमवार, 19 मार्च 2018

राजसाहब, बदल रहे है !

काँग्रेस मुक्त भारतची बेंबीच्या देटापासून भाजपनेही आरोळी ठोकली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. काँग्रेसची परिस्थिीती नाजूक आहे हे खरे आहे. पण, तो भारत मुक्त होऊ शकणार नाही. तेच मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ? 
अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण बदलत आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढे मिळेलच. आज ते सर्व घटकांना बरोबर घेऊनच जाण्याचा विचार करीत आहेत असे त्यांच्या भाषणावरून दिसून येत आहे. राज यांचे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठीकडून हिंदुत्त्वाकडे वळले होते. त्यांचे हिंदुत्वही ज्वलंत होते. ते भाजपच्याही कधी कधी पचनी पडत नसे. राज हे शिवसेनेत असताना हे दोन्ही मुद्दे घेऊन लोकांपुढे गेलेले आहेत. त्यांनीही एैन उमेदीच्या काळात जोरदार बॅटींग करून शिवसेनेच्या पदरात कसे यश पडेल यासाठी कष्ट घेतले होते. राज यांना हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हित महत्त्वाचे वाटते. मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा कणा आहे. असे असले तरी केवळ उच्चवर्णिय मंडळींना राज खूप जवळचे वाटतात. आता ही प्रतिमा पुसण्यासाठी जे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
हा तेल्या तांबोळ्यांचा पक्ष बनला पाहिजे असे जर त्यांना वाटत असेल आणखी खूप कष्ट त्यांना घ्यावे लागतील. बीसी, ओबीसी, आदिवासी, माळीसाळी, तेलीतांबोळी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, जैन, लिंगायत, धनगर आदी ज्या अठरापगड जातीपाती आहेत त्यांच्यापर्यंत पक्ष पोचला पाहिजे. शिवसेना घराघरात का पोचली हे ही त्याला एक कारण आहे. महाराष्ट्रात तरी शिवसेना आणि मनसे हे दोनच पक्ष असे आहेत की जेथे जातीला स्थान नाही. स्वत: ठाकरे हे "सीकेपी' आहेत म्हणून हे दोन्ही पक्ष "सीकेपीं'चे आहेत असे कोणी म्हणत नाहीत. इतर पक्षाचे तसे नाही.

