शनिवार, 6 दिसंबर 2014

कॅमेऱ्याच्या क्‍लिकला क्षणभर राज यांचाही विसर!

नाशिक : धारदार आवाज, लक्षवेधी एन्ट्री आणि नेमक्‍या पोझमुळे कायमच छायाचित्रकारांना सभोवताली घिरट्या घालायला लावणारे राज यांच्या इमेजची कायमच 'कॅमेऱ्याची क्‍लिक'ला भुरळ राहिली आहे. पण आज एक क्षण असा आला, की एका क्‍लिकसाठी सतत राज यांच्या आवती-भोवतीच घुटमळणाऱ्या कॅमेऱ्यांच्या क्‍लिकलाही राज यांचाही विसर पडला. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द राज यांच्याच 'राजगडावर तो क्षण असा आला, की सगळे कॅमेरे अन्‌ फ्लॅश छायाचित्रकारांनी राज यांच्याकडे पाठ फिरवित एका दुसऱ्याच चेहेऱ्यावर स्थिरावले.आणि सगळे प्लॅश...त्याच्यावरच झळकत राहिले. शेवटी न राहून 'मिश्‍किलपणे' राज यांना स्वतःच आता थोडा वेळ आपण तिकडे थांबा असे सांगावे लागले. 'राज यांच्याकडेही काही क्षणासाठी पाठ फिरवायला लावून स्वताकडे आर्कषित करणारा हा चेहेरा होता, अमित राज ठाकरे...

ज्या नाशिकमध्ये 'दार उघड बये, दार' या अधिवेशनच्या निमित्ताने, राज्यातील सत्तेची कवाडे उघडली. शिवसेनाप्रमुखांच्या जाहीरसभांनी विक्रमी गर्दी केली. याशिवाय ठाकरे कुटुंबातीलच राज ठाकरे यांच्या पदरातही भरभरून देताना कुठली कसर ठेवली नाही. त्यामुळेच सवतासुभा उभा करतानाच, राज ठाकरे यांनाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पायाभरणीसाठी नाशिकच योग्य वाटले. त्यांच्या मनसेला येथील महापालिकेच्या सत्तेसह 3-3 आमदार दिले. अशा त्या नाशिक विषयी ठाकरे कुटुंबीयांच्या मनात कायमच वेगळी इमेज राहिली आहे. 'ठाकरे आणि नाशिक' हा धागा विविध संदर्भांनी अधोरेखित होतानाच, आज आणखी एक संदर्भ पुढे आला.

राज ठाकरे यांच्या कुटुंबातील पुढची पिढीही नाशिकमधूनच 'राजकीय बाळकडू' घेत असल्याचे आज प्रकर्षाने जाणवले. दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राज यांच्यासोबतच दौऱ्यात सहभागी झालेला त्यांचा मुलगा अमित याचा मनसेच्या वर्तुळातील वावर लक्षवेधी होता. राज यांच्या प्रमाणे थेट व्यासपीठावरून 'एन्ट्री' न करता, 'पक्ष, आधी कार्यकर्ते आणि संघटनेत विरघळण्याचा प्रयत्न करतानाच, राजकीय निरीक्षण व अभ्यास सुरू झाला आहे. अमित याचा मनसेतील हा अभ्यास दोन दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला.

शुक्रवार, 28 नवंबर 2014

...राज ठाकरे ऐकण्याच्या मूडमध्ये

नाशिक - महाराष्ट्राच्या आमूलाग्र बदलांपासून तर कार्यकर्त्यांच्या राहणीमानापर्यंत आणि संवाद साधताना तो कसा असावा, इथंपासून सतत काहीतरी सांगण्याच्या मूडमध्ये असणारे राज ठाकरे नाशिक दौऱ्यात मात्र फक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसले. निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर राज यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच त्यांचा आब..रुबाब कायम दिसला असला तरी, पूर्वी इतरांना सांगण्याच्या भूमिकेत दिसणारे "राज‘ आज मात्र इतरांचे ऐकण्यात जास्त रस घेऊ लागल्याचे जाणवले.

सतत काहीना काही सांगणारे राज आज दिवसभर फक्त ऐकतच होते. बर ऐकावे तरी किती, तर त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ते ऐकत होते. त्यामुळे सतत लोकांना सांगणारे ठाकरे आज ऐकण्याच्या मूडमध्ये पाहताना दस्तुरखुद्द मनसे समर्थक कार्यकर्त्यानाही नवखेच होते. काळाचा महिमा असेल कदाचित, पण आजच्या दिवसभराच्या दौऱ्यात इतरांना ऐकणारेच राज ठाकरे दिसले. पक्षात काय चालले हे ऐकून घ्यायला सुरवात केली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकही त्यांच्यापुढे मोकळा होऊ लागला आहे. राजसाहेबांना, भेटायचे म्हणजे आधी पक्षातील इतर साहेबांना भेटावे लागे. हे पक्षातील दुसरे साहेबच, मनसेतील दुखरी "नस‘ होती. आता ही नस सापडली म्हणूनही असेल, पण स्वतः राज यांनी नगरसेवकांच्या वैयक्तिक गाठीभेटीत  रस घेतला.

गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न
नाशिकची एकमेव महापालिका मनसेच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक 40 जागांवर मनसेचे नगरसेवक मतदारांनी निवडून दिले. नाशिक महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष होऊनही मनसेचे नगरसेवकही खूष नाहीत. लोकसभा निवडणुकीपासून उफाळून आलेल्या पक्षांर्तगत कुरबुरी शमलेल्या नाहीत. महापालिकेत महापालिका आयुक्तांशी ते आर्धा तास बोलले. चांगल्या शहराची कल्पना आकाराला यावी. अशी अपेक्षा त्यांनी आयुक्तांकडे मांडली. महापौर, स्थायी सभापती, महापालिका आयुक्तांसह नगरसेवकांना भेटून साधारण गेल्या तीन वर्षांपासून बिघडलेली महापालिकेची गाडी पूर्ववत रुळावर आणण्यासाठी राज यांचा दिवस खर्ची पडला.

बुधवार, 19 नवंबर 2014

कोण सत्ताधारी, कोण विरोधक कळत नाही: राज

पुणे : ‘शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही स्मृतिदिनाशी संबंधित होती, त्याचा राजकीय संबंध कोणी लावू नये,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आज शिवसेना- मनसे मनोमिलनाच्या बातम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘राजकीय चर्चा करावयाची असेल, तर अशा ठिकाणी होऊ शकते का? कार्यकर्त्यांच्या भावना चांगल्या आहेत; परंतु पटकन अशा गोष्टी घडतात असे नाही,‘ असेही ठाकरे या वेळी म्हणाले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सोमवारी एकत्रित भेट झाली. त्यावरून दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आज पुण्यात आल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘गेल्या स्मृतिदिनी मी गेलो नव्हतो. का गेलो नव्हतो, त्याच्या खोलात मी जात नाही. तेथे दर्शनासाठी गेलो असताना उद्धव ठाकरे होते. त्यांना मी भेटलो, त्यात काय गैर आहे? अशा वेळेसच आपण भेटतो. त्या भेटीचा काही अर्थ काढू नका. मध्यंतरी माझ्या मुलीचा अपघात झाला त्या वेळी उद्धव तिला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता, त्याचाही तुम्ही राजकीय अर्थ काढणार का? अशा वेळेस राजकीय चर्चा होऊ शकते का? आणि करायची असेल, तर अशाच ठिकाणी ती होऊ शकते का?‘‘ दोन भावांनी एकत्र यावे, या भावनांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘चांगल्या भावनांची कदर केली पाहिजे; परंतु अशा गोष्टी लगेच घडतात असे नाही.‘ 

विश्‍वासदर्शक ठरावावेळी सभागृहात जो प्रकार घडला, त्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे कळेनासे झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असा प्रकार घडला नाही. त्या दिवशी नेमके काय झाले हे कोणालाच कळले नाही. बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत होऊ शकत नाही. आवाजी मतदान ही कसली पद्धत आहे? पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग ठरावावेळी मत दाखविण्यास काय हरकत आहे? मतदान घेतले असते, तर अधिक स्पष्टता आली असती. कधी गुप्त मतदान तर कधी हात वर करून, त्यातूनच हे घोडेबाजार घडतात. त्याला प्रोत्साहन देणारेही हेच आहेत, त्यामुळे या सर्वांनी मिळून ठरवूनच हे केले आहे का, अशी शंका येते.‘‘ 
सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजप शिवसेनेला ताणत असल्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘भाजप त्यांचे राजकारण करणारच; परंतु किती ताणू द्यावयाचे हे शिवसेनेने ठरविले पाहिजे होते. त्यांनी पटकन निर्णय घेतला असता, तर ही वेळ आली नसती.‘‘ 

पक्ष संघटनेत बदल करणार 
प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. आज त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याबद्दल माहिती देताना ठाकरे म्हणाले, ‘‘संवाद साधण्याची कार्यकर्त्यांची मागणी होती. असे सर्वच मतदारसंघात आणि त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना मी लिहून घेत आहे. त्यानंतर संघटनेत बदल करणार आहे.‘‘

सोमवार, 17 नवंबर 2014

राज ठाकरे करणार 'मनसे'ची बांधणी


पुणे : कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याबरोबरच पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी जातीने पुढाकार घेतला. त्यासाठी येत्या ता. 18 पासून ते शहराच्या आठही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली. त्यातच गटबाजीला उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वतः राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरवात पुण्यापासून होणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यात एका दिवशी दोन मतदारसंघ असे आठही मतदारसंघातील गट अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून, या बैठकीत त्यांची बाजू ऐकून घेणार आहेत.

दरवेळेस पक्षाकडून पुण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात येते; परंतु नेमण्यात आलेल्या नेत्यांकडून शहर संघटनेत म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे राज यांनीच लक्ष घालण्याचे ठरविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. कसबा विधानसभा मतदारसंघापासून या भेटीला सुरवात होणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटीत साहेबांसमोर कार्यकर्ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

सोमवार, 3 नवंबर 2014

मनसे सरचिटणीसपदाचा वसंत गितेंचा राजीनामा

नाशिक - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सपाटून मार खालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा नाशिकमध्ये मनसे रुजवणारे माजी आमदार वसंत गिते यांनी दिला आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदाचीही राजीनामा सचिन ठाकरे यांनी दिला आहे. 

या दोघांनीही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव पदाला न्याय देणे शक्‍य होत नसल्याचे कारण देत पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्याची विनंती पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारपासून (ता. 5) नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी गिते हे पक्षातून बाहेर पडतील अशी अटकळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केल्याने या अटकळीवर पडदा पडला होता. तसेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून गिते यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र गिते यांना यशाने हुलकावणी दिली. शिवाय राज्यातही पक्षाला केवळ एका आमदारांवर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत गिते पक्षातून बाहेर पडण्याचा विचार तरी करत नाही ना? अशा शंकेची पाल नाशिककरांच्या मनात चुकचुकू लागली आहे. गिते आणि ठाकरे यांचा पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे अथवा नाही याबद्दलचे स्पष्टीकरण पक्षाकडून करण्यात आलेले नाही. मुलगी उर्वशीला अपघात झाल्याने राज्याचा राज यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे राज हे नियोजित दौऱ्यानुसार बुधवारी (ता. 5) नाशिकमध्ये मुक्कामी येतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
गितेंचे "टाईमिंग‘ चुकलेसध्यस्थितीत "पॉलिटिकल ऍक्‍टिव्हिटी‘ नसताना गिते यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याने त्यांचे "टाईमिंग‘ चुकल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. पण तरीही स्थानिक पक्षातंर्गत गटातटाच्या राजकारणात संघटनात्मकदृष्ट्या वरचष्मा राहावा म्हणून कदाचित गिते यांनी हे पाऊल उचलले असावे, असा तर्क राजकीय अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेतील 37 पैकी गिते यांना मानणाऱ्या 18 नगरसेवकांनी राजीनामा देण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. महापालिका कामकाजाच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार महापौर अशोक मुर्तडक यांच्याविरुद्ध अविश्‍वास येऊ शकत नाही आणि स्वतंत्र गट स्थापन होण्यासाठी पुरेशी नगरसेवक संख्या कितीपत जुळणार याबद्दल शंका आहे. म्हणूनच राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी निकालानंतर नाशिकमध्ये मी ठाण मांडून बसणार असेही राज यांनी नाशिककरांना अश्‍वस्त केले होते. नाशिककरांनी त्यावर विश्‍वास न ठेवता मनसेचे इंजिन तीनही विधानसभा मतदारसंघात नापसंत केले.

राज यांच्या मुलीला अपघात; उद्धव ठाकरे भेटीस

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हिला अपघात झाल्याने राज यांचा राज्यव्यापी दौरा लांबणीवर पडला आहे. उर्वशीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही पत्नीसह हिंदुजा रुग्णालयात गेले होते.  

विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबरपासून आपला राज्यव्यापी दौरा आयोजित केला होता. काल (ता.1 ) त्यांनी नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेट दिली. या संदर्भातील चौकशी करण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे मुंबईत परतले होते. मात्र, रविवारी रात्री उशिरा राज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला एस. व्ही. रोडवर अपघात झाला. उर्वशीला माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पायाचे हाड तुटले असून, चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

या घटनेमुळे राज यांचा पुढील दोन-तीन दिवसांचा दौरा लांबणीवर टाकला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर राज यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. आज (मंगळवार) ते कल्याण-डोंबिवली येथे जाणार होते.

रविवार, 2 नवंबर 2014

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - नगर जिल्ह्यातील जवखेडा (ता. पाथर्डी) येथील दलित हत्याकांडाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

जवखेडा गावामध्ये संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांची हत्या करण्यात आली होती. यांच्या नातेवाईकांची राज ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जवखेडा हत्याकाडांची वेगाने चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांना बळ आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही केले. 

या भेटीत राज ठाकरे यांनी ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये, तर अंतिम दर तीन हजार रुपये द्या, अशी मागणी केली. महाराष्ट्राला पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्याची मागणी करत पर्यटनाबाबत आम्ही प्रेझेंटेशन सादर करू, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नाशिक महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने अनेक कामे रखडली असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

शनिवार, 1 नवंबर 2014

मनसेच्या पराभवामागे मोठे कारस्थान- राज

राज ठाकरे; टोल वसुलीसाठी "कॅशलेस‘ व्यवहाराची मागणी कायम
नगर - ‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरी पडलेल्या अपयशाचा सध्या खोलात जाऊन विचार सुरू आहे. पराभवाचे बहुतांशी विश्‍लेषण झाले आहे. त्यात पक्षाचा, पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामागे मोठे कट-कारस्थान आहे. राज्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलू,‘‘ असे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की राज्यातील टोल बंदच करा, अशी आमची मागणी कधीच नव्हती. राज्यातील अनेक रस्त्यांची कामे "बीओटी‘ तत्त्वावर झाली. त्यांच्या पैशाच्या वसुलीसाठी टोल नाके सुरू करण्यात आले. करारानुसार वसुली झाली असेल, ते नाके बंद करावेत, ही आमची भूमिका होती.‘‘

रस्त्यांवरून जाणारी वाहने किती, त्यातून ठेकेदाराला किती पैसे मिळतात, याचा हिशेब होत नाही. या संदर्भात सरकारकडे निश्‍चित अशी आकडेवारी नाही. म्हणून कॅशलेस व्यवहाराची पद्धत सुरू करण्याची मागणी आम्ही केली, असे सांगून राज म्हणाले, ‘कॅशलेस व्यवहार झाला, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची, त्यापोटी वसूल झालेल्या कराची निश्‍चित आकडेवारी हातात मिळेल. त्यातून करवसुलीस किती दिवस परवानगी द्यायची, हे नक्की करता येईल, ही आमची भूमिका आजही कायम आहे. त्यासाठी जगातील कोणत्याही देशाची कार्यपद्धती राज्य सरकारने स्वीकारावी. ‘‘

फोनवरून दिल्या शुभेच्छा!
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू व चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या नवीन सरकारला फोनवरून शुभेच्छा दिल्याच आहेत, असे सांगून राज म्हणाले, ‘वीस मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहूनच शुभेच्छा देता येतात का? त्याचे राजकीय भांडवल करू नका. मी सरकारचे फोन करून अभिनंदन केले आहे.‘

मंगलवार, 28 अक्टूबर 2014

देवेंद्र फडणवीस असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब झाले. फडणवीस हे राज्यातील सर्वांत कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड व्हावी यासाठी मांडलेल्या प्रस्तावात एकनाथ खडसे हे सूचक तर सुधीर मुनगंटीवर व पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. फडणवीस हे राज्यपाल विद्यासागर राव यांची आज सांयकाळी सहा वाजता भेट घेऊन, सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार आहेत.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी आज मुंबईत दुपारी चार वाजता बैठक झाली. भाजपचे निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जे. पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रूडी आणि ओमप्रकाश माथूर आदी बैठकीला उपस्थित होते.

तत्पूर्वी, विधिमंडळ पक्षनेता आणि भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते. याबरोबरच एकनाथ खडसे, पंकजा मुंडे-पालवे यांचीही नावे चर्चेत होती. पण, फडणवीस यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात होते.

महाराष्ट्रात बहुमतासाठी भाजपला 23 जागांची गरज असून, पुन्हा शिवसेना व भाजप हे दोन्हीही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, सत्तेत वाटा मिळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या सूचनांवर सावध पवित्रा घेताना भाजपने "विनाशर्त पाठिंब्याची मागणी केली आहे. प्रसंगी अल्पमताचे सरकारही बनविले जाऊ शकते, असेही भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान अनुपस्थित राहण्याची हमी दिल्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यावा की जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सहकार्य घ्यावे, यावर भाजपने ‘थांबा आणि वाट पाहा‘चे धोरण स्वीकारले आहे. पक्षाचे केंद्रातील नेते उघडपणे यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना‘मधून पाठिंब्याबाबत स्पष्टपणे संकेत देण्यात आले आहेत.

रविवार, 19 अक्टूबर 2014

राज ठाकरेंना जनतेनं नाकारलं!


मनसेची सत्ता आल्यानंतर काम करू शकलो नाही तर 'राजकीय दुकान' बंद करेन, अशी कोटी करणाऱ्या राज ठाकरे यांना जनतेने नाकारले आहे. मनसेला सत्ता देण्याचे सोडाच; त्यांच्या दुकानाकडे मतदार फिरकलेच नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणाऱ्या मनसेची या निवडणुकीत अक्षरश: वाताहात झाली आहे. सव्वा दोनशेपेक्षा अधिक जागा लढविणाऱ्या मनसेला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही.

२००९च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर मनसेने पहिल्याच प्रयत्नात १३ जागा पटकावल्या होत्या, तर ५०हून अधिक जागांवर कडवी लढत देत दुसरा क्रमांक पटकावला होता. या निकालामुळे मनसे हा राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत राज ठाकरे यांनी घेतलेल्या अनाकलनीय भूमिका, लोकसभेत नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व नाशिक महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे मनसेचा प्रभाव पूर्णपणे ओसरला होता.

गेली सहा वर्षे रखडलेली ब्ल्यू प्रिंट निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करून राज ठाकरे यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेच्या आश्वासनांना वैतागलेल्या जनतेने ब्ल्यू प्रिंटकडे ढुंकूनही पाहिले नाही. निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांनीही मनसेला दोन अंकी संख्याही गाठता येणार नसल्याचे भाकीत वर्तवले होते. ते खरे ठरले. मुंबईतील मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे यांचा पराभव झाला. तर नाशिकमध्ये तिन्ही आमदार पडले. पुण्यातील जुन्नर येथे शरद सोनवणे यांच्या विजयामुळे मनसेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मराठी मतदार फिरला!

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे जिल्ह्यातून आठ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी मराठी मतदारांनी साथ दिली नाही. युती तुटल्याने मुंबई, ठाण्यात शिवसेनेने मराठीचा आणि अखंड महाराष्ट्राचा मुद्दा भाजपच्या विरोधात प्रभावीपणे वापरला. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळला. त्याचाही फटका मनसेला बसला.


शनिवार, 18 अक्टूबर 2014

बुधवार, 15 अक्टूबर 2014

गूगलवर राज, चौटाला लोकप्रिय

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी, १४ ऑक्टोबर रोजी गूगलवर महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि हरियाणासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये इंडियन नॅशनल लोकदलचे ओमप्रकाश चौटाला सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले.

गूगलवर १४ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणाव 'सर्चिंग' झाले. महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये राज नंतर उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, भाजपचे देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आर. आर. पाटील हे नेते लोकप्रिय ठरले.

सोमवार, 13 अक्टूबर 2014

'अच्छे दिन' आणण्याचे सोडून मोदी प्रचारात - राज

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे गुजरात प्रमे स्वाभाविक होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमिका बदलायला हवी होती. अच्छे दिन आणायचे सोडून मोदी राज्यात प्रचारात व्यस्त आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) केली.

मुंबईत वार्तालाप कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य करत काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबण्यास काही तास शिल्लक असताना राज यांनी वार्तालापाच्या माध्यमातून आपली मते व्यक्त केली.

राज म्हणाले, ‘‘मोदींच्या लोकसभेतील यशासाठी 25 टक्के मोदी, 25 टक्के माध्यमे आणि इतर घटक तर 50 टक्के वाटा हा काँग्रेसचा आहे. लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती, पण काही कारणास्तव लढवावी लागली. आमच्या विकास आराखड्याला महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पक्षांनी लोकसभेची निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असं माझं मत आहे. राज्यांना स्वायत्तता मिळायला हवी या बाबतीत मी आग्रही आहे. राज्यांना त्यांच्या विकासाचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळायलाच हवेत. सत्ता आल्यास राज्याचे नेतृत्व करण्यास तयार आहे.‘‘

गुरुवार, 9 अक्टूबर 2014

वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ - राज ठाकरे

मुंबई - वेळप्रसंगी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोणता पक्ष कुणासोबत आघाडी करेल, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुती तुटल्याच्या दिवशी राज ठाकरे आजारी असल्याने रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारणा केली होती. तब्येतीची विचारपूस केली त्यात गैर काय, अशा शब्दांत उद्धव यांनी त्यांच्यातील संभाषणाची कबुलीही दिली होती. तसेच उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी "कृष्णकुंज‘वर जाऊन राज यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राज आणि उद्धव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष केल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच राज यांनी वेळप्रसंगी आम्ही भाऊ एकत्र येऊ, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंगलवार, 7 अक्टूबर 2014

...मोदी देश कधी चालविणार ?

डोंबिवली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सगळीकडे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत, तर ते देश कधी चालविणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

येथील डीएनसी मैदानावर मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका येतील. त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचाही प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी फिरणार आहेत का ? कारण भाजपकडे महाराष्ट्रात एकही चेहरा असलेला नेता नाही. याचा दाखला देण्यासाठी ठाकरे यांनी मोदी यांच्याच विधानाचा आधार घेतला. त्यांनी सांगितले की, मुंडे असते, तर मला प्रचारासाठी येण्याची गरज भासली नसती. यावरून त्यांनी राज्यातील भाजप नेत्याची लायकीच काढली आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या, तरी मला काही फरक पडत नाही. भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार आयात केले आहेत. त्यांच्या नावाची जंत्रीच ठाकरे यांनी वाचून दाखविली. त्यामुळे मोदी हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या लोकांनी राज्याच्या विकासावर वरवंटा फिरविला. त्याच लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी मोदी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. हा भाजपचा प्रचार नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच प्रचार आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. राज यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांची नक्कल करून सभेत एकच हशा पिकविला. खडसे विधानसभेत सहा तास बोलतात. विधानसभा ही काय प्रवचन देण्याची जागा आहे का ? त्यांची जागा आस्था चॅनेलवर आहे, असा सल्लाही राज यांनी खडसे यांना दिला आहे.

सोमवार, 6 अक्टूबर 2014

नरेंद्र मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

"मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले आहेत, त्यांची मी जाहीर प्रशंसा यापूर्वी केली आहे. मात्र, ते अद्याप गुजरातमध्येच रमले आहेत. मला वाटले पंतप्रधान झाल्यावर ते बदलले असतील; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. या वेळी राज यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा तीव्र करीत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही हल्ला केला. 

मुंबईतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची घाटकोपर येथे सभा झाली, या वेळी ते बोलत होते. राज म्हणाले की, मोदींनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढली आहे. "मुंढे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती,‘ असे मोदी यांनी बीड येथील सभेत विधान केले होते. तो धागा पकडत राज म्हणाले, की स्वतःची ताकद नसतानाही स्वबळाच्या बेटक्‍या भाजप फुगवत आहे. भाजपला स्वतःचे उमेदवार नाहीत, सगळे बाहेरून आयात केलेले आहेत. 

