बुधवार, 20 दिसंबर 2017

'यशराज'ची मुजोरी चालणार नाही; मराठी चित्रपटांना थिएटर द्याच! : मनसे



मुंबई : 'देवा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, या चित्रपटाला थिएटर स्क्रीन मिळत नसल्याने मनसेने यामध्ये उडी घेतली आहे. ''मराठी चित्रपटाला अन्याय झाला तर चित्रपट सेना गप्प राहणार नाही. 22 तारखेला देवा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर मनसे आंदोलन करणार आहे. मात्र, 22 डिसेंबरला देवा प्रदर्शित होणारच असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. तसेच मराठी सिनेमांसाठी भीक मागावी लागते हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
'देवा' चित्रपटाची टीम आणि खोपकर यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी खोपकर बोलत होते. खोपकर म्हणाले, देवा चित्रपटाला स्क्रीन न देणाऱ्या चित्रपटगृहांचे परवाने रद्द करावे. तसेच त्यांनी यशराज फिल्मस् ला इशारा दिला. ते म्हणाले, यशराज फिल्मस् चे सध्या 'मी जे सांगेल ते' असे झाले आहे, मात्र, आम्ही त्यांचा मुजोरीपणा खपवून घेणार नाही. मराठी चित्रपटाला अन्याय झाला तर चित्रपट सेना गप्प राहणार नाही.
महाराष्ट्रात मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्राधान्य द्यावे, अशी तरतूद आहे. मात्र, अनेक चित्रपटगृह याचे पालन करत नाही. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, मनसेच्या या इशाऱ्यामुळे देवा 22 तारखेला प्रदर्शित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवार, 3 दिसंबर 2017

राज ठाकरे यांचे नवे व्यंगचित्र, योगी शहा यांच्यावर evm वरून टीका.


राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया : वारिस पठाण

सोलापूर : मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरुन मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे.
हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.
मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ. जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याने ते आमच्या भागात येत नाहीत, असं वारिस पठाण म्हणाले. मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे, असं टीकास्त्रही वारिस पठाण यांनी सोडलं.
राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया, अशी टीकाही पठाण यांनी केली आहे. ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पठाण मनसेवर बरसले.

गुरुवार, 30 नवंबर 2017

राज यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं फक्त एक मत गेलं : नाना पाटेकर

णे : “प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.
आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर मत मांडलं.

मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आवळला होता. “भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता,” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता.
नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

“महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला,” असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.
या विषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. पण राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं.”

मंगलवार, 28 नवंबर 2017

मार खाणारे नाही तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित - राज ठाकरे

मुंबई - आंदोलनात मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे मनसैनिक हवे आहेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली असल्याची माहिती मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंबईतील फेरीवाले आणि त्यांना समर्थन देणारे मुंबई कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
विक्रोळीत दुकानदारांत मराठी पाट्यांच्या मुद्द्यासाठी गेलेल्या मनसैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथील निवासस्थानी मनसे पदाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असल्याचेही बोलले जात आहे. या सगळ्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात येणार आहे.
मनसैनिक विरोधी गटाकडून मार खातातच कसे? असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. मारहाणीत आपल्या कार्यकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे, असेही ठाकरे म्हणाल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
आमचे कार्यकर्ते दुकानदारांना नुसते निवेदन द्यायला गेले होते. त्यांच्यावर अचानक हल्ला होतो, तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असून, ही गंभीर बाब आहे. यात प्रशासनाचे लक्ष नाही. किंबहुना प्रशासन हे जाणूनबुजून करत असल्याचा आरोपही शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

शुक्रवार, 24 नवंबर 2017

'डीएसके' ही व्यक्ती फसविणारी नाही : राज ठाकरे


पुणे : ''बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी उभे केलेले विश्‍व उद्धवस्त होऊ नये. त्यांच्यावर
अन्यायही होता कामा नये. पण त्यांना संपविण्याच्या प्रयत्नात काही अमराठी लोक आणि राजकारणी आहेत. त्यांची नावे मला माहिती आहे. मात्र एक मराठी व्यावसायिक म्हणून त्यांच्या पाठीशी राजकीय पक्षांची लेबलं फाडून उभे राहिले पाहिजे. कारण डीएसके ही व्यक्ती फसवणारी नाही'', अशी स्पष्ट भूमिका घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लवकरच ठेवीदार आणि डीएसके यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्याचा शब्द गुंतवणूकदारांना दिला.
पुणे भेटीवर आलेल्या राज यांनी आज (शुक्रवार) काही निवडक ठेवीदारांबरोबर बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, ''डीएसकेंचा विषय गेली काही दिवस गाजत होता. वर्तमानपत्रातून त्यांच्याविषयीच्या बातम्या वाचल्या. डीएसके जेल मध्ये जाणार का? खरंतर अशा बातम्यांमुळे एखादा मराठी माणूस संपून जाईल. सध्या ते अडचणींतून चाललेत. डीएसकेंना मी गेली अनेक वर्षे ओळखतो. तो माणूस 'चिटर' नाही. नोटाबंदीचा फटका त्यांनाही बसला. मराठी व्यावसायिक हिंमतीने वर आला. ठेवीदारांनीही घाबरून जाण्याचे कारण नाही. अन्य मराठी व्यावसायिकांनीही त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अमराठी व्यावसायिकांची संकूल उद्धवस्त केली पाहिजेत. इतके वर्षे कष्ट करून वर आलेल्या डीएसकेंना जेल मध्ये पाठवायचे का? त्यापेक्षा त्यांच्याविषयी सकारात्मक विचार करा. वातावरणही तसेच निर्माण करा. मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी मराठी व्यावसायिक व ठेवीदारांनी उभे राहावे.''
दरम्यान, डीएसके यांनी त्यांच्या मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवाव्यात. कर्जातून ठेवीदारांचे पैसे फेडावेत आणि भविष्यातील स्थितीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार बँकांकडे असावा, असाही पर्याय बैठकीत चर्चेला आल्याचे ठेवीदारांनी सांगित

शनिवार, 4 नवंबर 2017

नाना पाटेकरने चोंबडेपणा बंद करावा : राज ठाकरे

मुंबई : "नाना, तू मराठी कलावंत आहेस. तू मला आवडतो. तू महाराष्ट्रावर बोल. तो xxx निरूपम तुझे अभिनंदन करतो. यायचे नसेल आमच्याबरोबर येऊ नको. मात्र मध्ये चोंबडेपणा कशासाठी करता. काय वस्तुस्थिती आहे हे कळत नाही. फेरीवाल्याच्या मुद्दयावर सरकारशी बोललो आहे, हे माहिती न घेता अभिनेता नाना पाटेकर आमच्यावर टीका करतो आहे. त्याने हे उद्योग प्रथम बंद करावेत, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिला.
मुंबईत आज सकाळी व्हीजेटीआय संस्थेत बोलताना नाना पाटेकर यांनी मनसेच्या फेरीवाल्यांसंदर्भातील भूमिकेवर टीका करताना फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का आणता, असा सवाल केला होता. नाना यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी त्यांचे अभिनंदनही केले होते.
नाशिक येथे जाहीरसभेत बोलताना राज यांनी फेरीवाल्यांच्या मुद्यावर नाना पाटेकर, काँग्रेसचे नेते संजय निरूपम आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. नाना पाटेकरांचा आपल्या ठाकरी भाषेत समाचार घेताना ते म्हणाले, की आज एकट्या मुंबईत दररोज साठ-सत्तर हजार लोक प्रवास करतात. त्यांची काळजी नानाला नाही. त्यांच्या गरीबीवर तो बोलत नाही. फेरीवाला दररोज शंभर रूपये हप्ता भरतो. गरीब कोण श्रीमंत कोण अशा व्याख्या जुळवायच्या कशा? आजपर्यंत सर्वांशी अनेकदा बोललो आहे. त्यानंतरही प्रशासन ढीम्म असेल तर आमचा हात उठणारच. जे अयोग्य आहेत त्याबद्दल बोलायचं नाही का? तो निरूपम नानाचे अभिनंदन करतो हेच मुळी चीड आणणारे आहे.
नाना पाटेकरांवर राज यांनी एकेरी भाषेत जोरदार हल्ला चढविला.
आज सगळीकडे झोपडपट्टीवाले दिसून येतात. ते ही बाहेरून येणार. परप्रांतियांच्या झोपडीला एक कोटी मिळणार, मात्र मराठी माणसासाठी काही नाही. प्रत्येक राज्य आपल्या माणसासाठी काम करतं. मी महाराष्ट्रासाठी काम करतो तेंव्हा तुम्ही आम्हाला शिव्या घालता. काय या शहरांची अवस्था आहे? फेरीवाल्यांसंदर्भातील निर्णयाबद्दल न्यायालयाचे अभिनंदन करतो. आमचा मामला सळेसोठ असतो. चुकीचे असेल तेंव्हा हाणणारच, असा इशारा राज ठाकरे पुन्हा एकदा परप्रांतियांना दिला.
राज म्हणाले, पुढच्या चार दिवसात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलविणार आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला, प्रत्येक वॉर्ड आफिसर, रेल्वे स्टेशन मास्तरच्या हातात न्यायालयाच्या आदेशाची प्रत द्यायची आहे. आता हे तर कायदेशीर आहे. पाटेकर मंडळी जर ऐकत असेल तर ते ऐकावे. फेरीवाल्यांना बेकायदा विक्री करता येणार नाही. फेरीवाले जर परत बसले तर अधिकाऱ्यांवर कंटेम्ट ऑफ कोर्ट टाकणार. फेरीवाल्यांना हटविण्याचे काम तुमचे किंवा माझे नाही. मात्र महाराष्ट्रासाठी जागता पाहरा आम्ही ठेवणार आहोत. अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावी अन्यथा मला हाथ सोडायला लावू नये. गरीब बिचार फेरीवाला असले टूणटूणे बंद करा. फेरीवाल्या भाजीपाल्यांकडून भाजी घेण्याचे बंद करा. नागारीकांनी फेरीवाल्यांएेवजी दुकानात जावे.
जगाच्या पाठीवर असे काही घडत नाही. येथे मात्र सगळे घडते कसे. मी महाराष्ट्राला बोंबलून सांगतो आहे. परप्रांतियांमुळे शहरे विस्कळीत झाली आहे. रोज किती माणसं शहरांनी अंगावर घ्यायची असा संतप्त सवालही त्यांनी शेवटी केला.

