शनिवार, 31 अगस्त 2013
बुधवार, 28 अगस्त 2013
विधान परिषद निवडणुकीत मनसे तटस्थ
मुंबई - विधान परिषदेच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार
धनंजय मुंडे यांनी आज "कृष्णकुंज' या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट
घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
विधान परिषद निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यासंदर्भात बोलताना सर्वच पक्षाच्या आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांनी अचानक "कृष्णकुंज'वर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नंतर लगेच ठाकरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना झटका बसला असून त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांची आजची भेट राजकीय नव्हती तर केवळ सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या हंडीसाठी मनसेचे आतापासूनच थर
गुरुवार, 29 ऑगस्ट 2013 - 03:00 AM
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीचा मुहूर्त साधत येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे थर रचायला सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबईतून आदित्य शिरोडकर आणि ईशान्य मुंबईतून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या निमित्ताने या उमेदवारांना घराघरात नेण्याचा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
लोकसभेच्या उमेदवारांवरून अन्य पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. मनसेने नांदगावकर, शिरोडकर आणि नलावडे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उठवत युतीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा करणाऱ्या भाजपचे तोंड बंद केले आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसेकडून सणांची पर्वणी साधली जाणार आहे. या मतदारसंघामध्ये मनसेने यापूर्वीच पाय रोवले आहेत. राज यांनीही तेथेच लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर घाई करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवारांचा मतदारांशी संवाद वाढावा यासाठी रणनीती आखली आहे.
लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राज यांनी बोलावलेल्या बैठकीला नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रीटा गुप्ता; तसेच या मतदारसंघांतील विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली असून आदित्य शिरोडकर यांनी दहीहंडीच्या निमित्ताने टी-शर्ट वगैरे वाटप करीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या तीन मतदारसंघापैकी दोन कॉंग्रेसकडे; तर एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.
तिसऱ्या थरातून मुसंडीची तयारी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईमध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील निवडून आले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला 32.60 टक्के, भाजपला 32.15 टक्के आणि मनसेला 29.79 टक्के मते मिळाली. दक्षिण-मध्य मुंबईतही मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती (येथे कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले). दक्षिण मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावरील मनसे यांच्यामध्ये मतांची थेट विभागणी झाल्याने कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांना लाभ झाला. आता मात्र दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा गड हलविण्यासाठी मनसेने तेथे अधिक ताकद लावण्याचे ठरवले आहे. एकंदर या तिन्ही मतदारसंघांत सध्या तिसऱ्या थरावर असलेल्या मनसेची विजयाचे दही चाखण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर
मुंबई
- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय
मुंडे यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
बीड
जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी
काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे
यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा
झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. धनंजय मुंडे हे वडिल पंडित अण्णा
मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नुकताच या जागेसाठी
राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे.
शुक्रवार, 23 अगस्त 2013
आबांना बांगड्यांचा आहेर द्या - राज ठाकरे
शनिवार, 24 ऑगस्ट 2013 - 01:00 AM IST
मुंबई - मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महिलांनी गृहमंत्र्यांना बांगड्याचा आहेर पोस्टाने पाठवून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. किमान मनाची चाड बाळगून आर. आर. पाटील यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि बलात्काराच्या घटनेवरून गृहमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ""2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटाच्या घटनेनंतर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. ही संधी का दिली गेली, हे आपल्याला कळले नाही. त्यानंतर आझाद मैदानात पोलिसांना आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली. त्या वेळीही आपण पाटील आणि तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण पाटील आपल्या खुर्चीला चिकटून राहिले आहेत.'' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रातील माहिती पुरविण्याचे काम करत असल्यानेच पाटील यांची वर्णी गृहमंत्रिपदावर लागल्याची टीका राज यांनी केली. ते म्हणाले, ""पवार यांच्यासाठी "कुरिअर सर्व्हिस'चे काम गृहमंत्री करत आहेत. यापूर्वी राज्यात रात्री-अपरात्री महिला सुरक्षित फिरत होत्या. पण या घटनेनंतर सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. महिलांनी घटनेचा निषेध म्हणून मलबार हिल येथील त्यांच्या बंगल्यावर अथवा सांगलीतील घरी पोस्टाने बांगड्या पाठवाव्यात.'' दरम्यान, एप्रिलपासून पोलिसांच्या बदल्यांची फाईल अडकून पडली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांना आपण आहे त्या ठिकाणी राहणार की जाणार याबद्दल शंका आहे.
पोलिसांच्या या संभ्रमावस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. "टग्यां'नी गृहमंत्रिपद घ्यावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे, असे थेट आव्हान राज यांनी पवार यांना दिले. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपण "टगे' असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या टग्यांनी आता गृहमंत्रिपद घेऊन आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी, असे आव्हान राज यांनी दिले.

शुक्रवार, 16 अगस्त 2013
सदस्यता लें
संदेश (Atom)