या वेळी राज यांनी भाजपने कोणत्या पक्षांचे उमेदवार आयात केले याची यादी वाचून दाखवली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

बुधवार, 1 अक्टूबर 2014

रस्ते, पाणी, वीज हे विकासाचे त्रिशूळ : राज ठाकरे

वणी (जि. यवतमाळ) : "रस्ते, पाणी आणि वीज हे विकासाचे त्रिशूळ आहे. ही कामे केली तर विकास होतो. पण आजवर सत्तेत असलेल्यांना तेच जमले नाही. याकरिता आम्ही उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला काही करण्याची संधी द्या,‘‘ असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी राज ठाकरे आज वणीत आले होते. यावेळी शासकीय मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
ब्ल्यूप्रिंटविषयी माहिती देताना म्हणाले राज ठाकरे, "गेल्या 60 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रोजीरोटी व पाणी या मुख्य समस्या सुटल्या नाहीत. म्हणून माझ्यासारख्या चित्रकाराला राजकारणात उतरावे लागले. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा लढा आहे. आम्ही सत्तेत आलो; तर सर्वसाधारण माणसाच्या समस्या सोडविण्याकरिता कार्य करू.‘‘
ते म्हणाले, "सणावाराच्या काळात आमच्या परंपरांचा विचार न करता आमच्यावर निवडणूक लादली गेली. आम्ही किंवा कोणताही राजकीय पक्ष यावर काही बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीप्रश्‍न, बेरोजगारी आदी विषयांवर कोणताच राजकीय पक्ष बोलला नाही. केवळ युती व आघाडी टिकेल की नाही, याचीच चर्चा करीत होते. तुमच्या समस्यांशी यांना काही घेणे देणे नाही. यांनी दिलेले आमदार-खासदार आपल्या क्षेत्रात न राहता मुंबई-दिल्लीत राहतात. यांनाही नागरिकांच्या समस्यांशी काहीच आपुलकी नाही.‘‘

मंगलवार, 30 सितंबर 2014

विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाकडे दुर्लक्ष केले-राज

अमरावती- विदर्भातील नेत्यानींच विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जमिनींचा वाळवंट केला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केला.

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मनसेची दुसरी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘विदर्भाचा विकास न करण्यामागे येथील नेतेच जबाबदार आहेत. विदर्भात पर्यटनाला चांगला वाव आहे, मात्र दुर्दैवाने राज्यात पर्यटन खाते म्हणजे सर्वांत खालचे खाते समजले जाते. राजकीय नेत्यांनी कसदार जमिनींचे अक्षरशः वाळवंट केले आहे. महाराष्ट्रातील युवकांना मी रोजगार मिळवून देणार आहे. परप्रांतातील युवक महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवताना दिसतात. पण, स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. सरकार दुसऱ्याच्या मुलाला जवळ करत असून, आपल्या मुलाला मारतो आहे. पोलिस भरतीवेळी युवकांना जीव गमवावा लागला आहे, सरकारला याचे काहीही वाटत नाही. माझ्या हातात सरकार द्या सगळी परिस्थिती बदलून दाखवतो.‘

‘महाराष्ट्रामध्ये फक्त इच्छाशक्तीची कमतरता आहे. जनतेने सर्व राजकीय पक्षांना गाडून मनसेला संधी द्यावी. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्याविना मरताना दिसत आहे. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. गेल्या साठ वर्षात महिलांना शौचालय बांधून देऊ शकलो नाही हे मोठे दुर्दैवच आहे. मुख्यमंत्री कामच करत नाही, म्हणूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे,‘ असेही ठाकरे म्हणाले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. तामिळनाडूमधील नेते जयललिता यांच्या समर्थनार्थ येतात, पण आपल्याकडे तसे चित्र दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

सोमवार, 29 सितंबर 2014

भाजप बेभरवशाचा, तर शिवसेनेचा भंपकपणा -राज


मुंबई - भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवताच येणार नाही, त्यांचा काय भरवसा, असा सवाल करून दुसरीकडे शिवसेनेचा केवळ भंपकपणा सुरू असल्याची कडवट टीका राज ठाकरे यांनी केली. कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे आयोजित केलेल्या मनसेच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्याने मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ राज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आलेल्या शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस आघाडीच्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. भाजप नेते अतुल भातखळकर आणि नगरचे माजी आमदार सदाशिव लोखंडे मनसेत प्रवेश करण्यासाठी आले असता त्यांना प्रवेश न देता ही बाब नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणल्याचा गौप्यस्फोट राज यांनी केला. मी तुमच्याशी प्रामाणिकपणा दाखवला, तुम्ही मात्र माझा आमदार पळवता, असा सवाल करून भाजप नेत्यांवर विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली. युती- आघाडी तुटल्याच्या दिवशी भाजप नेत्यांना शरद पवार यांचा फोन गेला होता. तुम्ही युती तोडा, मी अर्ध्या तासात आघाडी मोडतो, असे पवार म्हणाल्याची माहिती असताना शिवसेना नेते भाजपशी चर्चा का करत होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर महिन्याभरापूर्वीच युतीला लाथ मारली असती. युती तोडता आणि केंद्रातील मंत्रिपद आणि मुंबई महापालिकेतील युती ठेवता, हा कसला भंपकपणा आणि ढोंगीपणा, असा सवाल करून राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ""भाजप हा पक्ष वाळवीसारखा कोपऱ्याकोपऱ्याने पोखरत असताना उद्धवना हे कळले कसे नाही, मी तिथे असतो तर भाजपवाल्यांना लाथ मारून हाकलले असते,‘‘ असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्तेवर आल्यास ब्लू प्रिंटमधील विकास करून दाखवणार, हे माझे वचन असल्याचे राज म्हणाले. सत्तेवर आल्याचा पहिला दिवस म्हणजे झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांनाही इशारा दिला. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्या वाढण्यास परप्रांतीय लोंढे आणि बिल्डर लॉबी जबाबदार असून, त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, सत्तेवर आल्यास बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रत्येकावर माझी करडी नजर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तर राज्य 15 वर्षे मागे जाईल

राज्यात सुरू असलेल्या नेत्यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""निवडणुका झाल्यावर विधानसभेत कुणालाच बहुमत न मिळाल्यास राज्य 15 वर्षे मागे जाईल, त्यामुळे या पक्षांना पर्याय म्हणून मी आणि मनसे तुमच्यासमोर ठामपणे उभा आहे. मला एक संधी देऊन बघा.‘‘

शुक्रवार, 26 सितंबर 2014

बाळा नांदगावकरांविनाच मनसेची दुसरी यादी जाहीर

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 71 उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर केली. विद्यमान आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचे नाव या यादीत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली असली तरी ते शनिवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 25) पक्षाच्या "ब्ल्यू प्रिंट‘चे सादरीकरण केले. या वेळी मनसेच्या 153 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. आणखी 71 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचे 224 उमेदवार असतील. दुसऱ्या यादीतही नांदगावकर यांचे नाव नाही. त्यांनी आपण निवडणूक लढवण्याऐवजी पक्षाच्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र यावर राज यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

उमेदवारांची यादी
अक्‍कलकुवा- ममता रवींद्र वळवी, शहादा- किसन पवार, साक्री- दीपक भारूडे, धुळे शहर- ऍड्‌. नितीन चौधरी, चोपडा- इक्‍बाल तडवी, जळगाव ग्रामीण- मुकुंद रोटे, जामनेर- विलास राजपूत, मुक्‍ताईनगर- राजेंद्र सांगळकर, बाळापूर- प्रशांत लोथे, अकोला पूर्व- विनोद प्रल्हाद राऊत, वाशिम- ज्ञानेश्‍वर नामदेव जाधव, अमरावती- अविनाश श्रीकृष्ण चौधरी, अचलपूर- प्रफुल्ल शिवराम पाटील, मोर्शी- संजीव देशमुख, सावनेर- प्रमोद ढोले, उमरेड- राजेश कांबळे, नागपूर पूर्व- कपिल आवारी, नागपूर उत्तर- रितेश मेश्राम, कामठी- विठ्ठल बावनकुळे, रामटेक- योगेश वाडीभस्मे, अर्जुनी मोरगाव- महिंद्र चंद्रिकापुरे, अहेरी- दिनेश मढावी, ब्रह्मपुरी- विश्‍वास देशमुख, यवतमाळ- भानुदास बापू राजने, हदगाव- सुरेश सारडा, नायगाव- रवींद्र भिलवंडे, मुखेड- ऍड्‌. यशवंत सुभेदार, परभणी- विनोद दुधगावकर, औरंगाबाद पश्‍चिम- गौतम अमराव, नांदगाव- जयवंत सानप, चांदवड- नवलकिशोर शिंदे, येवला- कल्याणराव पाटील, निफाड- सुभाष होळकर, दिंडोरी- सुधाकर राऊत, नाशिक पूर्व- रमेश शंकर धोंगडे, देवळाली- प्रताप महरोलीया, बोईसर- वसंत रावते, उल्हासनगर- सचिन कदम, कल्याण ग्रामीण- रमेश पाटील, कोपरी पाचपाखाडी- शेजल कदम, ठाणे- नीलेश चव्हाण, मुंब्रा कळवा- महेश मोतीराम साळवी, ऐरोली- गजानन खबाले, दहिसर- राजेश येरूणकर, मालाड- दीपक पवार, गोरेगाव- शरद सावंत, वर्सोवा- मनीष धुरी, शिवाजीनगर मानखुर्द- सोहेल अश्रफ, अणुशक्ती नगर- वीणा उकरंडे, वांद्रे पश्‍चिम- तुषार आफळे, धारावी- गणेश खाडे, कुलाबा- अरविंद गावडे, मावळ- मंगेश वाळुंज, भोसरी- सचिन चिखले, शिवाजी नगर- राजू पवार, कर्जत जामखेड- सचिन पोटरे, परळी- संजय आगाव, लातूर शहर- गणेश गवारे, माढा- दिनेश गिट्टे, सोलापूर शहर मध्य- सत्तार उस्मान सय्यद, सोलापूर दक्षिण- युवराज सुधाकर चुंभळकर, पंढरपूर- जयवंत मोहनराव माने, वाई- मयूर नळ, सातारा- राहुल पवार, चिपळूण- संतोष नलावडे, राधानगरी- डॉ. युवराज पांडुरंग पाटील, कागल- अजित सदाशिव मोडेकर, कोल्हापूर उत्तर- सुरेश साळोखे, शाहूवाडी- संजय श्‍यामराव पाटील, मिरज- नितीन सोनावणे, इस्लामपूर- उदय पाटील

गुरुवार, 25 सितंबर 2014

मनसेची 153 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आता अगदी दृष्टिपथात आली असतानाही राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेना या चार प्रमुख पक्षांमधील जागावाटपाचे गुऱ्हाळ अद्यापी संपलेले नाही. मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज (गुरुवार) विधानसभेसाठी आपल्या 153 उमेदवारांची यादी जाहीर करीत यासंदर्भात आघाडी घेतली.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज संध्याकाळी त्यांच्या बहुचर्चित विकासाच्या ब्ल्यू प्रिंटसंदर्भात बोलण्याचे अनुमान आहे. ब्ल्यू प्रिंटसंदर्भातील भाषणानंतर मनसे उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र त्याआधीच मनसेच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण, मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा राज्यातील सर्व भागांमधील मतदारसंघांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनसेच्या या पहिल्या पावलानंतर आता इतर पक्षांच्याही निर्णयप्रक्रियेस वेग येईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.
मनसेची उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे - 

उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार
नंदुरबार -गुलाबसिंग वसावे
नवापूर - महादेव वसावे
 
धुळे
धुळे ग्रामिण- अजय माळी
 
जळगाव
रावेर - जुगल पाटील
भुसावळ - रामदास सावकारे
जळगाव शहर - ललित कोल्हे
एरंडोल - नरेंद्र पाटील
चाळीसगाव - राकेश जाधव
पाचोरा - दिलीप पाटील
 
विदर्भ
 
बुलडाणा
बुलडाणा- संजय गायकवाड
चिखली - विनोद खरपास
सिंदखेड राजा - विनोद वाघ
जळगाव जामोद - गजानन वाघ
 
अकोला
रिसोड - राजू राजेपाटील
अकोट - प्रदीप गावंडे
अकोला पश्चिम - पंकज साबळे
मुर्तिजापूर - रामा उंबरकर

 
अमरावती
धामणगाव- ज्ञानेश्वर धानेपाटील
तिवसा - आकाश वराडे 
दर्यापूर - गोपाल चंदन
अचलपूर - प्रवीण तायडे
 
 
वर्धा
हिंगणघाट- अतुल वंदिले
वर्धा - अजय हेडाऊ
 
नागपूर
काटोल- दिलिप गायकवाड
हिंगणा -किशोर सराईकर
नागपूर मध्य - श्रावण खापेकर
नागपूर पश्चिम -प्रशांत पवार
 
भंडारा
तुमसर - विजय शहारे
भंडारा- मनोहर खरोले
 
गोंदिया
तिरोरा - दिलिप जयस्वाल
 
गडचिरोली
गडचिरोली -मिनाताई कोडाप
राजुरा - सुधाकर राठोड
 
जालना
परतूर - बाबासाहेब आकात
घनसावंगी - सुनील आर्दंड
जालना - रवी राऊत
बदनापूर - ज्ञानेश्वर गायकवाड
भोकरदन -दिलिप वाघ
 
औरंगाबाद
सिल्लोड - दिपाली काळे
कन्नड - सुभाष पाटील
फुलंब्री - भास्कर गाडेकर
औरंगाबाद मध्य - राज वानखेडे
औरंगाबाद पूर्व - सुमीत खांबेकर
पैठण - सुनील शिंदे
वैजापूर - कल्याण पाटील
 
नाशिक
मालेगाव बाह्य - संदीप पाटील
नाशिक मध्य - वसंत गिते
नाशिक पश्चिम - नितीन भोसले
 