शनिवार, 28 अक्टूबर 2017

नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा

मुंबई : मालाडमधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आता मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.
“एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.”, असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखं वाटतंय आणि त्यांना मराठी माणसांची मतंही हवी असतात.”
काय आहे प्रकरण?
मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी बोरीवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत. काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

गुरुवार, 26 अक्टूबर 2017

याच 'पप्पू'ला घाबरून मोदी गुजरातला का जाताहेत- राज ठाकरे

मुंबई : भाजपच्या नेत्यांनी आधीपासून राहुल गांधींना लक्ष्य करून 'पप्पू पप्पू' म्हणून चिडवले. तेच राहुल गांधी आज गुजरातमध्ये जाऊन 'झप्पू' होत आहेत. राहुल यांच्या सभेला लोकांची जेवढी गर्दी होत आहे त्याला घाबरून मोदी नऊ-नऊ वेळा गुजरातमध्ये जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
ज्या राहुल गांधींना तुम्ही आतापर्यंत अपमानित करत होता. तीच व्यक्ती आज गुजरातमध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला एवढी भीती का वाटत आहे, असा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. 
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाचे सरकार आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत जी विरोधी पक्षांची सरकारे येतात त्यांनी शत्रूंची गरजच पडत नाही. ते स्वतःसाठीच खड्डा खोदून ठेवतात. तसेच हे मोदी सरकार करत आहे. राजीव गांधींच्या नंतर या देशात पहिल्यांदाच एवढे मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तरीही नोटाबंदी आणि जीएसटीसारखे जीवघेणे निर्णय मोदी सरकार घेत आहे, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.  
राज ठाकरे म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री असताना देशाला हलाखीच्या आर्थिक स्थितीतून सावरले. मात्र, मोदी सरकार पुन्हा आर्थिक स्थिती बिघडवत आहे. 
EVM यंत्रांमध्ये गडबड
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कसा फेरफार केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यास तयार होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना प्रात्यक्षिक देण्याची संधीच दिली नाही. किरीट सोमय्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मग एवढ्या वर्षांत कधीच भाजपला एवढी मते मिळाली नाहीत, आणि आता कशी मिळत आहेत. याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. 
परतीचा पाऊस
सोशल मीडियावर मोदी सरकारविरोधात टीका होत असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले, सोशल मीडिया वापरून मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी सोशल मीडियावर काहीही केलं तरी चालत होतं. आता तोच सोशल मीडिया आता त्यांच्याविरोधात जात आहे तेव्हा मात्र सरकारविरोधात कोणी लिहिले तर त्याच्याविरोधात लगेच गुन्हे दाखल केले जातात. मला मोदींनी गुजरातमधील केवळ ठराविक गोष्टी दाखवल्या, सांगितल्या. त्यामुळे तेच देशाचा विकास करू शकतील असे सुरवातीला मला वाटले. मात्र, आता तीन वर्षे झाली तरी ते केवळ खोटंच बोलत आहेत.

मंगलवार, 24 अक्टूबर 2017

चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? : राज ठाकरे

कल्याणः कामगारांनी एकाच ठिकाणी ठाम राहिले पाहिजे एकदा इकडे सत्ता आली की तिकडे, असेच वागलात तर जो तो तुम्हाला लूटेल. चार दिवस संप करून ही परिस्थिती बदलणार नसेल तर त्याला काय अर्थ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला केला. यावेळी एसटी कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन ही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
सोमवार (ता. 23) महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने एसटी कामगारांच्या संपाच्या पाश्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईच्या दादर मधील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. संपात सहभागी झालेल्या एसटी कामगारांवर होणारी संभाव्य कारवाई संदर्भात एसटी प्रशासनाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत चर्चा करू, वेळप्रसंगी पत्र ही देऊ असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी एसटी कामगारांच्या संघटनाबाबत ही ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. कामगारांनी कुठे तरी एकाच जागेवर ठाम राहण्याची गरज आहे. अन्याथा प्रत्येकाकडून असेच लुटले जाल, असा टोला लगावत पुढे म्हणाले की, 'सतत घरंगळत जायला एकदा इकडे सत्ता आली की तिकडे असेच राहणार असाल तर लुटले जाल. आता ही तेच होईल चार दिवसाचा संप करूनही परिस्थिती बदलणार नसेल तर मग काय अर्थ आहे.'

परिवहनच्या संघटनात्मक बदलांकडे ही आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन ठाकरे यांनी शिष्टमंडळास दिले. या प्रसंगी सरचिटणीस मोहन चावरे, कार्याध्यक्ष विकास अकलेकर, हरी माळी, ठाणे विभागाचे सचिव महादेव मस्के, विजय नांगरे आणि विभाग कल्याण, धुळे, नाशिक, रायगड, बुलढाणा, रत्नागिरी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवार, 21 अक्टूबर 2017

मंत्री- अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे ‘एसटी टायर्ड’; राज ठाकरेंचे फटकारे

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज
Youtube Channelठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकेबाजी केली आहे. राज यांनी शनिवारी आपल्या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले. यामध्ये त्यांनी एसटी महामंडळाच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले. व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक एसटी कर्मचारी आपल्या व्यथा सांगताना दिसतोय. मंत्री आणि अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार आणि संगनमतामुळे एसटी यंत्रणेची दुरावस्था झाली आहे. या दोन टायर्समुळेच संपूर्ण यंत्रणा ‘टायर्ड’ झाली. त्यामुळे ही दोन टायर्स बदला म्हणजे तुम्हाला आमच्या मागण्या अवास्तव वाटणार नाहीत, असे हा कर्मचारी मुख्यमंत्र्यांना सांगत आहे.
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप केला होता. मुंबई हायकोर्टाने संप बेकायदा ठरवून कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घेतला. दरम्यानच्या काळात एसटी बंद असल्याने राज्यातील लाखो प्रवाशांचे हाल होत होते. याचा फटका विशेषत: ग्रामीण भागात बसला होता. काही ठिकाणी संपाला हिंसक वळणही लागले होते. मात्र, एसटी प्रशासन शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या काळात एसटी प्रशासनाकडून वाहतुकीसाठी खासगी बसगाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र, त्यामुळे संप आणखीनच चिघळत गेला. त्यामुळे सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना टीकेलाही सामोरे जावे लागले होते.

ठाणे, कल्याण स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसे स्टाईल तोडफोड

गुरुवार, 19 अक्टूबर 2017

मोदी-शहांकडे 'लक्ष्मी' मागते पैसा : राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

 Subscribe Youtube
मुंबई : फेसबुक पेज सुरु केल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शब्दांनी नव्हे तर कुंचल्यांनी सरकारला फटकारणं सुरु केलं आहे. लक्ष्मीपूजनचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून मोदी सरकारवर टीका केली आहे.
या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागत असल्याचं रेखाटण्यात आलं आहे. हे व्यंगचित्र काढतानाचा राज ठाकरेंचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन करुन समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मीच मोदी आणि शाहांकडे ‘देश चालवायला मला थोडे पैसे देता का?,’ अशी विचारणा करताना दिसत आहे