भाजप हा भटाबामनांचा, काँग्रेस, राष्ट्रवादी मराठा, अल्पसंख्यांकाचा, आरपीआय दलितांचा असे आजही कमीअधिक प्रमाणात समजले जाते. मनसे तर पिऊर मराठी माणसाचा पक्ष म्हणून समजला जातो. मात्र राज्यात ज्या म्हणून काही मराठी जाती आहेत त्यामध्ये मनसेच अद्याप पोचला नाही. गावखेड्यात हा पक्ष पोचण्यासाठी मनसेला खूप मोठे जाळे विणावे लागेल.
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता राज्यात काही नवीन समीकरणे उदयास येतील असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही कॉंग्रेस, शिवसेना, मनसेचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी दीर्घकाळ सत्तेवर राहिले तर आपले काही खरे नाही ही भीती महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रादेशिक पक्षांना सतावत आहे. त्यामुळे ममता, चंद्राबाबू, उद्धव असोत राज ठाकरे ही मंडळी मोदींवर तुटून पडत आहेत.
मोदी हे भाजपला विजयश्री मिळवून देणारे एकमेव नेते आहेत. मोदी या दोन नावावर भाजपचा पताका पुढेही फडकेल असा विश्वास या पक्षातील नेत्यांनाच नव्हे तर ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे. मोदीविरोधात सर्व विरोधक कितीही गरळ ओकत असले तरी त्यांच्यावर अद्यापही देशातील जनतेचा विश्वास आहे. आज कॉंग्रेस त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत असली तरी याच काँग्रेसवाल्यांनी आपला चेहरा पुन्हा एकदा आरशात पाहयला हवा.
काँग्रेस भ्रष्ट आहे हा जो डाग या पक्षाला लागला आहे तो लवकर पुसला जाणार नाही. कॉंग्रेस भ्रष्टाचाररूपी रावण जोपर्यंत गाडण्याची प्रतिज्ञा करीत नाही तोपर्यंत अवघड आहे. कोणत्याही राज्यात स्वच्छ प्रतिमेबरोबर विजय मिळवून देणारे खमके आणि तरूण नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. तसेही चित्र अद्याप कॉंग्रेसमध्ये दिसत नाही. ते केवळ मोदींनाच लक्ष्य करीत आहेत.
इमेज जितकी डॅमेज करता येईल तितके करण्याचा प्रयत्व प्रादेशिक पक्षही करीत आहेत. राज हे ही तेच करीत आहे. ऐरवी ते नेहमीच कॉंग्रेस, शिवसेना, भाजपवर टीका करीत असतात. कालमात्र तसे चित्र दिसले नाही. त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केवळ भाजपच ठेवले होते. भाजप सरकार कसे वाईट आहे हेच ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जर्मनीत हिटलार वापरत असलेल्या क्‍लृप्ल्त्या केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वापरत असल्याचेही ते म्हणाले. हा त्यांचा कट लक्षात घेतला नाही तर भविष्य खूप अवघड आहे. देशात आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आणणारे हे सरकार पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. मोदींच्या झंझावातामुळे प्रादेशिक पक्षांचा पालापाचोळा होत आहे, की काय अशी भीती व्यक्त केली जात असताना यूपीतील पराभवाने विरोधकांना विशेषत: प्रादेशिक पक्षांना नवी उभारी मिळाली. त्यांच्या पंखात बळ आले आहे. भाजप विरोधात महाराष्ट्रात तरी विरोधकांनी मोट बांधली आणि शिवसेनाही सत्तेतून बाहेर पडली तर भाजपला सर्व विरोधकांशी सामना करताना दमछाक होणार आहे. मोदींची प्रतिमा जितकी म्हणून मलिन करता येईल तितकी केल्यास त्याचा राज्यात फायदा उठविता येईल हेच गणित सर्वच पक्ष मांडत असावेत. मात्र मोदी-फडणवीस हे ही कच्च्या गुरूचे खेळाडू नाहीत तेही विरोधकांशी तितक्‍यात ताकदीने उतरणार नाहीत का ? तसे अमित शहांनीही बोलून दाखविले आहेच.

तरीही महाराष्ट्रात भाजप सरकारला सत्तेवरून कसे खाली खेचता येईल याचाच विचार आतापासून सुरू आहे असे म्हणावे लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवारांची मुलाखत घेणे, कालच्या जाहीरसभेच्या एकदिवस आधी त्यांची पुन्हा भेट घेणे, हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जाईल. हे षडयंत्र ओळखा असे आवाहन ते दोन्ही धर्मियांना करतात. मनसे हा कोणत्याही धर्माचा पक्ष नाही. सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील असे दिसते. या सर्व घडामोडी लक्षात घेता राजसाहब, बदल रहे है ? असे कोणीही म्हणू शकतो.
हे सर्व असले तरी ज्या भाजपने काँग्रेस मुक्त करण्याची हाक देशवाशियांना दिली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ?
-प्रकाश पाटील