 
ठाणे
डहाणू - विजय वडिया
विक्रमगड - भरत हजारे
नालासोपारा - विजय मांडवकर
भिवंडी ग्रामीण - दशरथ पाटील
शहापूर - ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण प. - प्रकाश भोईर
अंबरनाथ - विकास कांबळी
कल्याण पूर्व - नितीन निकम
ओवळा माजीवडा - सुधाकर चव्हाण
बेलापूर - गजानन काळे

 
मुंबई
 
बोरिवली - नयन कदम
मागाठणे - प्रविण दरेकर
मुलुंड - सत्यवान दळवी
विक्रोळी - मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम - शिशिर शिंदे
जोगेश्वरी पू- भालंचद्र अंबुरे
दिंडोशी - शालिनी ठाकरे

कांदिवली पू- अखिलेश चौबे
चारकोप - दीपक देसाई
अंधेरी पश्चिम - रईस लष्करीया
अंधेरी पू- संदीप दळवी
विलेपार्ले - सुहास शिंदे
चांदिवली - ईश्वर तायडे
घाटकोपर प.- दिलिप लांडे
घाटकोपर पूर्व-सतिश नारकर
कुर्ला - स्नेहल  जाधव
कलिना- चंद्रकांत मोरे
वांद्रे पू- शिल्पा सरपोतदार
शीव- कोळीवाडा - बाबा कदम
वडाळा - आनंद प्रभू
माहिम - नितीन सरदेसाई
वरळी - विजय कुरतडकर
भायखळा - संजय नाईक
मलबार हिल - अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेवी - इम्तियाज अमीन

 
कोकण
रत्नागिरी
दापोली - वैभव खेडेकर
 
सिंधुदुर्ग
सावंतवाडी - परशुराम उपरकर
 
रायगड
पनवेल - केसरी पाटील
कर्जत - जे पी पाटील
उरण - अतुल भगत
पेण - गोवर्धन पोलसानी
महाड - सुरेंद्र चव्हाण
 
प. महाराष्ट्र
पुणे
जुन्नर - शरद सोनावणे
खेड-आळंदी - समीर ठिगळे
शिरुर - संदीप भोंडवे
दौंड - राजाभाऊ तांबे
पुरंदर - बाबा जाधवराव
भोर - संतोष दसवडकर
चिंचवड - अनंत कोराळे
कोथरुड - किशोर शिंदे
खडकवासला - राजाभाऊ लायगुडे
 
कोल्हापूर
चंदगड - दिवाकर पाटील
करवीर - अमित पाटील
शिरोळ - विजय भोजे
 
सांगली
सांगली - स्वाती शिंदे
खानापूर - भक्तराज ठिगळे
तासगाव - सुधाकर खाडे
जत - भाऊसाहेब कोळेकर
 
सोलापूर
सोलापूर शहर (उ) - अनिल व्यास
अक्कलकोट - फारुख शाब्दी
माळशिरस - किरण साठे
करमाळा - जालिंदर जाधव
मोहोळ - दिपक गवळी
 
सातारा
कोरेगाव - युवराज पवार
माण - धैर्यशील पाटील
कराड (उ) - राजेंद्र केंजळ
कराड (द) - अॅड. विकास पवार
पाटण (द) -रविंद्र शेलार
 
मराठवाडा
लातूर
निलंगा  - अभय साळुंखे
औसा - बालाजी गिरे
 
उस्मानाबाद
उमरगा - विजय क्षीरसागर
तुळजापूर - अमर कदम
उस्मानाबाद - संजय यादव
परांडा - गणेश शेंडगे
 
नांदेड
किनवट - धनपाल पवार
भोकर - माधव जाधव
नांदेड (उ) - दिलीप ठाकूर
नांदेड (द) - प्रकाश मारावार
लोहा - रोहिदास चव्हाण
देगलूर - पार्वतीबाई सुर्यवंशी
 
हिंगोली
कळमनुरी - सुनील अडकिने
हिंगोली - ओमप्रकाश कोटकर
 
परभणी
जिंतूर - खंडेराव आघाव
गंगाखेड - बालाजी देसाई
पाथरी - हरिभाऊ लहाने

घटस्थापनेच्या दिवशी घटस्फोट झाले तरी आजचा माझा विषय हा राजकारणाचा नाही, विकासाचा आहे, राज ठाकरे यांचा युतीला टोला

सगळेच पक्ष सध्या आपापला विचार करताहेत, आपण तरी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करूया: राज ठाकरे
अनेकजण माझ्या ब्ल्यू प्रिंटची थट्टा करीत होते. त्यांना महाराष्ट्राविषयी देणं घेणंही नाही
ब्ल्यू प्रिंटविषयी अनेकजण विचारत होते की, कधी येणार कधी येणार.. वेळ बघावी लागते की नाही
वीज-पाणी-रस्त्याकडे यापलिकडे आपण कधी जाणार आहोत की नाही  


शनिवार, 6 सितंबर 2014

मनसेची ब्ल्यू प्रिंट 25 तारखेला : राज

मुंबई - राज्याच्या सर्वांगीण विकासाचे चित्र असा प्रचार केला जात असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची "ब्ल्यू प्रिंट‘ येत्या 25 तारखेला जाहीर होणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

राज्याच्या विकासाचा अंतर्भाव असलेली ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार म्हणून अनेक तारखा आणि मुहूर्त सांगितले जात होते. वारंवार या तारखा आणि मुहूर्त पुढे गेले आहेत. त्यामुळे मनसेची ब्ल्यू प्रिंट नेमकी केव्हा जाहीर होणार याबद्दल चर्चा केली जात होती. खुद्द राज ठाकरे यांनीच या चर्चेला विराम दिला असून, 25 सप्टेंबरला मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मोठे उद्योगपती येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ही प्रिंट वेबसाइट तयार करून त्यावर टाकली जाणार आहे.

सोमवार, 2 जून 2014

महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन

महाराष्ट्राचे लोकनेते, भाजपचे लढवय्ये नेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. आज (मंगळवारी) सकाळी झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर आलेला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. मुंडे यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या वृत्तामुळे भाजपसह महाराष्ट्राला जबरदस्त हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

शनिवार, 31 मई 2014

मी विधानसभा निवडणूक लढवणार! - राज ठाकरे

लोकसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला सामोरे गेले. यावेळी त्यांनी देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले. कोणत्याही कुबड्यांचा आधार न घेता बहुमताने सरकार स्थापन केल्याबद्दल राज यांनी नरेंद्र मोदींचे कौतूक केले. तसेच आपण इतर पक्षांप्रमाणे चार भिंतीच्या आत चिंतन न करता, थेट जनतेसमोर येण्याचा पर्याय निवडल्याचे सांगितले. लोकसभेतील विजयाचे श्रेय हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून हे यश फक्त नरेंद्र मोदींचेच असल्याचे राज यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे वर्णन राज यांनी विरोधी पक्ष कधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी हरत असतात असे केले. यावेळी राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे अनुयायी असल्याची उपरोधिक टीका राज यांनी केली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना महात्मा गांधींच्या संदेशाचा अर्थ उमगला व त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकीत हा संदेश प्रत्यक्षात आणल्याचे सांगत राज यांनी राहुल गांधींची खिल्ली उडविली. लोकसभेच्या पराभवाने मी खचून गेलेलो नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी नक्कीच मुसंडी मारून दाखवेन असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.
तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवासाठी राज यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनसेतर्फे नाशिकमध्ये अनेक लोकोपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्य़ात अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यापुढील काळात पक्षाच्या आदेशाशिवाय कोणतेही मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचा इशारा राज यांनी सभेत दिला.

सोमवार, 26 मई 2014

"मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी...'

नवी दिल्ली : "मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्‍वर की शपथ लेता हू, की..'' भारताचे पंधरावे पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये सुरू असलेल्या या सोहळ्यासाठी जवळपास चार हजार पाहुणे उपस्थित आहेत. यामध्ये 'सार्क'मधील आठ राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेदेखील सोहळ्यामध्ये उपस्थित असून प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये त्यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या शेजारचे स्थान देण्यात आले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या बाजूस अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई आहेत.

मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांच्यासह राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांनीही शपथ घेतली. तब्येत ठीक नसल्याने मोदी यांच्या मातोश्री हिराबा दिल्लीमधील सोहळ्यासाठी येऊ शकल्या नाहीत; मात्र, गांधीनगर येथील घरातून दूरचित्रवाहिनीवर त्यांनी हा सोहळा आवर्जून पाहिला. महाराष्ट्रातील खासदारांपैकी गोपीनाथ मुंडे आणि अनंत गीते यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मंगलवार, 20 मई 2014

स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी - मोदी

नवी दिल्ली - भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेमधील ऐतिहासिक सेंट्रल हॉल येथे आज (मंगळवार) नव्याने निवडून आलेल्या सर्व भाजप खासदारांना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे विशेष आभार मानत पक्षाचे संसदीय नेते नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढत मोदी यांनी संवेदनशील भूमिका मांडली. यावेळी अटलजी यावेळी येथे असते; तर सोन्याहून पिवळे झाले असते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

'मोदी यांना भाजपवर कृपा केली, असा शब्दप्रयोग ज्येष्ठ भाजप नेते अडवानींनी केला. मात्र त्यांनी असा शब्दप्रयोग करु नये, अशी माझी त्यांना विनंती आहे. माझ्या आईप्रमाणेच भाजप हीदेखील माझी आईच आहे. मुलगा आईवर कृपा करत नसतो; तर आईची समर्पित भावनेने केवळ सेवा करत असतो. ही पक्षाचीच कृपा आहे; की मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे,' अशी भावना अश्रु अनावर होत असताना मोदी यांनी व्यक्त केली.

मोदी उवाच -

- देशातील सर्व घटकांचा विचार करणारे व त्यांच्यासाठीच जगणारे सरकार आवश्‍यक असून ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. आज आपण लोकशाहीच्या या मंदिरामध्ये सव्वाशे कोटी देशवासीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो आहोत. ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी आपणांस स्वत:ला पूर्णत: समर्पित करावे लागेल.

- पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनंतर मी एका कार्यकर्त्याच्या भावनेमधून काम करण्यास सुरुवात केली. 15 सप्टेंबर रोजी मी हा परिश्रम यज्ञ सुरु केला व 10 मेला निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर भाजप अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना एका सैनिकाच्या भूमिकेमधून पूर्ण अहवाल सादर केला! मी केवळ एका कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून जगलो.

- गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी मुख्यमंत्री कार्यालय पाहिले व विधानसभा पाहिली. आजही असेच झाले आहे! कदाचित माझ्या आयुष्यात असेच लिहिले असेल...

- देशास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व त्यासाठी अविरत झटलेल्या सर्व महापुरुषांना मी प्रणाम करतो. मी भारताच्या संविधानकर्त्यांना प्रणाम करतो. त्यांच्यामुळेच आज येथे लोकशाहीचा विजय झाला आहे. एका गरीब कुटूंबामधून आलेली व्यक्ती आज या स्थानी उभी आहे, हेच भारतीय लोकशाही व संविधानाचे खरे यश आहे.

- या निवडणुकीमध्ये कोणाचा जय वा पराजय झाला, ही बाब आता गौण आहे. भारताच्या सामान्य नागरिकामध्येही एका नव्या आत्मविश्‍वासाचा संचार या निवडणुकीमध्ये झाला आहे; हेच या निवडणुकीचे खरे यश आहे. हे नवे सरकार गरीबांना, देशामधील कोट्यवधी तरुणांना, देशातील माता भगिनींना समर्पित आहे. देशाच्या प्रत्येक घटकास हे सरकार समर्पित आहे. माझ्या प्रचारादरम्यान मी एका नव्या भारतास पाहिले आहे. अंगावर एकच वस्त्र असलेल्या परंतु तरीही खांद्यावर भाजपचा झेंडा असलेल्या गरीबास मी पाहिले आहे. यामुळे भारतीयांच्या स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी आहे, हे भान ठेवून आचरण हवे.

- भूतकाळातील सरकारांनी काहीच चांगले काम केले नाही, असे मी मानत नाही. गतकाळातील सरकारांनी केलेली चांगली कामे पुढे नेणे आवश्‍यक आहे.

- भाजपला संपूर्ण बहुमत देण्याचा अर्थ म्हणजे देशाच्या आशा व आकांक्षांस मत असा आहे. आता जबाबदरीचा कालखंड सुरु झाला आहे.

- हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही जन्माला आलो. देशासाठी झुंजून वीरमरण पत्करण्याची संधी आम्हाला मिळाली नसेल; मात्र देशासाठी जगण्याचे अहोभाग्य आम्हाला जरुर मिळाले आहे!