Subscribe Youtube 

शनिवार, 14 अक्टूबर 2017

रस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे

मुंबई: शिवसेना-मनसे मध्ये पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना रस्त्यावर सहज फिरुन देऊ नका, असे आदेशच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
मनसेच्या फुटलेल्या सहा नगरसेकांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर धाव घेतली. राज ठाकरे यांनी स्वत: या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन या फुटीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण, त्यांची अवस्था शिवसेनेत वाईट होणार. घर का ना घाट का अशी अवस्था होईल. तुम्ही कामाला लागा, असे सांगत त्या पैकी एकालाही रस्त्यावर सहज फिरु देऊ नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.
मनसे स्थापन झाल्यावर दादर मध्येच शिवसेना आणि मनसे मध्ये पहिली दंगल झाली होती. त्यात अनेक जण जखमीही झाले होते. त्यानंतर लहान मोठे वाद होत होते. मात्र, या नगरसेवक फुटीनंतर हा संघर्ष रस्त्यावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरसेवकांना पोलिस संरक्षण
या फाटाफुटीमुळे होणाऱ्या संघर्षाचा धोका ओळखून सहाही नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटूबियांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समजते. तर, दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरुन जोरदार हल्ला चढवण्यास सुरवात केली आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहाही नगरसेवकांना फेसबुक मधून अनफ्रेंड केले आहे.
शिवसेनेच्या आमदार नगरसेवकांनाही नव्हती माहिती
नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अनेक जेष्ट नगरसेवकांसह आमदारांनाही नव्हती.शुक्रवारी दुपारी फुटीची चर्चा सुरु झाल्यावर शिवसेनेचे नगरसेवक आमदार मनसेच्या नेत्यांकडूनच माहिती कन्फर्म करत होते.
दुपार पर्यंत संपर्कात
वरळी येथील बंडखोर नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या शाखाअध्यक्षाला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला, ही माहिती काही मिनीटात कृष्णकुंजवर पोहचली. राज ठाकरे स्वत: बंडखोर दिलीप लांडे यांच्या संपर्कात होते. तसेच इतर नगरसेवकांनाही संपर्क साधला जात होता. डॉ.अर्चना भालेराव यांच्या पतीशी संपर्क साधला असता त्यांनी शिडीला जात असल्याचे सांगितले. परमेश्‍वर कदम यांनी बारामतीला असल्याचे सांगीतले. राज ठाकरे स्वत: लांडे यांच्याशी बोलत होते.10 मिनीटात पोहचतो. ट्राफिक मध्ये अडकलोय असा बहाना लांडे करत होते. अखेरीस त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरवणकर यांच्यासह वरळी येथे एका जुन्या गाडीतून जाताना पाहिले. त्यानंतर सर्वांचाच संपर्क तुटला.

Youtube channel ला subscribe करा https://www.youtube.com/channel/UC9ZbmEr8JZWsUDMczLNTzGg

मंगलवार, 10 अक्टूबर 2017

परप्रांतीय कामगारांना 'मनसे'ने दिला चोप

कुपवाड - स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत परप्रांतीय कामगार हटाओ मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश न आल्याने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना अडवून बेदम चोप दिला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकारानंतर मनसेचे कुपवाड शहर प्रमुख विनय देवगोंडा पाटील (वय २०, लिंगायत गल्ली) याच्यासह सागर लक्ष्मण मगदूम (वय २२) आणि अविनाश तुकाराम मासाळ (वय २३, दोघे बजरंगनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जितेंद्रकुमार रामेश्‍वर साह (वय २५, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी - औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांना अधिक नोकऱ्या दिल्याने स्थानिक युवक बेरोजगार आहेत. यासाठी परप्रांतीय हटाओ मोहीम मनसेने सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कुपवाड परिसरात आज आंदोलन करण्यात आले.
दरम्यान,  मंगळवारी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सुटी असल्याने परप्रांतीय कामगार मिळाले नाहीत. मुख्य रस्त्यावरून चालत जाणाऱ्या परप्रांतीय युवकांना मारहाण करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली. घाबरलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढला. त्यानंतर तातडीने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी शहराध्यक्ष पाटीलसह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
‘‘औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचा अध्यादेश २००८ मध्ये पारित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरवा केला. मात्र दखल न घेतल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे  इथून पुढेही परप्रांतीय हटाओ मोहीम सुरूच राहील.’’
- तानाजी सावंत, 

जिल्हाध्यक्ष, मनसे, सांगली
सोशल साईटवर बातमी व्हायरल
‘मनसे’ स्टाइल आंदोलनाचे वृत्त समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळी झालेल्या प्रकारानंतर हा प्रकार वाऱ्यासारखा सोशल साईटवर फिरला. मारहाण सुरू असताना कोणीतरी व्हिडीओ तयार करीत होते. ती व्हिडिओ क्‍लिपही व्हायरल झाली. या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. तीही व्हायरल झाली.
संतप्त प्रतिक्रिया
‘मनसे’ या पक्षाचा परप्रांतीयांना रोखणे, हा पक्षीय अजेंडा असू शकतो; मात्र भरचौकात युवकांना अडवून बेदम मारहाण करीत त्यांच्या गृहोपयोगी वस्तूंचीही नासधूस करण्यात आली. हे अमानवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

बुधवार, 4 अक्टूबर 2017

राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आज मनसेचा संताप मोर्चा; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि प्रशासनात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. आता काही झाले तरी मोर्चा निघणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा निर्धार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हा कुठला नियम म्हणायचा. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.




मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मनसेच्या या मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तांत्रिकरित्या तशी परवानगी देणे पोलिसांना आणि प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसली तरी त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच चर्चगेट स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मनसेकडूनही या भागात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मरिनलाईन्स स्थानकापासून रेल्वे मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मनसेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर चर्चगेट स्थानकाच्या परिसरात एक लहानसे व्यासपीठ उभारले जात असून या ठिकाणी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चर्चगेट स्थानकाचा परिसर बॅरिकेडस लावून बंदिस्त करण्यात आला आहे.



* मनसेच्या मोर्चाला रेल्वे प्रवासी संघटनांचा पाठिंबा
* मोर्चाला परवानगी नाकारणे हा तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- संदीप देशपांडे
* लोकशाहीत मोर्चाला परवानगी देणार नाही, हा कुठला नियम- संदीप देशपांडे
* ब्रिटीशही मोर्चांना परवानगी देत होते, मात्र हे सरकार परवानगी देत नाही,
* आमची तयारी पूर्ण; मोर्चा निघणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ- संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस
* मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन

रविवार, 1 अक्टूबर 2017

‘माझे असत्याचे प्रयोग’; राज ठाकरेंचं मोदींवर पुन्हा टीकास्त्र

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रातूनही राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, अशी टीका राज ठाकरे यांनी शनिवारी केली होती. त्या टीकेला धरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत मोदींना पुन्हा लक्ष्य केले. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्राला ‘एकाच मातीतील दोघे,’ असे शीर्षक दिले आहे.
राज ठाकरेंनी गांधी जयंतीनिमित्त रेखाटलेल्या छायाचित्रात महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हातातही राज ठाकरेंनी एक पुस्तक दिले आहे. राज ठाकरेंनी या पुस्तकाला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही,’ अशी टीका राज यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हातात राज यांनी ‘माझे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले आहे. मोदी खोटे बोलतात. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिल्यास त्याचे नाव ‘माझे असत्याचे प्रयोग’ असेल, असे राज यांना सुचवायचे आहे.
पंतप्रधान मोदींवरील व्यंगचित्राला राज ठाकरेंनी ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक दिले आहे. महात्मा गांधी आणि मोदी हे एकाच मातीतील, म्हणजेच गुजरातमधील आहेत. मात्र या दोघांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. महात्मा गांधी कायम खरे बोलायचे. त्यामुळेच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधींच्याच मातीमधील, म्हणजेच गुजरातमधील मोदींनी त्यांचे आत्मचरित्र लिहिल्यास त्याला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव द्यावे लागेल, असे राज यांनी व्यंगचित्रातून सुचवले आहे.


शनिवार, 30 सितंबर 2017

मुंबईत बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही : राज ठाकरे Full Video

मुंबई : 'जगायचं कसं हा प्रश्‍न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले.. देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला. असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय. मेट्रोमुळे मुंबईची आणखी वाट लागली आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. बुलेट ट्रेन हवीच असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्येच ती फिरवावी.. यासंदर्भात जबदरस्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सरकारला इशारा दिला.
मुंबईत एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासनाची ढिलाई याविरोधात येत्या 5 ऑक्‍टोबर रोजी मनसे चर्चगेटला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. 'या मोर्चात सर्व मुंबईकर आणि ठाणेकरांनी सहभागी व्हावे. या मोर्चांचे परिणाम होत असतात. हा गर्दीचा विषय नाही; राग व्यक्त करण्याचा आहे', असे आवाहन राज यांनी केले.