शनिवार, 17 मार्च 2018

राज ठाकरेंची नव्‍या लढ्याची जुळवाजुळव




Raj Thackeray, Sharad Pawar

दारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही ?
गुढी पाडव्‍याच्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात बोलण्‍यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्‍यात प्रामुख्‍यानं फेरीवाल्‍यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्‍यात फारसं नाविन्‍य नाही, याची जाणीव स्‍वतः राज ठाकरेंनाही असणार. त्‍यामुळंच त्‍यांनी विविध समाजघटकांच्‍या गाठीभेटी घेण्‍याची मोहीम उघडलीय. यात त्‍यांनी ज्‍या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्‍यांच्‍या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्‍नही जाणून घेण्‍याचा प्रयत्‍नही राज ठाकरेंनी केल्‍याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्‍याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्‍या पलिकडच्‍या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.
मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत आतात. पण पुण्‍यातल्‍या शरद पवारांच्‍या प्रकट मुलाखतीनंतर पुन्‍हा एकदा नियमित चर्चेत येऊ लागले. कधी शेतकरी नेत्‍यांच्‍या भेटी घेऊन, तर कधी थेट शेतकरी मोर्चात सहभागी होऊन चर्चा करु लागलेत. आता राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली आणि पुन्‍हा नवनव्‍या चर्चा आणि समीकरणांना उधाण आलं. मूळात राज ठाकरेंनी काहीही केलं तरी चर्चा सुरुच होते, हे नाकारताच येणार नाही.
राज ठाकरे पुन्‍हा नियमित चर्चेत!
व्‍हीओ- राज ठाकरे गुढी पाडव्‍याच्‍या मुहूर्तावर पुन्‍हा एकदा गर्जणार आहेत. पण हे गरजणं नेमकं कशाकशावर असेल, यावर आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. पण हे आडाखे बांधण्‍याची काही गरज दिसत नाही. याचं कारण म्‍हणजे राज आणि त्‍यांची मनसे अलिकडच्‍या काळात ज्‍या पद्धतीनं वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना पाहायला मिळणं..... फेरीवाल्‍यांचा प्रश्‍न असो, की शेतक-यांचा मोर्चा असो, सगळीकडं मनसेचं अस्तित्‍व ठळकपणे पाहायला मिळू लागलंय. त्‍यामुळं शिवतीर्थवरही हेच मुद्दे प्रामुख्‍यानं येतील आणि त्‍यासाठीचा दारुगोळा जमवण्‍याची मोहीम त्‍यांनी उघडली असावी, असंच शरद पवारांबरोबरच्‍या भेटीवरुन वाटायला लागलंय. तोंडी लावायला केंद्र आणि राज्‍य सरकारची कामगिरीही राज ठाकरेंच्‍या रडारवर असेलच.
दारुगोळ्याची जमवाजमव की आणखी काही ?
गुढी पाडव्‍याच्‍या कार्यकर्ता मेळाव्‍यात बोलण्‍यासाठी राज ठाकरेंकडे पुरेसा दारुगोळा असणारच. त्‍यात प्रामुख्‍यानं फेरीवाल्‍यांचा मुद्दा असणारच आहे. पण त्‍यात फारसं नाविन्‍य नाही, याची जाणीव स्‍वतः राज ठाकरेंनाही असणार. त्‍यामुळंच त्‍यांनी विविध समाजघटकांच्‍या गाठीभेटी घेण्‍याची मोहीम उघडलीय. यात त्‍यांनी ज्‍या छगन भुजबळांवर वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली होती, त्‍यांच्‍या सुटकेसाठी धडपडणा-या भुजबळ समर्थकांचीही भेट घेतली. याशिवाय शेतक-यांचे प्रश्‍नही जाणून घेण्‍याचा प्रयत्‍नही राज ठाकरेंनी केल्‍याचं दिसतं. हा सारा प्रकार पाहता राज ठाकरे आता चहूबाजूंनी सक्रिय होत असल्‍याचं दिसतंय. पण शरद पवारांबरोबरची भेट मात्र या सगळ्यांच्‍या पलिकडच्‍या चर्चेला सुरुवात करुन देणारी ठरु पाहतेय.
भेट झाली, पण राजकीय नाही ! 
राज ठाकरे शरद पवार भेट झालीच नसल्‍याचं सुरवातीला सांगितलं जात होतं. पण नंतर ती झाल्‍याचं मान्‍य करण्‍यात आलं. मात्र हे मान्‍य करतानाच ही भेट झाली. ती पूर्वनियोजित होती, पुण्‍यातल्‍या प्रकट मुलाखतीच्‍या कार्यक्रमावेळीच ती ठरली होती, त्‍यावेळी फारसं बोलणं झालं नव्‍हतं, त्‍यामुळं ही भेट झाली, त्‍यात कसल्‍याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे एकापाठोपाठ एक खुलासे राज ठाकरेंकडून करण्‍यात आले. असा खुलासा केला गेला असला, तरी 40 मिनिटाच्‍या बैठकीत फक्‍त हवापाण्‍याच्‍याच गप्‍पा झाल्‍या असतील, असं मानायचं काही कारण नाही. त्‍यात कुठं ना कुठं नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्‍याप्रमाणं राज ठाकरेंनीही पवारांकडून कानमंत्र घेतला असणार, असंच राजकीय निरीक्षकांचं म्‍हणणंय.  राज ठाकरेंच्‍या रडारवर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, फेरीवाले यांच्‍याबरोबरच उद्धव ठाकरे आणि शिवसेनाही असणार आहे. अलिकडच्‍या काळात आपल्‍या व्‍यंगचित्रांच्‍या माध्‍यमातून याची झलक दाखवून दिलीच आहे.
....तोवर चर्चा रंगतच राहणार !
राज ठाकरे आणि शरद पवार यांच्‍या भेटीनं सर्वांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. त्‍यावर लगेच उलटसुलट चर्चाही सुरु झालीय. अशाच चर्चा शरद पवार- नरेंद्र मोदी, शरद पवार-राहुल गांधी यांच्‍यातल्‍या भेटीनंतरही रंगल्‍या होत्‍या. नरेंद्र मोदींनी तर शरद पवारांना आपले गुरुच असल्‍याचं जाहीर केलं होतं. याही आधी शरद पवारांनी राज ठाकरेंना सकाळी लवकर उठण्‍याचा सल्‍ला जाहीरपणे दिला होता. त्‍यावर तो मान्‍य करत आपण आता सकाळी लवकर उठत असतो, हवं तर दररोज सकाळची सेल्‍फी पाठवत राहीन, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आता आजच्‍या भेटीत पवारांनी राज ठाकरेंना नेमका कोणता कानमंत्र दिला, हे जोवर स्‍वतः राज सांगणार नाहीत, तोवर या भेटीबाबतच्‍या उलटसुलट चर्चा सुरुच राहणार, हे नक्‍की