- निराशा नको! 2001च्या विनाशकारी भूकंपानंतर उध्वस्त झालेला गुजरात पुन्हा एकदा नव्या जोमाने चालवायास लागला. निराशा सोडून नवी मार्गक्रमणा करावयास हवी. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांनी केवळ एक पाऊल चालले तरी देश सव्वाशे कोटी पाऊले प्रगती करेल! आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमाविणाऱ्या भारतीयांना केवळ एका संधीची आवश्‍यकता. या नव्या सरकारला अशा संधी पुरवायच्या आहेत.

- देशातील सगळ्यांचा विकास हवा; मात्र सगळ्यांचे योगदानही हवे.

- माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने व ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने हा देश पुढे नेऊ

- परिश्रमांची पराकाष्ठा करु व देश पुढे नेऊ. पुढील दोन वर्षांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे शताब्दीवर्ष आहे. 'आचार परमो धर्म' या उपाध्याय यांच्या जीवनमूल्याचा विकास अधिकाधिक कसा होईल,याचा विचार होणे आवश्‍यक आहे. भारताच्या दरिद्रिनारायणाची सेवा हेच या मूल्यांचे उद्दिष्ट आहे.

- देशातील कोट्यवधी जनतेने एका व्यक्तीस वा एका पक्षास जिंकून दिले नाही; तर भारताचे स्थान जगामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे.

- ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या खांद्यांवर बसल्यानेच मी मोठा दिसतो आहे. पक्षामध्ये पाच पिढ्या अविरत खपल्यानंतर आज हे दिवस दिसले आहेत. या सर्वांना माझे नमन आहे. या तपस्येमुळेच आज आपण सर्व येथे आहोत. संघटन हीच भाजपची ताकद आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

मोदी संसदेच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक!

नवी दिल्ली - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रथमच प्रवेश करत असलेले भावी पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन सभागृहात आले.

लोकसभा निवडणुकीत बडोदा आणि वाराणसीमधून निवडून आल्यानंतर मोदी प्रथमच संसदेत पोचले आहेत. तसेच त्यांची भाजपकडून भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आल्याने ते संसदेत पहिल्यांदाच थेट पंतप्रधान म्हणून प्रवेश करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभेत थेट मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश केला होता. 

आज सकाळी गुजरात भवनामधून संसदेत पोहचलेले मोदी गाडीतून उतरताच पहिल्यांदा सभागृहाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी नमस्कार करून संसदेत प्रवेश केला. संसदेत त्यांचे सर्व निवडून आलेल्या खासदारांनी स्वागत केले व संसदीय नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. 

Shree Narendra Modi gets Emotional crying


शुक्रवार, 18 अप्रैल 2014

उद्धवसोबत चर्चा होऊ शकते - राज ठाकरे

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे कौटुंबिक मतभेद नसून राजकीय आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच मी स्वतंत्र पक्ष काढला, माझ्या पक्षामुळे मराठी मतांत फूट पडत असल्याचे बाळासाहेब कधीही म्हणाले नाहीत, माझे राजकीय विरोधकच तसा सूर आळवतात. वास्तविक पाहता कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांनाही मराठी मते मिळत असताना मतांच्या विभागणीवर मलाच का दोष देण्यात येतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काही तात्त्विक मुद्यांवर उत्तर भारतीयांच्या विरोधात मी आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पोटावर लाथ मारून त्यांच्या हक्‍कांच्या नोकऱ्या कुणी बळकावत असेल तर मी गप्प का बसू. आसाम, तसेच पश्‍चिम बंगालमध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधात वातावरण असताना फक्‍त मला एकट्यालाच दोषी का धरले जाते, असा सवाल करून राज म्हणाले, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे फक्‍त उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यांचा गुजरातप्रमाणे विकास करावा म्हणजे आमच्या डोक्‍याचा ताप जाईल, यासाठीच मोदींना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे असल्याने भाजप नेते तुमचा पाठिंबा घेण्यास तयार नाहीत, या मुद्यावर बोलताना "पाठिंब्यासाठी फोन करून तेच माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे कधीही गेलो नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही

कितीही केसेस होऊ देत, ठोकशाही होणारच
टोलविरोधी आंदोलनाच्या मुद्यावर बोलताना "माझ्यावर कितीही केसेस झाल्या तरी घाबरणार नाही, सरकार ऐकत नसेल तर ठोकशाही होणारच,' अशी भूमिका राज यांनी मांडली. टोलसंदर्भात अनेक निवेदने दिली, चर्चा केल्या; परंतु काहीही हालचाल होत नसल्याने काही प्रमाणात हिंसक आंदोलने होणारच, असे सांगत टोल धोरणाला आपला विरोध नसून त्यातून जमा होणाऱ्या पैशाच्या हिशेबावर आपला आक्षेप असल्याचे राज यांनी नमूद केले. आठ वर्षांत कोणत्याही पक्षाच्या तुलनेत 13 आमदार, विविध महापालिकांमध्ये नगरसेवक असे यश मिळविले असून, अन्य पक्षांच्या तुलनेत मनसेची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येते. याच बळावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे निवडून येणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला. राजकारणात मी कधीही डील केले नाही, राजकारण माझ्यासाठी "मिशन' आहे, अशा शब्दांत राज यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

गुरुवार, 17 अप्रैल 2014

Raj Thakre Speech Kothrud Pune

देशाला आकार आणणारा पंतप्रधान व्हायला हवा या भावनेतून मी तब्बल तीन वर्षांपुर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता मोदींच्या सलाइनवर महाराष्ट्रभर फिरणारे तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे नाव पंतप्रधानासाठी पुढे करत होते, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेला ठाण्यात टोला लगाविला.
येथील सेंट्रल मैदानावर राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, माझा पाठींबा मोदींना आहे आणि स्वत मोदींचे त्यावर काही म्हणणे नाही. त्यामुळे माझ्या पाठिंब्याविषयी बोलणाऱ्या राजनाथ सिंगाचा या सगळ्याशी संबंध काय, असा सवाल करताना मोदींना पाठींबा देण्यापुर्वी एनडीएमध्ये विलीन व्हायला माझा पक्ष काय उत्तरप्रदेश, बिहारचा वाटला काय, असेही ते यावेळी म्हणाले. देशात मोदींचे सरकार आले तर माझ्या खासदारांना मंत्रीपद नको आणि दिले तरी मी ते घेणार नाही. फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारकडून पूर्तता व्हावी इतकीच अपेक्षा आहे, असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.  राज यांनी या जाहीर सभेत मोदी सलाइनचा एकमेव उल्लेख वगळता  शिवसेनेवर कोणतीही ठोस टीका केली नाही. राज यांची सभा ठाण्यात होत असल्याने महापालिकेत वर्षांनुवर्षे सत्तापदावर असणाऱ्या शिवसेनेच्या कारभाराविषयी राज बोलतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पालकमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीकेचे प्रहार करत असताना शिवसेनेविषयी थेट टीका करणे त्यांनी टाळल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या शाहीहल्ल्याचा राज यांनी जाहीर निषेध केला. बाबासाहेबांचे शिवचरित्र ब्राह्मणी ठरविणारे आणि त्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्यांना लाज वाटायला हवी. पेशव्यांनी केलेल्या चुकांचा इतिहास मांडत बसण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टींचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी हयात घालवली. त्यांच्यावर जातीचे शिक्के मारताना यांना लाज वाटायला हवी, असे सांगत राज यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यभर जातीचे विष पेरून ठेवल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली

शनिवार, 12 अप्रैल 2014

तरुणाईवर मोदींची भुरळ

पुणे - "अबकी बार मोदी सरकार'चा नारा... मोंदीचे मुखवटे आणि टी-शर्टमध्ये वावरणारे हजारो तरुण. शिवसेनेचा, रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा ध्वज उंचावून "मोदीनामा'चा जयघोष आणि कडेकोट बंदोबस्तात दर पन्नास फुटांवर पोलिसांची कडक तपासणी, अशा अलोट उत्साही वातावरणाने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे पटांगण शनिवारी फुलून गेले.

फटाक्‍यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह आणि जल्लोष आणि मोदी यांच्या घणाघाती भाषणाने ठाकरे यांच्या सभेची आठवण अनेकांना झाली. भाषणाच्या दरम्यान श्रोत्यांशी संवाद साधण्याचे मोदी यांचे कसब उपस्थितांना जिंकून घेत होते. दुपारी चार वाजल्यापासूनच महायुतीचे शहर व जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी एकत्र येत होते. गर्दीचा ओघ जसजसा वाढत होता तसतसे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली. सभेसाठी आलेल्या सर्वांनाच वाहनतळासाठी जागा शोधण्यासाठी कसरत करावी लागली. मैदानातील भव्य मंचावर अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. सभेची सुरवात बाळासाहेबांच्या भाषणांची चित्रफीत दाखवून केल्याने कार्यकर्त्यांमधील जोष द्विगुणित झालेला दिसत होता. महिलांची संख्याही लक्षणीय होती. मुखवटे घातलेल्या "मोदी फॅन्स'चा उत्साह दिसत होता. फटाक्‍यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या "मोदी मोदी' अशा घोषणांनी मोदींचे स्वागत झाले. मोदींनी भाषणात प्रश्‍नांच्या माध्यमातून श्रोत्यांनाही सहभागी करून घेतल्याने एकप्रकारचे चैतन्य आले. ढोल आणि नगाऱ्यांनी परिसर दुमदुमला होता. "जय भवानी जय शिवाजी', "जय भीम', "मोदीभाई आगे बढो' अशा घोषणांनी सभा डोक्‍यावर घेतली. मोदी यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दुपारपासून सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. दुपारपासून या भागातील वाहतूक वळविण्यात आली होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी करून मैदानात सोडण्यात येत होते.

शनिवार, 5 अप्रैल 2014

पैशाच्या जोरावर गृहीत धरणाऱ्यांना जागा दाखवा'

नाशिक - स्वतः मंत्री, पुतण्या खासदार, मुलगा आमदार... सगळे यांना घरामध्ये पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांची हीच का समता, असा छगन भुजबळ यांना थेट प्रश्‍न उपस्थित करीत, यांनी महाराष्ट्राला लुटले आहे. निवडणुकांमध्ये पैशाच्या जोरावर निवडून येता येते, हे गृहीत धरणाऱ्यांची मस्ती जिरवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

सिडकोत पवननगरला आज मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात श्री. ठाकरे बोलत होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे, सरचिटणीस वसंत गिते, अतुल चांडक, ऍड. उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, महापौर ऍड. यतीन वाघ, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे, शहराध्यक्ष समीर शेटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात टोलनाक्‍यांच्या संरक्षणासाठी पोलिस आहेत. पण नागरिकांच्या संरक्षणाला नाही. टोल म्हणजे मंत्र्यांचा पॉकेटमनी. हाच पैसा निवडणुकांत ओततील. भुजबळही पैसे ओततील. ओतलाच तर निवडणुका आहेत, तुम्हीही यांना लुटा. पुतण्या खासदार, मुलगा आमदार, स्वतः मंत्री सगळेच यांना घरात लागते, हीच महात्मा जोतिबा फुलेंची समता का, अशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, महात्मा फुले यांचे नाव घेता, पण त्यांच्या नखाची तरी सर आहे का, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. शेणफेक सहन करीत, स्त्रीशिक्षणाचा हट्ट धरला. इकडे तुमच्या शिक्षणसंस्था लोकांच्या डोनेशनवर उभ्या राहत आहेत, अशी टीका केली.

श्री. ठाकरे यांनी 2010 मध्येच गुजरातचा दौरा केल्याचे सांगून, तेव्हाच आपण नरेंद्र मोदी यांच्यासारखा माणूस देशाचा पंतप्रधान असला पाहिजे, असे म्हटल्याची आठवण करून देत, नरेंद्र मोदींच्या विकासकामांची स्तुती केली. राज्यात मनसेचे भूमिपुत्रांच्या प्रश्‍नावर आंदोलन पेटले होते. तेव्हा एक खासदार बोलला नाही, अशी टीका केली. हिमाचल प्रदेशात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्याच्या हमीशिवाय प्रकल्पांना मान्यता देत नाहीत. अनेक राज्यांत स्थानिक प्रतिनिधी त्यांच्या अस्मितेविषयी जागरूकता दाखवितात. फक्त महाराष्ट्रात मात्र नेमका संकुचित विचार म्हणून आम्हाला चिरडले जाते. कुणी यावे इथे मतदारसंघ बांधावेत, असे म्हणून दोन मतदारसंघांतून आबू आझमी निवडून येतो. त्यांचे लोक आपल्या मतदारसंघात पाठवितात, असे सांगत स्थानिक मराठीच्या मुद्द्याला स्पर्श केला.

राज्याची संपूर्ण सत्ता द्या राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा, असे नेहमीचे आवाहन करीत ते म्हणाले, की राज्य कसे हाकले जाते, हे दाखवून देतो. लोकसभेत कसे लोक पाठवायचे याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. कायदेमंडळ आहे. तेथे रस्ते, गटारीची कामे करण्यासाठी लोक पाठविणार का? डॉ. प्रदीप पवार
डॉक्‍टर आहेत. संवेदनशील आहेत, असे सांगून तिरुपती येथील मंदिराचे उदाहरण देत, मंदिरांचा जिल्हा असलेल्या नाशिकमधील अव्यवस्थेवर टीका केली.