राज ठाकरे म्हणाले.. 
  • काल घटनास्थळी मुद्दाम गेलो नाही. कारण तिथे जाऊन आपल्या यंत्रणेवर ताण देण्याची इच्छा नव्हती. पोलिस, फायरब्रिगेड, डॉक्‍टर त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. पण तिथे मीडिया असते म्हणून सगळे पुढारी, मंत्री घटनास्थळी जातात. मदतकार्य सुरू असताना चिंतेचा आव आणून तिथे जाण्यात उपयोग नसतो. 
  • गेली दहा-पंधरा वर्षे याच एका एल्फिन्स्टन पुलाबद्दल भांडत आहेत; पण काहीही झालं नाही. 
  • आपल्या शहरांमध्ये इतक्‍या सरकारी संस्था काम करतात आणि सगळ्या संस्था आपापली जबाबदारी झटकत आहेत. कुणीही उत्तर द्यायला तयार नाही. 
  • कसलं 'मुंबई स्पिरीट'? रोज सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं.. त्याला पर्याय नाही. 
  • शहरांवर बाहेरचे लोंढे येऊन आदळणे थांबत नाहीत, तोपर्यंत अशा घटनांवर उपाय नाहीत. मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे आचके देत आहेत. इथे पायाभूत सुविधाच नाहीत. 
  • रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारण्यासाठी यंत्रणा नाही आणि आपण बुलेट ट्रेन आणायला चाललो आहोत. 
  • आपल्या देशात बाहेरचे दहशतवादी हवेच कशाला? आपणच आपली इतकी माणसे मारत असतो..

मंगलवार, 26 सितंबर 2017

सोशल मिडीयाच अस्त्र भाजपवर बुमरँग झालयं: राज ठाकरे

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर, नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत, असे राज यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज म्हणाले, ''तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय? फोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतां बद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार?''
स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार बाईंनी लिहिलेल्या I am a Troll पुस्तकांत भारतीय जनता पक्षाची आयटी आणि सोशल मीडिया टीम कसं काम करते याची पूर्ण माहिती आहे. या भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा. अजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो, आहे आणि राहणार. माझी पोलिस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

शनिवार, 23 सितंबर 2017

मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र; राज ठाकरेंच्या फटकाऱ्यांचा पहिला फटका


फेसबुक पेज लॉन्च करताना दाऊद आणि मोदी सरकार यांच्यात ‘सेटिंग’ असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता याच विषयावर व्यंगचित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. मात्र मोदी दाऊदला मीच पाकिस्तानातून फरफटत आणल्याचे सगळ्यांना सांगत आहेत. शनिवारी रात्री राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र फेसबुक पेजवर प्रसिद्ध करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
राज ठाकरेंनी व्यंगचित्रात भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा दाखवत त्याठिकाणी २०१९ या वर्षाचा उल्लेख केला आहे. ‘२०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी दाऊदला भारतात आणून मोदींकडून त्याचे भांडवल केले जाईल,’ असा आरोप राज ठाकरेंनी मागील आठवड्यात फेसबुक पेज लॉन्च करताना केला होता. याच आधारावर दाऊद पाकिस्तानातून भारतात येत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढले आहे. या व्यंगचित्रात दाऊद मोदींना फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. तर मीच दाऊदला भारतात फरफटत आणल्याचे मोदी इतरांना सांगत आहेत.
राज ठाकरेंनी शनिवारी रात्री त्यांच्या फेसबुक पेजवर दाऊद आणि मोदींचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. हे व्यंगचित्र आतापर्यंत ३३ हजार लोकांनी लाईक केले आहे. राज ठाकरेंनी या व्यंगचित्राला ‘तर्कचित्र’ असे नाव दिले आहे. या व्यंगचित्रावर आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या असून राज ठाकरेंच्या या फटकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन दिली, अशा प्रतिक्रिया अनेकांनी हे व्यंगचित्र पाहून दिल्या आहेत. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र २ हजाराहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

बुधवार, 20 सितंबर 2017

राज ठाकरे यांची ‘फेसबुक’वर धडाक्यात एन्ट्री; RajThackerayOnFB हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये

राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी राज ठाकरे यांची हीच व्यंगचित्रे आता फेसबुकवर पाहता येणार आहेत. त्यामुळे आता राज यांच्या ‘ठाकरी’ फटकाऱ्यांचा ‘फटका’ कोणाकोणाला बसणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून थेट तरुणांशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल तरुणांच्या मनात मोठी उत्सुकता असून मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आलेला टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे बहुचर्चित फेसबुक पेज गुरूवारी सुरू झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर राज यांच्या फेसबुक पेजची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली. रविंद्र नाट्यमंदिरातील एका कार्यक्रमात फेसबुक पेज लॉन्च करण्यात आले. राज यांची फेसबुकवरील एन्ट्री धडाक्यातच झाली आहे, असे म्हणावे लागेल. कारण, पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याला तब्बल साडेचार लाख लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय, ट्विटरवरही राज यांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो आहे. सध्या ट्विटरच्या भारतातील ट्रेंड लिस्टमध्ये RajThackerayOnFB हॅशटॅग चौथ्या स्थानावर आहे. 

गुरुवार, 14 सितंबर 2017

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र

मुंबई : गुरुग्राम येथील सात वर्षीय प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलच्या देशभरातील शाखा पालकांच्या निशाण्यावर आल्या. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनेकदा निष्काळजीपणा झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करु नये, असं आवाहन केलं आहे.
देशाचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचं लैंगिक शोषण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांमुळे मान शरमेने खाली गेली आहे. शिवाय या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरकार याबाबतीत गंभीर दिसत नाही, त्यामुळे मी स्वतः पत्र लिहून संवाद साधत आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
शैक्षणिक संस्थांचे सुरक्षिततेविषयीची कारणं वेगवेगळी असू शकतात. मात्र कोणतंही कारण न देता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण करावेत. यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील ती अग्रक्रमाने उचलावीत, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर मनसे सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल. मात्र तुम्ही जबाबदारीपासून पळ काढत आहात किंवा पालकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र नाहीत, असं आढळून आलं तर ते कदापि सहन केलं जाणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंचं शाळा-महाविद्यालयांना पत्र
 

मंगलवार, 12 सितंबर 2017

कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी


कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. नव्याने कोणतीही कामे करण्याची पालिकेची ऐपत नसल्याने पालिकेने आपल्या स्थितीची श्वेतपत्रिका काढावी अन्यथा नागरिकांबरोबर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे पत्र पालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी वेलारसू यांना पाठवले आहे.
पालिकेचा अर्थ संकल्प तयार करताना करण्यात येत असलेल्या चुकांमुळे आज स्पील ओव्हरचा आकडा वाढत आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींना कामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, या श्वेतपत्रिकेमुळे आर्थिक स्थिती नागरिकांनाही समजेल अशी अपेक्षा मंदार हळबे यांनी व्यक्त केली. प्रशासकीय यंत्रणा समय सूचकतेचा वापस न करता कामे करत आहेत. नविन अर्थसंकल्प तयार करताना कलम 102 नुसार सरत्या वर्षातील अखर्चिक रकमांना पुन्हा मंजुरी घेतली जात नसल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याच कारणाने प्रशासन सादर करत असलेला अर्थ संकल्प वस्तूस्थितीला ध्रुव नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य अशी अनेक कामे ठेकेदार सोडून देण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या ठेकेदारांना त्यांच्या कामाची देयके वेळेत मिळत नसल्याने ही परिस्थिती उदभवू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर अशी परिस्थिती आली तर पालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी अर्थ संकल्प फुगवला असे सांगत आता आरोप प्रत्यारोपांचा खेळ शासन प्रशासन करत असल्याचा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. प्रशासनाने श्वेतपत्रिका काढण्यास टाळाटाळ केली तर विरोधी पक्ष म्हणून आपल्याला नागरिकांबरोबर आंदोलनाचा पावित्रा स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंगलवार, 22 अगस्त 2017

राज ठाकरेंनी मुठा नदीपात्र विकसित करण्याची संकल्पना मांडली.

पुणे : लोकसभा, विधानसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेनं पराभवाची धूळ चाखल्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज पुण्यातील नदीपात्राच्या विकासाचा आराखडा सादर केला.
म्हात्रे पूल ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत मुठा नदीचं पात्र नाशिकच्या गोदापार्कच्या धर्तीवर विकसित करता येईल आणि त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभा करता येईल, असा विश्वास यावेळी राज ठाकरेंनी व्यक्त केला.
राज ठाकरेंच्या संकल्पनेनुसार सध्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची व्याप्ती वाढवून तीन वेगवेगळी थिएटर्स तयार करता येतील. मुख्य थिएटर हे खुल्या पद्धतीचे, एम्फी थिएटरच्या धर्तीवर तयार करता येईल, अशी संकल्पना राज ठाकरेंनी मांडली.
राज ठाकरेंनी मुठा नदीपात्र विकसित करण्याची संकल्पना मांडली असली, तरी पुण्यातील मेट्रोचा प्रस्तावित मार्ग हा याच नदीपात्रातून जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या संकल्पनेतील नदीपात्र प्रत्यक्षात कसं येणा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नदीपात्रालगतच्या विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना देखील दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनी या आराखड्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

सोमवार, 21 अगस्त 2017

तोंडी तलाकवर 6 महिने बंदी, कायदा बनवा; सर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निकाल