बुधवार, 28 फ़रवरी 2018

मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी.

कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला हवी हीच इच्छा.

शनिवार, 10 फ़रवरी 2018

गोळवळकर, हेडगेवारांचा पुतळा उभारावासा का वाटला नाही: राज ठाकरे


पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्रातून बौद्धिक घेतले आहे. लोकसभा आणि राज्यसभा येथे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावावर चर्चा करताना मोदी यांनी काँग्रेसला जोरदार झोडपले होते. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या चुका त्यांनी या भाषणात दाखवल्या होत्या. मोदींनी व्यंगचित्रातून गांधीजींच्या मुखातून मोदी यांचे बौद्धिक घेतले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल हे जर देशाचे पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न निर्माणच झाला नसता, असे मोदी यांनी या भाषणात म्हटले होते. पटेल यांना डावलून नेहरू यांना पंतप्रधान केल्याचाही दावा त्यांनी केला होता.
त्यावर व्यंगचित्रातील गांधीजी हे मोदींना इतिहास समजावून सांगताना राज यांनी दाखविले आहेत. गांधीजींच्या हातात `भारताचा इतिहास` हे पुस्तक दाखविण्यात आले आहे. `जवाहरलाल नेहरू यांना मी पंतप्रधान केले. काॅंग्रेसने नाही,` असे गांधीजी मोदींना सुनावत आहेत. `वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचेच होते. त्यांचा पुतळा उभारावासा वाटला. मात्र गोळवळकर गुरूजी किंवा हेडगेवारांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला. प्रचारक होताना तू?, असा सवाल गांधीजींनी केल्याचे राज यांनी दाखविले आहे. मोदी यांच्या पाठीशी अमित शहा यांना दाखवून राज यांनी व्यंगचित्रात आणखी गंमत आणली आहे.

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

मरगळ झटकून 'दिलसे' काम करण्याची गरज

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागली आहे. शिवसेनेने या दोन्ही निवडणुका स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेमके काय सुरू आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल; पण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात येऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार, अशी बातमी झळकली आणि कार्यकर्त्यांना हायसे वाटले.
ठाकरे यांना त्यांच्या व्यापातून पक्षाच्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नाही; पण अमित ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे पक्षाच्या कार्यालयातही बऱ्याच दिवसांनी कार्यकर्त्यांची वर्दळ दिली. प्रत्येक प्रभागात पदाधिकारी नेमताना पक्षाची नेमकी ताकद किती उरली आहे, याचा अंदाजही या निमित्ताने पक्षनेत्यांना आला. पुण्यात येत्या काळात पक्षाला उभे राहण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागेल, याची जाणीवही त्यांना नक्कीच झाली असणार.  कृपया आमच्या चॅनेल ला subscribe  करा