19 ला टराटरा फाडतोच
मराठीच्या अस्मितेचा मुद्दा, विकासाला वेळ लागतो, हा नाशिक महापालिकेतील साक्षात्कार, महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठी राज्याच्या पूर्ण सत्तेचे आवाहन आणि सरतेशेवटी सत्ताधाऱ्यांविषयीच्या नाराजीवर कोरडे ओढीत हमखास टाळ्या मिळविणाऱ्या वाक्‍यासह पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका या मुद्द्याभोवती राज ठाकरे यांचे भाषण होते. शिवसेनेबद्दल मात्र चकार शब्दही काढला नाही. मात्र त्याच वेळी 19 एप्रिलच्या जाहीर सभेत टराटरा फाडतोच असे जाहीर आव्हानही दिले.

समीर नव्हे आमीर भुजबळ
तत्पूर्वी आमदार नितीन भोसले यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करताना, आचारसंहितेपूर्वी 15 दिवस आधीच्या विविध जाहिरातबाजीत भुजबळांनी 50 कोटी खर्च केल्याचा आरोप केला. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या बीओटी तत्त्वावरील रस्त्याचे श्रेय काका-पुतणे घेत असल्याची टीका करीत उड्डाणपुलाच्या तांत्रिक नियोजनात त्रुटी असल्यामुळेच आतापर्यंत सहा बळी गेल्याचाही आरोप केला.

उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी, वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत असल्याचे सांगताना, 2009 ते 2014 या काळात 11 कंपन्यांचे संचालक असूनही कुठलेही कर न भरताच भागविक्री केल्याचा समीर भुजबळांवर आरोप केला. तसेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी दगडाला शेंदूर लावला तरी तोही
खासदार होईल, असा विश्‍वास असल्यामुळेच पालकमंत्री छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याविरोधात लढण्याची हिंमत असल्याचा दावा केला. या वेळी ऍड. ढिकले, सौ. डेरे यांच्यासह स्थानिकांची भाषणे झाली. अशोक सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.

-माझी इंचभर तरी जागा दाखवा अन्‌ फुकट घेऊन जा.
-त्यांनी महाराष्ट्र लुटला, तुम्ही निवडणुकीत यांना लुटा.
-जेथे महिलांची उपस्थिती तेथे विजय असतो निश्‍चित.
-विकास करायचा तर, वेळ लागतोच.

मंगलवार, 1 अप्रैल 2014

मनसे खेळतेय 'डेंजर झोन'मध्ये!

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा; मात्र भाजपविरोधात मनसेचा उमेदवार ही राज ठाकरे यांची खेळी मतदारांच्या आकलनाच्या पलीकडची आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? राज यांच्या मनसुब्यांमुळे मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे.

एक कार दिल्लीला चालली आहे. या कारमध्ये पाच मंडळी बसलेली आहेत. सहाव्या भिडूला गाडीत यायचे आहे. पण, कारमध्ये जागाच नसल्याचे सांगून कारमधील एक जण या भिडूला आतमध्ये येऊ देत नाही. त्याला धडा शिकवायचा विचार भिडूने केला आहे. पण, कार तर दिल्लीला पोचली पाहिजे, असेही त्याला वाटते आहे. या भिडूला आतमध्ये न घेणाऱ्याला बाहेर ढकलता येणे शक्‍य नसल्याने त्याने गाडीच पंक्‍चर करायची ठरवली आहे. पंक्‍चर केलेली गाडी हलत नाही. पण, ती दिल्लीला पोचण्यासाठी हा भिडू पाठीमागून गाडीला धक्का मारत आहे. कशी आहे सिच्युएशन? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात उभे केलेले उमेदवार पाहिल्यावर या कारचे चित्र समोर उभे राहते. राज यांना महायुतीत येण्यास उद्धव यांनी विरोध केला, असे त्यांनी पुण्यातील सभेत सांगितले. याचाच दुसरा अर्थ असा, की मी युती करायला तयार होतो, असे त्यांना सांगायचे असावे. ""उद्धव यांनी त्यास विरोध केल्याने आता माझी औकात दाखवितो,'' असे आव्हान राज यांनी दिले आहे. हे "औकात' दाखविणे म्हणजे काय? तर सारी ताकद पणाला लावून शिवसेनेचे उमेदवार पाडतो, असेच राज यांना सांगायचे आहे. शिवसेनेची ताकद घटली, तर भाजपला मनसेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोदी यांना पाठिंबा देऊन राज एक पाऊल पुढे आले आहेत. शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्यासाठी उद्धव यांनी मला भाग पाडले आहे, असे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडले, तर त्याला मी जबाबदारी नाही, उद्धव यांचा कोतेपणा त्यास जबाबदार असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

हे सारे मतदारांना समजावून सांगणे अवघड आहे. त्यांची अडचण ही पुण्यातील सभेत लक्षात आली. पुण्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा आहे. त्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे. आता थेट मोदींच्या पक्षाचा उमेदवार असताना परत मोदींना पाठिंबा द्यायचा म्हणून मनसेच्या उमेदवाराला मतदान कशाच्या आधारावर करायचे, हा गोंधळ मतदारांपुढे आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. त्यामुळे त्यांनी पुण्यातील पहिल्या सभेत भाजपवर आणि भाजपच्या उमेदवारावर टीका करायचे टाळले. कदाचित, यानंतर होणाऱ्या पुण्यातील दोन सभांत ते भाजपला लक्ष्य करतीलही. भाजपचा उमेदवार पाडा आणि मोदींना पाठिंब्यासाठी मनसेच्या उमेदवाराला मत द्या, असे विसंगत वाटणारे आवाहन मतदारांच्या पचनी पडेल?

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत मनसेची पाटी कोरी होती. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडल्यानंतर मनसेची पाटी कोरी राहिली नाही. "मी कोणाला पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केलेले नाहीत,' असे राज ठाकरे सांगत असले, तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका हा अंतिमतः शिवसेनेलाच बसणार आहे. शिवसेनेचे काही उमेदवार पराभवाच्या छायेत उभे करण्याचे काम मनसेने चोखपणे बजावले आहे. या साऱ्या बाबींचा फायदा अंतिमतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ज्या जागा धोक्‍याच्या वाटत होत्या, त्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुस्कारा टाकला आहे. "लोकसभा निवडणूक लढविणे, हे राज ठाकरे यांच्यासाठी अपरिहार्य होते,' हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विधानही बरेच काही सांगून जाते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही सेनांना योग्य वेळी छानपैकी सांभाळले आहे. त्यांना सांभाळल्यामुळे कॉंग्रेसला थेट असा विरोधक तयार झाला नाही. (झालाच तर, कॉंग्रेसमधीलच मंडळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम करतात.)

तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज यांचा मनापासून विरोध आहे, असे मानले तरी त्यांची कृती प्रत्यक्षात उलटाच परिणाम घडवून आणणारी आहे. मराठी पाट्यांचे आंदोलन असो की टोलचा विषय असो, हे विषय असेच मध्येच मनसेकडून सुटल्यासारखे दिसतात. त्याचा "लॉजिकल एंड' नजरेस येत नाही. त्यांच्या भाषणासारखाच. त्यांच्या भाषणातही असेच मुद्दे एकावर एक आदळत असतात. विशिष्ट मुद्द्यावर ते आणखी काही बोलतील, असे वाटत असतानाच दुसराच मुद्दा ते भाषणात सुरू करतात.

मोदींना सहकार्याचा हात आणि दुसरीकडे त्याविरोधात उलटा परिणाम घडवून आणणारी कृती मतदारांच्या लक्षात येते. असे किती वेळा होणार? राज यांच्या मनसुब्यांमुळेच मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसशी हात जवळ केलेले अरविंद केजरीवालही सध्या "डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यांचेही वागणे तर्कदृष्ट्या जनतेला पटले नाही. कॉंग्रेसला विरोध करायचा आणि त्यांच्याच सहकार्याने सरकार स्थापन करायचे आणि त्यांनाच शिव्या देत सरकारमधून बाहेर पडायचे. हा "शो' म्हणून ठीक आहे. राजकारण म्हणून या "शो'चे प्रयोग सतत होऊ शकत नाहीत. या "शो'मुळे विश्‍वासार्हतेला धक्का बसतो. मनसेसाठीचा "डेंजर झोन' म्हणजे एकदम एक्‍झिट नव्हे; पण एक्‍झिटकडे जाणारा दरवाजा आहे. येथून "लाइफलाइन' मिळाली तर पुढे टिकता येते. लोकसभेची ही निवडणूक मनसेला लाइफलाइन देणारी ठरेल का? काही जागांवर यश मिळाले, तर मनसेला लाइफलाइन मिळेल. गेल्या वेळेप्रमाणे अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकावरच मनसेला मतदारांनी रोखले, तर हा "डेंजर झोन' अधिक गडद होईल.

राज यांचा 'संकल्प'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपणच वारस आहोत, असा दावा करणारे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील आणि राज्यावर पुन्हा एकदा "शिवशाही'ची गुढी उभारतील, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांची झोप कायमची उडवण्याचे काम राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचाच मुहूर्त साधून केले आहे. पुण्यातील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा प्रारंभ करताना, त्यांनी आपल्या स्वभावधर्मानुसार नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच; पण त्याच वेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख घटकांमधील परस्परसंबंधांबाबत मतदारांमध्ये अधिकाधिक दुराव्याचे, तसेच अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे कामही केले. त्यानंतर लगोलग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर समझोता अशक्‍य असल्याचे स्पष्ट केल्याने आता ही भाऊबंदकी अशीच पुढे चालत राहणार, यावर शिक्‍कामोर्तबही होऊन गेले.

खरे तर या निवडणुकीत मनसेने भाजपला बहुतांशी सूट देऊन केवळ शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाच राज यांचे डावपेच स्पष्ट झाले होते. शिवाय, त्याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर करत, आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो हेही सूचित केले होते; पण या "गुगली'नंतरही पुण्यातील सभेत मात्र त्यांचा बहुतांश वेळ आपण हे का केले, याबाबतचा खुलासा करण्यातच गेला. राज यांना महायुतीत सामील होण्याची मनापासून इच्छा होती, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून आणि देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. "मला खरोखरच बरोबर घ्यायचे होते, तर ती चर्चा मीडियातून कशी होऊ शकते, त्यासाठी एक फोन करावयाचा होता. मी विचार केला असता...' या विधानातूनच त्यांची अंतरीची इच्छा जाहीर झाली, शिवाय त्याचवेळी मतदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देशही स्पष्ट झाला.

पण या सभेतील राज यांचा "दुसरा' हा अधिक रोखठोक होता. "मनसे' महायुतीत येऊ नये, ही उद्धव यांचीच इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनीच आपल्याला सांगितल्याचे त्यांनी एकवीरादेवीची शपथ घेऊन जाहीर केले! त्यामुळे भाजप नेते तर अडचणीत सापडलेच; शिवाय आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो, हेही जाहीर करून ते मोकळे झाले. शिवाय, आपली "औकात' नेमकी काय आहे, ते या निवडणुकीत दाखवून देण्याचा विडाही त्यांनी मुळा-मुठेच्या साक्षीने उचलला आहे. त्यामुळे एकदा का लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बोजवारा उडाला, की मोदी-गडकरी आदी कंपनी विधानसभेच्या वेळी शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर जाण्याचा आग्रह धरणार, हेही उघड आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीतच शिवसेनेला नामोहरम करण्याचा राज यांचा इरादाही उघड झाला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत देशापुढील अजेंडा काहीही असला तरी, या दोन भावांची लढाई मात्र एकमेकांशीच राहणार आहे. एका अर्थाने ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाचीच लढाई आहे, हेच खरे!

सोमवार, 31 मार्च 2014

शिवसेनेला औकात दाखवतोच - राज ठाकरे

पुणे - 'लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या महायुतीमध्ये घ्यायचे होते, तर चर्चा पसरविण्यापेक्षा मला थेट फोन करायचा होता. पण, शिवसेनेला मला युतीमध्ये घ्यायचेच नव्हते. माझी औकात काय, असे विचारणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत माझी औकात दाखवूनच देतो,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत शिवसेनेला सोमवारी थेट आव्हान दिले. पंतप्रधानपदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी यांनाच "मनसे' पाठिंबा देणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

लोकसभा निवडणुकीतील "मनसे'च्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांनी फोडला. येथील नदीपात्रात सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या प्रसंगी "मनसे'चे सर्व उमेदवार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज-गडकरी भेट, तर शिवसेना आणि दै."सामना'तून त्यावर झालेली टीका, यावर राज ठाकरे यांनी भर देतानाच उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर प्रखर टीका केली. एकीकडे मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करतानाच दुसरीकडे मात्र नितीन गडकरी यांची पाठराखण केली. "त्यांच्या पोटात एक आणि ओठात असा हा माणूस नाही. तो एक चांगला माणूस आहे, आजही माझे त्यांच्याबद्दल हेच मत आहे,' असे स्पष्ट करून ठाकरे यांनी गडकरींशी मैत्री असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध लढण्याऐवजी "मनसे'च्या अंगावर येण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोणाला मदत व्हावी म्हणून नाही, तर विजयी होण्यासाठी, दिल्लीत मराठी माणसाचा आवाज काढणारे कोणीतरी असावे, यासाठीही उमेदवार उभे केले आहेत, असा दावाही राज यांनी केला.

ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रस्ताव गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या "सामना'तूनही त्याबाबत भाष्य प्रसिद्ध झाले होते. शिवसेनेने हात पुढे केला असून, "मनसे'ने टाळी द्यायला हवी, असे त्यात म्हटले होते. पण खरोखरच मनसेला बरोबर घ्यायचे होते, तर एक फोन तरी करायचा होता. सगळी चर्चा वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनच. महायुतीमध्ये मनसेला घेण्यास शिवसेनेचा नकार होता. शिवसेनेला फक्त आम्ही किती उदार आहोत, हेच दाखवायचे होते. शिवसेनेचा विरोध होता, असे भाजपचे नेते सांगत होते. याबाबत खरे-खोटे करायचे असेल, तर केव्हाही समोर येण्यास मी तयार आहे.''

मुंबई महापालिका ताब्यात असूनही शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता येत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ जाते, ही शिवसैनिकांशी प्रतारणा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, ""पाहिजे तेव्हा वापरायचे, पाहिजे तेव्हा भेटायचे असे उद्योग यांचे.''

भारती विद्यापीठाकडून डोनेशन परत घ्या कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. या देशाला कॉंग्रेसने आजपर्यंत लुटले. त्यामुळे निवडणुका हाच त्यांना लुटण्याचा एक मार्ग आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""भारती विद्यापीठात प्रत्येक प्रवेशासाठी डोनेशन घेतले जाते. ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिले त्यांनी आता भारती विद्यापीठात जाऊन डोनेशन परत मागावे. त्यांना ते लगेचच मिळेल. प्रवेशापोटी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या भारती विद्यापीठाकडून आता निवडणुकीत मतदारांना पैसे मिळणार आहेत. ते जरूर घ्या, पण "मनसे'लाच मत द्या,''

पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोंदी यांनाच पाठिंबा देतील, असे राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपमध्येही खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपने आयोगाकडेही तक्रार केली. त्यावर राज यांनी या पुढेही "मोदी अजेंडा' राहणार असल्याचे सूचित केले. ठाकरे म्हणाले, ""या देशाला सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व मोदी देऊ शकतात. म्हणूनच त्यांना पाठिंबा देऊ केला आहे.'' काही गोष्टी त्यांच्या मला पटल्या नाहीत. त्यामुळे मध्यंतरी मी त्यांच्यावर बोललो. परंतु ती टीका नव्हती. तर तो मैत्रीचा सल्ला होता, असेही खुलासा ठाकरे यांनी केला.

'बाळासाहेबांना आणि शिवसेनेला सोडून का गेला म्हणून मला विचारता. परंतु मला पक्ष सोडण्याची वेळ या नालायकांच्या गोतवळ्यामुळेच आली. बरे झाले शिवसेना सोडली, आता असे वाटते.''
- राज ठाकरे

रविवार, 9 मार्च 2014

नवनिर्मित गणित! (अग्रलेख)

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या अर्ध्या डझनाहून अधिक उमेदवारांच्या विजयात ज्यांनी हातभार लावला ती "महाराष्ट्र नवनिर्माण सेना' यंदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही, याबाबत गेले काही दिवस सातत्याने उठणाऱ्या वावड्यांवर अखेर पडदा पडला आहे. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात सात उमेदवारांची घोषणा करून, राज ठाकरे यांनी हा पडदा टाकला असला, तरी त्याच वेळी आपली आगामी खेळी नेमकी काय असेल, याबाबतची जनतेच्या मनातील उत्सुकता कायम राहावी, याचीही दक्षता घेण्यात ते यशस्वी झाले आहेत! त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या उमेदवारांची घोषणा करतानाच, आपले खासदार हे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील, असेही जाहीर करून ते मोकळे झाले आहेत. केंद्रात भाजपला मदत, राज्यात युतीला विरोध, असे अजब समीकरण मांडून ज्याला त्याला हवा तो अर्थ काढण्याची सोय मनसेच्या घोषणेने करून ठेवली आहे. मनसेचे किती खासदार विजयी होतील, हा प्रश्‍नच असला, तरीही यात एक गोम आहेच. मुंबई या आपल्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राज यांनी एकही नाव जाहीर केलेले नाही.

त्यांच्या सात उमेदवारांपैकी फक्‍त एकच उमेदवार पुण्यात भाजपविरोधात लढणार आहे! शिवाय, मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात आपले आणखी काही उमेदवार आपण येत्या दोन-चार दिवसांत जाहीर करू, असे त्यांनी सांगितल्यामुळे याबाबतची त्यांची खेळी त्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. राज यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्‍न तर निर्माण झाले आहेतच; पण त्यामुळेच त्यांच्या मनात नेमके काय आहे, याबाबतही लोकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ शकते. मनसेचे खासदार मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार असतील, तर मग त्यांनी शिवसेना-तसेच भाजप यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे कारणच काय? मोदी पंतप्रधान व्हावेत, असा विचार राज यांनी आजच केलेला असणे शक्‍य नाही. मोदी आणि राज यांचा दोस्ताना जुना आहे. 2007 मध्ये गुजरातेत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी नरेंद्रभाईंना शुभेच्छा पोचवण्यासाठी राज यांनी शिशिर शिंदे यांना धाडले होते. शिवाय, गुजरातमधील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आपल्या "थिंक टॅंक'ला घेऊन मध्यंतरी राज जातीने गुजरातेत गेले होते आणि तेथे त्यांचे लाल गालिचा घालून स्वागतही झाले होते. तरीही दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांनंतर भाजपच्या नेत्यांनी त्या टीकेचा खरपूस समाचार घेतल्यामुळे आधी भाजप आणि राज यांच्यात असलेल्या कमालीच्या "सौहार्द'पूर्ण संबंधांमध्ये बराच तणावही निर्माण झाला होता. मग आता नेमके असे काय घडले, की मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, असे राज यांना अचानक वाटू लागले, या प्रश्‍नाचे उत्तर गेल्या पंधरवड्यात नितीन गडकरी यांनी मनसेने निवडणूक लढवू नये, यासाठी घेतलेल्या राज यांच्या भेटीत आहे काय? की ही विधानसभा निवडणुकीसाठी वेगळ्या समीकरणांची जुळवाजुळव आहे? या आणि अशाच अनेक प्रश्‍नांचा भूलभुलैया राज यांच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. मुळात, उद्धव आणि राज या दोघांच्या कट्टर शत्रुत्वामुळेच त्या दोघांबरोबरच भाजपचेही राजकारण पेंड खात आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. महायुतीत राज यांना सामावून घेण्यास भाजपमधील कोणाचाच विरोध नव्हता आणि केवळ उद्धव यांच्यामुळेच ते शक्‍य झालेले नाही, हेही आता गुपित राहिलेले नाही. खरे तर राज यांची गेल्या काही दिवसांत भलतीच कोंडी झालेली होती. एकीकडे उद्धव यांच्याशी असलेले हाडवैर आणि दुसरीकडे भाजपशी असलेली मैत्री, अशा पेचात ते सापडले होते. त्या वेळी शेकापचे जयंत पाटील आणि जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांनी त्यांची भेट घेतली आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू करून दिली. त्यामुळे देशात गेले चार महिने लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागले असताना, स्वस्थचित्त राहिलेल्या राज यांच्या ताकदीचे महत्त्व अधोरेखित झाले. पण तिसऱ्या आघाडीच्या या चर्चेवर पुन्हा भाजप नेत्यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्यासाठी राज यांची भेट घेऊन पाणी फिरवले, पण त्यामुळेच राज ठाकरे जोरात आले, ही बाबही नाकारण्याजोगी नाही. या पार्श्‍वभूमीवर अखेर राज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवारांचे धाबे काही प्रमाणात दणाणून गेले असणार, हे उघड आहे. पण आता मनसेचे बळ पाच वर्षांपूर्वीइतके राहिले आहे काय, याचा विचार साऱ्यांनीच करायला हवा. शिवाय, या वेळी जनतेपुढे आम आदमी पक्षाचाही पर्याय खुला आहेच. पण एक मात्र नक्‍की! राज मैदानात उतरल्यामुळे प्रचारात रंगत येणार आणि टीव्ही चॅनेलांचाही टीआरपी वाढणार, हेही नसे थोडके!

शनिवार, 8 मार्च 2014

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार ,नरेंद्र मोदी यांना पाठिंबा.

ठाणे - आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढविणार असून, निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.

मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यातील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेचे सर्व आमदार व राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी जमले होते. 'एम एन एस अधिकृत' या नावाने मनसेच्या अधिकृत ऍपचे उदघाटन राज यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी मनसेत प्रवेश केला. 

राज ठाकरे म्हणाले, ''लोकसभा निवडणूक लढविणार न लढविणार अशी आतापर्यंत अनेकांची चर्चा सुरू होती. पण, सर्वांना बोलून दिल्यानंतर योग्यवेळी मुसंडी मारायची असते. आज मी मनसे निवडणूक लढविणार हे स्पष्ट करतो. या निवडणुकीत माझी काय ताकद आहे, ती सर्वांना दाखवून देणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनसेच्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पुढील यादी जाहीर होईल. लवकरच पहिल्या सभेची तारिख जाहीर करणार आहे. यावेळी मी सर्वकाही स्पष्ट करणार आहे. आपण सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. मला खात्री आहे, की आपले खासदार निवडून येतील. निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. देशाच्या भविष्यासाठी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे, मला वाटते.'' 

सर्वांच्या सहकार्यामुळे मी पक्ष यापुढेही नेत राहिन. गारपीटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. येत्या काही दिवसांत मी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. आचारसंहितेचा विषय मधे न घेता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर,
 उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर,
 कल्याण - राजीव पाटील,
शिरूर - अशोक खांडेभराड,
 नाशिक - डॉ. प्रदीप पवार,
 पुणे - दिपक पायगुडे

मंगलवार, 4 मार्च 2014

लोकसभा निवडणूक नऊ टप्प्यांत;16 मेला निकाल

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केली. देशभरात नऊ टप्प्यांत मतदान होणार असून, 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेबरोबरच सरकार आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

व्ही. एस. संपत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकांबरोबरच विभाजन झालेल्या तेलंगण व सीमांध्र, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांत मतदान होणार आहे. या तिन्ही विधानसभांचे निकालही 16 मे रोजीच लागणार आहेत. देशभरात सात एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार आहे.

या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती. विद्यमान लोकसभेचा कालावधी एक जूनला संपत असल्यामुळे 31 मेपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणार आहे.

निवडणुकांची वैशिष्ट्ये -
  • लोकसभा निवडणुका नऊ टप्प्यांत होणार
  • सात एप्रिल ते 12 मे दरम्यान देशभरात मतदान होणार
  • पहिला टप्पा 7 एप्रिल, दुसरा 9 एप्रिल, तिसरा 10 एप्रिल, चौथा 12 एप्रिल, पाचवा 17 एप्रिल, सहावा 24 एप्रिल, सातवा 30 एप्रिल, आठवा 7 मे आणि नववा 12 मे 
  • 16 मे रोजी मतमोजणी होणार
  • 10, 17, 24 एप्रिलला तीन टप्प्यांत महाराष्ट्रात मतदान होणार
  • आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओरिसामध्ये विधानसभा निवडणुका होणार
  • निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली माहिती
  • लोकसभा निवडणुकांच्या तारखा ठरविताना परीक्षा, हवामानाचा विचार
  • विभाजनानंतर आंध्र प्रदेशात प्रथमच निवडणुका होणार
  • यंदाच्या निवडणुकीत देशातील 81.4 कोटी मतदार मतदान करणार
  • 31 मे पूर्वी 16 वी लोकसभा स्थापन होणार
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 कोटी मतदार वाढले
  • मतदानासाठी 9 लाख मतदान केंद्रांची उभारणी
  • आजपासून आचारसंहिता लागू
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार केंद्रांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली
  • लोकसभा निवडणुकीत नकारात्मक मतदानाचा वापर होणार
  • मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 मार्चला राबविण्यात येणार विशेष मोहिम
  • उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार

सोमवार, 3 मार्च 2014

मनसेने लोकसभा लढवू नये;भाजपचा प्रस्ताव

गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा
मुंबई - नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, हा प्रस्ताव घेऊन आज भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आज दुपारी सुमारे दीड तास चर्चा केली. ही भेट गुप्त ठेवण्याची खबरदारी घेण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न होता; पण बातमी फुटल्याने, हिंदुत्ववादी शक्‍तींना बळकट करण्यासाठी मनसेने मदत करावी, अशी विनंती करण्यासाठी ही भेट झाल्याचे सायंकाळी गडकरी यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मात्र या भेटीबाबत मौन बाळगले असून येत्या एक-दोन दिवसांत ते या संदर्भात बोलतील अशी चर्चा आहे. मनसेने अद्याप उमेदवारांची नावे घोषित केली नसल्याने या निवडणुकीत ते केवळ काही जागा लढवणार की पूर्णत: विश्रांती घेणार, अशी विचारणा सुरू झाली आहे. केवळ काही महिन्यांच्या कालावधीने होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, मनसे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेईलच कसा, असाही विषय मांडला जातो आहे.