नवी दिल्ली : तोंडी तलाकविरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा एेतिहासिक निकाल आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले होते.
सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या याचिकवेर सलग सहा दिवस सुनावणी झाली होती. खंडपीठाने 18 मे रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. आज (मंगळवार) या तोंडी तलाकच्या मुद्द्यावर अंतिम निकाल देण्यात आला. येत्या सहा महिन्यांत संसदेत कायदा बनवावा. या काळात तोंडी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. नवा कायदा होईपर्यंत ही पद्धत कायम राहणार असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
बहुपत्नीत्वाबाबत न्यायालय काही भाष्य करणार नाही, केवळ तोंडी तलाक हा मुस्लिम धर्मीयांचा मूलभूत हक्क आहे की नाही यावर स्पष्टीकरण करेल, असे खंडपीठाने यापूर्वी सुनावणी वेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज हे आदेश दिले. या खंडपीठामध्ये न्या. कुरियन जोसेफ, आ. एफ. नरिमन, यू. यू. ललित, एस. अब्दुल नाझिर या अन्य न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश आहे. खंडपीठामध्ये शीख, ख्रिश्‍चन, हिंदू, मुस्लिम व पारशी धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याबाबत उल्लेख केला होता. तोंडी तलाकच्या प्रथेमुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल आणि ही पद्धत बंद करण्याची कार्यवाही लवकर करावी, यासाठी उत्तर प्रदेशमधील मुस्लिम समाजातील महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राख्या पाठविल्या होत्या. तोंडी तलाकच्या प्रश्‍नावर राजकारण करू नये, असे आवाहन मोदी मुस्लिम समाजातील नागरिकांना सातत्याने करीत आहेत. तोंडी तलाक ही सामाजिकदृष्ट्या वाईट पद्धत असून, समाजात जागरूकता निर्माण करून ही प्रथा नष्ट करावी, असे मोदी यांनी म्हटले होते. अनेक मुस्लिम महिलांनी या पद्धतीला आव्हान दिले होते.

राज ठाकरे आज पुण्यात.

पुणे - महापालिका निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात फारसे लक्ष घातले नव्हते; मात्र ठाकरे आता पुन्हा पुण्यात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. शहराच्या विकासातील विविध प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी ते मंगळवारी पुण्यात येणार आहेत.
शहरातील नियोजित प्रकल्पांची मांडणी, त्यांचा दर्जा आणि कालावधी याचे सादरीकरण ठाकरे स्वत: महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना करणार आहेत.
शहरातील निवडणुकांमध्ये मनसेची पीछेहाट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या पुढील काळात पक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ते पुण्यातील पक्ष संघटनेच्या कामासाठी अधिक वेळ देणार असल्याचे स्पष्ट झाले.

शनिवार, 19 अगस्त 2017

राज ठाकरे सभांपासून दूरच... मनसे घेणार "सोशल मीडिया'चा आधार

पुणे - राज्याच्या राजकारणात पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता "सोशल मीडिया'चा आधार घेण्याचे ठरविले आहे. नागरिक आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे "फेसबुक पेज' सुरू होणार असून, येत्या 27 सप्टेंबरला त्याचा "श्रीगणेशा' होणार आहे. सभा आणि कार्यक्रमांऐवजी "सोशल मीडिया'ला प्राधान्य देत राज सभांपासून लांब राहण्याची शक्‍यता आहे.
पक्षासह आपला संपर्क वाढविण्यासाठी ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. येत्या 21 सप्टेंबरला मुंबईत सभा घेणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील निवडणुकांमध्ये मनसेची जोरदार पीछेहाट झाल्यानंतर पक्ष संघटनेत मरगळ आली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून दोनपर्यंत घसरली. पक्षाच्या या स्थितीनंतर ठाकरे यांनी पुण्यात फारसे लक्ष घातले नव्हते; मात्र आता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा वाढविण्यासाठी ठाकरे गेले दोन दिवस पुण्यात होते. अशोकनगरमधील क्‍लब हाउसमध्ये ठाकरे यांनी शनिवारी शाखाध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्षांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. राज्यातील राजकीय स्थिती, तिचे परिणम या मुद्यांसह आपल्या पक्षाच्या वाटचालीबाबत ठाकरे यांनी चर्चा केली.
ते म्हणाले, ""सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्यास मदत होईल. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत होईल. राजकारणातील दिवस पुढे सरकत असतात. तसे ते होईल.''
प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
शहरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी राज ठाकरे यांनी शनिवारी शाखा अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्षांबरोबर संवाद साधला. दिवसभरात चार विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.

रविवार, 30 जुलाई 2017

राज ठाकरे यांचे बाबासाहेब पुरंदरेवरचे भाषण विडिओ




मुंबई : राजकारणात श्रीमंत झाले ते बाबासाहेबांवर बोटे उगारत आहेत. इतिहासाला जातीपातीची लेबले लावली जात आहेत. बाबासाहेबांना या वयातही राज्यात पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, की यापुढे बाबासाहेबांना पोलिस संरक्षणात फिरण्याची आवश्‍यकता नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 95 वा वाढदिवस सन्मान सोहळा रविवारी रात्री विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. या वेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. स्वरगंधार व जीवनगाणी यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतरत्न सचिन तेंडलकर यांच्या हस्ते बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब म्हणाले की, वडील हे माझे सर्वांत जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांवर फुंकर घालण्याचे काम केले. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय त्यांना देईन. आपल्या मुलांवर प्रेम करा. आपला वारसा त्यांच्याकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे. मला पुस्तक प्रकाशनासाठी मुंबईत येऊन कोथिंबीर विकावी लागली, याचे वाईट वाटते.

गुरुवार, 20 जुलाई 2017

कन्नडप्रेमी मनसे !