लोकसभा, विधानसभा आणि वर्षभरापूर्वी झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. राज्यभरातच या पक्षाची स्थिती वाईट झाली. पण त्यानंतर वेळीच सुधारणेसाठी जी पावले टाकावी लागतात तीही कुठे दिसली नाहीत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा संच असतानाही पक्षाला मरगळ आली. पुणे महापालिकेत 2012च्या निवडणुकीत मनसेला 27 जागांवर विजय मिळला होता. पुणेकरांच्या मोठ्या अपेक्षा या पक्षाकडून असताना त्यांना मतदारांचा विश्‍वास कमावता आला नाही. पुणेकरांच्या प्रश्‍नावर ठोस भूमिका घेऊन लढताना हा पक्ष दिसला नाही. पक्षाच्या नेत्यांचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणून पक्षाची महापालिकेतील संख्या 27 वरून दोनवर आली. जे दोन नगरसेवक विजयी झाले, त्यातही त्यांच्या वैयक्तिक कामाचा वाटाच जास्त होता.
महापालिका निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी झाली. युवकांचा मोठा पाठिंबा असणाऱ्या या पक्षाला शहर पातळीवर खंबीर नेतृत्व मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचा प्रभाव पडण्यासही मर्यादा आल्या. आता पक्षाने पक्षसंघटनेवर भर दिला आहे, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. पुण्यातील प्रभाग रचना बदलल्याने पक्ष संघटनेच्या रचनेतही बदल केले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी एक प्रभागाध्यक्ष नियुक्त केला जाणार आहे. दोन प्रभागांवर उपविभाग अध्यक्ष असेल. आठ विभाग अध्यक्ष, चार उपशहराध्यक्ष आणि एक शहराध्यक्ष अशी नवी रचना यापुढे शहरात राहणार आहे. ठाणे आणि मुंबईच्या धर्तीवर ही रचना केली जाणार असून, त्यानिमित्ताने पक्षाला प्रभाग पातळीपर्यंत पदाधिकारी मिळतील अशी अपेक्षा आहे.
महापालिकेत सध्या वसंत मोरे आणि साईनाथ बाबर विविध विषयांवर लढताना दिसतात. त्यांना पक्ष संघटनेचे पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे. महापालिका पदाधिकारी आणि पक्षसंघटना यातील समन्वय सध्या मनसेमध्येही दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आतापासून तयारी आवश्‍यक आहे; पण अद्याप पक्षपातळीवर मरगळच दिसते, पक्ष संघटनेच्या फेररचनेत ती दूर होईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. एक सक्षम विरोधी पक्षाची पोकळी सध्या पुण्यात
निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याची संधी मनसेला आहे. त्यासाठी गरज आहे, ती जिद्दीने काम करण्याची, मरगळ झटकण्याची!
आमच्या चॅनेल ला subscribe  करा 
आमच्या चॅनेल ला subscribe  करा 

शनिवार, 27 जनवरी 2018

महाराष्ट्रातल्या जातीय भांडणांवर राज साहेबांचे व्यंगचित्र

मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता.

सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.

९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' किंवा २३ जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र तुम्ही पाहिलं असेलच.
पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत.

त्यातलेच काही माझे 'फटकारे'.
तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो.

कृपया आमच्या चॅनेल ला subscribe  करा
आमच्या चॅनेल ला subscribe  करा 
आमच्या चॅनेल ला subscribe  करा 

बुधवार, 24 जनवरी 2018

मंगलवार, 23 जनवरी 2018

कोण जिंकलं कोण हरलं- गुजरात निवडणूक, राज ठाकरेंचं नवीन व्यंगचित्र.

मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता.
सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.
९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' व्यंगचित्रं तुम्ही पाहिलं असेलच. पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी होते.
त्यातलेच काही माझे 'फटकारे'.
तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो.