गडकरी बऱ्याच दिवसांच्या मध्यांतरानंतर आज मुंबईत आले. निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आज भाजपचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष पियूष गोयल आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह गडकरी वरळी परिसरात गेले. काही वेळातच तेथे राज ठाकरे दाखल झाले. ही बातमी बाहेर फुटल्याने माध्यमांचे प्रतिनिधी तेथे हजर झाले. आशीष शेलार यांनी प्रारंभी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे ट्‌विट केले; पण त्यानंतर लगेचच भारत कॉंग्रेसमुक्‍त करण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनीच माध्यमांना कळवले.

राज ठाकरे काय करणार? मोदी यांच्यासंदर्भात काही वर्षांपूर्वी घेतलेल्या कौतुकाच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पंचाईत होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच केवळ काही दिवसांनी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मनसेचे आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार नाहीत. गेल्या निवडणुकीत झालेल्या मतविभाजनामुळे भाजपला फटका बसला. त्यामुळे आता काळजी घेत मनसेला समजावण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी चर्चा आहे. मात्र राज यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या विधानांमुळे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाहीत, असे मानले जाते. गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

सेनेची संघटना कामाला
या गुप्त भेटीची माहिती फोर सीझन हॉटेलातील शिवसेनेच्या कामगार संघटनेने चोखपणे नेत्यांना कळवल्याची जोरदार शक्‍यता आज वर्तवण्यात येत होती. राज यांना भाजपने कोणत्याही प्रकारे मदत करू नये, अशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे या भेटीबाबत सेनेची प्रतिक्रिया फारशी अनुकूल नसेल, असे सांगण्यात येत आहे.

""होय, मी राज ठाकरे यांची भेट घेतली. हिंदुत्ववादी शक्‍तींचे हात बळकट करण्यासाठी मनसेनेही वेगळे धोरण स्वीकारावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे.''
नितीन गडकरी, भाजप नेते

मनसे महायुतीत आल्यास फायदा : आठवले
गडकरी यांनी राज यांची भेट घेताच महायुतीत सहभागी झालेले नवे भिडू रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, तसेच स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी बेरजेच्या राजकारणाचा फायदाच होईल, असे मत व्यक्‍त केले.

गुरुवार, 20 फ़रवरी 2014

टोल घेणाऱ्यांची 'हजेरी' न घेताच राज गेले निघून!

मुंबई- टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी खुद्द राज ठाकरे खारीगावच्या टोल नाक्‍यावर येणार आहेत, अशी अफवा पसरली आणि ठाण्यात सगळेच बोंबलत फिरू लागले. प्रसारमाध्यमांची धावपळ उडाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. राज खरोखरच आले; पण ते आपल्या 9 क्रमांकाच्या वातानुकूलित कारमधून नाशिकच्या दिशेने टोल न भरताच निघून गेले.

ही अफवा पेरणारे तोंडही तिथेच कुठे तरी "आ' वासून पाहत राहिले असावे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी धुमशान घालण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले.

लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नवे टोल धोरण जाहीर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज यांना दिले आहे. धोरण जाहीर होईपर्यंत टोल न भरण्याचे आवाहन राज्यातील वाहनचालकांना राज यांनी केले आहे. त्यामुळे एका वाहनचालकाने ठाण्यातील खारीगाव नाक्‍यावर टोल भरण्यास बाणेदारपणे नकार दिला.

राज यांचे नाव घेतल्यावरही त्याच्याकडून टोल घेण्यात आला. यामुळे तो डिवचला गेला. त्याने हळूच वाऱ्यावर एक अफवा सोडून दिली- राज यांना ही घटना समजली आहे. टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी राजविषयी अनुद्‌गार काढलेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दस्तरखुद्द राज आज खारीगाव टोल नाक्‍यावर येणार आहेत.

आधी दबक्‍या आवाजात याबाबत चर्चा सुरू झाली. नंतर कर्णोपकर्णी झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांना नवा जोम चढला. कामधाम सोडून सगळे नाक्‍यावर जमले. काही पत्रकारही धावले. याची खातरजमा करण्यासाठी मनसेच्या एका नेत्याशी "सकाळ'ने संपर्क साधल्यानंतर यात तथ्य नसल्याचे समजले.

कार्यकर्ते नाक्‍यावर जमले होते. बराच वेळ वाट पाहिल्यावर अखेर राजसाहेबांची कार आली. कारचा 9 नंबर पाहिल्यावर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले; पण कार आली आणि गेलीही. टोल न भरताच गेली. जल्लोष करणारे कार्यकर्ते "आ' वासून पाहतच राहिले. नाशिक येथील "गोदा पार्क'च्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करण्यासाठी राज खारीगाव टोल नाक्‍यावरून भरधाव निघून गेले.

कार येताच काही कार्यकर्त्यांनी मग टोल नाक्‍यावर "खळ्ळखट्ट्याक'चा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. काही दगड फेकले गेले; पण पोलिसांनी राजची कार निघून जाताच लाठ्या सरसावल्या. दोन-चार जणांना याचा प्रसाद मिळताच कार्यकर्ते पांगले. साहेब का थांबले नाहीत, हे त्यांनाही कळले नाही आणि कार्यकर्ते का जमलेत हे राजसाहेबांनाही कळले नाही. याआधी जबरदस्तीने ज्याच्याकडून टोल घेतला गेला आणि ज्याने ही अफवा पसरवली, त्याने पाहिले की साहेबांकडून टोल घेतला गेलाच नाही! किमान साहेबांनी टोल भरला नाही, याच समाधानात त्यानेही घरची वाट धरली.

शनिवार, 15 फ़रवरी 2014

केजरीवाल यांच्या राजीनाम्या नंतरची बदललेली राजकीय परिस्तिति

अरविंद केजरीवाल यांनी काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याचा अंदाज मागच्या २ आठवड्यापासून आल होता , नाहीतरी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी "मोकळे "  होण्याचे कारण पाहिजे होते , ते जनलोकपाल च्या निमित्ताने झाले . मुळात ज्या दिवसापासून ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून "पता  नाही सरकार कब तक चलेगी " सारख्या ववक़्त्व्यन्नि ते दिसत होते
केजरीवाल यांच्या कालच्या बलिदान मुले (stunt ?) लोकसभेच्या जागांवर बराचसा प्रभाव पडेल असे दिसते , AAP चे उमेदवार ५/१० जागावर निवडून येतील पण  BJP च्या निवडून येणाऱ्या  ३०-४० जागा पडतील ,आणि याचा फायदा कॉंग्रेस ला होईल आणि कॉंग्रेस १५०-१६० जागा जिंकेल , यात दोन शक्यता आहेत १] कॉंग्रेस (सो called  सेकुलर ) front उभा करून SP+BSP+NCP+DMK+AIDMK+TMC+RJD+LEFT असे करून २७२ पर्यंत पोहचतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील (कदाचित ) २] आणि जरी BJP १९०-२०० पर्यंत पोहचली तरी बहुमतासाठी ७२ जागा कमी पडतात आणि बाकीचे "so called secular" पक्ष नरेंद्र मोदीन पाठींबा देणार नाहीत किंवा अडवाणी , स्वराज  सारखे सर्वमान्य व्यक्ती  पंतप्रधान साठी उभे राहू शकते आणि त्यांना बाकीचे पक्ष पाठिंबा देऊ शकतात, पण अशा परिस्तितित हा कॉंग्रेस चाच विजय असेल कारण मोदी सोडून bjp चा कुठलाही पंतप्रधान होणे म्हणजे कॉंग्रेस चाच विजय आहे . भाजप ला मोदी सोडून दुसरा कोणीही नको असेल तर मग  पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील ,तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल .

गुरुवार, 13 फ़रवरी 2014

टोल भरण्यास जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात धुमशान

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर 21 फेब्रुवारीला टोलविरोधात काढण्यात येणारा मनसेचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. "टोल बंद' आंदोलन मात्र सुरू राहील, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. टोल भरण्यास नकार देणाऱ्या वाहनचालकांवर ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात घुसून माझे कार्यकर्ते जे थैमान घालतील त्याला आपण जबाबदार नसू, असा इशाराही राज यांनी दिला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राजसोबत मनसेचे काही नेते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात गेले होते. त्यानंतर दुपारी "कृष्णकुंज' या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी ठेकेदारांना वाहनचालकांवर टोलसाठी जबरदस्ती करू नका, असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही टोलविषयी आश्‍वासने दिली आहेत. या वेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक वाटल्यानेच 21 फेब्रुवारीचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही नवे धोरण आणण्याचा दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही तर नागरिकांनी टोल भरू नये, या भूमिकेवर आपण ठाम आहोत, असे राज यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टोल नाक्‍यावरील कामगारांकडून जबरदस्तीने टोल घेतला जातो, याकडे लक्ष वेधल्यावर अशा संबंधित ठेकेदाराच्या घरात शिरून माझे कार्यकर्ते थैमान घालतील, असा इशारा त्यांनी दिला.
टोलच्या एकूण कारभाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात यावी, या मागणीवर आपण ठाम आहोत. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एसटी बसना टोल माफ केला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बेस्टच्या बसनाही टोल माफ करण्याची आपली मागणी आहे, असे ते म्हणाले. या वेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रस्त्यांमधील फरक दर्शविणारी छायाचित्रे त्यांनी पत्रकारांना दाखविली. टोल न देता कर्नाटकमधील नागरिकांना चांगले रस्ते मिळाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले. आंदोलन वाढत जाईल या धास्तीनेच मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेऊन चर्चा केली, असे राज म्हणाले. टोल आकारण्यात येत असलेल्या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा नसल्याने अनेकांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या धोरणात त्रुटी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

ठेकेदारांना भेटण्यात रस नाही टोलचे काही ठेकेदार आपल्याला भेटण्यासाठी आले होते का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर ठेकेदारांना भेटण्यात आपल्याला रस नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सरकारबरोबर चर्चा करुन टोलविषयक धोरणावर निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळेच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या "मिफ्टा'च्या कार्यक्रमासाठी सिंगापूरला जाणे मी टाळले. या कार्यक्रमाचे प्रायोजक "आयआरबी' असल्याने मी गेलो नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

"मनसेमुळे 67 टोल नाके बंद' मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात 67 टोल नाके बंद पडल्याचा दावा राज यांनी केला. 10 ऑगस्ट 2012 पासूनच टोलविरोधातील भूमिका मनसेने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. टोलविरोधी आंदोलनात मी सरकारविरोधात बोलत असताना विरोधक मात्र माझ्याच विरोधात बोलत आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भाषा सरकारला कळली नाही. त्यामुळेच आमच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असे ते म्हणाले.

येथे होते दामदुप्पट वसुली सरकारचे नियम धाब्यावर बसवून दामदुप्पट वसुली सुरू आहे, असा दावा राज यांनी केला. कागल - सातारा रस्त्यावर सरकारी सूत्रांप्रमाणे 62 रुपये टोल अपेक्षित असताना 124 रुपये घेतले जातात. आणेवाडी (सातारा) - खेड शिवापूर रस्त्यावर 24 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, खेड शिवापूर - पुणे रस्त्यावर 15 रुपये अपेक्षित असताना 70 रुपये, मुंबई - पुणे रस्त्यावर 53 रुपये अपेक्षित असताना 87 रुपये, पुणे - शिरुर रस्त्यासाठी 30 रुपये अपेक्षित असताना 37 रुपये, शिरुर - नगर रस्त्यासाठी 26 रुपये अपेक्षित असताना 35 रुपये, नगर - औरंगाबाद रस्त्यासाठी 58 रुपये अपेक्षित असताना 75 रुपये, औरंगाबाद- जालना रस्त्यासाठी 32 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, मुंबई - पुणे (एनएच 4) - नगर - औरंगाबाद-जालना रस्त्यासाठी 205 रुपये अपेक्षित असताना 284 रुपये, पुणे - बेळगाव रस्त्यासाठी 167 रुपये अपेक्षित असताना 294 रुपये, मुंबई-पुणे-बेळगाव रस्त्यासाठी 240 रुपये अपेक्षित असताना 381 रुपये टोल घेतला जातो, असा आरोप राज यांनी केला.