सध्या गटांगळ्या खात असलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला नवसंजिवणी देण्यासाठी राज ठाकरे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. मनसेचे बारसे घातल्यापासूनच राज यांनी खास आपल्या बेधडक शैलीत पक्षाची बांधणी केली. हा बेधडकपणा मराठी माणसांनीही डोक्यावर घेतला. त्यामुळे राजकीय डावपेच, नियोजन, पक्ष बांधणी अशा बाबींचा अभाव असतानाही पक्ष वाढला, फोफावला. सुरूवातीची सात - आठ वर्षे स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार सातव्या आस्मानावर होते. त्यामुळे त्यांच्या बेधडकपणाचा वारू महाराष्ट्राच्या मातीत चौखूर झेपा घेऊ लागला. पण बेधडकपणाला कुठे कसा वापरायचा हे राज यांना कधी कळलेच नाही.
त्यांच्या सभोवतीच्या चेल्यांपैकी काहींनी राज यांच्या समोर नंदीबैलासारख्या माना डोलावण्याचे काम तेवढे केले. काही चेल्यांना राज यांचा हा बेधडकपणा पटत नव्हता, पण त्यांच्या 'हिटलरी बाण्या'समोर ब्र काढण्याची बिशाद कुणाकडेच नव्हती. शेवटी 'अती केलं अन् हसू झालं' अशी गत राज व त्यांच्या मनसेची झाली. राज यांच्या अशा वागण्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
पण या लेखाची पार्श्वभूमी असलेल्या मुद्द्यावरच आपण चर्चा करूयात. पाचेक वर्षांपूर्वी राज यांनी एक जाहीर वक्तव्य केले होते. कोणत्याही संवेदनशील मराठी भाषकाच्या हृदयावर घाव घालणारे ते विधान होते. जवळपास 50 - 55 वर्षांपासून महाराष्ट्रात सामाविष्ट होऊ पाहणा-या सीमा भागातील विशेषत: बेळगावमधील मराठी भाषकांच्या भावनांवर उकळलेले तेल ओतणारे ते विधान होते. 'सीमाभागातील मराठी जनतेने आता महाराष्ट्रात येण्याच्या फंदात पडू नका. जिथे आहात, तिथेच गुण्या गोविंदाने राहा,' असे ते विधान होते. राज यांच्या बेधडक शैलीचाच हा अविष्कार होता. त्यावेळी मनसे ऐन फॅार्मात होती. मराठी तरूणांनी मनसेला डोक्यावर घेतलेले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानाने सीमाभागातील मराठी बांधवांना काय वाटेल याची त्यांनी पर्वाही केली नव्हती.  महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी त्यांचे हे विधान अचंबित करणारे होते.
खरेतर, मराठी व महाराष्ट्राचा कैवार घेवून स्थापन झालेल्या मनसेच्या धोरणांत सीमाभागातील मराठी बांधव हे महत्त्वाच्या अजेंड्यावर असतील, अशी ठाम समजूत भाबड्या मराठी जनतेची होती. मनसेच्या स्थापनेनंतर बेळगाव व सीमाभागातील जनतेमध्ये राज हे हिरो झाले होते. सीमाभागात मनसेच्या शाखा मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या होत्या. शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यापेक्षाही मनसेचा झंझावात सीमाभागात वाढू लागला होता. अशा परिस्थितीत राज यांनी सीमा भागातील मराठी जनतेच्या विरोधात वक्तव्य केले. या वक्तव्याने सीमाभागातील मनसे पक्ष एका रात्रीत हद्दपार झाला. मनसेचे झेंडे, शाखा बंद झाल्या. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले.
परंतु सीमाभागातील या नाराजीची राज यांना कसलीही फिकीर वाटली नाही. कारण त्यांना महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचे जेवढे कार्यक्षेत्र आहे, तेवढ्याच मराठी (मतदारांची) गरज होती. थोडक्यात, त्यांना राजकीय स्वार्थापुरताच महाराष्ट्र व मराठी माणूस हवा होता. साहजिकच त्यांच्या स्वभावानुसार सीमाभागातील जनतेला काय वाटले याची पर्वा त्यांनी केली नाही.
त्या वक्तव्यामुळे सीमाभागात मनसेचे भलेही नुकसान झाले असेल. पण महाराष्ट्रात मात्र त्याचा राजकीय फटका त्यावेळी राज यांना बसला नाही. पण कालांतराने आंदोलनातील धरसोड, टोलच्या आंदोलनात त्यांनी 'सेंटिंग' केल्याची तयार झालेली जनभावना अशा अनेक कारणांनी मराठी जनता राज व त्यांच्या मनसेपासून दुरावली. हे हळूहळू घडत गेले.
त्यात सीमा भागातील मराठी बांधवांविषयी त्यांनी केलेले असंवेदनशील वक्तव्य सुद्धा थोडेफार का होईना कारणीभूत आहे, असे मानण्यास वाव आहे.
राज यांच्या या बेधडकपणाला मराठी जनतेने विधानसभा व त्यानंतर महानगरपालिका (विशेषतः नाशिक महानगरपालिका) निवडणुकीत जागा दाखवून दिली. स्वप्नातही कुणाला वाटले नसेल इतका केविलवाणा पराभव पक्षाच्या नशिबी आला. राज ठाकरे ज्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत तुच्छतेने हेटाळणीवजा जाहिर पाणउतारा करायचे, त्या रिपब्लीकन पक्षापेक्षाही दुबळी अवस्था मनसेची झाली.
मनसे पुन्हा जोमाने उभा राहू शकतो. भविष्यात शिवसेना, भाजपएवढाही मोठा होऊ शकतो, असा आत्मविश्वास अजूनही राज ठाकरे यांना वाटत असेल, तर त्यात चूक काही नाही. किंबहूना त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेतली तर कोणत्याही मराठी माणसाला कौतुकच वाटेल. पण झालेल्या चुका परत व्हायला नकोत, एवढी साधी समज सुद्धा राज यांच्याकडे नाही की काय अशी शंका वाटू लागली आहे. कारण सीमा भागातील मराठी जनतेविषय़ी पाच - सहा वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या बेधडक वक्तव्यापासून आजही काही बोध घेतलेला दिसत नाही. अन्यथा त्यांनी आपला चेला संदिप देशपांडे यांना 'कन्नड रक्षक वेदिके' या संघटनेच्या व्यासपीठावर जाहीर भाषण करण्यासाठी पाठविले नसते.
हा कार्यक्रम हिंदी भाषेच्या विरोधी होता. पण बेळगावात मराठी भाषेवर, मराठी माणसांवर ज्यांच्याकडून अत्याचार होत आहेत, त्यात ही 'कन्नड रक्षक वेदिके' ही संघटना आघाडीवर आहे. कर्नाटक सरकार जेवढे आक्रमक नाही, त्यापेक्षा जास्त ही संघटना मराठीद्वेष्टी आहे. काही वर्षांपूर्वी बेळगाव महाराष्ट्रात सामाविष्ट करण्याचा अत्यंत धाडसी ठराव बेळगाव महानगरपालिकेने केला होता. विजय मोरे हे त्यावेळी महानगरपालिकेचे महापौर होते. लोकशाही मार्गाने महानगरपालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे या लोकभावनेचा कुणीही आदरच करायला हवा. पण बंगळुरू येथे गेलेल्या विजय मोरे यांना तेथील विधानभवन परिसरातच या 'कन्नड रक्षक वेदिके'च्या गुंडांनी प्रचंड मारहाण केली होती. त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. अंगावरील कपडे फाडले होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोरे त्या हल्ल्यातून वाचले. मोरे यांच्या जिवावर बेतलेल्या या हल्ल्यामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. महाराष्ट्रातील विधीमंडळांच्या दोन्ही सभागृहांमध्ये या घटनेचा जाहीर निषेध केला होता. आझाद मैदानात धरणे आंदोलन झाले होते. राज्यभरातही मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. विजय मोरे व बेळगावांतील मराठी बांधवांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी आहे. मोरे यांच्यावरील हा हल्ला आम्ही कदापी विसरणार नाही, अशा गर्जना त्यावेळी अनेक राजकीय व सामाजिक चळवळीतील नेत्यांनी केल्या होत्या.
एखाद्या दहशतवादी संघटनेपेक्षाही कमी वाटणार नाही, इतका राग मराठी माणसांचा या 'कन्नड रक्षक वेदिके'वर आहे. अशा या मराठीद्वेष्ट्या संघटनेच्या मांडीला मांडी लावून मनसेचा एक पदाधिकारी बसतो, हे तमाम मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. राज व त्यांच्या मनसेचे राजकीय डावपेच नक्की काय आहेत, हे तेच जाणो. पण सीमाभागातील व महाराष्ट्रातील जनतेला हा असला बेधडकपणा आजिबात आवडणार नाही. त्यातून मनसेचा पाय आणखी खोलात गेला तरी नवल वाटायला नको.

शुक्रवार, 14 जुलाई 2017

'आसाम बचाओ'साठी राज ठाकरेंना साकडे

स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई - आसाममधील स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज येथे भेट घेतली. या भेटीत आसामी भाषा, आसामी संस्कृतीची सुरू असलेली गळचेपी, शेजारच्या प्रदेशातून होणारी घुसखोरी आणि या परप्रांतीयांनी उद्योगधंद्यांवर केलेला कब्जा, याविषयी राज यांना शिष्टमंडळाने माहिती दिली. तसेच सप्टेंबरमध्ये आसामला भेट देऊन "आसाम बचाओ' आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती या भेटीदरम्यान केली.
भाषिक अस्मिता आणि स्थानिकांचा रोजगारांवरील हक्क यावर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक राज्यांत संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगारावरील मराठी माणसाच्या हक्कांसाठी राज ठाकरे हे सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याविषयी इतर राज्यांत भाषिक अस्मितेसाठी सुरू असणाऱ्या चळवळींच्या नेतृत्वांना कुतूहल आहे. या प्रश्‍नाबाबत राज हेच नेतृत्व देऊ शकतात, याची त्यांना खात्री वाटत आहे. नुकतीच कन्नड रक्षण वेदिकेने केंद्र सरकारच्या हिंदी लादण्याच्या निर्णयाविरोधात होणाऱ्या चर्चासत्रात मनसेने सामील व्हावे आणि राज यांनी या चळवळीचे देशव्यापी नेतृत्व करावे, अशी विनंती केली आहे.
मराठी अस्मितेसाठी लढा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी देशभरात कुतूहल आहे. शुक्रवारी आसामी महिलांनी राज यांना राखी बांधून बहिणीच्या हक्काने आसामी भाषेचे रक्षण आणि स्थानिक आसामींच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या "आसाम बचाओ' या आंदोलनाला पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

रविवार, 9 जुलाई 2017

राज ठाकरेंचे नवे मोहरे 'मनसे'ला नवसंजीवनी देतील?

लोकसभा, विधानसभापाठोपाठ महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आता पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. हे करीत असताना पक्षस्थापनेपासून नेतेपदावर असलेल्यांना बाजूला सारले आहे. पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठीच राज यांनी हा कटू परंतु आवश्‍यक असा निर्णय घेतला आहे. पक्षाला नवसंजीनवनी देण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. अर्थात या निर्णयाचे परिणाम कळण्यासाठी काही काळ जावून द्यावा लागणार आहे. 
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना केलेल्या राज यांना सुरवातीला प्रशंसनीय असे यस मिळाले. महापालिकाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पक्षाने चांगले यश मिळविले. पहिल्याच निवडणुकीत मनसेचे बारा शिलेदार विधानसभेवर निवडून गेले. सन 20012 च्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत तर सत्ता मिळाली. पुणे, मुंबई महापालिकांमध्ये लक्षणीय असे संख्याबळ प्राप्त केले. त्यानंतर पक्षाचा वारू दौडू लागला. जनतेच्या अपेक्षा वाढल्या. परंतु, विधानसभेत तसेच महापालिकांमध्ये मनसेचे लोकप्रतिनिधी फारशी छाप पाडू शकले नाहीत. पक्षात मोठी गटबाजी निर्माण झाली. मराठी माणसाच्या हितासाठी सुरु झालेल्या या पक्षाला मराठी माणसाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत.
पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रमही दिर्घकालिन नसल्याचा परिणाम पुढील काळात पक्षाच्या वाटचालीवर झाला. परंतु, राज याच्या करिश्‍म्यामुळे पक्ष तग धरू शकला. सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेने टोलचा मुद्या उचलला. मात्र, त्यानंतर पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परीणाम झाला. टोलचा झोल करता करता पक्षाचाच तोल कधी गेला हे कळाले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक प्रसिध्दी खरेतर राज यांनीच केली असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात तर भाजपचे लोकही मोदी यांचे नाव घेत नसताना राज राज्यव्यापी दौऱ्यामध्ये मोदी स्तुती गात होते. मात्र, याच मोदी लाटेमुळे मनसेची पिछेहाट होणार आहे हे त्यावेळी राज यांच्या लक्षात देखील आले नसेल.
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदी यांना आमचे विजयी उमेदवार पाठिंबा देतील अशी भूमिका घेतली. मात्र, लोकसभेला आलेल्या मोदी लाटेत मनसेच काय कॉग्रेस आणि राष्ट्रवादीही तग धरू शकली नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा अवघा एक उमेदवार निवडून आला. त्यानंतर पक्षाला गळती सुरू झाली. पक्ष संघटना विस्कळीत झाली. ज्या नाशिकचा कायापालट करण्यासाठी आटापिटा केला त्या नाशिकमध्येही मनसेला पराभव पत्कारवा लागला. पक्षातील तथाकथित नेत्यांविरोधात कार्यकर्ते बोलू लागले. परंतु, त्यांना बाजूला करण्यात आले नाही. उशिरा का होईना आता राज यांनी पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी तरुणांना जबाबदारीची पदे दिली आहेत. हे करताना त्यांनी पक्षातील जुन्या नेत्यांना बाजूला करण्याची हिंमत दाखविली आहे. हे नवे शिलेदार आता मनसेला पुन्हा चांगले दिवस दाखवितात का हे आगामी काळात दिसणार आहे. एक मात्र खरे की राज यांनी पक्षबांधणीचा विषय गांभीर्याने घेतला आहे..