रविवार, 14 जनवरी 2018

महाराष्ट्राच्या परिस्थितीवर साहित्यिकांची ठोस भूमिका नाही - राज ठाकरे

सांगली - येथील पलूस येथे सध्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन सुरु आहे. आज दुपारनंतर हे साहित्य संमेलन गाजत आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीने. परखड भाषण आणि थेट आरोपांनी राज ठाकरे यांनी या साहित्य संमेलनचा मंचही गाजवला. आज महाराष्ट्रात एकमेकांना जातीच्या दृष्टीकोनातूनच आपण बघत आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याचे म्हटले. आजचे साहित्यिक ठोस भूमिका घेत नाहीत. राज्यातील शहरं बळकावली जात आहेत तरी महाराष्ट्र बेसावधच असल्याचे वक्तव्यही राज यांनी यावेळी केले.
मुंबईत कमला मिलला लागलेल्या आगीत लोक मृत्युमुखी पडले. ज्यात 14 लोक गुजराती होते. कोरेगाव भीमा येथे इतक्या मोठ्या प्रमाणात दंगल झाली. पण पंतप्रधान मोदींनी मात्र केवळ कमला मिलबाबतच ट्विट केले. कोरेगाव भीमा दंगलीवर ते काहीच बोलले नाही. पंतप्रधान हा देशाचा असतो, एकटा गुजरातचा नाही. असे परखड बोल राज ठाकरे यांनी सरकारविरुध्द उच्चारले. आपल्या भाषणात राज ठाकरे पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात काम आहे. पण तरी काम मिळत नाही आणि बाहेरच्या राज्यातील लोक येऊन काम मिळवतात, ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. मुंबई ही गुजरातला हवी आहे, त्यामुळे हे सगळे चालू आहे. महाराष्ट्राची भूमिका घेणारे कवी, लेखक कुठे गेले? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. एवढ्या घटना घडत आहेत. पण एकही साहित्यिक पुढे येत नाहीत. माझे या साहित्यिकांना एकच सांगणे आहे की जे घडत आहे ते त्यांनी आपल्या साहित्यातून मांडावे. केवळ आपल्या महाराष्ट्रामध्येच असे राजकारण सुरु आहे. या दुषित राजकारणामुळे आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे माझी एक विनंती आहे की, या सगळ्या राजकीय भिंती पाडा. बुलेट ट्रेन ही पंतप्रधान यांना अंधारात सुचते.
साहित्य काही वाचायचे नाही, त्याचा बोध घ्यायचा नाही, तर कशाला साहित्य संमेलन घ्यायची? असा सवालही त्यांनी केला. नुसती साहित्य संमेलन घेऊन काही उपयोग नाही. या महाराष्ट्राला काही किंमत राहणार नाही. येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत, हे तुम्हाला आणि या सरकारला काहीच देणे घेणे नाही.' अशा आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर त्यांनी टिकास्त्र चालवले. 'आपल्या देशात निवडणुकांशिवाय दुसरा धंदा नाही, रोज एक निवडणूक असते.' असेही राज म्हणाले. साहित्यकारांनी महाराष्ट्रासाठी काम करावे, अशी माझी इच्छा असल्याचे वारंवार आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी आज नमुद केले.  

शनिवार, 13 जनवरी 2018

मी हाती घेतलेले काम अर्धवट ठेवत नाही : राज ठाकरे


राजापूर : रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालेन. मी हाती घेतलेले कोणतेच काम अर्धवट ठेवत नाही. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तरीदेखील हा प्रकल्प होणारच असे विधान मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत केले. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे.
ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेदेखील ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णघ घेत प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, याबाबत मनसेने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट घेतलेली नाही.
नाणार परिसरातील ग्रामस्थांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान आपण प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडू असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाणार परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला हा प्रकल्प नको, असे ठणकावून सांगितले. त्याचबरोबर मनसेने एक दणका देऊन हा प्रकल्प येथून हटवावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, की कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोकणी माणूस स्वस्त आहे, असा समज झाल्याने कोकणाच्या माथी असे प्रकल्प लादले जात आहेत. कोकणची ताकद दाखवून द्या, या प्रकल्पाला कडाडून विरोध करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मात्र, जर फूट पडतील तर मग ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आज होला किंमत नाही तर जगात नाहीला किंमत आहे. त्यामुळे प्रकल्प नको, या भूमिकेवर ठाम रहा, मनसे तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.