सोमवार, 12 जून 2017

सरकारच्या निर्णयाचे स्वागत - राज ठाकरे


मुंबई - सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरीही कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
आम्हाला "कर्जमाफी' हा शब्द मान्य नाही; मात्र शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित आहे, असे ठाकरे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा. यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या निर्णयाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. जिथे जिथे अन्याय होताना दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतील, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शुक्रवार, 2 जून 2017

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक


मुंबई:  राज्यातील शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला.
अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, ही समिती 31 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहेत.
तसंच दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किंमतीबाबत 20 जूनपर्यंत  निर्णय होईल.
आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सरकार आर्थिक मदत करणार.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकरी संप आणि शेतकरी मागण्यांवर सुमारे चार तास चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीवर कार्यवाही केली जाईल.या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल “.
याशिवाय शेतकऱ्यांना  हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. त्यासाठी पावसाळी अधिवेशनात कायदा करण्यात येईल. शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी राज्य कृषिमूल्य आयोग स्थापन करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
  • हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे.
  • राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.
  • दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार
  • वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार
  • थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय
  • शीतगृह साखळी निर्माण करणार
  • नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार
  • शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे
मुंबई : शेतकऱ्यांचा राग समजू शकतो. जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये. त्या संपातही मालकांना त्रास झाला नाही, कामगारांना झाला, तसं शेतकऱ्यांसोबत होऊ नये, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाविषयी मनसेची भूमिका मांडली. शेतकरी संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारकडे पैसे नाहीत, आता म्हणतात कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
”शेतकरी आंदोलनाचा आणि पक्षाचा काय संबंध?”
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाशी जोडून मोकळं होऊ नका, ते मांडतात तो विषय योग्य की अयोग्य एवढं फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शेतकरी संपात काही पक्षांचा सहभाग असून ते हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
शेतकरी संपात पक्षाचा सहभाग असला तरी त्यांचा प्रश्न योग्य की अयोग्य ते ठरवून त्यावर निर्णय घ्या. आपल्याकडे फक्त प्रश्न तयार होतात. त्याचं उत्तर मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्याचं पुढे काय झालं? असंही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
  • जवान आणि किसान दोघेही मरतायेत, भाजपवाले मात्र खुशाल – राज ठाकरे
  • योजनांना गोंडस नावं देऊन सरकार भुलवतंय – राज ठाकरे
  • निवडणुकीआधी घोषणा, सत्तेत आल्यानंतर घोषणा, पैसे आहेत का यांच्याकडे? – राज ठाकरे
  • अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर करावं, पण प्रश्न सोडवावा, ते महत्त्वाचं आहे – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा, शेतकऱ्यांसोबत कायमच आहे – राज ठाकरे
  • मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाचं लेबल का लावताय? – राज ठाकरे
  • सरकारकडून शेतकरी आणि जनतेची फसवणूक – राज ठाकरे
  • हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे – राज ठाकरे
  • सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये – राज ठाकरे

गुरुवार, 18 मई 2017

...तर मनसे सुरक्षा देईल

मुंबई- डोंबिवलीत निर्माण झालेल्या फेरीवाल्यांच्या समस्येवर शिवसेना आक्रमक झाल्यानंतर मनसेनेही मुंबईत हा मुद्दा उचलून धरला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मनसेच्या माजी नगरसेवकांनी घेराव घालत ही कारवाई त्वरित आणि कडक करावी अशी मागणी केली आहे. परंतु जर पोलीस संरक्षणाच्या नावाखाली ही कारवाई करता येत नसेल तर, मनसैनिक महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहील, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मनसे घेईल, असा शब्द माजी नगरसेवकांनी दिला आहे.
दादर-माहीममधील नागरिकांना होत असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा त्रास लक्षात घेत मनसेच्या माजी नगरसेवकांनी महापालिका उपायुक्त आनंद वाग्राळकर यांना गुरुवारी सकाळी घेराव घातला. एफ दक्षिण विभागाच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. आनंद वाग्राळकर हे कधीही सामान्य नागरिकांना भेटत नाहीत. तसेच या विभागातील फेरीवाल्यांवरही ते कडक कारवाई करत नाहीत, असा आरोप करत उपयुक्तांना धडा शिकवण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, सुधीर जाधव आणि विरेंद्र तांडेल यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आनंद वाग्राळकर यांना भेटण्यास गेले होते. यावेळी त्यांनी आनंद वाग्राळकर यांना घेराव घातला. वाग्राळकर यांनी आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात धडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मनसेच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले.
मात्र ही कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा या माजी नगरसेवकांनी दिला. महापालिकेकडे अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा यंत्रणा नसल्यास मनसेच्या वतीने ती उपलब्ध करून देण्याची तयारीही धुरी यांनी दर्शवली.

बुधवार, 17 मई 2017

रामदेवबाबा राज ठाकरेंच्या भेटीला; अमितला योगाचे धडे

मुंबई - योगगुरू रामदेवबाबा यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी भेट वैयक्तिक असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी रामदेवबाबांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रामदेवबाबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.
पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना ते योगाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अमित ठाकरे हे आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे राज ठाकरे देखील पक्ष पातळीवर जास्त कार्यरत नव्हते. तसेच उपचारासाठी राज अमितला घेऊन परदेशी गेले होते.

सोमवार, 24 अप्रैल 2017

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच !

राजकारणात फार रोखठोक भूमिका घेऊन चालत नाही. थोडा थंडा करके खाओ ! असे बोलले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट आणि रोखठोक विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. 'पोटात एक आणि ओठात ऐक' हे त्यांना आयुष्यभर जमले नाही. जे नाही पटत ते बोलून मोकळे होत असत. परिणामाची चिंता ते कधी करीत बसले नाहीत. त्यांच्या ज्वलंत विचाराने राज्यात एक पिढी भारावून गेली. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार कदापि पुसले जाणार नाहीत. प्र. के. अत्रे काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, त्यांची या ना त्या कारणाने आठवण होत असते. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने अनेकांना घायाळ केले.
मराठी माणूस हा शिवसेनेचा आत्मा आहे हे बाळासाहेब अखेरपर्यंत सांगत राहिले. मराठी माणसाच्या मुद्यावर त्यांनी कदापी तडजोड केली नाही. हिंदुत्व वैगेरे नंतर आले. मराठी माणूस हीच शिवसेनेची ताकद होती आणि आज माहीत नाही. 
बाळासाहेबांच्या रोखठोकपणाची आज अचानक आठवण आली ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे. महापालिका निवडणुकीत मनसेने सपाटून मार खाल्यानंतर या पक्षाने मुंबईत चिंतन बैठक घेतली. या बैठकीत थोडी गरमागरम चर्चा झाल्याची वार्ता कानोकानी पसरली. पराजयाचे खापर नेत्यांनी राज यांच्यावर फोडल्याचे तर माझा विचार लोकांपर्यंत पोचविण्यात नेते अपुरे पडल्याचे राज यांचे म्हणणे होते. पराजयानंतर टीकेचे धनी प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला व्हावे लागते. त्यामध्ये तसे काही नवीन नाही.
राजकारणाच्या रणांगणात उतरल्यानंतर कोणी एक जिंकणार आणि कोणी तरी पराभूत होणार हे आलेच. पराभव झाला म्हणून कोणी संपत नाही. तो फिनिक्‍स पक्षाप्रमाणे उसळी घेऊ शकतो. आपण इंदिरा गांधीचे नेहमीच याबाबतीत उदाहरण देत असतो. आणीबाणीत धूळदाण उडूनही त्या पुन्हा सत्तेवर आल्या. या रणरागिनीच्या मनात जिद्द आणि पराजय पचविण्याची हिंमत होती. इंदिरा गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पराजय पचविण्याची हिम्मत प्रत्येक नेत्याने ठेवली पाहिजे. 
देशात आज मोदींची लाट आहे. या लाटेविरोधात दोन हात पुढे करण्याची हिंमतही विरोधकांनी दाखवायला हवी. नुसतीच टीका करण्यापेक्षा जो नेता रस्त्यावर उतरेल. जो लढेल तोच हिरो होईल. मोदींविरोधात वातावरण निर्मिती करण्याची तयारी ठेवा. मात्र त्यासाठी आपण आणि आपले चारित्र्य स्वच्छ असायला हवे. सरकारने तुम्हाला ईडीची भीती दाखवता कामा नये. 'कर नाही तर डर कशाला' असे म्हणणारे नेते हवेत. मला वाटते ती हिम्मत पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यात नक्कीच आहे. स्पष्ट आणि स्वच्छ विचार न डगमगता मांडायला हवेत. भाजप काय पुढील शंभरवर्षे सत्तेवर राहण्यासाठी जन्माला आला आहे का ? याचा विचार करायला हवा. 
अंतर्गत राजकारण काही असो. त्यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नेते नाराज आहेत. पक्षाचे काय करायचे आणि कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय तो पक्ष घेईल.
राजगडावरील बैठकीत राज ठाकरे यांना त्यांच्या नेत्यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वांनाच बरोबर घेण्याविषयी सांगितले. त्यावर राज यांनी मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. लोकांनी मला मते दिली नाहीत तरी चालेल असे स्पष्टपणे सांगितले ही स्वागतार्ह बाब आहे. शेवटी कुठेतरी पक्षाची ध्येयधोरणे असतातच ना! मराठीचा मुद्दा घेऊन जो पक्ष जन्माला आला त्या मुद्यालाच तिलांजली कशी देऊन चालेल! मताच्या लाचारीसाठी तडजोड करण्याचे कारणच काय हा प्रश्‍न उतरतोच. आज जागतिकीकरणात मराठीचा मुद्दा चालणार नाही असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती हिंदूत्वाकडे वळली. एकाचवेळी मराठी आणि हिंदूही अशी भूमिका घेऊन ती पुढे चालली आहे. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसं सोडली तर इतर प्रांतातील किती हिंदूंनी शिवसेनेला मते दिली हा ही संशोधनाचा भाग आहे. आज आपण काही म्हटले तरी अर्धीच मुंबई मराठी माणसाची आणि अर्धी परप्रांतीयांची आहे हे मान्य करावेच लागेल. मराठीचा मुद्दा सोडायचा नाही ही राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. मराठी माणसाला कोणी तरी वाली हवाच. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच अशी प्रत्येक मराठी माणसाची भूमिका असायला हवी. मग तो पक्ष मनसे असेल की शिवसेना?

शुक्रवार, 21 अप्रैल 2017

मनसेतील असंतोषाचा स्फोट?

मुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पडझड अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मनसेची धुळदाण उडाली. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी गुरुवारी (ता.20) झालेल्या बैठकीत राज यांच्याच कार्यद्धतीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याची चर्चा आहे. 
पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज घरातून बाहेर पडत नाहीत. पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसाठी सत्तेतील शिवसेनेने राज्य सरकारला घाम फोडला असताना मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात नेतृत्वाला अपयश आले, असे आरोप या नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज ट्‌विट केले असून त्यांना पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही राज यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धीबाबत नाराजी व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते. 
मध्यंतरी शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटचा विषय गाजला होता. त्यामागे राज यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीची पार्श्‍वभूमी असल्याचे समजते. पक्षासाठी आपण काम करणार नसाल तर मीही करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्‍त करून देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट रद्द केला होता. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी भाजपसह शिवसेनेतही चढाओढ सुरू होती. 
मनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.

तुम्ही माझी भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात कमी पडलात - राज ठाकरे

मुंबई - महापालिका निवडणुकींचा माहोल पार पाडल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पराभवाचे, चुकांचे चिंतन करण्यासाठी बैठक पार पडली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
मी मांडलेली भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यात तुम्ही कमी पडलात, असा ठपका राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे कळते, तर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविल्याचे कळते. राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज' या निवासस्थानी गुरुवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची बैठक बोलवण्यात आली होती. सुमारे दोन तास ही बैठक चालली. महापालिकेतल्या पराभवाबाबत नेते, सरचिटणीस यांनी पहिल्यांदाच राज यांच्यासमोर त्यांची परखड मते मांडल्याचे कळते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तुमच्याकडून पक्षाची भूमिकाच येत नाही, असे मत मांडल्याचे कळते.
त्यावर राज ठाकरे यांनी मी भूमिका मांडतो; पण तुम्हीच माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोचवायला कमी पडत आहात, असे सांगितल्याचे कळते. पक्षाच्या कार्यकर्त्यांची आता भावना आहे, आता आपण मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ केले पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी मी मराठीचा मुद्दा असा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नकोत, असे सांगितल्याचे कळते. निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरविताना राबवण्यात आलेल्या काही प्रक्रियांवरही नेत्यांनी आक्षेप नोंदवल्याचे कळते. दरम्यान, निवडणुकीतील पराभवाला पक्षात जबाबदार कोण याबाबत या बैठकीत काहीच स्पष्टता झाली नसल्याचे कळते. पक्षात आता अध्यक्ष, नेते, सरचिटणीस आणि कार्यकर्ते असे सरळ तीन गट पडल्याचेही बैठकीतून पुढे आले आहे.

गुरुवार, 9 मार्च 2017

Full Video - हा शेवटचा पराभव, कसं लढायचं शिकलो: राज ठाकरे

मुंबई: महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि कामं हरली. निवडणुका कशा लढायच्या या तुम्ही (जनतेने) मला शिकवलात. जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे केलं, ते-ते यापुढे मीही करणारआता झालं एवढं पुरे झालं, हा पराभव शेवटचा असेल, यापुढे पराभव दिसणार नाही, असा एल्गार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजिक मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
आता जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार, त्यांचे डाव मी खेळणार असा  इशारा राज ठाकरे यांनी दिला.
आजचं भाषण हे आजपर्यंतचं सर्वात लहान भाषण असेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.
पैसा जिंकला, काम हरलं
महापालिका निवडणूक निकालाबाबत माझी प्रतिक्रिया विचारण्यासाठी अनेक पत्रकार संपर्क साधत होते. मात्र काय बोलायचं असा प्रश्न पडला होता. कारण निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरलं, असाच होता, असं राज ठाकरे म्हणाले.
कामं करुन चूक केली
निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्ष कोणत्या थराला जाऊन भांडत होते सर्वांनी पाहिलं.  नाशिकमध्ये आम्ही विकासकामं केली, ती जनतेसमोर घेऊन गेलो. मात्र तरीही आमचा पराभव झाला. नी गुंडांना तिकीटं दिली, ते निवडून आले. भाजपकडे उमेदवार नव्हते, तरीही त्यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे कामं करुन चूक केली, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
कसं लढायचं तुम्ही शिकवला
ज्या नागरिकांनी मनसेला मतदान केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवलं. त्यामुळे यापुढे जिंकणाऱ्यांनी ज्या-ज्या गोष्टी केल्या, त्या-त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं, असा एल्गार राज ठाकरे यांनी केला.
यापुढे मी भेटायला येणार
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. हा आपला शेवटचा पराभव असेल. यापुढे पराभव दिसणार नाही. आपण जिंकायचंच. त्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
परिचारकसारख्या माणसांना चौकात चपलाने चोपायला हवं
जवानांच्या कुटुंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौकात चपलाने चोपलं पाहिजे, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
  • आता पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव, यापुढे पराभव दिसणार नाही : राज ठाकरे
  • आता जे जिंकले आहेत त्यांचे फासे मी घेणार : राज ठाकरे
  • जिंकणाऱ्यांनी ज्या-ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी यापुढे मीही करणार, तुम्ही मला कसं लढायचं हे शिकवलं – राज ठाकरे
  • आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत : राज ठाकरे
  • नाशिकमध्ये आम्ही कामं केली, ज्यांनी गुंडांना तिकीटं दिली, ते निवडून आले : राज ठाकरे
  • प्रशांत परिचारकसारख्या माणसांना चौका-चौकात चपलांनी चोपलं पाहिजे : राज ठाकरे
  • भाजपकडे उमेदवार नव्हते, तरीही त्यांचे उमेदवार निवडून आले : राज ठाकरे
  • मनसेच्या उमेदवारांना, मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची शिकवलं : राज ठाकरे
  • कामाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो हे दिसलं, काम उगीच केली असं वाटतंय : राज ठाकरे
  • निवडणुकीचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरलं – राज ठाकरे